पालक पनीर रेसिपी । Palak Paneer Recipe in Marathi
पालक पनीर ही रेसिपी (Palak Paneer Recipe) पंजाबी डिश मध्ये मोडली जाते. आपण कोणत्याही पनीरच्या रेसिपी किंवा इतर पंजाबी डिश खाण्यासाठी शक्यतो हॉटेलमध्ये जाणे पसंत करतो, कारण तेवढ्या रेसिपी स्वादिष्ट आपल्याकडे बनवल्या जात नाहीत. हे पालक पनीरचे एक वेगळी अशी रेसिपी दिली आहे जी तुम्ही घरी बनवून सर्वांना खायला घालू शकाल. रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि नक्कीच तुम्हाला देखील आवडेल.
![Palak Paneer Recipe](https://growthackmarathi.com/wp-content/uploads/cwv-webp-images/2023/10/Palak-Paneer-Recipe-1024x576.jpg.webp)
पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- अर्धा किलो पालक
- दोनशे ग्रॅम पनीर
- एक कांदा आणि टोमॅटो
- अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट
- 50 ग्रॅम दही
- 50 ग्रॅम बेसन
- मिरची आणि थोडे तूप
कृती
- सर्वप्रथम तुपामध्ये थोडेसे बेसन भाजून घ्यावे.
- पालक धुऊन कापून घ्यावी.
- आले लसणाचे तुकडे वाटून बारीक करावे.
- टोमॅटो शिजवून कापून घ्यावेत.
- पनीरचे लहान लहान तुकडे करून तळून घ्यावे.
- कुकरमध्ये पालक, मीठ व पाणी टाकून उकळावे.
- उकळलेले पालकचे पाणी गाळून वेगळे करावे आणि पालक मिक्सर मधे बारीक करावे.
- तूप गरम करून त्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत भाजावा.
- आले लसूण, टोमॅटो, मिरची टाकून परत परतावे आणि चांगले भाजून घ्यावे.
- त्यामध्ये बेसन व दही मिक्स करावे.
- नंतर पालक व पनीर टाकून सर्व मिश्रण मिक्स करावे.
पालकाचे पाणी लागत असेल तर ते मिक्स करावे व पाच ते दहा मिनिटे पालक पनीर वापरून द्यावे तुमचे पालक पनीरची रेसिपी लगेच तयार.
पालक खाण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने पालक च्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून तुम्ही आहारामध्ये पालकाचा समावेश करू शकता.
पालक आयर्न वाढवण्यासाठी मदत करते. शिवाय जर तुम्हाला कॅल्शियमची वगैरे कमतरता असेल तर त्यासाठी देखील पालक खाल्ली तर अतिशय योग्य आहे.
त्यामुळे पालक पनीर ही रेसिपी तुम्हाला पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. पनीर मुळे तुम्हाला प्रोटीन ची कमतरता दूर होण्यास मदत होते, तर पालक पनीर जरूर करून पहा आणि शेअर करा.
कुरकुरीत समोसा रेसिपी । Kurkurit Samosa Recipe in Marathi
उत्तपम रेसिपी । Uttappam Recipe in Marathi
आवळा चुंदा रेसिपी । Awala Chunda Recipe in Marathi