DIY केळी आणि दही फेस पॅक | DIY Banana and Yogurt Face pack

DIY केळी आणि दही फेस पॅक | DIY Banana and Yogurt Face pack in Marathi

तुम्ही फेस पॅक ची रेसिपी शोधत असाल तर आज आपण पाहणार आहोत DIY Banana and Yogurt Face pack.

मित्रांनो आरशामध्ये चेहरा पाहिला की आपण सर्वप्रथम चेहरा किती सुंदर दिसतो आहे किंवा आकर्षक दिसतो आहे का हे त्यातून पाहतो आणि जर काही चेहऱ्यावर डाग असेल किंवा पिंपल असतील किंवा थोडा काळवंडला असेल तर लगेच आपण फेस पॅक लावण्यासाठी विचार करतो.

पण आपल्याला नक्की कोणता फेस पॅक लावावा हे कळत नाही, म्हणून आपण बाजारातून काही फेसपॅक विकत आणून तो चेहऱ्यावर वापरतो. त्याच्या ऐवजी जर तुम्ही घरगुती असलेल्या वस्तूंचा वापर करून चांगला फेसपॅक तयार केला तर तो जास्त उपयोगी ठरेल.

घरगुती फेसपॅक

शिवाय घरगुती फेसपॅक तुम्हाला नक्कीच फायदा मिळवून देईल. आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत अगदी दोन सोप्या वस्तू ज्याकी तुमच्या किचनमध्ये असतात. त्याचा वापर करून एक फेसपॅक बनवणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा नितळ आणि सुंदर बनवू शकता.

Banana and Yogurt Face pack फेस पॅक कोणीही लावला तरी चालू शकेल, पण ज्यांची त्वचा कोरडी आहे आणि ज्यांचे स्किन एजिंगचे प्रमाण वाढले आहे अशा लोकांना हा फेस पॅक चांगला उपयोगी ठरेल.

आजकाल तरुण मुलांना देखील चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या आहेत. काही कारण असो जसे की हेल्दी डायट किंवा प्रदूषण. या गोष्टीमुळे त्वचा वृक्ष दिसू लागली आहे. अशावेळी तुम्ही नियमितपणे फेस पॅक लावणे गरजेचे आहे जेणे करून तुमच्या चेहऱ्याचे पोषण होईल आणि चेहरा सुंदर दिसेल.

केळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

केळा आणि दही एकत्रितपणे, आल्यावर ते त्वचेला हायड्रेट करतात आणि त्वचा टवटवीत ठेवण्यास उपयुक्त ठरतात.

आणखी काही फेसपॅक –

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
DIY केळी आणि दही फेस पॅक
एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल फेस पॅक

Banana and Yogurt Face pack बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

1 पिकलेले केळ आणि 2 टेबलस्पून साधे दही घरामध्ये जे दही लावलेले असते ते जरी घेतले तरी अत्यंत उत्तम. 10 रुपयेचा छोटा दह्याचा पॅक फ्रीजमध्ये ठेवून तोदेखील फेसपॅकसाठी वापरू शकता.

एका लहान बाऊल मध्ये केळ मॅश करा चांगले पुर्ण पेस्ट तयार झाल्यावर त्यामध्ये
दही घालून चांगले एकजीव होईपर्यंत मिसळा.

डोळे आणि तोंडाचा भाग सोडून आपल्या चेहऱ्यावर केळ आणि दहीचा बनवलेला फेसपॅक लावा. हा फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर पुर्ण पसरून एकसारखा लावून ठेवा.

सुमारे 15-20 मिनिटे किंवा फेसपॅक कोरडा होईपर्यंत ठेवा.

शेवटी, कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवुन त्वचा स्वच्छ टॉवेलने कोरडी करा. तुम्ही तुमच्या नियमित स्किनकेअर रूटीन साठी हा फेसपॅक वापरू शकता आणि नंतर मॉइश्चरायझर लावू शकता.

Banana and Yogurt Face pack हा फेसपॅक बनवायला खूप सोपा देखील आहे आणि अगदी काही मिनिटामध्ये हा फेसपॅक तयार होतो.

फेसपॅकमुळे तुमची त्वचा मऊ, गुळगुळीत आणि टवटवीत तर होतेच. शिवाय त्वचा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर तेज येते. करून तर पहा आणि काही दिवसातच फरक पहा.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin