अश्वगंधा चे फायदे मराठी l Benefits of Ashwagandha in Marathi

अश्वगंधा चे फायदे मराठी l Benefits of Ashwagandha in Marathi

अश्वगंधा चे फायदे (Benefits of Ashwagandha) भरपूर आहेत. कारण ही वनस्पती अत्यंत औषधी आणि आयुर्वेदमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरली जाते शिवाय याचे फायदे लोकांना बऱ्याच प्रमाणात झाले देखील आहेत.

अश्वगंधा (Ashwagandha) ही एक औषधी वनस्पती आहे. जी आयुर्वेदामध्ये बऱ्याच उपचारांसाठी मदत ठरते. अश्वगंधा या वनस्पतीमुळे जर कोणाला ताण, तणाव किंवा चिंता या गोष्टी सतावत असतील तर त्याच्यामध्ये खूप फायदा होतो.

अलीकडच्या काळामध्ये अश्वगंधाचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. औषधे किंवा आयुर्वेदिक उपचारांमध्ये अश्वगंधांची पावडर, अश्वगंधा टॅबलेट तसेच लिक्विड फॉर्ममध्ये देखील अश्वगंधा आपल्याला मिळते. टेन्शन किंवा तणाव यामुळे जर तुम्ही त्रस्त होत असाल तर तुम्हाला अश्वगंधा टॅबलेट किंवा लिक्विड जर डॉक्टरांचा सल्ला घेवून घेतले तर ह्याचे तुम्हाला चांगले फायदे मिळतील.

अश्वगंधा ही एक पिवळ्या फुलांची छोटीशी वनस्पती आहे जी मूळ भारतामध्ये व आफ्रिका मध्ये काही भागांमध्ये दिसून येते. हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी अश्वगंधांची मुळे आणि बेरि यांचा वापर केला जातो. अलीकडच्या काळामध्ये अश्वगंधा मुळे बरेच आरोग्याचे फायदे देत असल्यामुळे देखील भरपूर लोकप्रिय झाली आहे.

अश्वगंधा वनस्पतीचे विविध फायदे

तणाव आणि चिंता कमी करते

अश्वगंधा (Ashwagandha) ही ताण तणाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. याचे काही गुणधर्म शरीराच्या ताणतणावास कमी करण्यास व कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास मदत करतात. शरीराच्या तणावासाठी जबाबदार असलेले काही हार्मोन्स अश्वगंधा घेतल्यामुळे बॅलन्स राहतात. इंडियन जनरल ऑफ सायकॉलॉजिकल मेडिसिन मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की अश्वगंधा लोकांच्या तुलनेत चिंता आणि नैराश्याच्या लक्षणे कमी करण्यामध्ये चांगल्या रीतीने फायदा मिळवून देते.

सहनशक्ती वाढवते

शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी शतकानू शतके अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरण्यात आले आहे. काही अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की सहनशक्ती वाढवण्यासाठी देखील अश्वगंधा या वनस्पतीचा वापर होतो. यासाठी जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनमध्ये एक टेस्ट घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये असे दिसून आले की ज्या व्यक्तींनी अश्वगंधा घेतले आहे त्या व्यक्तींमध्ये स्नायूंचे द्रव्यमान वाढून ताकद वाढत आहे.

मेंदूचे कार्य सुधारते

अश्वगंधा ही अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या रोगांमध्ये देखील चांगली मदत नीस ठरली आहे. काही अभ्यासामध्ये हे आढळून आले आहे की अश्वगंधा घेतल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास देखील मदत मिळाली आहे. जर्नल ऑफ डायटरी सप्लीमेंट मध्ये प्रकाशित केलेल्या एका लेखांमध्ये असे सांगितले आहे की अश्वगंधा घेतलेल्या लोकांमध्ये स्मरणशक्ती मध्ये बऱ्याच प्रकारे चांगले सुधारणा झाली आहे. त्यामुळे अश्वगंधा ही वनस्पती मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी चांगली मदत करते.

कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते

रक्तातील साखर कमी करणारे आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे काही घटक अश्वगंधामध्ये असल्याचे आढळून आले आहे. काही स्टडी मध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीय घटल्याची दिसून आले, जेव्हा त्या व्यक्तींनी अश्वगंधा या वनस्पतीचा वापर करून औषध घेतले. नैसर्गिक उपाय म्हणून अश्वगंधा हे मधुमेह वर देखील सुधारण्यासाठी चांगले मदत करू शकते असे आयुर्वेद तज्ञांचे देखील म्हणणे आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते

अश्वगंधा (Ashwagandha) ही औषधाचा वापर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील करण्यात येतो. काही रोगांचे संक्रमण किंवा आजारांपासून लढण्यासाठी देखील अश्वगंध्येचा वापर करण्यात येतो. काही आयुर्वेदिक अभ्यासामध्ये अश्वगंधा घेतलेल्या लोकांच्या रोगप्रतिकार शक्ती मध्ये वाढ दिसून आली आहे. अँटीव्हायरला गुणधर्म अश्वगंधा मध्ये असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास अत्यंत लाभदायक आहे.

जळजळ कमी करते

संपूर्ण शरीरामधील सूज कमी करण्यासाठी देखील अश्वगंधा या वनस्पतीचा वापर औषधांमध्ये केला जातो. ज्या व्यक्तींना जळजळ होते आणि ज्या व्यक्तींना संधीवाताचा त्रास आहे त्या व्यक्तींना देखील अश्वगंधाचे भरपूर फायदे दिसून आले आहेत. [Proven Health Benefits of Ashwagandha]

अश्वगंधा (Ashwagandha) बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अश्वगंधा सेफ आहे का?

अश्वगंधा ही वनस्पती औषधांमध्ये वापरण्यात येते त्यामुळे ही सेफ आहे. परंतु ज्यावेळी अश्वगंधाचा वापर तुम्ही औषध म्हणून करणार असाल त्यावेळी तुम्ही डॉक्टरांच्या योग्य सल्याने याचा डोस किती घ्यावा व कसे घ्यावे हे विचारूनच तुम्ही हे औषध वापरू शकता.

अश्वगंधा औषध किती आणि कसे घ्यावे?

अश्वगंधा हे औषध घेण्यासाठी तुम्ही वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांच्या दिलेल्या डोस नुसार तुम्ही आणि इन्स्ट्रक्शन नुसार अश्वगंधा तेवढ्या प्रमाणात घेऊ शकता.

अश्वगंधाचे फायदे किती दिवसांमध्ये कळतात?

अश्वगंधा याचा होणारा तुमच्या शरीरावर परिणाम तुम्हाला काही दिवसांमध्ये जाणवेल. प्रत्येक व्यक्तीला काही दिवसांमध्ये फरक जाणवतो, तर काही आठवड्यांमध्ये. काही व्यक्तींना महिन्याने फरक जाणवतो. त्यामुळे अगदी नक्की किती दिवसात तुम्हाला फरक जाणवेल ते सांगता येणार नाही.

अश्वगंधा ही औषधी वनस्पती आहे आणि शतकानोशतके ती आयुर्वेदामध्ये वापरली जात आहे. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी, मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी तसेच शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील अश्वगंधा ही अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. अश्वगंधा जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमच्या हेल्थकेअर एक्सपर्ट च्या सल्ल्यानुसार किंवा आयुर्वेदिक तज्ञनुसार अश्वगंधा च्या सप्लीमेंट घेऊ शकता.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity