चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल? । How to start a Chocolate business in Marathi?

चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल? ।  How to start a Chocolate business in Marathi?

तुम्हाला तर माहीतच आहे बऱ्याच महिलांना घरी काहीतरी नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड असते. जर तुम्हाला अशीच घरबसल्या चॉकलेट बनवण्याची आवड असेल तर तुम्ही ह्यामध्ये तुमचा स्वतःचा एक चांगला Chocolate business उभारू शकता.

Chocolate business
Chocolate business

Table of Contents

महिलांना ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स बनवणे खूप आवडते. आणि त्या दरवेळी नवनवीन डिझाईन्स तयार करून हे चॉकलेट्स घरातल्या मुलांना खाऊ घालतात. चॉकलेट सुद्धा अशी वस्तू आहे जी तुम्ही घरी बनवू शकता. घरातील प्रत्येक लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत चॉकलेट आवडत असतात.

त्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज सुद्धा लागणार नाही. काही महिला  आपापली हौस किंवा आवड म्हणून चॉकलेट्स तयार करतात. तर काही महिला ह्याबद्दल माहिती घेऊन स्वतःचा घरीबसल्या एक चांगला चांगला Chocolate business चालू करतात.

तुम्हाला जर ह्यामध्ये घरून तुमचा Chocolate business चालू करायचा असेल तर तुम्ही सहजरित्या ह्यामधून बरेच काही करू शकता. ह्यांच्यामध्ये तुम्हाला तुमचा व्यापार वाढवण्यासाठी बराच चांगला स्कोप आहे.

चॉकलेट व्यापारासाठी लागणारी जागा आणि खर्च । Place for Chocolate business and investment

चॉकलेटचा तुमचा उद्योग चालू करण्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च करण्याची किंवा जागेची गरज लागत नाही. तुम्हाला ह्यामध्ये फक्त तुमच्या नवनवीन कला आणि कौशल्याचा वापर करून तुमचा Chocolate business तुम्ही घरून सुद्धा चांगल्या प्रकारे चालू करू शकता.

ह्यामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्हाला बराच नफा मिळू शकतो. तुम्हाला कुठेही ह्यासाठी जागा किंवा त्यासाठी लागणार खर्च जवळजवळ नसतोच. जर तुम्हाला पुढे मोठी फॅक्टरी किंवा कंपनी उभारायची असेल त्यावेळी तुम्हाला त्यासाठी चांगली जागा आणि खर्च हा करावा लागेल. पण तुम्ही हा Chocolate business अगदी घरूनसुद्धा व्यवस्थितपणे चालू करू शकता.  

चॉकलेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आणि प्रॉडक्ट कल्पना । Designs and product ideas for Chocolates

चॉकलेटमध्ये तुम्ही तुमच्या कल्पना वापरून त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता. ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाककलेचा आणि तुमच्या कलाकौशल्याचा वापर करून तुम्ही नवीननवीन विविध प्रकारच्या डिझाईन्समध्ये चॉकलेट्स बनवून ते विकू शकता.

तुम्हाला अगदी तुमच्या मताप्रमाणे आणि कल्पनेप्रमाणे चॉकलेट्स तुम्ही बनवू शकता. ह्यामध्ये तुम्ही अजून ड्रायफ्रुटस चा वापर करून अजून वेगळ्या प्रकारचे चिकलेट्ससुद्धा बनवू शकता. जसे कि almond चॉकलेट, cashew चॉकलेट, मिक्स ड्रायफ्रूट चॉकलेट अशा बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या चॉकलेट्स तुम्ही विकू शकता. तुम्हाला डिझायन्ससाठी बाजारामध्ये बरेच मोल्ड्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये चॉकलेट्स टाकून विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईन्स तुम्ही तयार करू शकता.

चॉकलेटसाठी लागणारे कच्चा माल किंवा मटेरियल । Raw material for Chocolate

तुम्हाला चॉकलेटसाठी लागणारे साहित्य तुम्ही ऑनलाईन किंवा नजीकच्या होलसेल विक्रेत्याकडून खरेदी करू शकता. आजकाल बऱ्याच ठिकाणी होलसेलमध्ये कच्चा माल बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध आहे. तुम्ही जरी कुणाला चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य द्या म्हंटले तरी लगेच सर्व साहित्य तुम्हाला मिळून जाईल. चॉकलेटसाठी तुम्हाला खालीलप्रमाणे साहित्य खरेदी करावे लागेल.

चॉकलेट कंपाऊंड – तुम्हाला चॉकलेट कंपाऊंड ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल.

मेल्टर – चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मेल्टर लागेल. पण जर तुम्ही घरी तुमच्याकडे असणाऱ्या वस्तू वापरून डबल बॉयलर पद्धतीने तुम्ही चॉकलेट मेल्ट करू शकता. ह्याची गरज तुम्हाला सुरुवातीला कमी चॉकलेटसाठी लागणार नाही.

मोल्ड्स- विविध प्रकारच्या डिझाईन्स तयार करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या डिझायनमध्ये मोल्ड्स लागतील ज्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या चोक्लेट्सच्या डिझाईन्स तयार करू शकाल.

मेजरमेंट कप्स आणि स्पून्स – मेजरमेंट करण्यासाठी तुम्हाला कप्स आणि स्पून्स लागतील ते अगदी कमीत कमी किमतीत तुम्हाला मिळून जातील. प्लॅस्टिकमध्ये हे कप्स आणि स्पून्स वेगवेगळ्या मेजरमेंटमध्ये उपलब्ध असतात.  

इसेन्स – वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टप्रमाणे चॉकलेट्स तयार करण्यासाठी वेगवेगळे इसेन्स तुम्हाला लागतील.

कलर – तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे चॉकलेट तयार करण्यासाठी फूड ग्रेडचे कलर लागतील.

चॉकलेट पॅकेजिंग मटेरियल – चॉकलेट सेट झाल्यावर त्याला पॅकिंग करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य.

रेफ्रिजरेटर – प्रत्येकाच्या घरी रेफ्रिजरेटर हा असतोच त्यासाठी तुम्हाला नवीन काही हि वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही आहे त्या रेफ्रिजरेटरचा वापर करून चॉकलेट सेट करण्यासाठी ठेवू शकता.

ह्याच्याव्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही वेगवेगळे पदार्थ जसे कि ड्रायफ्रुटस वगरे घालून जर चॉकलेट्स तयार करायचे असतील किंवा अजून काही बनवायचे असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला साहित्य मागवावे लागेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते साहित्य एका होलसेल विक्रेत्याकडून खरेदी करू शकता.

चॉकलेटसाठी लागणारी मशीन आणि त्याचा खर्च । Machine for Chocolate business and investment

तुम्हाला मोठ्या मशीनची चॉकलेट बनवण्यासाठी गरज लागत नाही. तुम्ही घरामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यामध्येच चॉकलेट्स बनवू शकता. आणि ते सेट करण्यासाठी फ्रीजचा वापर करू शकता. ह्यासाठी वेगळी मशीन किंवा त्यासाठी लागणार खर्च हा करण्याची तुम्हाला काहीच गरज भासत नाही. अगदी घरातल्या सामग्रीचा वापर करून तुम्ही सहजरित्या तुमचा Chocolate business तुम्ही चालू करू शकता. 

चॉकलेट उद्योगासाठी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन । License and registration required for Chocolate business

चॉकलेट उद्योगासाठी तुम्हाला प्रथम जीएसटी रेजिस्ट्रेशन, ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन, फूड लायसन्स, शॉप ऍक्ट ह्या गोष्टी सर्वप्रथम तुम्हाला लागतील. जर तुम्हाला मोठी कंपनी चालू करायची असेल त्यासाठी तुम्हाला कंपनी लायसन्सची गरज लागेल. अजून काही इतर माहिती तुम्ही नजीकच्या सरकारी कार्यालयात जाऊन घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी रजिस्टर करू शकता.

चॉकलेट तयार करण्याची कृती । How to make a chocolets?

चॉकलेट तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चॉकलेट कंपाऊंड ला डबल बॉयलर च्या पद्धतीने ते वितळून घ्यावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड मेजर करून त्यामध्ये चवीप्रमाणे इसेन्स वापरून चांगले मिक्स करून घ्यावे.

त्यामध्ये ड्रायफ्रुटस चे तुकडे टाकून मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण तयार झाल्यावर ते मोल्डमध्ये टाकून सेट होण्यासाठी फ्रीझमध्ये ठेवावे. ३० मिनिटांनी तो मोल्ड काढून बाहेर घेऊन तुमचे मोल्डमधील चॉकलेट्स काढून ते चांगल्या पॅकिंगमध्ये पॅक करावे. चॉकलेट सेट होण्यासाठी तास फारसा वेळ लागत नाही त्यामुळे ह्यामध्ये जास्त वेळ वाट पाहण्याची गरज लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही सहजरीत्या विविध प्रकारचे चॉकलेट्स घरच्या घरी तयार करू शकता. 

 चॉकलेट तयार करण्याची ट्रैनिंग किंवा प्रशिक्षण। Training for chocolates

चॉकलेट तयार करण्यासाठी तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही सरकारी मोफत ट्रेनिंग पुरवते तिथून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता.  तसे ह्या उद्योगासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायची काही सुद्धा गरज लागत नाही. तुम्ही घरच्या घरी चॉकलेट बनवू शकता.

तुम्ही गूगल वर रेसिपी शोधून किंवा युट्युब वर चॉकलेट तयार करण्याचे व्हिडिओस पाहून त्याप्रमाणे तुम्ही चॉकलेट्स तयार करू शकता. एकदा तुम्हाला बेसिक गोष्टी नीट समजल्या कि तुम्ही त्यामध्ये मग नवीन नवीन तुमच्या कल्पना तयार करून त्याप्रमाणे चोक्लेट्समध्ये वेगवेगळे प्रकार तयार करू शकता. त्यामुळे ह्यासाठी प्रशिक्षण घ्यायची काहीच गरज भासत नाही.

 चॉकलेटसाठी पॅकेजिंग । Packiging for chocolates

चॉकलेट पॅकेजिंग तुम्हाला आकर्षक असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही जेवढे चॉकलेट पॅकेजिंग आकर्षक कराल तेवढीच तुम्हाला त्यासाठी अजून मागणी वाढेल. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस आजकाल बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही चॉकलेट्स पॅक करू शकता. किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या पॅकिंगसाठी काही कल्पना असतील त्याप्रमाणे तुम्ही पॅकेजिंग करू शकता. पॅकिंगसाठी मटेरियल रेडिमेड एका होलसेल विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. आणि त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या पॅकिंगचा वापर वेगवेगळ्या चोक्लेट्सना करू शकता.

चॉकलेटसाठी किंमत कशी ठरवाल? । Price for chocoletes

चॉकलेट साठी किंमत ठरवताना तुम्ही सर्व लागणारे साहित्य आणि त्याचा खर्च बघून त्यामध्ये तुमचा नफा ऍड करून ती तुमच्या चॉकलेटसाठी किंमत राहील. तुम्ही सर्वप्रथम बाहेर विकल्या जाणाऱ्या चोक्लेट्सची किंमत बघून त्याप्रमाणात तुमचा नफा त्यामध्ये काढू शकता. अशा रीतीने तुम्ही तुमचे चॉकलेट्स होलसेल किंवा कंपनीमध्ये मोठ्या ऑर्डर्स घेऊनसुद्धा विकू शकता. किंमत तुम्ही किलोप्रमाणे किंवा नगाप्रमाणे ठरवू शकता.

चॉकलेटसाठी लागणारे लोक, खर्च व इन्व्हेस्टमेंट । Investment, and people for Chocolate making

चॉकलेट बनवण्यासाठी तुम्हाला कामगार किंवा लोक ठेवण्याची सुरुवातीला काहीच गरज नाही. जसा तुमचा उद्योग सेट होईल तसे नंतर तुम्ही त्याचे दुसऱ्यांना प्रशिक्षण देऊन तुमच्या हाताखाली काम करण्यासाठी मदतनीस ठेवू शकता.

चॉकलेट उद्योगासाठी साठी मार्केटिंग स्ट्रॅटेजि किंवा प्लॅन । Marketing strategy or Plan for Chocolate Business

कुठलाही उद्योग सुरु करताना त्याचा चांगला प्लॅन करणे अत्यंत आवश्यक असते. तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या ideas वापरून किंवा एक चांगला प्लॅन करून त्याप्रमाणे तुमच्या उद्योगाची मार्केटिंग विविधरित्या कशी करता येईल व त्यासाठी माल लवकरात लवकर वेळेवर ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल ह्या गोष्टी पाहणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व गोष्टीचा व्यवस्थित विचार आणि प्लॅन करून तुमचा Chocolate business तुम्ही अजून वाढवू शकता.

चॉकलेटसाठी मार्केटिंग । Marketing for Chocolate business

चॉकलेट तुम्ही नजीकच्या दुकानांमध्ये विकू शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन सुद्धा विकू शकता. तुम्हाला social मीडिया द्वारे तुमच्या उद्योगाचा प्रसार करून तुम्ही चॉकलेट्स साठी अजून कस्टमर मिळवू शकता. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ऑनलाईन साईट वर देखील तुम्ही विकू शकता.

तुमच्याकडे जर बजेट असेल तर तुम्ही स्वतःचे दुकान चालू करून चॉकलेट्स विकू शकता. अशा प्रकारे बऱ्याच पद्धतीने तुम्ही चोक्लेट्सची विक्री करू शकता. काही कंपन्यांमध्ये काही सेलिब्रेशन असेल तर तिथे चॉकलेट्सची गरज असते तिथे देखील तुम्ही चॉकलेट्स विकू शकता.  

अशा रीतीने तुम्ही Chocolate business हा घरीबसल्या सहजरित्या करता येणार एक चांगला उद्योग आहे. आणि ह्यापासून तुम्हाला भरघोस नफा मिळवू शकतो. तुम्हाला सर्व गोष्टी फक्त व्यवस्थित प्लॅन करून त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून लोकांना चांगल्या प्रतीचा असा माल देऊन तुम्ही चांगले उद्योजक बनु शकता. 

चॉकलेट हा एक फायदेशीर व्यवसाय आहे का?

हो, Chocolate business हा एक फायदेशीर व्यवसाय आहे

माझा स्वतःचा चॉकलेट व्यवसाय कसा सुरू करायचा?

वरील लेख संपुर्ण वाचा तुमचा business plan तयार करा आणि बजेट ठरवुन स्वतःचा चॉकलेट व्यवसाय सुरू करा.

चॉकलेट विकणे हा चांगला व्यवसाय आहे का?

हो, चॉकलेट विकणे हा चांगला व्यवसाय आहे.

मी भारतात छोटा चॉकलेट व्यवसाय कसा सुरू करू शकतो?

हो, तुम्ही भारतात छोटा चॉकलेट व्यवसाय सुरू करू शकता. वरील लेख संपुर्ण वाचा तुमचा business plan तयार करा आणि बजेट ठरवुन स्वतःचा चॉकलेट व्यवसाय सुरू करा.

चॉकलेट चांगली गुंतवणूक आहे का?

चॉकलेट ही चांगली गुंतवणूक आहे.

चॉकलेटला जास्त मागणी आहे का?

सध्या एशियामध्ये चॉकलेटला जास्त मागणी आहे.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee