ज्युस व्यवसाय । Amla-Aloe-vera Juice business in Marathi

ज्युस व्यवसाय । Amla-Aloe-vera Juice business

आजच्या लेखामध्ये आपण Amla-Aloe-vera Juice business ह्या व्यवसायाची घेणार आहोत.

आजकाल सर्वजण आपल्या शरीराची काळजी घ्यायला लागले आहेत. सर्वांना कळायला लागले आहे कि आपले आरोग्य चांगले असणे किती महत्वाचे आहे.म्हणून आजकाल व्यायाम करणे, सकाळी फिरायला जाणे हे आवर्जून सर्वजण आपल्या दैनंदिन शैलीमध्ये एक चांगली सवय शरीराला लावून घेत आहेत.

Amla-Aloe-vera Juice business
Amla-Aloe-vera Juice business

प्रत्येकाला माहित झाले आहे कि आपले स्वास्थ्य चांगले टिकून राहावे त्यासाठी व्यायाम आणि आपला आहार किती महत्वाचा आहे. आयुर्वेदिक औषधे आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टी आपण खाण्यासाठी रोज आहारात वापरतो.

त्या कशा वापराव्या किंवा त्यांचा औषध म्हणून कसा उपयोग करावा ह्या गोष्टीदेखील सर्वांना समजायला लागल्या आहेत. तसेच भाजी आणि फळे कसे आपल्या आरोग्यासाठी महत्वाची आहेत हे देखील लक्षात आले आहे.

तसेच आजकाल वृद्ध लोक सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे किंवा इतर काही ज्युस पिल्यामुळे शरीराला कसे फायदेशीर ठरते हे देखील जणू लागले आहेत.

सध्या मार्केटमध्ये आमला आणि कोरफड ज्युसला खूप मागणी वाढली आहे. असे ज्युस सकाळी पिल्यामुळे सर्वांना आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय लाभदायक ठरतात.

हेच ज्युस तुम्ही व्यवसाय म्हणून करून विकले तर तुम्हाला ह्यामध्ये भरपूर फायदा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायची गरज लागणार नाही.

काही ठिकाणी सकाळी लोक मॉर्निंग वॉल्कसाठी बागेमध्ये किंवा ग्राऊंडवर फिरायला येतात. तिथे काही ठिकाणी ज्युस सेंटर उभारले असतात. ते लोक ह्या ज्युस पासून भरपूर नफा मिळवतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे ज्युस सेंटर उभारून काहीतरी तुमचा इनकम चालू करू शकता.

तुम्हाला ह्यासाठी तुमची जर गाडी असेल तर त्याचा वापर करून तुम्ही घरी ज्युस बनवून गार्डन, ग्राउंड अशा ठिकाणी विकायला ठेवू शकता.

कोरफड किंवा आमला ज्युस तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त काही कष्ट देखील करायची गरज भासत नाही.

तसेच मार्केटमध्ये तुम्हाला एलोवेरा आणि आमला ह्यांचे रेडिमेड तयार ज्युस मिळतात. तुम्हाला फक्त त्याचे योग्य ते प्रमाण घेऊन पाण्यामध्ये समप्रमाणात मिक्स करून त्यामध्ये टेस्टप्रमाणे मध आणि लिंबू टाकून तुम्ही एक टेस्टी ज्युस तयार करू शकता. त्यामुळे हा अत्यंत सोपा असा कुणालाही करता येण्यासारखा व्यवसाय आहे.

सध्या पतंजली चे ज्युस मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचे मिळतात. तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. किंवा तुमच्या आसपास कुणी चांगल्या प्रतीची कोरफड मिळत असेल तर तुम्ही ती विकत घेऊन त्याचा ज्युस बनवू शकता.

तसेच कोहळ्याचा ज्युस देखील सकाळी पिणे चांगले असते. तुम्ही बाजारातून कोहळे विकत घेऊन त्याचा ज्युस बनवून विकायला ठेवू शकता. आवळ्याचा ज्यावेळी सिझन असेल त्यावेळी तुम्ही आवळे विकत आणून त्याचा देखील घरच्या घरी ज्युस तयार करून विकू शकता. अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे ज्युस तयार करून तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता. 

फ्रुट ज्युस ला देखील सध्या खूप मागणी आहे. तुम्ही सकाळी आवळा आणि कोरफड किंवा कोहळ्याचा ज्युस विकू शकता. आणि संध्याकाळी तुम्ही फ्रुट ज्युस विकायला ठेवू शकता. असे सेंटर्स तुम्ही एका गार्डन किंवा ग्राऊंडजवळ काढू शकता.

मोठ्या कंपन्यांच्या किंवा  हॉस्पिटलच्या ठिकाणी तुम्ही असा व्यवसाय उभारू शकता. काही कंपन्यांमध्ये जे काम करणारे लोक असतात त्यांना कधी भूक लागली तर ते तुमच्या सेंटर मध्ये येऊन ज्युस वगैरे विकत घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला असे ज्युस सेंटर खूप फायदेशीर ठरू शकतात.

तुम्ही ज्युस सेन्टरमध्ये चांगल्या प्रतीचे ज्युस ठेवले तर तुम्हाला नक्कीच भरपूर कस्टमर मिळू शकतात. लोकांचे उपवास वगैरे असतात त्यावेळी ते भूक लागली कि ज्युस पितात.

त्यामुळे ज्युस साठी सध्या खूप मागणी आहे. काही लोक मंदिराजवळ सुद्धा छोटे ज्युस सेंटर उभारून चांगला नफा कमावतात. अशा अनेक प्रकारे तुम्ही तुमचा छोटासा ज्युस सेन्टरचा व्यवसाय चालू करू शकता.       

तुम्हाला जरी ज्युस सेंटर्स (juice business) उभारायचे नसतील तर तुम्ही ज्युस ऑनलाईन देखील सेल करू शकता. छोट्या छोट्या ज्युसच्या बॉटल तुम्ही विकायला ठेवू शकता. तुम्ही नुसता लिंबू सरबत किंवा इतर सरबत बनवून देखील तो तुम्ही घरच्या घरी बनवून विकू शकता.

तुम्हाला फक्त हा सरबत किंवा ज्युस लोकांना ताजा ताजा द्यावा लागेल. फक्त तुम्हाला ह्यासाठी तुमच्या नजीकच्या ऑर्डर्स घ्याव्या लागतील. आणि तुमचा मोबाईलद्वारे तुम्ही वेगवेगळ्या जवळच्या ग्राहकांना तुम्ही हे ज्युस देऊ शकता. जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही डिलिव्हरी सुद्धा करू शकता.

आणखी काही बिझनेस आयडिया

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग

चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल?

कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय

ज्युस सेंटरसाठी लागणारी जागा । Place required for juice business

ज्युस सेंटरसाठी तुम्ही चांगली मोक्याची जागा निवडणे गरजेचे आहे. गार्डन, ग्राउंड, कंपनी किंवा हॉस्पिटलच्या नजीकच्या जागेत तुम्ही ज्युस सेंटर उभारू शकता. शक्यतो अशा ठिकाणी लोक फिरायला बाहेर पडतात. किंवा काही जण खेळायला बाहेर पडतात. अशा वेळी त्यांना जर प्यायला ज्युस मिळाला तर ते नक्कीच विकत घेतात. म्हणून अशा ठिकाणी तुम्ही तुमचे ज्युस सेंटर उभारू शकता. 

वेगवेगळ्या प्रकारचे ज्युस ठेवून तुमचा व्यवसाय अजून वाढवू शकता. | You can sell various types of juices to increase your business

तुम्ही वेगवेगळ्या फळांचे ज्युस तुमच्या सेन्टरमध्ये ठेवू शकता. जसे कि स्ट्रॉबेरी ज्युस, सफरचंद ज्युस, किवी ज्युस, संत्रा ज्युस, मोसंबी ज्युस, अननस ज्युस, मिक्स फ्रुट ज्युस, डाळिंबाचा ज्युस अशा अनेक प्रकारचे ज्युस तुम्ही ठेवू शकता.

सुरुवातीला तुम्ही एकाच कोणता तरी ज्युस निवडून तुमचा व्यवसाय चालू केला तरी तुम्ही ह्यापासून भरपूर नफा मिळवू शकता. ह्यामध्ये तुम्ही बरीच व्हरायटी करून कॉकटेल ज्युस सुद्धा बनवून विकू शकता. तुम्ही हेल्थ ज्युस साठी आमला ज्युस, कोरफड ज्युस, कोहळ्याचा ज्युस असे अनेक प्रकारचे ज्युस देखील विकायला ठेवू शकता.  

ज्युस तयार करण्यासाठी लागणारे मटेरियल । Material required for juice business

ज्युस बनवण्यासाठी तुम्ही सर्व लागणारे साहित्य बाजारामधून विकत आणू शकता. तुमच्या नजीक जे भाजी आणि फळे मार्केट असेल तिथून तुम्ही मोठ्या प्रमाणात ज्युससाठी लागणारा माल आणू शकता. तुम्हाला हे सर्व साहित्य फ्रेश आणावे लागेल.

जसे कि तुम्ही जी फळे वापरणार आहेत ती तुम्हाला ताजी ताजी आणावी लागतील. बाकीचे साहित्य जसे कि साखर हि तुम्ही अगोदरच आणून ठेवू शकता.

ज्युसर तुमचा स्वतःचा असेल तर त्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये तुमचा हा ज्युसचा व्यवसाय चालू करू शकता. 

ज्युससाठी लागणारी ट्रेनिंग किंवा तयार करण्याची पद्धत । requirement of Training or juice making

कुणीही ज्युस तयार करू शकते. त्यामुळे तुम्हाला ह्यासाठी ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. तुम्ही घरातून ह्याचे चांगल्या प्रकारे ज्युस बनवणे शिकू शकता. तसेच गूगल आणि युट्युब च्या मदतीने अजून नवनवीन चांगल्या प्रकारचे ज्युसेस तुम्ही तयार करू शकता. ह्यांच्यामध्ये कोणतीही अवघड अशी गोष्ट नाहीये. फक्त तुम्हाला सर्व गोष्टींचे योग्य ते प्रमाण वापरणे जमले पाहिजे. तुम्ही घरामध्ये स्वतः वेगवेगळे ज्युस बनवून सगळ्यांना प्यायला देऊ शकता.

कुणाला कोणती टेस्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या रेसिपीज तयार करून ज्युस तयार करण्यासाठी वापरू शकता. म्हणजे तुम्हाला अंदाज येऊ शकेल कि लोकांना कोणत्या रेसिपीज जास्त आवडत आहेत. जसजसे जे ज्युस जास्त लोक घेतील ते ज्युस तुम्ही जास्त प्रमाणात बनवण्यास चालू करावे. 

ज्युससाठी लागणारी मशीन। Machine for Juice business

तुम्हाला छोटा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठे मशीन वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला त्यासाठी फक्त एक ज्युसर लागेल तो तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातून विकत आणू शकता. किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा ज्युसर मागवून घेऊ शकता.

जर तुमच्याकडे अगोदर ज्युसर असेल तर तुम्हाला नवीन ज्युसर खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही तोच व्यवसायासाठी वापरू शकता.

तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात ज्युस तयार करायचा असेल किंवा तुम्ही मोठी कंपनी उभारणार असाल तर तुम्ही त्यासाठी indiamart च्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही मोठ्या मशीन खरेदी करू शकता. खालील लिंकवर जाऊन तुम्हाला सर्व मशीनच्या डिटेल्स मिळून जातील.

मशीनची किंमत हि त्याच्या कपॅसिटी प्रमाणे ठरवण्यात येते. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही मशीन निवडून ती खरेदी करू शकता.

https://dir.indiamart.com/impcat/fruit-juice-machine.html

लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन । License and Registration

तुम्हाला कोणताही व्यवसाय चालू करताना प्रथम सर्व लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन तुम्ही सरकारी कार्यालयात जाऊन त्याप्रमाणे चौकशी करून तुम्ही खरेदी करू शकता. फूड लायसन्स, जी.एस.टी. रेजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट लायसन्स हे व्यवसायासाठी आवश्यक असतात. तुम्ही ब्रॅण्डसाठी ट्रेडमार्क लायसन्स सुद्धा घेऊ शकता. अजून इतर काही माहिती तुम्ही सरकारी कार्यालयातून घेऊ शकता. 

ज्युस पॅकेजिंग । Juice Packaging

तुम्ही जर ज्युस सेंटर उभारणार असाल तर तुम्ही त्यासाठी ग्लासमधून ग्राहकांना ज्युस देऊ शकता. आणि जर तुम्ही मोठी कंपनी उभारणार असाल तर तुम्ही छोट्या बॉटल मधून पॅक करून ज्युस विकू शकता. हे सर्व मटेरियल तुम्हाला होलसेल पॅकेजिंग मटेरियल विक्रेत्याकडे मिळून जाईल. पॅकेजिंग साठी तुम्ही मशीन सुद्धा खरेदी करून पॅकिंग करू शकता. तुम्हाला ह्या मशीन indiamart ह्या वेबसाईट वर मिळून जाईल. तुम्ही पॅकेजिंग outsource देखील करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज लागत नाही.

ज्युस व्यवसायासाठी लागणार स्टाफ । Staff required for juice business

तुम्हाला सुरुवातीला दोन ते तीन लोक तुमच्या मदतीसाठी हा व्यवसाय कारण्यासाठी लागू शकतात. तुम्ही जर छोटा व्यवसाय करणार असाल तर एवढे लोक पुरेसे आहेत.

जर तुम्ही छोटेसे स्टॉल उभारणार असाल तर तुम्ही एकटे सुद्धा हा व्यवसाय करू शकता. आणि जर तुम्ही मोठा व्यवसाय करणार असाल तुम्हाला ह्यासाठी बऱ्याच लोकांची आवश्यकता भासू शकते.

जसे कि तुम्हाला मार्केटिंग, मॅनुफॅक्चरिंग, पॅकेजिंग ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला स्टाफ ची गरज लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी किती लोक लागू शकतील आणि तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट त्यासाठी करू शकाल ह्याप्रमाणे तुम्ही तुमचा स्टाफ ठेवू शकता.

ज्युस व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि इन्व्हेस्टमेंट । Investment for Juice business

सुरुवातीला तुम्ही तुमचा व्यवसाय कसा करणार आहेत आणि त्यासाठी तुमचे बजेट किती आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी ठरवू शकता.

ह्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे तुमचा व्यवसाय उभारू शकता. कमी बजेट असेल तर तुम्ही छोट्या स्टॉलपासून ह्या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

किंवा तुम्हाला ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही स्वतःचे ज्युस सेंटर किंवा कंपनी देखील उभारू शकता. तुम्हाला ह्यासाठी व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

ज्युस व्यवसायासाठी मार्केटिंग । Marketing for juice business

तुम्ही ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करू शकता. जसे कि तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना ह्याबद्दल माहिती देऊ शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे बॅनर तुम्ही चौकामध्ये लावून तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहचवू शकता.

तुम्ही व्हाट्सअँप द्वारे ग्रुप करून ऑर्डर्स घेऊ शकता. मोठ्या कंपन्यांमध्ये जाऊन तेथील लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. ऑनलाईन जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे तर तुम्ही ऍमेझॉन, फ्लिपकार्ट कंपनीकडे तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता.

तसेच कुणी ऑनलाईन सेल वाढवण्यासाठी तुम्ही कुणी सेल्स पर्सन ठेवू शकता. अशा अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता. 

अशा अनेक प्रकारे तुम्ही ज्युस हा व्यवसाय चांगल्या रीतीने करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त भांडवल देखील घालण्याची गरज भासत नाही.

तुम्ही कमी खर्चामध्ये देखील तुमचा हा व्यवसाय चांगल्या रीतीने उभारू शकता. सुरुवातीला तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्व व्यवस्थित प्लँनिंग करून मग तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

प्लॅनिंग केल्यानंतर त्याप्रमाणे योग्य त्या स्टेप्स घेऊन तुम्ही हा व्यवसाय हळूहळू चांगला एस्टॅब्लिश करू शकता. आणि ज्युस ह्या व्यवसायापासून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

पापड उद्योग । Papad making business in Marathi

पेपर प्लेट तयार करण्याचा व्यवसाय । Paper plate business one of the small and easy in Marathi

फुले सजावट व्यवसाय माहिती । Flower decoration business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin