चपाती किंवा पोळी बनवण्याचा व्यवसाय | Chapati or Roti business in Marathi

चपाती किंवा पोळी बनवण्याचा व्यवसाय | Chapati or Roti business in Marathi

बऱ्याच शहरामध्ये किंवा गावी शिकण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी बाहेर गावावरून मुले मुली येऊन हॉस्टेलमध्ये किंवा रूम रेन्टने घेऊन राहायला येतात. आणि खाण्यासाठी किंवा जेवणाची सोया ते एका चांगल्या मेसमध्ये करतात. किंवा काही ठिकाणावरून भाजी विकत येतात आणि चपाती विकत घेतात. काहीजण भाजी स्वतः बनवतात आणि चपात्या विकत घेतात.

Chapati or Roti business
Chapati or Roti business

काही ठिकाणी मेसमध्ये चपाती देण्यासाठी बाहेरून चपात्या विकत घेतल्या असतात. कोणती जर हॉटेल किंवा खानावळ मोठ्या प्रमाणात चालत असेल तर ते चपात्या बाहेरून विकत घेऊन मेसमध्ये विकण्यासाठी ठेवतात. त्यामुळे चपाती बनवण्याचा व्यवसाय घरगुती करून बरेच जण ह्यापासून भरपूर कमावताना दिसतात.

जिथे जिथे नवीन कॉलेजेस किंवा एडुकेशनल इन्स्टिटयूट उभारल्या गेल्या आहेत तिथे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थीना राहण्यासाठी होस्टेल्स किंवा वसतिगृह उभारले जातात आणि तिथे खाण्याची सोय म्हणून बाहेरून मेसमधून चपाती आणि भाजी विकत घेतली जाते. तुम्ही जरी नुसती चपाती  बनवण्याचा व्यवसाय चालू केला तरी तुम्ही ह्यापासून भरपूर नफा मिळवू शकता.

त्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात देखील हा व्यवसाय चालू करू शकता. काहीजण चपाती बनवण्यासाठी घरगुती चपात्या विकत घेतात तर काहीजण चपात्या बनवण्यासाठी मशीनवर चपात्या बनवून व्यवसाय करतात.

तुम्ही कुठल्याही प्रकारे हा व्यवसाय करू शकता. पण मशीनद्वारे चपातीचे गुणवत्ता किंवा तेवढ्या चांगल्या चपात्या बनल्या जात नाहीत. पण जर तुम्ही हाताखाली चपाती बनवण्यासाठी महिलाना तुम्ही ठेवले तर तुम्ही चांगल्या प्रतीच्या चपात्या बनवून मुलांना खायला किंवा मेसमध्ये देऊ शकता.

तसेच बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यादेखील उभारल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे कंपनीमध्ये कामानिमित्त जे लोक बाहेर गावावरून कामगार येतात ते कंपनीजवळ एखादी भाड्याने जागा बघून तिथेच राहतात. आणि बाहेरून मेसमधून जेवण विकत घेतात. कधीकधी काही कंपन्यादेखील कामगारांसाठी जेवणाची सोया करतात तिथेदेखील तुम्ही ह्या चपात्या मोठ्या प्रमाणात विकत देऊन तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता.    

Business Idea
आईसक्रीम बनवण्याचा व्यवसाय
पर्स तयार करण्याचा व्यवसाय
कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय
ब्युटी पार्लर व्यवसाय
पापड उद्योग
ज्युस व्यवसाय
पेपर प्लेट तयार करण्याचा व्यवसाय
फुले सजावट व्यवसाय माहिती
वेफर्स व्यवसाय
चॉकलेट व्यवसाय
टी-शर्ट व्यवसाय
डिझाईन्स तयार करून आपला उद्योग कसा चालू कराल
टी सेंटर एक चांगला उद्योग
बेकिंग केक्स एक चांगला उद्योग
शेती उद्योग
छोटा स्नॅक सेंटरचा उद्योग
शिवणकाम उद्योग

चपाती हा व्यवसाय चालू करण्यासाठी जागेची गरज  | Place for chapati or Roti business

चपाती हा व्यवसाय असा आहे कि ह्या व्यवसायासाठी तुम्ही घरच्या घरी तुमच्या किचनमध्येच हा व्यवसाय चालू करू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळी जागा घेण्याची गरज भासत नाही. जर तुम्ही मशीन घेऊन हा व्यवसाय चालू करणार असाल तर मात्र तुम्हाला ह्यासाठी जागेची गरज लागू शकते.

त्यासाठी तुम्ही भाडेतत्वावर छोटीशी जागा घेऊन तिथे तुम्ही चपाती बनवण्याचा व्यवसाय चालू करू शकता. तसेच तुम्ही दुकानाशेजारी किंवा कंपनी कॉलेजशेजारी एखादी छोटीशी जागा घेऊन देखील हा व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही जागेसाठी जर बजेट आहे तर तुम्ही जागा विकत घेऊन देखील हा व्यवसाय चालू करू शकता. सुरुवातीला जरी तुम्ही घेऊन हा व्यवसाय चालू केला तरी तो चालू शकतो.

हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंटसाठी चांगल्या जेवणाची आवश्यकता असतेच. तर तुम्ही जरी चपाती हॉस्पिटलमध्ये कॅन्टीनमध्ये विकत दिल्या तरी तुम्ही त्यापासून भरपूर नफा कमवू शकता. 

चपाती बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Material required for Chapati or Roti making

तुम्हाला चपाती बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते तुम्ही घरामध्ये जे साहित्य वापरता तेच तुम्ही वापरून चपाती बनवू शकता.

तुम्हाला ह्यासाठी फक्त जास्त प्रमाणात सर्व साहित्य होलसेलमध्ये विकत घ्यावे लागेल. तुम्हाला ह्यासाठी महत्वाचे म्हणजे चपाती बनवण्यासही चांगल्या प्रतीचे गहू प्रथम विकत घ्यावे लागतील. तुम्ही गहू किराणा मालाच्या दुकानातून स्वस्त दरात घेऊ शकता.

किंवा तुम्ही शेतकऱ्याकडून गहू घेऊ शकता. त्यांच्याकडून तुम्हाला चांगले गहू मिळतील आणि नंतर तुम्ही हे गहू दळून मग त्याच्या चपात्या बनवू शकता. तेल, लागणारे मीठ हे साहित्य देखील तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून एकदम खरेदी करू शकता.   

चपाती बनवण्यासाठी मशीन | Machine for Chapati or Roti business

तुम्ही चपाती मशीनवर बनवून पॅक करून विकणार असाल तर तुम्ही चपाती बनवण्याची मशीन देखील विकत घेऊ शकता. तुम्हाला ह्या मशीन तुमच्या गरजेप्रमाणे किंवा तुम्हाला तासाप्रमाणे किती चपात्या हव्या आहेत त्याप्रमाणे हि मशीन तुम्ही निवडू शकता. तुम्ही ५०००० पासून पुढे ते ३ लाखापर्यंत ह्या मशीन मिळतात. ह्या मशीन आणि त्याच्या किमती तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करू शकता. तिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळून जाईल. मशीन होलसेलर आणि त्याचे सर्व डिटेल्स मिळून जातील. तसेच तुम्ही तुमच्या जवळपासचा होलसेल विक्रेता देखील तुम्ही पाहू शकता. जेणेकरून तुमचा न्हे-आन करण्याचा तुमचा खर्च वाचू शकेल.

https://dir.indiamart.com/impcat/chapati-maker.html

चपाती व्यवसायासाठी लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन | License and registration for Chapati or or Roti business

चपाती हा व्यवसाय तुम्ही सुरु करणार असाल तर त्यासाठी फूड लायसन्स आणि जी.एस.टी रेजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल. तसेच तुम्ही शॉप ऍक्ट देखील काढून घेऊ शकता. फूड लायसन्स साठी तुम्ही फूड ग्रेडचे एफ.एस.एस.ए.आय  लायसन्स सुद्धा आवश्यक आहे. इतर लायसन्स आणि रेजिस्ट्रेशनची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही सरकारी कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता.

चपाती व्यवसायासाठी पॅकेजिंग  | chapati or Roti Packaging

चपाती तुम्ही पॅकिंग करण्यासाठी सिल्वर फॉईलचा वापर करू शकता. पॅकिंग करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित चपाती पॅक करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही चपाती चांगल्या रीतीने पॅक करून देणे आवश्यक आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणात एकत्र चपात्या पॅक करताना देखील त्यासाठी चांगले फॉईल पेपर वापरून पूर्णपणे पॅक करून तुम्ही ते विकू शकता. त्यामुळे विशेषतः चपाती खराब होणार नाही ह्याची काळजी घेऊन आणि ती पॅकिंगमधून बाहेर निघणार नाही असे पॅकिंग करून तुम्ही ती ग्राहकांना किंवा व्यापाऱ्यांना देऊ शकता. चपाती व्यवसायात मुख्यत्वेकरून स्वच्छतेची काळजी घेणे जास्त आवश्यक आहे.   

चपाती व्यवसायासाठी स्टाफ | Staff requirement for chapati or Roti business

चपाती बनवण्याची मशीन वापरून जर तुम्ही चपाती हा व्यवसाय चालू करणार नसाल तर तुम्ही हाताखाली मदतीला महिला किंवा पॅकिंगसाठी कामगार लागू शकतात. सुरुवातीला तुम्हाला जर घरामधूनच मदत मिळत असेल तर तुम्ही तसे करून नंतर जसा तुमचा नफा वाढेल त्याप्रमाणे तुम्ही नंतर तुम्ही मदतीला कामासाठी लोक ठेवू शकता.

सुरुवातीला हा व्यवसाय चालू करण्यासाठी दोन ते तीन जण कामासाठी ठेवू शकता. तुम्ही हा व्यवसाय कमी खर्चामध्ये चालू करणार असाल तर तुम्ही जास्त लोक ठेवण्याची तेवढी गरज नसते. जसा तुमचा नफा वाढत जाईल तसे तुम्ही नंतर प्लॅन करून लोक ठेवून तुमचा व्यवसाय अजून वाढवू शकता.   

