ब्युटी पार्लर व्यवसाय | Beauty parlor business in Marathi

ब्युटी पार्लर व्यवसाय | Beauty parlor business

मुले आणि मुली चेहऱ्याची, केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करतात किंवा काहीजण ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आपल्या त्वचेची काळजी घेतात.

Beauty parlor business
Beauty parlor business

ब्युटी पार्लर मध्ये विविध प्रकारच्या टेकनिक्स वापरून त्वचेला सुंदर आणि तेजस्वी बनवले जाते. म्हणून सर्वजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासठी ब्युटी पार्लरचा उपयोग करतात.

तसेच ह्यामध्ये विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक क्रिम ह्यांचा वापर करून आपल्या त्वचेला सुंदर बनवले जाते. महिलां ब्युटी पार्लरचा वापर जास्त करतात. काही पुरुष देखील ह्याचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही Beauty parlor business करत असाल तर तुम्ही ह्यापासून नक्कीच चांगला नफा मिळवू शकता.

Beauty parlor business मध्ये महिलांना आणि पुरुषांना देखील तितकीच विकासाची संधी असल्यामुळे हा व्यवसाय खूप चांगला चालला जातो. तुम्ही जर एखाद्या गोष्टींमध्ये जास्त चांगले पारंगत झाला तर तुम्ही ह्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवू शकाल. केस कापण्यासाठी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांना पार्लरमध्ये जावे लागते.

तसेच, आजकाल केसांच्या समस्या खूप वाढल्यामुळे बऱ्याचशा ट्रीटमेंट पार्लरमध्ये केल्या जातात त्यासाठी देखील भरपूर ग्राहक भरपूर पैसे देऊन चांगले पार्लर निवडून आपल्या केसांची काळजी घेतात. तुम्ही सुद्धा केसांच्या विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स आणि केस कटिंगसाठी वेगवेगळे प्रकार शिकून Beauty parlor business एक चांगला व्यवसाय म्हणून तुम्ही स्थापित करू शकता.

तसेच केसांसाठी हेड मसाज, हेअर ट्रीटमेंट्स जशा कि स्पा, केराटिन ट्रीटमेंट, हेअर शॅम्पू अशा बऱ्याच प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही कस्टमरला देऊ शकता. तुम्ही पार्लरसाठी फक्त लहान मुलांचे पार्लर देखील ओपन करू शकता. लहान मुलांचे हेअर कटिंग करण्यासाठी तुम्ही व्यवसाय म्हणून निवडू शकता. तसेच तुम्ही फक्त पुरुषांचे किंवा महिलांचे एक वेगळे पार्लर देखील ओपन करू शकता.

पार्लर तसेच तुम्ही स्पा ट्रीटमेंट देखील तुमच्या ग्राहकांना देऊ शकता. आजकाल स्पा खूप चालले जातात. मोठमोठ्या शहरामध्ये हे स्पा मध्ये लोंकांचे जाण्याचे प्रमाण खुप  जास्त आहे. तुम्ही जरी स्पा चे देखील ट्रेनिंग घेतले तरी तो सुद्धा व्यवसाय म्हणून करू शकता. 

तुम्ही फेशिअल, क्लीन्सिंग, ब्लिच, मेकअप, मेहंदी, ड्रेसिंग अशा सर्विसेस देखील तुम्ही ग्राहकांना देऊ शकता. लग्नासाठी किंवा इतर समारंभासाठी मेकअप करण्यासाठी जर तुम्ही सर्विसेस दिल्या तर ह्यापासून देखील चांगला नफा तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही अशा बऱ्याच प्रकारच्या सर्विसेस देऊन तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता.

काहीजण पार्लर मध्ये क्रीम सुद्धा तयार करून ते विकतात. तुम्ही जर त्यासाठी चांगल्या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन स्वतःच्या क्रीम देखील बनवून पार्लरमध्ये तुम्ही विकायला ठेवू शकता. किंवा तुम्ही काही क्रीम ज्या तुम्ही पार्लरमध्ये वापरता त्या होलसेलमध्ये ग्राहकांना देखील देऊ शकता. जसे कि फेस पॅक, लोशन, सनस्क्रिन , फेस क्रीम असे विविध प्रकारच्या क्रीम तुम्ही विकून अजून अधिक नफा मिळवू शकता.  

पार्लर आणि सलून ह्यामधील फरक | Difference between Beauty parlor business

पार्लर मध्ये सर्व प्रकारच्या फेशिअल आणि हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. सलून मध्ये हेअर ट्रीटमेंट्स किंवा फेशिअल ट्रीटमेंट्स काही एक्स्पर्ट लोकांकडून केल्या जातात. पार्लर हे छोट्या जागेमध्ये देखील तुम्ही चालू करू शकता. Beauty parlor business साठी तुम्हाला थोडीशी मोठी आणि स्वतंत्र अशी जागा लागते. अशा प्रकारे तुम्ही पार्लर किंवा सलून असा कोणताही व्यवसाय चालू करू शकता. पार्लर साठी तुम्हाला जास्त जागा लागत नाही आणि तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स घरगुती देखील लोकांना देऊ शकता. 

पार्लरसाठी लागणारी जागा | Place required for Beauty parlor business

तुम्ही पार्लर चे ट्रेनिंग घेऊन नंतर स्वतःच्या घरामध्ये तुमचे पार्लर चालू करू शकता किंवा तुम्ही बाहेरच्या ऑर्डर्स घेऊन तुम्ही होम सर्विसदेखील देऊ शकता. जर तुम्ही घरूनच पार्लर चालू करत असाल तर स्वतःची एक रूम तुम्ही पार्लरसाठी वापरू शकता.  त्यामुळे ह्यासाठी तुम्हाला जास्त जागेची गरज भासत नाही. जर तुम्ही स्पा किंवा सलून चालू करणार असाल तर तुम्हाला ह्यासाठी मोठी जागा किंवा स्वतंत्र अशी रूम लागते जिथे तुम्ही तुमचा Beauty parlor business चालू करू शकता. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही जागेमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचा पार्लरचा व्यवसाय चालू करू शकता.  

पार्लरसाठी तुम्ही कोणत्या सर्व्हिसेस देऊ शकता? | How much services you can provide through Beauty parlor business?

पार्लरसाठी तुम्ही मसाज, क्लीन्सिंग, फेशिअल, ब्लिच, पॅडीक्युअर, मेनिक्युअर, हेड मसाज, हेअर कटिंग, हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्पा ट्रीटमेंट, स्किन केअर ट्रीटमेंट, हेअर कटिंग साडी ड्रेपिंग, मेहंदी अशा अनेक प्रकारच्या सर्विस तुम्ही देऊ शकता. तसेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हेअर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स देखील होलसेल दरामध्ये ग्राहकांना देऊ शकता.

पार्लरसाठी लागणारे साहित्य आणि खर्च | Material and money required for Beauty parlor business

तुम्ही सर्व साहित्य एका होलसेल दुकामधून आणू शकता. तुम्हाला त्यासाठी सुरुवातीला कमी खर्चामध्ये देखील साहित्य आणून तुम्ही तुमचे काम चालू करू शकता. त्यामुळे तुम्ही पार्लर हा व्यवसाय अगदी कमी खर्चामध्ये देखील चालू करू शकता.

हेअर कटिंगसाठी लागणारी कात्री, कंगवे, वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना लावण्यासाठी पिन्स, ड्रायर असे सर्व साहित्य तुम्ही आणू शकता. फेशिअलसाठी तुम्ही फेशिअल किट ऑनलाईन देखील मागवू शकता. तुम्ही सुरुवातीला थोड्या कमी प्रमाणात वस्तू आणून तुमचे काम चालू करू शकता. नंतर तुम्ही पैसे अजून इन्व्हेस्ट करून बाकीचे साहित्य देखील घेऊ शकता. आणि तुमचा पार्लरचा सेटअप चांगल्या रीतीने करू शकता.

More business –

Profitable Idli-dosa business in marathi

कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय

कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय

पार्लरसाठी ट्रैनिंग | Training for Parlour business

ह्या व्यवसायासाठी लागणारी ट्रेनिंग तुम्ही कोणत्याही तुमच्या नजीकच्या पार्लरमधून जाऊन घेऊ शकता. तुम्ही तिथे कामासाठी मदत करून सर्व काही टेकनिक शिकून घेऊ शकता. जर तुम्हाला सर्टिफाइड कोर्सेस करायचे असतील तर बरेच एक्स्पर्ट लोक ह्यास्तही कोर्सेस देतात तिथून चांगला कोर्स निवडून तुम्ही सर्व पार्लरचे ट्रेनिंग घेऊ शकता. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही तुमचे ट्रेनिंग चालू करू शकता.

पार्लरसाठी लागणारे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक साहित्य | Electronic equipment for Beauty parlor business

तुम्ही हे साहित्य ऑनलाईन indiamart च्या वेबसाइट वरून घेऊ शकता किंवा तुम्ही इतर तुमच्या ओळखीने किंवा ट्रेनिंग मध्ये जे होलसेल विक्रत्याबद्दल माहिती दिली जाते तुम्ही त्याप्रमाणे तिथून तुम्हाला सर्व’लागणारे साहित्य विकत घेऊ शकता. तसेच ऑनलाईन ऍमेझॉन, फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवर देखील पार्लरचे सर्व लागणारे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध असते. तिथून सुद्धा तुम्ही लागणाऱ्या सामानाची खरेदी करू शकता. 

पार्लरसाठी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन | License and registration for parlour

तुम्हाला Beauty parlor business साठी जी.एस.टी तसेच शॉप ऍक्ट लायसन्स पार्लरसाठी आवश्यकता आहे. तसेच तुम्ही तुमचा एक ब्रँड स्थापित करणार असाल तर तुम्ही ट्रेडमार्क लायसन्स देखील घेऊ शकता. तुम्ही व्यवसायाविषयी सरकारी कार्यालयामध्ये माहिती देऊन तुम्ही सर्व लागणारे सरकारी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन अगोदरच रजिस्टर करून घेऊ शकता.

पार्लरसाठी तुम्ही लागणाऱ्या सर्व्हिससाठी किंमत कशी ठरवाल? | Price for the parlour services giving to customer

सर्विसची किंमत तुम्ही तुमच्या ट्रेनिंग मध्ये एक्स्पर्ट लोक मार्गदर्शन करतील किंवा तुम्ही मार्केटमध्ये पार्लरमधील प्रत्येक सर्विससाठी किती किंमत लावली आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या किमती ठरवू शकता. तसेच तुम्ही नवीन नवीन सुरुवातीला काही डिस्काउंट ऑफर देऊन देखील कस्टमर वाढवू शकता.

पार्लरसाठी तुम्हाला स्टाफ किती लागेल? | Staff required for parlour business

तुम्हाला पार्लरसाठी सुरुवातीला स्टाफ ठेवण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा जसा व्यवसाय वाढवाल तसे तुम्ही मदतीसाठी स्टाफ ठेवू शकता. त्यांना तुम्ही फ्री मध्ये पार्लरचे ट्रेनिंग देऊन तुमच्या मदतीला ठेवून तुमचे काम करून घेऊ शकता. म्हणजे त्यांना तुमच्याकडे फ्री मध्ये सर्व शिकायला देखील मिळून जाईल आणि तुमचे काम सोपे होऊन जाईल. 

पार्लरसाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट | Investment for parlour business

ह्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही ह्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करू शकता.

पार्लरसाठी मार्केटिंग | Marketing for Parlour business

तुम्ही सुरुवातीला तुमच्या आजूबाजूला तुमच्या व्यवसायाची माहिती देऊ शकता. तसेच तुम्ही व्हाट्सअँप ग्रुपमध्ये देखील तुम्ही तुमच्या पार्लरची माहिती देऊ शकता.

तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीण ह्यांना सुद्धा तुमच्या व्यवसायाबद्दल इतर लोकांना माहिती द्यायला सांगू शकता. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पार्लरसाठी ग्राहक मिळून जाईल.

तुम्ही मोठ्या प्रमाणात सर्विसेस देण्यास तयार असाल तर तुम्ही बाहेरच्या सुद्धा इतर ऑर्डर्स ऑनलाईन मार्केटिंगद्वारे घेऊ शकता.

अशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय सहजरित्या चालू करू शकता. तुम्हाला जर ह्यामध्ये आवड असेल आणि तुम्ही हा व्यवसाय चालू करणार असाल तर तुम्ही लगेचच ह्याची ट्रेनिंग नजीकच्या पार्लरमधून घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee