६ Engaging ब्लॉग टीप्स ज्यामुळे लोक तुमचा ब्लॉग पाहतील | 6 Tips to make engaging Blog in Marathi

६ Engaging ब्लॉग टीप्स ज्यामुळे लोक तुमचा ब्लॉग पाहतील | 6 Tips to make engaging Blog in Marathi

ब्लॉगिंग ची सुरुवात केली आणि ब्लॉग पण लिहायला चालू केले पण ब्लॉगवर ट्रॅफिक नाही आणि तुमचा ब्लॉग कुणी वाचतच नाही. मग त्या ब्लॉगिंग मुळे तुमचा कोणताच फायदा नाही. ह्याचा अर्थ तूम्ही लिहिलेले ब्लॉग लोकांना समजत नाहीत किंवा त्यांना तो वाचण्यामध्ये interest मंजेच आवड निर्माण होत नाही.

6-Tips-to-make-engaging-Blog

अशा वेळी आपल्याला हे पाहणे आवश्यक आहे की आपले ब्लॉग्स लोक वाचत का नाहीत. याचे कारण काय असावे की ज्यामुळे लोक ब्लॉग वाचत नाहीत. कारण जोपर्यंत तूम्ही ह्याचे solution शोधून काढत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे सरकून ब्लॉगिंग मध्ये तुमचे करिअर पुढे जाणार नाही.

ह्यासाठी प्रथम आपल्या ब्लॉगमधून काही त्रुटी असतील तर त्या बाजूला करणे आवश्यक आहे. ह्या त्रुटी समजून घेवून तुम्ही त्याच्यावर योग्य त्या रीतीने काम चालू करणे आवश्यक आहे. तेव्हा तुमच्या ब्लॉगवरही ट्रॅफिक वाढू शकते.

काही महत्वाच्या टिप्स येथे आपण पाहू ज्या अगदी सुरुवातीला तुम्ही ब्लॉगिंग साठी वापरू शकता आणि ज्या तुम्हाला तुमचा ब्लॉग जास्त engaging ठेवण्यासाठी मदत करतील. म्हणजेच तुमचा ब्लॉग लोक वाचण्यास प्रवृत्त होतील आणि नियमितपणे तुमचा ब्लॉग वाचतील.

तर चला पाहूया काही टीप्स ज्या तुमच्या ब्लॉग का आकर्षक बनवतील. ब्लॉग लिहिण्याची सुरुवात आपण विषय निवडण्यापासून करतो. एखादा विषय निवडला की पुढचा टप्पा म्हणजे त्या विषयानुसार योग्य तो टॉपिक निवडणे.

1. विषयानुसार योग्य तो टॉपिक निवडणे.

टॉपिकची निवड झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या टॉपिक साठी लोकांना बरेच प्रश्न पडतात. ते पश्र्न कोणते असू शकतात हे पाहणे. त्यानंतर त्या प्रश्नावर आपण लोकांना कसे समाधानकारक उत्तर देवू शकतो हे देखील पाहणे गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही टॉपिक निवडताना व्यवस्थित माहिती घेवून आणि त्या टॉपिक वर वेगवेगळ्या प्रकारे रिसर्च करून तुम्ही तुमचे मुद्देसूदपणे पॉइंट्स तयार करू शकता.

ज्यावेळी तुमच्याकडे एखाद्या विषयाचा टॉपिक आहे आणि त्या टॉपिक प्रमाणे जे काही लोकांचे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देखील आता तुमच्याकडे आहे. म्हणजे तुमच्याजवळ तुमच्या कंटेंट साठी लागणारा एक साचा तयार होईल.

अशा प्रकारे नंतर मग तुम्ही तुमच्या टॉपिक साठी रिसर्च करून तुमचा टॉपिक मांडण्यासाठी घ्यावा आणि त्याप्रमाणे टॉपिक बद्दल माहिती लिहावी.

2. योग्य ते टायटल/ title निवडणे.

