11 स्किन केअर टिप्स l 11 Skin Care Tips
चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी अकरा स्किन केअर टिप्स (11 Skin Care Tips).
चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. पण चेहरा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी तुम्हाला रोज चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. इथे अकरा स्किन केअर टिप्स (11 Skin Care Tips) दिल्या आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या तर तुमचा चेहरा सुंदर आणि सतेज दिसण्यास मदत होईल. तर चला पाहूया या कोणत्या स्किन केअर टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा उजळू शकता.
![11 Skin Care Tips](https://growthackmarathi.com/wp-content/uploads/cwv-webp-images/2023/10/11-Skin-Care-Tips-1024x576.jpg.webp)
चेहऱ्यावर सनस्क्रीन वापरावे
बाहेर जाताना नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन चा वापर करणे आवश्यक आहे. सध्या उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात चेहरा काळवंडतो त्यामुळे त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि पॉल्युशन पासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लोशन नियमित वापरावे.
स्कार्फ लावावा
बाहेर जाताना नेहमी चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळावा. केस खराब होऊ नये म्हणून केस देखील झाकून ठेवावेत, मोकळे सोडू नयेत.
चेहरा वरचेवर धुवा
चेहरा दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी धुतला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर मेकअप प्रथम काढावा. सकाळी आणि रात्री चेहरा धुणे आवश्यक आहे. मध्ये मध्ये तुम्हाला ज्या वेळी वेळ मिळेल तेव्हा चेहरा स्वच्छ करावा. ऑईली स्किन असेल तर वारंवार चेहरा धुणे आवश्यक आहे.
घरगुती फेसपॅक वापरा
चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी तुम्ही घरगुती फेसपॅक वापरणे गरजेचे आहे. जसे की काकडी पासून फेस पॅक, डाळी पासून फेस पॅक किंवा तुम्ही स्क्रबर म्हणून मसूरच्या डाळीचा फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा. जेणेकरून नवीन पेशी येण्यास मदत होईल.
मॉइश्चरायझर वापरा
चेहऱ्यावर नियमितपणे मॉइश्चरायझर लावावे. उन्हामुळे चेहरा ड्राय पडतो. कोरडा चेहरा असेल तर मॉइश्चरायझर ची गरज असते. तुम्ही झोपताना खोबरेल तेल किंवा इतर मॉइश्चरायझर जसे की मधाचा देखील वापर केला तरी चालेल.
स्किन टोनर
स्किन टोनर साठी तुम्ही चांगले स्किन टोनर वापरावे. जसे की तुम्ही बाहेर जाताना सनस्क्रीन लावता त्याप्रमाणे स्किन टोनर वापरणे देखील आवश्यक आहे. लवंग ही एक चांगली ऑस्ट्रीजेंट आहे. बडीशेप आणि लवंग याचे पाणी तुम्ही टोनर म्हणून वापरू शकता.
सिरम
चेहऱ्यावर सिरम लावायचं असेल तर, सिरम वापरण्यासाठी तुम्ही विटामिन सी म्हणजेच लिंबाचा वापर किंवा संत्र्याचा वापर करावा. यासाठी तुम्ही घरामध्ये थोडेसे इसेन्शियल ऑईल मध्ये दोन-तीन लिंबाचे किंवा संत्र्याच्या रसाचे थेंब टाकून ते चेहऱ्यावर लावावे. सिरम शक्यतो रात्री झोपताना वापरावे.
डोळ्याखाली काळी वर्तुळे
डोळ्यांच्या कडेला काळी वर्तुळे झाले असतील तर बटाट्याचे किंवा काकडीचे गोल काप करून नियमितपणे डोळ्यांवर ठेवावे बदामच्या तेलाने हलक्या हाताने डोळ्याच्या बाजूने मसाज करावा त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर
चेहरा धुण्यासाठी थोडेसे गरम पाण्याचा वापर करावा. जास्त थंड पाणी चेहरा धुण्यासाठी वापरू नये.
चेहरा टॉवेलने स्वच्छ करावा
चेहरा टॉवेलने स्वच्छ करताना चेहरा घासू नये. सर्व चेहऱ्यावरील पाणी हलक्या हाताने टिपून घ्यावे.
अशा रितीने या जर तुम्ही टिप्स नियमितपणे फॉलो केल्या तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा दिसेल दोन-तीन महिन्यात तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक पडेल आणि तुमची त्वचा जास्त चांगली तजेलदार आणि टवटवीत दिसेल. [11 Skin Care Tips]
5 स्किनकेअर टीप्स आणि घरगुती उपाय l 5 Skincare Tips and Home Remedies
शेवग्याच्या पानांचे (मोरिंगा पावडर ) त्वचेसाठी फायदे l Benefits of moringa leaves for skin
शेवग्याच्या पानांचे (मोरिंगा पावडर ) त्वचेसाठी फायदे l Benefits of moringa leaves for skin