चपाती व्यवसायासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट आणि नफा | Investment and profit for Chapati or Roti business

चपाती हा व्यवसाय तुम्ही ज्यावेळी चालू कराल तुम्ही त्यावेळी अगदी कमी खर्चामध्ये १००० रुपयांमध्ये देखील हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता.

त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू करता येण्यासारखा व्यवसाय आहे. तसेच तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे आणि जशा ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे तुम्ही व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करून त्याप्रमाणे चपात्या वाढवून तुम्ही त्या विकू शकता.

एक चपाती विकायची असेल तर ती दोन ते तीन रुपये अशी विकली जाते. तुम्ही मोठ्या ठिकाणी जसे कि कंपनी, हॉस्टेल किंवा हॉस्पिटल ह्या ठिकाणी चपाती विकत देणार असाल तर तुम्ही होलसेल दरामध्ये दोन ते तीन रुपयामध्ये हि चपाती विकत देऊ शकता.

जर तुम्ही छोटा व्यवसाय करत असाल आणि तुम्ही कमी प्रमाणात चपात्या विकत असाल तर तुम्ही पाच रुपये एक चपाती अशी विकत देऊ शकता.   

चपाती व्यवसायासाठी मार्केटिंग कसे करू शकता? | How to do marketing for Chapati or Roti Business

तुम्ही ह्या व्यवसायासाठी मोठमोठे व्यापार किंवा हॉटेल्स किंवा मेस ह्याठिकाणी तुमचा चपाती तयार करण्याचा व्यवसाय ह्याबद्दल माहिती देऊ शकता. तसेच हॉस्पिटल आणि इन्स्टिटयूट मध्ये देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात चपात्या विकू शकता. तसेच तुम्ही कॉलेज किंवा कंपनीच्या कॅन्टीनमध्ये देखील तुम्ही चपात्या विकत देऊ शकता.

तुम्ही मार्केटिंग करण्यासाठी स्वतःचे बॅनर वापरू शकता किंवा पोस्टर तुम्ही तुमच्या जवळच्या ठिकाणी लावून तुमच्या व्यवसायाबद्दल इतर लोकांना माहिती देऊ शकता. तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये जाऊन तिथे तुमच्या व्यवसायाबद्दल जर माहिती दिली आणि सॅम्पल जर तुम्ही दिले तर तुम्ही कंपन्यांमध्ये चपाती देऊन देखील भरपूर नफा मिळवू शकता.   

चपाती व्यवसायामध्ये लाभ | Benefit from Chapati or Roti Business

चपाती हा व्यवसाय अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चालण्यासारखा व्यवसाय आहे. बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या मशीन लावून ह्या चपात्या मोठ्या कंपन्या, हॉस्पिटल,

होस्टेल्स, कॉलेजेस मध्ये पुरवले जातात त्यामुळे हा व्यवसाय रेगुलर चालण्यासारखा व्यवसाय आहे. चपाती हि अत्यंत आवश्यक गोष्ट आहे जी तुम्ही खाण्यासाठी दररोज वापरता. त्यामुळे चपातीला खूप मागणी आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी आश्रम आणि शाळा असतात तिथे देखील चपात्यांची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही तिथेदेखील ह्या चपात्या विकून चांगला नफा मिळवू शकता.   

अशा रीतीने तुम्ही चपाती किंवा रोटी तयार करण्याचा व्यवसाय सहजरित्या कमी खर्चामध्ये चालू करून चांगला नफा मिळवू शकता. आणि हा व्यवसाय तुम्ही घरूनदेखील करू शकता त्यामुळे तुमचा जागेसाठी जो लागणारा खर्च आहे तो वाचतो.

अगदी कमी खर्चामध्ये कुणीही हा व्यवसाय सहजरित्या चालू करू शकतो. ह्यासाठी तुम्हाला वेगळे काही ट्रेनिंग वगैरे घ्यायची गरज लागत नाही.

त्यामुळे हा व्यवसाय कुणालाही कार्य येऊ शकतो फक्त त्याची काम करण्याची तयारी पाहिजे आणि त्यासाठी थोडेफार मार्केटिंग करणे हि आवश्यक आहे. शिवाय तुम्हाला जिथे चपाती लागते तिथे जाऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती आणि तुमच्या चपात्या खाण्यासाठी सॅम्पल म्हणून दिल्या तर त्याचा ऑर्डर्स तुम्ही सहज मिळवू शकता. त्यामुळे ह्या व्यवसायापासून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. 

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Toowoomba-Au10 Best hellofresh meals you must tryDaily green smoothie to Glow your Skin10 Easy mid day meals you must try!10 home chef fresh and easy meals
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Toowoomba-Au10 Best hellofresh meals you must tryDaily green smoothie to Glow your Skin10 Easy mid day meals you must try!10 home chef fresh and easy meals