बेकिंग केक्स एक चांगला उद्योग । Cake baking business in Marathi

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग । Cake baking business in Marathi

बेकिंग हा एक चांगला उद्योग (Cake baking business) ज्याला सध्या खूप मागणी आहे. आजकाल बेकिंगसाठी भरपूर क्लासेस आणि बेकिंगसाठी लागणारे सर्व साहित्य सहजरित्या उपलब्ध होते. बेकिंगमध्ये तुम्ही विविध प्रकारे पदार्थ बनवून ते तुम्ही घरून सुद्धा विकू शकता.

महिलांना ह्यामध्ये एक चांगली संधी आहे. तुम्ही घरी बसल्या हा उद्योग करू शकता. साहित्य सहजरित्या बेकिंगच्या दुकानात मिळून जाते. बेकिंगसाठी तम्ही बऱ्याच प्रकारचे पदार्थ जसे कि केक, बिस्किट्स, खारी, बटर, पाव, ब्रेड ह्यापैकी तुम्ही कोणतरी पदार्थ घरी चांगल्या रीतीने बनवून तो विकू शकता. केकसाठी आजकाल सर्वात जास्त मागणी आहे.

आणि केकसाठी लागणारे सर्व साहित्य आजकाल लगेच बाजारात मिळून जाते ज्यामुळे तुम्हाला त्यासाठी वेगळी अशी काही करण्याची गरज लागत नाही. बेकिंगसाठी सर्व साहित्य हे बेकिंग शॉप मध्ये उपलब्ध असते. तिथून तुम्ही हे सर्व साहित्य होलसेलच्या दरामध्ये घेऊन तुम्ही तुमचा घरबसल्या उद्योग चाली शकता.

आजकाल ह्याचे क्लासेससुद्धा भरपूर ठिकाणी उपलब्ध आहेत. सरकारसुद्धा ह्याचे क्लासेस बऱ्याच ठिकाणी कमीत कमी फी घेऊन सर्वांना उपपलब्ध करून देत आहे. तुम्ही ह्या क्लासेसमार्फत आपलयाला बेकिंगची जी आवड आहे तो क्लास पूर्ण करून त्यामध्ये आपला उद्योग घरच्याघरी तुम्ही उभारू शकता. 

वेगवेगळ्या प्रकारचे केक्स आणि कूकीस | Different types of Cakes and Cookies

केक्समध्ये बऱ्याच प्रकारच्या रचना तुम्ही तयार करून त्या विकू शकता. ह्यासाठी तुम्ही

विगन म्हणजे व्हेज किंवा ऑरगॅनिक अशा विविध प्रकारचे केक्स बनवून ते तुम्ही घरी बसल्या विकू शकता. जसे कि फ्रुट केक, स्ट्रॉबेरी केक, पाईन अँपल केक वगैरे जे केक खायला स्वादिष्ट तर लागतातच पण हे दिसायला सुद्धा तेवढेच सुंदर दिसतात.

तुम्ही पेस्ट्रीस पण तयार करून चांगल्या मोठ्या ऑर्डर्स मिळवू शकता. मोठमोठ्या कंपनीमध्ये किंवा व्यवसायात काही सेलेब्रेशन किंवा पार्टी असेल तर ते मोठ्या प्रमाणात पेस्ट्री किंवा केकची ऑर्डर घेऊ शकतात.

तुम्ही तुमची एक स्वतःची वेगळी अशी रचना तयार करून ती तुम्ही स्पेशल म्हणून वेगळी विकू शकता.

तुम्ही डोनट किंवा पाय बनवून सुद्धा घरी बसल्या उद्योग करू शकता. ह्यासाठी तुम्हाला फक्त बेकिंगचे साहित्य लागेल. ते तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या नजीकच्या होलसेल विक्रेत्याकडे मिळेल.

ह्यामध्ये तुम्ही कूकीस आणि चोकोलेट्स सुद्धा बनवून ते विकू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे कूकीस आणि चोकोलेट्सच्या आकर्षक रचना निवडून त्या बनवून तुम्ही गिफ्ट्ससाठी दुसऱ्यांना विकू शकता. तुम्ही छोटेछोटे मफीन्स, कोन्स किंवा कफ केक्स सुद्धा विक्रीला ठेवू शकता. ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारच्या डिझाईन्स बनवून ह्यामधून चांगला नफा तुम्हाला मिळू शकतो.  

ऑर्डर्स कशा मिळवायच्या आणि किंमत कशी ठरवायची | How to get orders?

ऑर्डर्स घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारचा वापर करून मिळवू शकता. ऑनलाईनसाठी तुम्ही social मीडिया जसे कि व्हॅट्सऍप, फेसबुक वगैरे वापरून तुम्ही तुमच्या केक्सच्या किंवा कूकिजचे फोटो शेयर करून त्याद्वारे ऑर्डर्स घेऊ शकता. तुम्ही तुमचा उद्योग इंडियामार्ट वर रजिस्टर करून तीथूनसुद्धा तुम्ही चांगल्या ऑर्डर्स घेऊ शकता.

ऑफलाईन मध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या बिझनेस बद्दल सांगून त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळवू शकता. तुमच्या आजूबाजूला जे राहतात त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती देऊन त्यांचा ओळखीने अजून ऑर्डर्स घेऊ शकता. मित्र, नातेवाईक, त्यांचे मित्र अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऑर्डर्स वाढवू शकता.

केक्स आणि कुकीजसाठी किंमत आणि नफा | Profit & Prize for Cakes and cookies

तुम्हाला तुमच्या वस्तूची सुरुवातीला किती खर्च येतोय त्याप्रमाणात त्याची किंमत ठरवावी लागेल. सुरुवातीला तुम्ही एका वस्तूचा किती तुम्हाला खर्च आला तो लिहून काढा. त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या वस्तू वापरल्या आणि त्याचा खर्च किती आला ह्या सर्वांची एकत्र किती खर्च आला ते पहा.

त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचा नफा किती मिळवायचा आहे आणि ते तुम्ही ठरवून त्यामध्ये तुमचा नफा ऍड करून खर्च अधिक नफा ह्याची टोटल करून ती तुमच्या वस्तूची किंमत तुम्ही लावू शकता. तसेच तुम्हाला हेदेखील पाहणे गरजेचे आहे कि ती वस्तू बाजारात कितीला विकली जाते. आणि बाजारातल्या विकल्या जाणाऱ्या वस्तूची किंमत आणि तुम्ही जी किंमत ठरवली आहे ह्यामध्ये जास्त तफावत नसू नये.

म्हणजे ग्राहक तुमच्याकडून ती वस्तू घ्यायला तयार होईल. जर तुम्ही जर तुमची किंमत जर जास्त ठेवलं तर ग्राहक जिथे कमी दरामध्ये वस्तू मिळेल तिथून विकत येईल. त्याबरोबरच तुम्हाला तुमच्या वस्तूची गुणवत्ता सुद्धा जास्तीत जास्त चांगली ठेवणे जास्त महत्वाचे आहे. तुम्ही जर तुमची वस्तू इतरांपेक्षा चांगल्या गुणवत्तेची ठेवली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या वस्तूची योग्य ती किंमत ग्राहक देईल. वस्तूची किंमत आणि गुणवत्ता ह्यांद्वारेच तुम्ही तुमचा उद्योग चांगल्या प्रकारे पुढे न्हेऊ शकता.  

केक्स आणि कुकीजपासून मिळणारे प्रॉफिट | Profit from Cakes and Cookies

केक्स आणि कुकीजपासून तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता. तुम्ही जर ह्या वस्तू चांगल्या उत्तम दर्जेच्या आणि आकर्षक बनवण्यात पारंगत असाल तर तुमच्या पदार्थाला किंवा वस्तूला जास्तीत जास्त मागणी मिळू शकेल. आणि ह्याबरोबरच तुम्ही जर योग्य दर ठेवला असेल आणि चांगली गुणवत्ता असेल तर तुमचे प्रॉडक्ट्स बाजारात खूप चालू शकतात.

आपोआपच तुमच्या प्रॉडक्ट्सची मागणी जास्तीत जास्त वाढू शकते. जसजशा तुमच्या ओळखीने आणि ज्यांनी कुणी तुमचे प्रॉडक्ट्स घेतले आहेत त्यांना जर तर ते आवडले तर तेच लोक तुमचे प्रॉडक्ट्स अजून विक्री वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील. नंतर तुम्ही तुमची स्वतःची बेकरीसुद्धा चालू करू शकता आणि अजून नफा मिळवू शकता.

केक्स आणि कुकीज उद्योगासाठी लागणार खर्च | Investment for Cakes and Cookies business

तुम्हाला सुरुवातीला कमीतकमी तुम्ही खर्चामध्ये हा उद्योग चालू करू शकता. तुम्ही अगदी ५००० पासूनसुद्धा हा उद्योग घरी बसल्या चालू करू शकता. केकसाठी तुम्हाला जे साहित्य मिळते ते कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे.

तुम्हाला त्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये तुम्ही ते विकत घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जसा ग्राहक मिळेल आणि तुमचा नफा चालू होईल ते पैसे परत तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून अजून नफा मिळवू शकता.

