त्वचा सुंदर दिसण्यासाठी लिंबाचे फायदे l Benefits of lemon for beautiful skin

त्वचा सुंदर दिसण्यासाठी लिंबाचे फायदे l Benefits of lemon for beautiful skin

त्वचा सुंदर दिसण्यासाठी लिंबाचे फायदे (Benefits of lemon for beautiful skin) भरपुर आहेत ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि सतेज दिसेल.

Benefits-of-lemon-for-beautiful-skin
Benefits of lemon for beautiful skin

आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण रोज काही ना काही प्रयत्न करत असतो. आपल्याला बरेच घरगुती उपाय माहित आहेत पण आपण घरगुती उपाय करण्यापेक्षा बाहेरील नवनवीन प्रॉडक्ट आपल्या त्वचेवर लावून आपली त्वचा आणखीन खराब करतो.

लिंबू हा आपल्या सर्वांच्या घरात असतोच. हा लिंबू जर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी फेस पॅक म्हणून वापरला तर याचे खूप फायदे (Benefits of lemon for beautiful skin) तुम्हाला मिळू शकतात.

लिंबाचे फायदे

  • तुमची त्वचा सुंदर आणि सतेज बनवण्यासाठी लिंबू अत्यंत उपयोगी आहे. लिंबामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन काढून त्वचेवर नवीन सेल निर्माण करण्याचे कार्य लिंबू करते.
  • लिंबामध्ये ब्लिचिंग चे गुणधर्म असल्यामुळे तुमच्या स्किन लाइटनिंग साठी त्वचेवर लिंबू हा अत्यंत उपयोगी आहे.
  • तुम्ही जर बाहेरची उत्पादने वापरत असाल तर त्याच्या ऐवजी लिंबाच उपयोग करावा. त्यामुळे तुमच्या स्किनच्या एजिंग चे प्रमाण कमी होण्यास देखील मदत मिळते.
  • चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आले असतील किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर त्यासाठी देखील लिंबू अत्यंत उपयोगी आहे.
  • आपल्याला माहीत नसेल पण सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी लिंबाचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.
  • तुम्ही विटामिन सीरम वापरत असाल त्या विटामिन सीरममध्ये लिंबा मध्ये असलेले सायट्रिक ऍसिड असते. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे ब्लिचिंग होते.

तर पाहूया की कशाप्रकारे तुम्ही सुंदर दिसण्यासाठी लिंबाचा वापर घरच्या घरी कराल. त्यासाठी तुम्हाला महागड्या क्रीम आणण्याची काहीच गरज नाही.

लिंबाचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी वापर

  • एक चमचा लिंबाचा रस डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून थोडीशी चिमूटभर हळद घेऊन तो चेहऱ्यावर लावावा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघून जातील आणि चेहरा पूर्ण स्वच्छ होईल. हा फेस पॅक वापरल्याने तुमच्यावर चेहऱ्यावर एक वेगळी चमक येईल.
  • दही आणि लिंबाचा रस एकजीव करून तो मानेवर किंवा जिथे जिथे तुमची त्वचा काळवंडलेली आहे त्या भागामध्ये लावावा यामुळे काळवंडलेली जागा स्वच्छ होऊन पांढरी होईल.
  • खोबरेल तेल किंवा बदाम तेलामध्ये लिंबाचा रस टाकून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावावा त्यामुळे तुमचे पिंपल्स ब्लॅक हेड्स कमी होण्यास मदत मिळेल व जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तेलकटपणा निघून जाईल.
  • मध आणि लिंबाचा रस एकत्र लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते शिवाय तुमचा चेहरा जर कोरडा असेल तर त्याच्यावर एक वेगळी चमक निर्माण होते व चेहरा सॉफ्ट आणि तुकतुकीत दिसतो.
  • आपल्या हाताचे कोपर, पायांचे गुडघे कोपर मानेवर चिकटचा जर काळ बनले असेल तर तुम्ही दुधाच्या साई मध्ये लिंबाचा रस टाकून हे मिश्रण त्या जागी चोळा हळू हळू काळसरपणा कमी होईल.
  • ओठ सारखे फुटत असतील किंवा सुकलेल्या दिसत असतील तर लिंबू आणि दुधाची साय बोटांवर लावावे व नियमितपणे याचा म्हणून वापर करावा ओठ भाऊ आणि मुलायम होतील.
  • काकडीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर हळूहळू लावा. यामुळे देखील चेहरा टवटवीत आणि सुंदर दिसण्यासाठी उपयोगी ठरतो. असे दोन वेळा केल्याने तुमचा चेहरा सतेज होईल.
  • लिंबाचा रस आणि साखर एकत्र करून हे मिश्रण स्क्रब म्हणून वापरा तुमच्या त्वचेवर मसाज करण्यासाठी हे मिश्रण तुम्ही वापरू शकता.
  • अंडरआर्म्स काळे झाले असतील तर लिंबाचा रस अत्यंत उपयोगी आहे लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये मध आणि हळद टाकून हे मिश्रण लावा अंडरआर्म्सला लावा वीस मिनिटांनी स्वच्छ करा.

अशा प्रकारे लिंबाचे भरपूर फायदे आहेत याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा अत्यंत सुंदर आणि निरोगी अशी बनवू शकता याच्यामध्ये तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. तुमचा चेहऱ्यावर जास्तच पिंपल असतील किंवा चेहरा खूप सेन्सिटिव्ह असेल तर अशावेळी वैद्यकीय सल्ला घेणे जास्त योग्य ठरेल.

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
The Grapeful’s Surprising The benefitsYour kitchen holds the key to turning white hair blackThe Fruit Bowl Holds the Key to Natural BeautyEnhance Facial Beauty with these Home RemediesDo you know the benefits of eating figsUsing cinnamon to get radiant skin is naturalThe All-Day Energy Booster With Natural Ingredients – DatesDaily green smoothie to Glow your SkinQuick and Easy half baked harvest chicken saladLala green smoothie to glow your skin on New year
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day