डिझाईन्स तयार करून आपला उद्योग कसा चालू कराल । Business by making attractive designs in Marathi

डिझाईन्स तयार करून आपला उद्योग कसा चालू कराल । Business by making attractive designs in Marathi

तुम्ही जर डिझाईन्स मध्ये पारंगत असाल तर तुम्हाला तुमचा उद्योग चालू करण्याची एक चांगली संधी आहे. तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या डिझाईन्स तयार करणे जसे कि तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्याची डिझाईन्स, बेडशीट्स आणि पिलोसाठी वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करणे किंवा एम्ब्रॉयडरी चा वापर करून किंवा पैंटिंग्सचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या आर्टस् आणि डिझाईन्स तयार करू शकत असाल तर ह्यासाठी सध्या खूप मागणी आहे.

तुम्ही जर अशा प्रकारे काही काम करत असाल तर तुम्ही काही जे उद्योग करत आहेत त्यांना तुमच्या डिझाईन्स दाखवून त्यांच्यासाठी तुम्ही घरीबसल्या काम करू शकता.

जर तुम्ही कपड्यांसाठी डिझाईन्स तयार करत असाल तर तुम्ही तुमच्या नजीक बुटीक किंवा कपडे शिवणकाम करणारी दुकाने असतील तर त्यांना जर fashionable डिझाईन्स ची गरज असेल तर त्यांच्याशी बोलून आणि तुमच्या डिझाईन्स त्यांना दाखवून तुम्ही हा उद्योग चालू करू शकता.

तसेच तुम्ही जर मेहंदी डिझाईन्स, रांगोळी डिझाईन्स, एम्ब्रॉयडरी डिझाईन्स, मोबाईल केस डिझाईन्स अशा बऱ्याच प्रकारच्या डिझाईन्स तयार करून त्या तुम्ही विकून चांगला नफा मिळवू शकता. मेहंदीसाठी लग्नसमारंभासाठी खूप मागणी असते.

तुम्ही अशा ऑर्डर्स सुद्धा घेऊ शकता. वेगवेगळ्या सणासुदीला रांगोळी काढण्यासाठी सुद्धा खूप मागणी असते. तुम्ही डिझाईन्सचा वापर करून वेगवेगळे डेकोरेशन्स जर करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काम करू शकता.

अशा रीतीने बऱ्याच ठिकाणी डिझाईन्स चा वापर करून तुम्ही तुमचा चांगला नफा मिळवू शकता.

लागणारी जागा | Place for your business

तुम्हाला ह्यासाठी जागेची गरज भासत नाही तुम्ही घरीबसल्या हा उद्योग चालू करू शकता. तुम्ही तुमच्या फोनच्या मदतीने तुमच्या ऑर्डर्स घेऊ शकता. आणि घरूनच काम करून चांगला नफा मिळवू शकता.

वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट डिझाईन्स | Various types of designs

डिझाईन्स मध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारच्या आकर्षक गोष्टी बनवून त्या लोकांना विकू शकता. त्यासाठी तुम्ही सणासुदींनुसार लागणाऱ्या डिझाईन्स किंवा रेगुलर कपड्याची लागणाऱ्या डिझाईन्स अशा निवडून ऑर्डर्स घेऊ शकता.

आपल्याकडे लग्नसमारंभ, सण वगैरे केले जातात त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला लागतात. जसे कि गणपती गौरी साठी तोरण, मकर, गौरीसाठी आकर्षक डिझाईन्समध्ये दागिने, रांगोळी अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही सेल करू शकता.

तुमच्या आकर्षक डिझाईन्सचा वापर करून तुम्ही अजून बऱ्याच प्रकारच्या वस्तू तयार करून त्या विकू शकता. फक्त तुम्ही नवीन नवीन आकर्षक डिझाईन्स आणि ideas वापरून तुम्ही ह्या वस्तू विकू शकता. तुम्ही ह्या डिझाईन्स दुसऱ्या कुणी छोट्या उद्योजकासाठी लागणार असतील तर तिथे सुद्धा तुम्ही विकू शकता.  