अशा प्रकारे जो काही सुरुवातीला नफा मिळेल तो नफा तुमच्या उद्योगात तुम्ही परत परत इन्व्हेस्ट करून तुमचा लागणार खर्च करून अजून नफा मिळवू शकता. अशा रीतीने जर तुम्ही तुमचे पैसे व्यवस्थितपणे वापरून कमी खर्चामध्ये तुमचा उद्योग चांगल्या प्रकारे वाढवू शकता.

केक्स आणि कुकीज उद्योगासाठी लागणारी जागा | Place required for business of cakes and cookies

ज्यावेळी तुम्ही घरातूनच हा उद्योग जर चालू करणार असाल तर ह्यासाठी तुम्हाला जागेची गरज भासत नाही. कारण तुम्ही तुमच्या घरच्या किचन आणि वस्तूंचाच वापर ह्यासाठी करणार आहेत. त्यामुळे जागेसाठी लागणार तुमचा बराचसा खर्च ह्यामध्ये वाचतो.

हाच खर्च तुम्ही तुमचा उद्योग अजून चांगल्या रीतीने वाढवण्यासाठी वापरून शकता. नंतर तुमच्या जशा ऑर्डर्स अजून मोठ्या प्रमाणात वाढत जातील आणि जास्त नफा मिळत जाईल तेव्हा तुम्हाला जागेची गरज भासू शकते.

कारण नंतर ऑर्डर्स मॅनेज करण्यासाठी तुम्हाला हाताखाली काही स्टाफची सुद्धा गरज भासेल. त्यावेळी मग तुम्ही एखादी चांगली योग्य ती जागा निवडून तुम्ही तिथून तुमचा उद्योग अजून वाढवू शकता. जागा निवडताना ती मोक्याची आणि जिथे बाजारपेठ जवळ असेल आणि लोकांची रहदारी असेल अशी निवडावी म्हणजे तुम्हाला अजून ग्राहक मिळून जातील.

केक्स आणि कुकीज उद्योगासाठी लागणारा स्टाफ | Staff required for cakes and cookies business

सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरच्यांची मदत घेऊनच तुमचे काम करू शकता. आणि जसजसा तुमचा उद्योगात चांगला जम बसेल तसा तुम्ही मग नंतर तुमचा स्टाफ वाढवू शकता. तुमच्याच ओळखीने मित्रांमध्ये किंवा आजूबाजूला कुणाला जर बेकिंगची आवड असेल त्यांना तुमच्या मदतीला घेऊन तुमचा स्टाफ वाढवू शकता. तुम्ही स्वतःचे बेकिंगचे नंतर क्लासेस सुद्धा ठेवू शकता. ह्यामधूनच तुम्ही तुमचा स्वतःचा चांगला स्टाफ तयार करू शकता.

लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन | License and registration

तुम्हाला ह्या उद्योगासाठो FSSAI License,  GST Registration, Fire License, Municipal Corporation चे Health License अशा प्रकारच्या लायसन्सची तुम्हाला आवश्यकता असते. तुम्ही ह्याविषयी अधिक माहिती तुमच्या नजीकच्या कार्यालयातून जाऊन घेऊ शकता.

तुमचा केक्स आणि कुकीजचा उद्योग घरच्याघरी करूनसुद्धा कसा यशस्वी बनवाल ह्यासाठी काही टिप्स

अगोदर तुम्ही केक्स आणि कुकीज मध्ये तुमच्या कला वापरून इतरांपेक्षा काही वेगळे करू शकता का हे पाहणे आवश्यक आहे. लोकांना नवनवीन गोष्टींमध्ये जास्त रस असतो. त्यामुळे जर तुम्ही वेगवेगळ्या रचनेचा वापर करून तुम्ही ग्राहक आकर्षित करू शकता.

प्लॅन आणि मेनू – उद्योगासाठी व्यवस्थितरीत्या स्वतःचा एक प्लॅन तयार करून तुम्ही सुरुवातीला टेस्टसाठी काही ठेवता येईल का हे सुद्धा ठरवू शकता.

मार्केटिंग – चांगल्या रीतीने नवनवीन गोष्टीचा ऑनलाईन पद्धतीने अजून कसे मार्केटिंग करता येईल हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे.

किंमत आणि गुणवत्ता – तुमच्या प्रोडूक्टस्ची योग्य ती किंमत आणि चांगली गुणवत्ता टिकवून तुम्ही अजून ग्राहक मिळवू शकता.

अशा रीतीने तुम्ही केक्स आणि कुकीजचा उद्योग घरून चांगल्या रीतीने कमी खर्चामध्ये चालू करू शकता. 

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee