मसाले तयार करण्याचा व्यवसाय । Business of Masala in Marathi

मसाले तयार करण्याचा व्यवसाय । Business of Masala in Marathi

आज आपण पाहणार आहोत मसाले तयार करण्याचा व्यवसाय (Business of Masala) ज्यांच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करून त्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

Business of Masala
Business of Masala

कुठलाही खाद्यपदार्थ बनवायचा म्हंटलं कि सर्वप्रथम आपण कोणते मसाले टाकायचे ह्याबद्दल विचार करतो. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्याचे प्रकार असतात. किंवा प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये विविध प्रकारचे मसाले टाकले जातात.

कुठलाही पदार्थ मसाल्यामुळे स्वादिष्ट बनतो. ह्याच मसाल्यांचे प्रमाण जर चुकीचे वापरले किंवा ते पदार्थ बनवताना कमी जास्त प्रमाणात वापरले तर तो पदार्थ स्वादिष्ट बनत नाही. हे मसाले बनवण्यासाठी प्रत्येक साहित्य हे योग्य त्या प्रमाणातच वापरावे लागते.

घरामध्ये कुठलीही भाजी बनवताना आपल्याला वेगवेगळे मसाले लागतात. ते मसाले शक्यतो कधी कुणी विकत आणते. किंवा काही घरामध्ये हे सर्व मसाले वर्षभरासाठी तयार केले जातात.

सध्या हे मसाले बाजारामध्ये भरपूर उपलब्ध आहेत. तुम्हाला सुद्धा जर घरीबसल्या अशा प्रकारचा उद्योग चालू करायचा असेल तर तुम्ही हे मसाले बनवून विकू शकता.

घरगुती मसाल्यासाठी दुकानांमध्ये भरपूर मागणी आहे. चांगल्या गुणवत्तेचे तुम्ही मसाले बनवून दिले तर हे मसाले चांगले खपू शकतात. मसाल्यामध्ये बरेच प्रकार तुम्ही बनवू शकता आणि हे मसाले तुम्ही वेगवेगळ्या पॅकमध्ये विकू शकता. 

मसाल्यामध्ये कांदा-लसूण मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, लोणच्याचा मसाला, असे अनेक प्रकारचे मसाले तयार करून तुम्ही विकू शकता. ह्यामध्ये अजून बऱ्याच प्रकारचे मसाले तयार केले जाऊ शकतात.

तुम्ही सुरुवातीला एक दोन प्रकारचे मसाले सुद्धा विकू शकता. हे मसाले तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तुम्हाला ह्यासाठी थोडी म्हणत घ्यावी लागेल. पण मसाल्यासाठी मार्केटमध्ये भरपूर मागणी असल्याकारणाने ह्यामध्ये फायदा देखील भरपूर आहे.

तुम्ही सुरुवातीला एक कोणता तरी मसाला जरी विकला तरी चालू शकेल. जसे कि गरम मसाला, कांडा-लसूण मसाला, गोडा मसाला हे नेहमी लागणारे मसाले आहेत. तुम्ही ह्यापैकी कोणताही मसाला बनवून तुम्ही त्याचा घरगुती व्यवसाय चालू करू शकता.

मसाले तयार करण्यासाठी जागा । Place required for Business of Masala

मसाले तयार करण्यासाठी तुम्ही घरातूनच मसाले तयार करून विकू शकता. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र जागा घ्यायची गरज लागत नाही. फक्त तुम्हाला हे मसाले तयार करण्यासाठी जे कच्चे मसाले हवे असतात ते मसाले तुम्ही होलसेल विक्रत्याकसून विकत घेऊन ते एकत्र करून मसाला तयार करून शकता.

त्यामुळे ह्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातूनच हा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही सहजरित्या हा व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही गिरणीमध्ये जाऊन किंवा जिथे मसाला कांडून देण्याची मशीन असते तिथून हा मसाला कांडून घेऊ शकता.

अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा व्यवसाय कोणतीही मशीन विकत न घेता केला तर तुम्हाला जागा आणि खर्च ह्या दोन्ही गोष्टींचा खर्च आपोआपच कमी होऊन जातो.

कोणकोणत्या प्रकारचे मसाले आपण बाजारामध्ये विकत घेऊ शकतो.। Which types of Masalae we can make?

भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. प्रत्येक ठिकाणाची खाद्यसंस्कृती हि वेगळी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवले जातात.

तसेच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून प्रत्येक प्रांतातील खाद्यपदार्थ घरामध्ये बनवले जातात. त्यामुळे भारतामध्ये ह्या सर्व मसाल्यांना खूपच जास्त मागणी आहे. घरामध्ये आपण सर्वच प्रकारचे मसाले बनवू शकत नाही.

आपण आपल्याला नेहमी जेवणासाठी जेवढे मसाले आवश्यक असतात तेवढेच बनवतो आणि इतर मसाले आपण बाहेरून विकत आणतो.

मसाल्यामध्ये खालील प्रकारचे बाजारामध्ये मसाले उपलब्ध असतात.

  • गरम मसाला
  • कांदा-लसूण मसाला
  • गोडा मसाला
  • चाट मसाला
  • छोले मसाला
  • बिर्याणी मसाला
  • कोल्हापुरी मसाला
  • पंजाबी मसाला
  • चिकन मसाला
  • मटण मसाला
  • पनीर मसाला

अशा अनेक प्रकारचे मसाले बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे मसाले बनवून तुमचा व्यवसाय चालू करू शकता. 

लोणच्याचे मसाले किंवा काही कच्च्या मसाल्यांच्या पावडर पण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मसाल्याच्या पावडर चे पाकिटे पण विकायला ठेवू शकता.  

मसाला तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मसाला । Raw spices required for Masala

ज्यावेळी तुम्ही मसाला बनवता तेव्हा त्यासाठी तुम्हाला कच्चे मसाले वापरावे लागतात ते तुम्ही होलसेल मार्केटमधून मागवून घेऊ शकता.

तिथून तुम्हाला सर्व माल स्वस्त दरामध्ये एक्दम मिळू शकतो. नंतर हे मसाले व्यवस्थित चांगले भाजून घेऊन त्याचा वापर तुम्ही मसाला बनवण्यासाठी करू शकता.

मसाला तयार करण्यासाठी सर्व साहित्य तुम्ही एकत्र करून त्याची पावडर करण्यासाठी तुम्ही मसाला ग्राइंडर मशीनद्वारे तुम्ही त्याची पावडर बनवू शकता.

काही ठिकाणी भरपूर प्रमाणात मसाले कांडण्यासाठी यंत्रणा किंवा मशीन गावामध्ये उपलब्ध असतात. तुम्ही तिथून सुद्धा हे मसाले कांडून घेऊ शकता. कच्चा मसाला चांगला घेणे किंवा तो मसाला चांगला कुठे मिळेल हे प्रथम पाहून घ्यावे मग नंतर त्या मसाल्यांची खरेदी करावी.  

मसाला तयार करण्याची प्रक्रिया किंवा ट्रैनिंग । How to make masala or training to make a masala

तुम्ही मसाला बनवण्यासाठी घरातूनच मसाले शिकू शकता. घरामध्ये असे मसाले जे आपण घरामध्ये वापरतो ते जसे बनवले जातात त्याप्रमाणे आपण विकण्यासाठी सुद्धा मसाले बनवू शकतो.

तुम्हाला जर अजून कोणत्या वेगळ्या प्रकारचे मसाले बनवायचे असतील तर तुम्ही त्यासाठी तुम्ही कुणी जे त्यामध्ये पारंगत असतील त्यांच्याकडून तुम्ही ते शिकू शकता.

काही महिला ह्यासाठी स्वतःचे क्लासेसचे सुद्धा आयोजन करतात तिथून तुम्ही सविस्तर माहिती मिळवून घेऊ शकता.

