आहारामध्ये या 7 बिया खाण्याचे फायदे l Biya khanyache Fayde

आहारामध्ये या 7 बिया खाण्याचे फायदे l Biya khanyache Fayde

आहारामध्ये वाळलेल्या बिया खाण्याचे फायदे (Biya khanyache Fayde) देखील भरपूर आहेत. पण आपल्याकडे अशा वाळलेल्या बिया कधीतरी जेवणामध्ये वापरल्या जातात.

Biya khanyache Fayde
Biya khanyache Fayde

शक्यतो करून आपण जवस सूर्यफूल आणि तीळ यांचा वापर कधीतरी करतो. परंतु ह्या बिया तुम्ही खाल्ला मुळे शरीरास भरपूर फायदे मिळतात. तर आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत या बियांपासून कोणकोणते फायदे मिळतात.

या लेखांमध्ये सात बिया दिल्या आहेत त्या जर तुम्ही दररोज घेतला तर तुम्हाला तुमच्या शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि पोषक तत्वे मिळतात.

ज्यामुळे तुमच्या शरीराचे चांगले पोषण होते दररोज फक्त एक चमचा जरी या बियांचा वापर आहारामध्ये केला तरी तुम्हाला त्याचा लाभ होईल.

कोणताही उपाय करण्यात अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे इथे फक्त बिया आणि त्याविषयी माहिती दिली आहे तुम्हाला जर कोणते हेल्थ इशू असतील तर तुम्ही प्रथम वैद्यकीय सल्ला घ्यावा व नंतर आपले डायट चेंज करावे.

जवसाच्या बिया

या बियांमध्ये प्रथिने, ब 1 जीवनसत्त्व, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्‌स, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर हे क्षार असतात.
दोन टेबलस्पून जवसाच्या बियांमध्ये 6 ग्रॅम फायबर आणि 4 ग्रॅम प्रथिने असतात.

सूर्यफूलाच्या बिया

सूर्यफुलात ई जीवनसत्त्व, कॅल्शियम, अँटी ऑक्‍सिडेंट्‌स मोठ्या प्रमाणात असतात. या बिया पोषणमूल्यांनी अत्यंत समृद्ध आहेत.
या बियांमधील फायटोसस्टेरॉल घटकामुळे कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. केसांची मुळे घट्ट होतात. मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी आदी त्रास कमी होतात.

भोपळ्याच्या बिया

यामध्ये ई जीवनसत्त्व, झिंक, मॅंगेनीज, फॉस्फरस, मोनोसॅच्युरेटेड फॅट्‌स, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्‌स असतात, हृदयविकार, मधुमेहींसाठीही भोपळ्याच्या बिया उपयुक्त आहेत.

सर्व प्रकारचे कॅन्सर्स, विशेषत: प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. यासाठी रोज दोन ते चार चमचे भोपळ्याच्या भाजलेल्या बिया खाल्ल्याच पाहिजेत.

शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्‍यक असणारी फॅट्‌स भरपूर प्रमाणात असतात.
कच्चे, भाजलेले खारे शेंगदाणे किंवा गूळ-शेंगदाण्याचा लाडू, शेंगदाण्याचा कूट, चिक्की अशा कोणत्याही प्रकारात शेंगदाणे खाता येतात. मात्र, पचायला जड असल्याने शेंगदाणे प्रमाणातच खावेत.

काळे आणि पांढरे तीळ

तीळ बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात. तसेच, मूळव्याधीवर गुणकारी, हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत.

वजन वाढविणाऱ्या आणि कमी करू इच्छिणाऱ्या अशा दोघांनीही तीळ खाणे हितकारक आहे. काळ्या तिळांत औषधी गुणधर्म असतात.

खसखस

या काहीशी मातकट चव लागणाऱ्या बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. यातून कॅल्शियम, लोह, प्रथिनेही मिळतात. यात प्रति औंस 6 ग्रॅम फायबर्स असतात.

यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. पोटदुखी, उलटीच्या समस्येवर गुणकारी आहेत.

हळीव

लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक असतात.तसेच, 100 ग्रॅम हळिवांत तब्बल 100 मिलिग्रॅम आयर्न असते.

यात अँटिऑक्‍सिडंट्‌स व रक्तशुद्धी करणारे घटक असतात. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत.
हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी होते. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.

ह्या बियांचा वापर तुम्ही तुमच्या भाज्यांमध्ये बारीक करून टाकून करू शकता किंवा तुम्ही जर पराठे वगैरे बनवत असाल तर त्यामध्ये मिक्स करून खाल्ले तरी चालतील.

ज्यावेळी तुम्ही नाश्टा बनवत असाल, त्यावेळी सँडविच मध्ये या बिया वापराव्यात. मिल्कशेक किंवा स्मुदी तयार करत असाल तर त्यामध्ये देखील या बिया वापरल्या तरी चालतील. कोणताही उपाय करण्याअगोदर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला कोणतेही हेल्थ प्रॉब्लेम असतील तर प्रथम वैद्यकीय सल्ला घ्यावा व त्याप्रमाणे आहारात बदल करावा.

सुटलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय l Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay

11 स्किन केअर टिप्स l 11 Skin Care Tips

एलोवेराचे अनेक फायदे l Aloevera Benefits in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?