डिझाईन्ससाठी लागणारा कच्चा माल | Raw material

डिझाईन्स कारण्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या डिझाईन्स तयार करून त्या दुसऱ्यांना देऊन त्याचा वापर त्यांच्या उद्योगासाठी ते करू शकतात.

तुम्ही तुमच्या डिझाईन्स jewellary शॉप्समध्ये, कटलरी शॉप्समध्ये देऊन पैसे कमउ शकता. तसेच तुम्ही ह्याचा वापर करून जर तुम्ही एखादी चांगली नवीन वस्तू तयार करणार असाल तर त्यासाठी तुम्ही मटेरियल चांगल्या होलसेल दुकानातून आणून तुमचा उद्योग चालू करू शकता.

 जसे कि जर तुम्हाला दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या किंवा मेणबत्तीसाठी दिवे डिझाईन्स करायला आवडत असेल तर तुम्ही ह्यासाठी लागणाऱ्या पणत्या आणि दिवे एका होलसेल दुकानातून विकत आणून त्यावर तुम्ही तुमच्या डिझाईन्स बनवून त्या पणत्या तुम्ही दुकानात विकायला देऊ शकता. तसेच तुम्ही तुमचे स्टॉल सुद्धा लावून त्या विकू शकता.

डिझाईन्ससाठी लागणाऱ्या मटेरियलसाठी लागणारा खर्च | Investment for business

डिझाईन्ससाठी तुम्हाला ज्या गोष्टी लागतील त्या कमीत कमी दरात कशा मिळतील त्यासाठी तुम्हाला प्रथम काही होलसेल विक्रत्याकडे जाऊन त्याची किंमत पहिली पाहिजे. त्यामध्ये

तुम्हाला कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त माल जो कोणी देईल आणि गुणवत्ता देखील तेवढीच असेल तर तुम्ही तुमचे लागणारे मटेरियल तिथूनच विकत घेऊन तुमचे काम चालू शकता. तुमच्या ओळखींमध्ये कुणी जर असेल तर तो तुम्हाला ह्यामध्ये नक्कीच मदत करेल. जर मटेरियल अशा रीतीने कमीत कमी किमतीत तुम्हाला मिळाले कि तुम्ही मग ती वस्तू डिझाईन करून त्यावर तुमचा नफा ऍड कडून ती तुम्ही विकू शकता.

डिझाईन्ससाठी लागणाऱ्या मशीन आणि त्याचा खर्च | Machine investment

डिझाईन्ससाठी जर तुम्हाला कोणत्या मशिन्स सुद्धा लागत असतील तर त्याचा खर्च किती होतोय हे पाहणे गरजेचे ठरते. तुम्हाला कमीत कमी किमतीत जर मशिन्स  मिळाल्या तर तुमची गुंवणूकसुद्धा कमी राहील. जर तुम्ही नवीन मशिन्स घेऊ शकत नसाल तर सुरुवातीला तुम्ही जुनी मशीन घेऊन त्यावरच तुमचे काम करू शकता. मशीन ची जर तुम्हाला गरजच नसेल तर मग तुम्हाला अजूनच सोयीस्कर ठरेल.

डिझाईन्ससाठी तुम्ही ठरवलेले प्रॉडक्ट त्यासाठी कच्चा माल आणि पॅकेजिंग | Packaging and raw material

डिझाईन्ससाठी तुम्ही कोणता प्रॉडक्ट ठरवलं आहे आणि त्यासाठी कच्चा माल तुम्ही जवळूनच कमी खर्चामध्ये मिळवत असाल तर तुम्हाला पुढचे काम करणे जास्त सोपे जाईल. समजा जर तुम्ही टी-शर्टवर डिझाईन्स तयार करून ते विकणार असाल तर तुम्ही त्यासाठी लागणारे सर्व होलसेल विक्रेत्यांची लिस्ट त्याचा खर्च ह्याविषयी व्यवस्थि

त प्लॅन करणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त डिझाईन्स तयार करून त्या तुम्ही प्रॉडक्टवर प्रिंट करून किंवा बनवून दुसरीकडून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये जास्त काही efforts घ्यायची गरज पडणार नाही.