मसाल्यामध्ये सर्वात महत्वाचे कच्चा मसाल्याचे योग्य ते प्रमाण ह्यावर मसाल्याची गुणवत्ता ठरते. तसेच ते तयार करण्यासाठी ज्या काही महत्वाच्या लागणाऱ्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित मसाला तयार करताना वापरणे देखील महत्वाचे असते.

हा मसाला जास्तीत जास्त काळ कसा टिकवून कसा ठेवता येईल ह्याविषयी माहिती असणे सुद्धा आवश्यक असते.

अशा छोट्या छोट्या गोष्टीची व्यवस्थित माहिती घेऊन नंतरच तुम्ही ह्या व्यवसायाला प्रारंभ करावा. ह्यामध्ये मसाला टिकवून राहणे हे अत्यंत महत्वाचे आहे. जर मसाला खराब झाला तर नंतर त्याचा वापर तुम्ही करू शकणार नाही.

आणि हा मसाला तुम्हाला जास्तीत जास्त टिकवून ठेवण्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे ह्याची प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

मसाला तयार करण्यासाठी लागणारी मशीन आणि खर्च । Machine required for Masala and investment

मसाला तयार करण्यासाठी लागणारी मशीन तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर होलसेल दरामध्ये मिळू शकते.

तुम्ही ह्या मशीनसाठी तुमच्या जवळपास कुणी मशीन विकणारे होलसेल विक्रेते असतील तर त्यांच्यापासून तुम्ही मशीन विकत घेऊ शकता. किंवा तुम्ही indiamart.com ह्या साईटवर जाऊन खरेदी करू शकता. ह्यासाठी तुम्हाला जवळजवळ ४ लाखांपर्यन्त खर्च येऊ शकतो.

शक्यतो लोक घरगुती मसाला विकत घेणे जास्त पसंत करतात. तुम्ही जर हा मसाला मशीन न वापरता घरगुती बनवून विकला तर ह्या मसाल्याला भरपूर मागणी आहे. तसेच ह्या मसाल्यापासून जे खाद्यपदार्थ बनवले जातात ते अत्यंत चविष्ट बनले जातात.

त्यामुळे तुम्ही मशिनशिवाय सुद्धा घरगुती मसाले बनवू शकता.

लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन । License and registration

लायसन्स मध्ये सर्वप्रथम तुम्हाला FSSAI रेजिस्ट्रेशन करावे लागते. हे एक फूड लायसन्स आहे जे कुठलाही खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते.

तसेच तुम्ही ह्याबरोबर तुम्हाला जर मोठा उद्योग चालू करायचा असेल तर तुम्हाला उद्योग आधार लायसन्स आणि ट्रेडमार्क लायसन्स ची आवश्यकता असते.

तुम्हाला ह्याबरोबर एक कंपनीचे वेगळे बँक अकाउंट सुद्धा लागेल. GST रेजिस्ट्रेशन करणे देखील उद्योगासाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन करून घेऊन तुमचा व्यवसाय चालू करू शकता.

इतर अजून काही सविस्तर माहितीसाठी तुम्ही सरकारी कार्यालयाशी संपर्क साधून अजून माहिती मिळवू शकता. 

मसाला पॅकेजिंग । Masala Packaging

मसाला तयार करून झाल्यावर त्यासाठी पॅकेजिंग हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. तुम्ही त्यासाठी तुमच्या ब्रँड प्रमाणे नाव ठरवून पॅकेजिंग जर केले तर तुम्हाला ह्यापासून जास्त फायदा मिळू शकतो. त्यामुळे तुमचा ब्रँड आणि व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचला जातो.

तुम्ही पॅकेजिंगसाठी वेगवेगळे पॅकिंग होलसेल मार्केटमधून आणून मसाले पॅक करू शकता. तुम्ही हे मसाले छोट्या छोट्या पॅकमध्ये सुद्धा विकू शकता.