टॉपिक निवडून झाल्यानंतर त्या टॉपिक प्रमाणे आपल्याला title देखिल योग्य ते निवडणे आवश्यक आहे. तुमचे title तुमच्या विषयाला अनुसरून असावे. त्यासाठी title मध्ये तुमच्या टॉपिक प्रमाणे शब्द वापरावेत जे वाचून लोकांना लगेच कळून जाईल की तुम्ही कोणत्या टॉपिक बद्दल बोलत आहात.

तुमचा ब्लॉग ज्याबद्दल आहे त्याबद्दल तुमच्या title मध्ये शब्द म्हणजे keywords असणे आवश्यक आहे. ज्यावेळी कुणीही title बघेल तेव्हा त्याच्या लगेच लक्षात येईल की ह्या ब्लॉगमध्ये कोणत्या विषयी माहिती आहे. आणि ती जर माहिती त्यांना आवश्यक आणि उपयुक्त असेल तर लोक ती माहिती पाहतील आणि लगेच वाचतील.

अशा प्रकारे title हे एक महत्वाचे आकर्षण आहे. ज्यावेळी ब्लॉग लोक पाहतात तेव्हा सर्वप्रथम title दिसते आणि आपण title प्रथम वाचून घेतो आणि जर ते आकर्षक म्हणजे काही महत्वाच्या गोष्टीबद्दल असेल तर आपण लगेच ब्लॉग ओपन करतो आणि वाचायला घेतो.

3. योग्य ती टॉपिक नुसार paragraph मध्ये मुद्देसूद माहिती मांडणे किंवा वाक्य छोटे बनवा. |

टॉपिक आणि title ची निवड झाल्यानंतर त्या टॉपिक प्रमाणे मुद्देसूद माहिती मांडणे देखील आवश्यक आहे. ज्यावेळी तूम्ही paragraph लिहायला घेता त्यावेळी त्यामध्ये तुम्ही subtopic करून त्याप्रमाणें छोट्या छोट्या paragraphs मध्ये माहिती मांडणे आवश्यक आहे.

हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की आजकाल खूप लोक busy असल्याकारणाने सर्व माहिती वाचणे शक्य होत नाही अशावेळी जर त्यांना छोटेछोटे paragraph मध्ये माहिती मिळाली तर ते जेवढी त्यांना माहिती हवी आहे तेवढी वाचतात.

तुम्ही वाक्य जी paragraph मध्ये लिहिणार आहे ती वाक्य छोटी छोटी बनवा. जेणेकरून ती लगेच वाचता आणि समजण्यासारखी असतील. छोटी वाक्य लगेच वाचली जातात. मोठी वाक्य पाहिले की ते वाचून समजायला अवघड जाते.

छोट्या छोट्या paragraph मुळे माहिती व्यवस्थित समजते आणि पटकन वाचली जाते. मोठे paragraphs बघितले की खूपच माहिती आहे एवढे कधी वाचणार असे होते. म्हणून मुद्देसूद आणि लोकांना चटकन समजेल अशी माहिती असावी जेणेकरून वाचकाला वाचण्यास आणि तुमचा ब्लॉग समजण्यास सोपे जाईल.

4. वेगवेगळ्या प्रश्र्नप्रमाणे, टॉपिक प्रमाणे पॉईंट्स तयार करणे |

एकत्रितपणे असलेली information ही नेहमी कंटाळवाणी वाचकांना वाचाण्यापासून दूर खेचते. ज्यावेळी तुम्ही एखादा विषय किंवा मुद्दा पॉइंट मध्ये मांडता त्यावेळी तुम्ही ते आर्टिकल लगेचच वाचता.

पॉइंट्स मध्ये लिहिलेले सहज समजते आणि लगेच त्याच्याकडे लक्ष देखील जाते. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो की तिथे ज्याप्रमाणे वस्तू व्यवस्थितपणे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये मांडलेल्या असतात त्याप्रमाणे जर आपण आपल्या लेखामध्ये पॉइंट्स व्यवस्थितपणे मांडले तर ती माहिती लोकांनां आवडते आणि लोक त्या माहितीकडे आकर्षिले जातात.

अशा प्रकारची माहिती लोक वाचणे देखिल पसंद करतात. ज्यावेळी कोणतेही आर्टिकल ज्यावेळी ओपन केले जाते तेव्हा प्रथम त्या articles ची मांडणी लोक सर्वप्रथम पाहतात.

आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय लिहिले आहे हे बघतात. त्यांना जर माहिती व्यवस्थित आणि समजणारी वाटली तर ते ब्लॉग वाचतात. त्यामुळे तुमची माहिती ही काप्प्यामध्ये मांडलेल्या वस्तु प्रमाणे असली पाहिजे.

समजा तुम्ही ब्लॉगमध्ये कोणत्या गोष्टीचे फायदे जर सांगत असाल तर ते तुम्ही paragraph मध्ये टाकले तर ते लोकांना लगेच समजणार नाही. पण तेच फायदे तुम्ही पॉइंट्स मध्ये मांडले तर ते व्यवस्थित दिसतील आणि लोक ते लगेच वाचतील.

अशा रीतीने जर तुम्ही पॉइंट्स आणि व्यवस्थित मांडणीमध्ये तुमचा topic मांडला तर तो टॉपिक लोक लगेच बघतील आणि वाचतील.

5. ब्लॉगमध्ये quote वापरा.

Quote म्हणजेच कुणी व्यक्तीचे जे motivational quotes असतील तर ब्लॉगमध्ये थोडी आकर्षकता वाढेल. लोकांना motivational quotes आवडतात. कुणी मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तीचे quotes देखिल तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही स्वतः quotes तुमच्या विषयाप्रमाने तयार करून वापरू शकता.

Quotes तुम्ही तुमच्या टॉपिक आणि विषयानुसार वापरू शकता. Quotes तुम्ही ठराविक paragraph झाल्यानंतर त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. त्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध व्यक्तीचे quotes असतील तर quote खाली त्यांचे नाव देवू शकता.

6. ब्लॉग स्वतः वाचून पहा.

ब्लॉग लिहून झाल्यानंतर तो ब्लॉग तुम्ही स्वतः वाचून बघा. आपण ज्यावेळी एखादा लेख किंवा आर्टिकल वाचतो तेव्हा त्या आर्टिकल मध्ये काय त्रुटी आहेत आणि अजून काय असेल पाहिजे हे आपल्याला समजते.

त्यामुळे तुमचा ब्लॉग लिहून झाला आहे आणि तुम्हाला असे वाटतेय की ह्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी दिसतायत तर तुम्ही त्या लगेच भरून काढू शकता. आणि तुमचा ब्लॉग लगेच तुम्ही update करू शकता.

ह्यामुळे वाचकांपर्यंत तुमचा ब्लॉग पोहचेपर्यंत तुम्ही ब्लॉग मधील सर्व गोष्टी तयार असतात. आणि जर कोणत्या गोष्टीची त्यामध्ये त्रुटी असेल तर ती लगेच भरून निघते.

अशा प्रकारे ब्लॉग वाचून काढल्यामुळे आपल्यालाच लक्षात येते की काय लिहायचे राहिले आहे आणि त्याप्रमाणे आपण बदल करून आपला ब्लॉग आपण अजून आकर्षित बनवू शकतो.

ब्लॉग वाचल्यामुळे आपल्याला कळते की नक्की वाचकाला ब्लॉगमधून काय मिळतेय आणि काय हवे आहे. ह्या दोन्ही गोष्टींची पूर्तता ब्लॉगमधून होत असेल तर ब्लॉग नक्कीच लोकांना आवडतो आणि ते वाचण्यास लोक प्रवृत्त होतात.

अशा रीतीने तुम्ही जर काम चालू केले तर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नक्कीच यशावी होवू शकला. शिवाय तुम्हाला ह्या सवयीमुळे ब्लॉग चांगल्या प्रकारे मांडता येतील. ज्यामुळे तुमच्या ब्लॉग वर लोकांची engagement वाढेल आणि लोक तुमचा ब्लॉग वाचणे पसंद करतील.

पैसे कमावण्यासाठी Teespring | Teespring business in Marathi

इन्स्टाग्राम पेजचा वापर करून फॉलोअर्स वाढवून पैसे कमवा | Earn money by Instagram page in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin