कोको केक । Coco Cake 🍰 Recipe in Marathi
लहान मुलांसाठी केक (Coco Cake Recipe) जर हवा असेल तर कोको केक हा एक चांगला ऑप्शन आहे. कोको केक मध्ये कोको आणि कोकोनट पावडर वापरून केक तयार केला आहे. ज्यामध्ये मैदा आणि रवा याचे देखील मिक्सर आहे तर चला पाहूया कोको केकची रेसिपी.
![Coco Cake Recipe](https://growthackmarathi.com/wp-content/uploads/cwv-webp-images/2023/10/Coco-Cake-Recipe-1024x576.jpg.webp)
कोको केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- दीड वाटी मैदा
- अर्धा वाटी रवा
- एक वाटी दही
- एक वाटी दूध
- एक वाटी तूप
- अडीच वाट्या साखर
- अर्धा वाटी कोकोनट पावडर
- दोन चमचे कोको पावडर
- दोन चमचे बेकिंग पावडर
- अर्धा चमचा छोटा सोडा
- व्हॅनिला इसेन्स
कृती
- मैदा, सोडा, तवा आणि बेकिंग पावडर सर्व एकत्र करून बारीक चाळणी मध्ये चाळून घ्यावे.
- दूध, दही, साखर, तूप मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
- नंतर सर्व मिश्रण एकत्र करावे व चांगले हलवावे.
- यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकून मिश्रण चांगले फेटून एकजीव करावे.
- केकच्या भांड्याला तूप लावून किंवा बटर पेपर लावून घ्यावा.
- तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतून बेक करावे.
बेकिंग साठी ओव्हन नसेल तर एका कढईमध्ये वाळू किंवा बारीक मीठ टाकून गॅसवर कढई गरम झाल्यानंतर बेकिंग साठी केकचे भांडे ठेवून द्यावे. अर्ध्या तासांमध्ये तुमचा केक तयार होईल.
सर्व मिश्रण जर तुम्ही अगोदरच एकत्र करून ठेवले तर हा केक तुम्ही झटपट बनवून लगेचच खायला देऊ शकता. यासाठी तुम्ही एका डब्यामध्ये सर्व मिश्रण काढून फ्रिजमध्ये ठेवावे. जसे लागेल तसे घेऊन फेटून त्याचा केक तयार करावा व नाष्ट्या मध्ये खायला मुलांना द्यावा. रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि शेअर करा.
झणझणीत मिसळ पाव रेसिपी । Misal paav Recipe in Marathi
झणझणीत शेव भाजी ही रेसिपी | Zhanjanit Shev Bhaji Recipe
पांढऱ्या वांग्याचे लोणचे रेसीपी। Pandhrya Wangyache Lonche recipe in Marathi