मुळा खाण्याचे फायदे l Benefits of eating Radish

मुळा खाण्याचे फायदे l Benefits of eating Radish in Marathi

मुळा हा आपण सॅलड मधून किंवा त्याची भाजी बनवून खातो. मुळा खाण्याचे फायदे (Benefits of eating Radish) शरीराला भरपूर आहेत शरीराला पोषक द्रव्य मिळवून देणे आणि शरीरामधील विटामिन ची कमतरता भरून काढणे यामध्ये मुळा अत्यंत उपयोगी ठरतो.

Benefits of eating Radish
Benefits of eating Radish

मुळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण भरपूर असते. विटामिन सी फायबर प्रोटीन अशा प्रकारचे विटामिन देखील मुळ्यामध्ये आढळतात.

मुळा खाण्याचे फायदे / Benefits of eating Radish –

लिव्हर साठी अत्यंत लाभदायक

लिव्हरची क्रिया सुरळीत चालण्यासाठी व लिव्हरचा जर त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये नियमितपणे मुळ्याचे सेवन करणे योग्य आहे. त्यामुळे लिव्हर साप राहते आणि लिव्हरच्या क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

ब्लड प्रेशर नियंत्रण करण्यासाठी मुळा उपयोगी

मला जर ब्लड प्रेशर चा त्रास असेल तर शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम चा स्तर बॅलन्स करण्यासाठी मुळा हा अत्यंत उपयोगी ठरतो. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रण होण्यास मदत होते. मुळा हा आहारामध्ये तुम्ही भाजी द्वारे किंवा सॅलड म्हणून जेवताना घेतला तरी चालू शकतो.

शरीराची स्वच्छता करण्यासाठी मुळा उपयोगी

मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट चे प्रमाण असल्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स ना बाहेर टाकण्यास मदत करतो. यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकले गेल्यामुळे शरीराची पूर्ण स्वच्छता होते व त्यामुळे होणारे आजार कमी होण्यास मदत मिळते. भूक न लागणे पचनक्रिया संबंधी जे काही आजार असतात ते कमी होण्यास मदत मिळते.

त्वचा सुंदर होण्यासाठी मुळा उपयोगी

मुळा खाल्ल्यामुळे शरीरातून आतून जशी स्वच्छता होते तसेच तुमची त्वचा देखील सुंदर होण्यास मदत मिळते. मुळा खाल्ल्यामुळे शरीरातील पोषक तत्वे भरून निघतात आणि त्यामुळे त्वचा टवटवीत आणि तेजस्वी राहण्याचा फायदा होतो.

मुळ्यामुळे पचनक्रिया सुधारते

मुळ्याचा रस जर नियमितपणे पिला तर त्यामुळे शरीरातील पोटामध्ये होणारे आजार असतात ते कमी होतात. मध्ये जडपणा वाटत असेल किंवा पोट दुखत असेल तर अशावेळी मुळ्याचा रस मीठ घालून तिला तर त्याचे फायदे अनेक मिळतात. ज्यांना वाताची समस्या असते त्यांनी मुळा खाऊ नये कारण मुळ्यामुळे वात वाढतो.

मुळा कशाप्रकारे खावा?

  • मुळ्याची फोडणी देऊन भाजी करून मुळा जरी खाल्ला तरी चालू शकतो.
  • तुम्हाला जर तुमच्या जेवणामध्ये मुळा आवडत नसेल तर तुम्ही सॅलडमध्ये मुळा बारीक करून खाल्ला तरी चालतो.
  • मुळ्याचे लोणचे देखील केले जाते लोणचे वर्षभर टिकते त्यामुळे जर तुम्ही लोणचे करून रोज ते जेवणाबरोबर घेतले तरी त्याचा फायदा देखील तुम्हाला मिळतो.
  • तुम्हाला जर जेवणामधून मुळा खायचा नसेल तर तुम्ही मिक्सर मधून मुळा बारीक करून त्याचा रस सकाळी घेतला तरी चालतो. मुळ्यामध्ये चवीपुरते थोडेसे मीठ टाकून हा रस नियमित घ्यावा याने देखील फायदा मिळतो.
  • जशी तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवतात तशी त्याप्रमाणे मुळ्याची चटणी बनवून देखील ती तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर घेऊ शकता.

अशा रीतीने विविध प्रकारे मुळा वापरून तुम्ही जेवणामध्ये मुळापासून होणारे फायदे मिळवू शकता. हे लक्षात घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे की कोणतेही गोष्टीचे अतिरेकपणा योग्य नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणता हजर असेल किंवा त्रास होत असेल तर तुम्ही प्रथम डॉक्टरांशी संपर्क साधावा व त्यानंतरच उपाय करावेत.

इथे सांगितलेले फायदे हे तुम्हाला माहिती म्हणून देण्यात आले आहेत. जसे आपण इतर भाजी आणि फळे आहारामध्ये घेतो. त्याप्रमाणे जर आपण वेगवेगळी फळे आणि भाज्या आहारामध्ये खाल्ले तर आपल्याला त्याचे भरपूर फायदे मिळतात.

(Note – This website’s content is not meant to be a replacement for qualified medical guidance. Before taking any medication, always check with your physician or another qualified health care professional.)

ओवा खाण्याचे फायदे l Benefits of eating Ova in Marathi

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय l Home Remedies to Increase Hemoglobin in Marathi

अंजीर खाण्याचे फायदे I Benefits of eating figs in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
Vitamin D3 Fruits and Veggies which Will Improve Your Well-being.11 Desserts Without Sugar That Are Ideal for Any OccasionThe Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings on New yearThe 11 Smoothies That Are Ideal for Travelers
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?