अंजीर खाण्याचे फायदे I Benefits of eating figs in Marathi

अंजीर खाण्याचे फायदे I Benefits of eating figs in Marathi

अंजीर खाण्याचे खूप फायदे (Benefits of eating figs) आहेत. आज अंजीर खाण्याचे काही आणि महत्त्वाचे फायदे पाहूया.

Benefits of eating figs
Benefits of eating figs

अंजीर हे पौष्टिक स्वादिष्ट आणि चविष्ट असे फळ आहे, जे फळ आपण सर्वांनी पाहिलेच असेल. अंजीर हे फळ छोटे गोल आकारामध्ये एकदम डार्क लाल कलर मध्ये असते. जे अत्यंत गोड आणि चवीला देखील चांगले असते.

अंजीर हे दिसायला जेवढे सुंदर दिसते तेवढे चवीला देखील चांगले असते. पण शिवाय ते पौष्टिक देखील तितकेच आहे. तुम्ही कच्चे अंजीर पण खाऊ शकता किंवा अंजीर सुकवून देखील वाळल्यानंतर ते देखील खाल्ले जाते.

आजच्या लेखामध्ये आपण अंजीर खाण्याचे फायदे पाहणार आहोत. तर चला पाहूया अंजीर खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि जे तुम्हाला कसे उपयोगी पडतील. कोणी अंजीर खाणार नाही असे होणारच नाही अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना अंजीर अंजीर आवडते.

अंजीर खाण्याचे फायदे

अंजीर हे भरपूर पोषक आहे

फायबर पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि बी 6, व्हिटॅमिन k असे अनेक विटामिन हे अंजीर मध्ये मिळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. यामध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन मेंटेन ठेवण्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.

अंजीर पचनासाठी चांगले असते

भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे अंजीर हे पचन सुधारण्यासाठी व बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. यामध्ये विविध पोषक घटक जसे प्रथिने असतात जे निरोगी आतड्यासाठी आणि नवीन बॅक्टेरिया तयार करण्यास मदत करतात.

अंजीर मुळे रक्तदाब कमी होऊ शकतो

अंजिन हे पोटॅशियम चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते उच्च रक्तदाब हृदयविकार आणि किडनी सारखे आजारासाठी एक घटक आहे जो कमी करण्यामध्ये अंजीर उपयोगी ठरते.

कर्करोगासारख्या रोगांमध्ये उपयोगी

अंजीर मध्ये वेगवेगळे विटामिन आणि लागणारे संयुगे आहेत जी कर्करोगाविरोधी काम करतात, असे काही अभ्यासामध्ये आढळून आले आहे. यामध्ये flavonoids, finolik acid, lignus यांचा समावेश असतो जे कर्करोगाच्या पेशीची वाढ रोखण्यास मदत करू शकतात.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी

रक्तदाब कमी करण्यासाठी अंजीर उपयोगी तर ठरतेच. पण जळजळ कमी करणे, रक्तातील लिपिड पातळी सुधारणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारणे यासाठी देखील अंजीर अत्यंत चांगले फळ आहे. अँटिऑक्सिडंट चे प्रमाण अंजीर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे तणावापासून संरक्षण तसेच जुनाट आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी मदत करते.

हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी

कॅल्शियमचा देखील अत्यंत चांगला स्रोत आहे. ज्यामुळे निरोगी हाडांसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम अंजीर मुळे मिळते. त्यासोबत मॅग्नेशियम आणि विटामिन के हे पोषक घटक देखील हाडांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात.

त्वचेचे आरोग्य सुधारते

अँटिऑक्सिडंट चे प्रमाण अंजीर मध्ये भरपूर असल्यामुळे त्वचेसाठी अंजीर उपयोगी ठरते. सूर्यप्रकाशाचा किरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच त्वचेवर अगुंगची चिन्हे कमी करण्यास आणि कॉलेजन चे प्रमाण वाढवण्यासाठी अंजीर अत्यंत उपयोगी ठरते.

अंजीर कसे खावे?

अंजीर तुम्ही कसेही खाऊ शकता हे ताजे किंवा वाळलेले देखील खाऊ शकता किंवा तुम्ही 🥗 सलाड मध्ये वापरून अंजीर जरी खाल्ले तरी चालू शकते.

कच्चे आणि जर अत्यंत स्वादिष्ट लागते. त्यामुळे जर तुम्ही अंजीर इतर कोणत्याही प्रकारे खाण्यासाठी तयार नसाल तर तुम्ही कच्चे अंजीर दरी रोज घेतले तरी चालू शकते.

वाळलेले अंजीर मध्ये जास्त विटामिन चे सत्व दिसून येतात त्यामुळे वाळलेले अंजीर देखील तुम्हाला जास्त पोषक ठरते. जर तुम्हाला दातांचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही कोरडे व वाळलेले अंजीर देखील नियमितपणे खाऊ शकता.

काही जणांना गोड आवडत नाही अशा लोकांनी ओट्स मध्ये अंजीर मिक्स करून खाल्ले तरी चालू शकेल.

इतर फळांचे फ्रुट्स 🥗 सॅलड बनवतात त्याच्यामध्ये अंजीर खाऊ शकता.

बेकिंग करताना देखील अंजीरचा उपयोग केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला बेकिंग पदार्थ बनवायचे असतील आणि लहान मुलांना अंजीर खाण्यासाठी द्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या बेकिंगच्या पदार्थांमध्ये देखील अंजीर मिक्स करून मुलांना देऊ शकता.

अंजीर हे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे फळ आहे. ज्याचे आरोग्याचे फायदे भरपूर आहेत. अंजीर खाण्याचे फायदे आपण पाहिलेत तर नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये अंजीर चा वापर करा आणि लहान मुलांना देखील अंजीर खाण्यासाठी द्या. ज्यावेळी अंजीरचा सिझन असतो त्या सिझनमध्ये अंजीर खाणे जास्त योग्य आहे. जर तुमच्याकडे ओले अंजीर उपलब्ध नसतील तर तुम्ही सुखे अंजीर देखील आणून खाऊ शकता.

तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी किंवा पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी अंजीर हे आहारामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे असे फळ आहे. ते तुम्ही ताजे किंवा वाळलेले असो कसेही खाऊ शकता. जर तुम्हाला निरोगी आणि स्वादिष्ट नाष्टा हवा असेल तर आहारामध्ये अंजीर नक्कीच वापरा.

(Disclaimer – This website’s content is not meant to be a replacement for qualified medical guidance. Before taking any medication, always check with your physician or another qualified health care professional.)

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय l Home remedies to lighten face

खोबरेल तेलाचा वापर आणि फायदे l Uses and Benefits of Coconut Oil

ग्रीन ज्यूस – वजन कमी करण्याचे रहस्य आणि चेहरा सुंदर l Green Juice – The Secret to Weight Loss and a Healthy Glow in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee