बाजरीची खिचडी रेसिपी l Bajri khichdi Recipe in Marathi

बाजरीची खिचडी रेसिपी l Bajri khichdi Recipe

बाजरीची खिचडी (Bajri khichdi Recipe) ही रेसिपी आपण पाहत आहोत जी अत्यंत पौष्टिक आणि सकाळी उठल्याउठल्या न्याहारी करण्यासाठी तुम्हाला खाण्यासाठी अत्यंत योग्य आहे.

Bajri khichdi Recipe
Bajri khichdi Recipe

बाजरी ही अत्यंत पौष्टिक अशी आहे. बाजरी तुम्ही सकाळी नाष्ट्यामध्ये खाल. बाजरीची भाकरी जशी खाण्यासाठी चांगली आहे, तशी बाजरीची खिचडी देखील खाण्यासाठी उत्तम आहे.
बाजरीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

त्यामुळे हाडांचा प्रॉब्लेम जर असेल तर बाजरी मुळे हाडे बळकट होतात. तसेच जर तुम्हाला अस्थमाचा त्रास असेल तर बाजरी खाणे तुम्हाला चांगले आहे.
तुम्ही जर ऑफिसमध्ये जात असाल किंवा सकाळी घाईगडबडीत असाल तर बाजरीची खिचडी सकाळी खाल्ल्यामुळे दिवसभर आपल्याला ताकत मिळते.

बाजरीची खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • बाजरी
  • मुगाची डाळ
  • कांदा
  • मिरची
  • मिरेपूड
  • हिंग
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • गरम मसाला

कृती

  1. प्रथम बाजरी रात्री भिजत घालावी.
  2. सकाळी बाजरी काढून त्यामध्ये भिजवलेले मूग पण टाकावे आणि मग रात्री भिजत ठेवावे.
  3. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मिरची, हिंग, कांदा टाकावे. हवे असल्यास गाजर, टोमॅटो बारीक चिरून मिक्स करावे. ढोबळी मिरची देखील टाकली तरी चालेल. नंतर थोडा गरम मसाला टाकून त्यामध्ये बाजरी आणि मुग आणि हळद टाकून कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन शिजवावे.
  4. पाणी थोडे जास्त ठेवावे. त्यामुळे खिचडी थोडी मऊसर होईल.
  5. हवा असल्यास वाटाणा, बटाटा, गाजर चिरून शिजवावे व कुकरमध्ये टाकावे व हे सर्व खिचडी मध्ये मिक्स करून नंतर एकत्र शिजवावे.
  6. अशा रीतीने बाजरीची खिचडी तयार. ही खिचडी गरम गरम खाण्यास द्यावी. [Bajri khichdi Recipe]

सर्व्ह करताना त्याच्यासोबत वरून कोथिंबीर, तूप द्यावे. त्यामुळे खिचडी अत्यंत चविष्ट आणि सर्वांना आवडेल.
वयोवृद्ध लोकांना ही बाजरीची खिचडी सकाळी नाष्ट्यामध्ये द्यावी. त्यामुळे त्यांना जर सांधेदुखीचा किंवा इतर कोणता त्रास असेल तर त्याच्यामध्ये मदत होईल. शिवाय सकाळी पोटभर नाश्ता खाल्ल्यामुळे थकवा जाणवणार नाही. बाजरीची खिचडी नक्वी करून पहा…

कोफ्ता करी रेसिपी। Kofta Curry Recipe in Marathi

मोतीचूर लाडू l Motichur Che Ladoo Recipe in Marathi

कच्ची दाबेली रेसिपी | Kachchi Dabeli Recipe in Marathi

ढोकळा रेसिपी | Dhokla Recipe in Marathi

उपवासाची इडली l Upvasachi Idli in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin