मराठीतील आरती साईबाबा गाण्याचे बोल I Aarti saibaba lyrics in marathi

मराठीतील आरती साईबाबा गाण्याचे बोल I Aarti saibaba lyrics in marathi

साईबाबांची आरती (Aarti saibaba lyrics)दर गुरुवारी किंवा रोज देखील म्हंटली जाते. शिर्डीमध्ये साईबाबांची आरती चार वेळा करतात आणि दर गुरुवारी साईबाबांची पालखी निघते. मनाला शांतता प्राप्त करण्यासाठी व मन एकाग्र करण्यासाठी ही आरती नेहमी साईबाबांच्या मुर्तीसमोर उभे राहून म्हणावी.

आरती साईबाबा ।
सौख्यदातारा जीवा ।
चरणरजतळीं निज दासां विसावां ।
भक्तां विसावा ॥धृ॥ आरती साईबाबा ।

जाळुनियां अनंग ।
स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजना दावी ।
निजडोळां श्रीरंग ॥१॥ आरती साईबाबा ।

जया मनीं जैसा भाव ।
तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना ।
ऐसी ही तुझी माव ॥२॥ आरती साईबाबा ।

तुमचें नाम ध्यातां ।
हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी ।
मार्ग दाविसी अनाथा ॥३॥ आरती साईबाबा ।

कलियुगीं अवतार ।
सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे ।
स्वामी दत्त दिगंबर ॥४॥ आरती साईबाबा ।

आठा दिवसां गुरुवारी ।
भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ॥५॥ आरती साईबाबा ।

माझा निजद्रव्य ठेवा ।
तव चरणसेवा ।
मागणें हेंचि आता ।
तुम्हा देवाधिदेवा ॥६॥ आरती साईबाबा ।

इच्छित दीन चातक ।
निर्मळ तोय निजसुख ।
पाजावें माधवा या ।
सांभाळ आपुली भाक ॥७॥ आरती साईबाबा ।

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images