घरच्याघरी तुम्ही पॅकिंग करून त्याचे वजन आणि पॅकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य तुम्ही होलसेल दुकानातून विकत आणू शकता.

पॅकिंग जर तुम्ही स्वतः करणार नसाल तर तुम्ही इतर सर्विसेस जे पॅकिंग करून देतात त्यांच्याकडून पॅकिंग करून घेऊ शकता. तुम्हाला फक्त पॅकिंगसाठी लागणारे सर्विस चार्जेस द्यावे लागतील.   

मसाला तयार करण्यासाठी लागणारा स्टाफ आणि इन्व्हेस्टमेंट। Staff and investment required for Masala business

मसाला व्यवसाय तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे चालू करता येणारा व्यवसाय आहे.

तुम्हाला सुरुवातीला व्यवसायासाठी किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते ठरवूनच तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय घरगुती व्यवसाय म्हणून करू शकता.

तुम्ही हा व्यवसाय विना मशीनद्वारे चालू केला तर तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये हा व्यवसाय चालू करू शकता.

व्यवसायासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च हा सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतो. तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे सर्व गोष्टींचे नियोजन करू शकता.

व्यवसाय सुरु केल्यानंतर तुम्हाला स्टाफ किंवा हाताखाली लागणारे मदतनीस तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ठरवू शकता.

तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे किंवा तुमचा माळ किती प्रमाणात तुम्ही बनवणार आहे त्या प्रमाणात तुम्ही स्टाफ किंवा मदतनीस व्यवसायासाठी ठेवू शकता.

मसाला हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी खर्चात केला किंवा माल कमी बनवला तर तुम्हाला स्टाफ देखील ठेवण्याची गरज लागणार नाही.

तुम्ही घरगुती मसाला व्यवसाय चालू करणार असाल तर तुम्ही घरचे सदस्य मदतीसाठी घेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय चालू करू शकता.    

मसाल्याची मार्केटिंग । Marketing for Masala business

तुम्हाला मसाला पॅकेट्स विकण्यासाठी तुम्ही ते नजीकच्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये विकण्यासाठी ठेवायला देऊ शकता.

तसेच तुम्ही काही मोठ्या कंपन्यांशी देखील तुमचा व्यवसाय जोडून तुम्ही त्यांना तुमचे मसाले विकायला देऊ शकता. मसाला विकण्यासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे मार्केटिंग करू शकता.

तुम्ही तुमचा माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त किराणा स्टोरमध्ये तुमचे मसाल्याचे पॅकेट्स विकण्यासाठी देऊ शकता.

त्यामुळे तुमचा माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल आणि तुमचा व्यवसाय चांगला वाढण्यास तुम्हाला मदत मिळेल.

ऑनलाईन मार्केटिंगसाठी तुम्ही सोशल मीडियाद्वारे तुमच्या प्रॉडक्ट्स चा प्रसार करू शकता. तुम्ही व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम चा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय अजून वाढवू शकता.

अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच प्रकारे मार्केटिंग करून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये चांगला नफा मिळवू शकता.  

अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा व्यवसाय करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला प्रारंभ करू शकता.

हा व्यवसाय एक घरगुती व्यवसाय करता येण्यासारखा असून ह्यामध्ये लागणारे खर्च हा तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आणि हा व्यवसाय चालू करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

तुम्हाला सुरुवातीला सर्व तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि त्यासाठी व्यवसाठीत प्लॅनिंग करून तुम्ही हा व्यवसाय कमीत कमी खर्चात करून नंतर खूप मोठा व्यवसाय वाढवू शकता. 

आणखी काही व्यवसाय संबंधी माहिती पाहा खालील लेखमध्ये –

कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय । start your own Kurkure business from home in Marathi

वेफर्स हा एक अतिशय चांगला छोटा व्यवसाय । Wafers business in Marathi

पीजी किंवा हॉस्टेल व्यवसाय । Paying guest or hostel business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?