वेगवेगळ्या वास्तूसाठी डिझाईन्ससाठी लागणारे मटेरियल वेगळे असते त्यामुळे तुम्ही ज्या प्रोडूक्टसाठी डिझाईन करणार आहेत त्याप्रमाणे प्रिंटर किंवा मशीन घ्यावे लागेल. ह्याविषयी अजून माहिती पुढच्या लेखामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या प्रोडूक्टसाठी डिझाईन तयार करून विकणार आहेत त्याप्रमाणे मशीन निवडून तुमचा उद्योग चालू करू शकता.

पॅकेजिंग तुम्ही स्वतः किंवा तुम्ही दुसरीकडून करून घेऊ शकता. जर स्वतः करणार असाल तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व मटेरियलची यादी करून त्या मटेरिअलमध्ये तुम्ही किती पॅकेजिंग करू शकता हे सर्व एकत्रित लहून ठेवणे गरजेचे आहे.

नुसते पॅकेजिंग करणाऱ्या कंपन्यासुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही सुरुवातीला कमी वास्तूसाठी पॅकेजिंग स्वतः करू शकता. नंतर तुमचा नफा वाढला कि नंतर तुम्ही हाताखाली लोक ठेवून किंवा दुसऱ्यां कंपनीकडून पॅकेजिंग करून घेऊ शकता.

डिझाईन्ससाठी लागणारा खर्च | Total investment for designs

डिझाईन्ससाठी तुम्ही कोणता प्रॉडक्ट ठरवलं आहे आणि त्यासाठी कच्चा माल कुठून घेणार आहे ह्या आणि इतर गोष्टींची यादी करून त्याप्रमाणे लागणारे खर्च लिहून काढावे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये किती इन्व्हेस्ट करू शकाल आणि कमीत कमी खर्चामध्ये कसा तुम्ही तुमचा उद्योग चालू कराल ह्या गोष्टी सर्वप्रथम पाहाव्या.

म्हणजे तुमची मालासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट कमी असेल. त्यामुळे तुम्हाला नंतर कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न घेऊन तो नफा परत तुमच्या उद्योगधंद्यांसाठी तुम्ही वापरू शकता. अशा रीतीने व्यवस्थित प्लॅनिंग करून तुम्ही व्यवस्थितपणे तुमचा उद्योग चालू करू शकता.

डिझाईन्ससाठी मार्केटिंग | Marketing

मार्केटिंगसाठी तुम्ही बऱ्याच चॅनेल्सचा वापर करू शकता. तुमच्या ओळखी, मित्र, नातेवाईक तसेच तुम्ही ऑनलाईन व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम असे बरेच चॅनेल वापरून तुमच्या वास्तूचे मार्केटिंग करू शकता.

तसेच नंतर तुम्ही इतर advertise च्या माध्यमाने तुमचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त ग्राहकाकडे पोहोचवू शकता. त्याबरोबरच तुम्ही तुमचे प्रॉडक्ट amazon, flipkart अशा चांगल्या ऑनलाईन सेलर website वर लिस्टिंग करू शकता. त्यामुळे तुमचा प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांकडे तुम्हाला पोहोचवता येईल 

मार्केटिंग प्लॅनिंग | Planning

मार्केटिंगसाठी प्लॅनिंग करणे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या मटेरियल साठी मार्केटिंग करण्यासाठी लागणार खर्च आणि त्यातून तुम्हाला किती नफा मिळतोय ह्याविषयी व्यवस्थित अंदाज आणि महिन्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे तुम्ही पुढचे प्लॅन्स करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमचे बजेट प्लॅन करू शकता. आणि त्याप्रमाणे माल बनवून तो ग्राहकाकडे पोहोचवू शकता.  

अशा रीतीने विविधरित्या तुम्ही तुमच्या डिझाईन्स तयार करून एखादा प्रॉडक्ट ठरवून तो विकून तुम्ही तुमचे प्रॉफिट चांगल्या रीतीने कमवू शकता. 

टी सेंटर एक चांगला उद्योग । Tea Center business in Marathi

इन्स्टाग्राम पेजचा वापर करून फॉलोअर्स वाढवून पैसे कमवा | Earn money by Instagram page in Marathi

शिवणकाम उद्योग । Sewing business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day