कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय । Coffee Shop outlet business in Marathi

कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय । Coffee Shop outlet business in Marathi

सकाळी उठले की आपल्याला सगळ्यांना कॉफी किंवा चहाची आवश्यकता असतेच. Coffee Shop outlet business हा एक अतिशय चांगला व्यवसाय आहे. आपण बाहेर कुठे गेलो कि कंटाळा आला कि कॉफी किंवा चहा आपल्याला लागतोच.

Coffee

Table of Contents

आणि समोर जर तुम्हाला कुठे कॉफी शॉप दिसले तरी आपण लगेच जाऊन कॉफी घेतोच. असा व्यवसाय तुम्ही नक्कीच चालू करू शकता. कॉफी बनवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी बनवून आउटलेट मध्ये तुम्ही ठेवल्या तर तुमच्याकडे भरपूर जण कॉफी प्यायला येऊ शकतात. कॉफी पिणे हे सर्वांना आवडते.

कुणी कधीही बाहेर पडले आणि त्याला चहा किंवा कॉफी दिसली तर ते कॉफी पिण्यासाठी नक्कीच त्या शॉपमध्ये जातात.

भारतामध्ये खूप क्वचितच लोक असतील कि ज्यांना कॉफी किंवा चहा आवडत नसेल. काही जण ऑफिसमध्ये काम करून थकले तर ते प्रथम कॉफी शॉप कुठे दिसतेय का ते पाहतात. आणि स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी प्रथम कॉफी घेतात.

कॉफी मध्ये भरपूर प्रकार तुम्ही करून तुमचे कॉफी शॉप चांगल्या प्रकारे चालवू शकता. जसे कि ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी असे बरेच प्रकार कॉफी मध्ये तुम्ही करू शकता. कॉफी किंवा कॅफे तुम्ही कुठेही चालू केले तरी त्यासाठी तुम्हाला इथे भारतामध्ये ग्राहक मिळणार नाही असे होणारच नाही. तुम्हाला जर Coffee Shop outlet business करायचा असेल तर तुम्ही लगेच आणि कमी खर्चामध्ये चालू करू शकता.

कॉफी शॉप हा व्यवसाय अत्यंत प्रॉफिट कमवून देणारा व्यवसाय आहे. कारण ह्यामध्ये ५०% प्रॉफिट मार्जिन असल्याने ह्यापासून भरपूर फायदा होतो. तसेच कॉफी बनवण्यासाठी देखील तुम्हाला जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाहीत.

आणि मुख्य म्हणजे ह्या Coffee Shop outlet business ला तुम्ही कुठेही चालू केले तरी तुम्हाला गिर्हाईक मिळतेच त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय लगेच चालू करू शकता. 

तुम्ही कॉफी शॉप चालू केल्यावर ते इतरांपेक्षा कसे वेगळे कसे बनवता येईल ह्याकडे तुम्ही लक्ष देऊन तुम्ही तुमचे कॉफी शॉप खूप चांगले चालवू शकता.

जसे कि कॉफी शॉप चे एक वेगळे आणि आकर्षित करणारे असे नाव ज्यामुळे नाव वाचल्यानंतर लगेचच कस्टमर तुमच्या दुकानात येईल. तसेच तुम्ही ज्या ज्या प्रकारच्या कॉफी तयार करणार आहात त्या कॉफी चे वेगवेगळ्या प्रकारची नावे असे तुम्ही तुमच्या कॉफी शॉपसाठी करू शकता. काही तुमच्या कॉफी शॉप साठी एखादे कॉफीचे स्पेशल मेनू किंवा पॅकेज देखील तुम्ही ठेवू शकता.

इतरांपेक्षा तुमच्या कॉफी शॉपमध्ये काही वेगळे असेल तर कोणताही कस्टमर तुमच्या दुकानात येऊन कॉफी घेईल.

तुम्ही डिस्काउंट ऑफर्स वगैरे सुद्धा ठेवू शकता. असे अनेक प्रकार आहेत ते तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे नवनवीन काहीतरी बदल करून तुम्ही तुमचा कॅफे चांगला चालवू शकता.    

काही कॉफी शॉप फेल होतात कारण त्यांचे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन व्यवस्थित नसते. काहीजण सर्विस चांगली देत नाहीत.

किंवा चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ कस्टमर ला दिले जात नाहीत. काहीतरी शॉप ओपन करायचे म्हणून केले जाते आणि त्यामुळे असे कॉफी शॉप मग चालत नाहीत.

जर तुम्ही तुमच्या Coffee Shop outlet business कडे व्यवस्थित लक्ष देऊन चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू किंवा खाद्यपदार्थ तुमच्या ग्राहकांना दिले तर तुमचा व्यवसाय चालणार नाही असे होत नाही. त्यामुळे तुमच्या

Coffee Shop outlet business चे व्यवस्थित नीटपणे मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग करून जर तुम्ही व्यवसाय चालू केला तर तो नक्कीच यशस्वी होण्यास तुम्हाला मदत होईल. सर्वप्रथम आपण व्यवसायाची व्यवस्थित योजना आणि त्यासाठी लागणारा खर्च आखून त्याप्रमाणे तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करणे आवश्यक आहे.

काही लोकांना असे वाटते कि त्यांना व्यवसायाचा काही अनुभव नाही तर ते हा व्यवसाय कसा करू शकतील. पण व्यवसायासाठी तुम्हाला फक्त बेसिक गोष्टींची आवश्यकता असते.

आणि कोणताही व्यवसाय कुणीही करू शकते. त्यासाठी वेगळे काही नाही करावे लागत. म्हणतात ना पाण्यात उतरले कि आपोआप पोहता येते तसे तुम्ही तुमचा व्यवसाय देखील चांगल्या रीतीने करू शकता.

तुम्हाला व्यवसाय कसा चालू करायचा त्याचे व्यवस्थित प्लॅनिंग कसे करायचे त्याचा खर्च कसा मॅनेज करायचा. किंवा व्यवसायात होणारा खर्च कमीत कमी कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे.

अशा बारीकसारीक गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष दिले आणि तुम्ही Coffee Shop outlet business ची वाटचाल चालू केली तर तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला जरी कोणताही अनुभव नसेल तरी तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

More business –

Profitable Idli-dosa business in marathi | इडली सेंटर एक चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय 2023

कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय । Coffee Shop outlet business in Marathi

ब्युटी पार्लर व्यवसाय 2023 | Beauty parlor business in Marathi

कॉफी किंवा कॅफे ह्या व्यवसायासाठी लागणारी जागा । Place required for café business

तुम्हाला Coffee Shop outlet business साठी एखादी चांगली मोक्याची किंवा जिथे दुकाने, ऑफिसेस, हॉस्पिटल्स, गार्डन्स किंवा मॉल जवळच असतील अशा ठिकाणी तुम्ही एखादे शॉप किंवा आउटलेट ओपन करू शकता. तसेच तुम्ही जर छोटेशे कॉफी शॉप ओपन करणार असाल तर तुम्ही त्यासाठी कोणत्याही दुकानासमोर किंवा मॉलसमोर एखादे छोटेशे शॉप ओपन करू शकता.  

कॉफी सोबत तुम्ही अजून इतर कोल्ड्रिंक्स किंवा चहा वगैरे काही ठेवू शकता. किंवा स्नॅक्स देखील तुम्ही ठेवू शकता. तुम्ही कॉफीमध्ये एक्सप्रेसो, कॅपचिनो, अशा अनेक प्रकारच्या कॉफी तसेच आईस कॉफी, आईस टी असेही ठेवू शकता. तुम्ही ह्यामध्ये भरपूर व्हरायटी करू शकता. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी ठेवून तुम्ही तुमचा कस्टमर वाढवू शकता.   

कॉफी कोणकोणत्या प्रकारची तुम्ही विकू शकता । Various types of Coffees

सध्या पाहाल तर कोल्ड कॉफी सर्वात जास्त विकली जाते. तुम्ही फक्त कोल्ड कॉफी जरी विकायला ठेवली तरी तुम्ही त्यापासून चांगला नफा कमवू शकता. किंवा तुम्ही कोल्ड अँड हॉट कॉफी असे दोन्हीही ठेवू शकता.

त्यामुळे कोणतीही कॉफी तुम्ही तुमच्या आउटलेट ला ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या पाककौशल्याप्रमाणे जर काही बदल करून वेगवेगळे फ्लेवर तयार करता आले तरी तुम्ही त्याप्रमाणे बदल करून कॉफी विकू शकता. 

कॉफीसाठी तुमच्या ब्रँडचे नाव कसे ठरवाल? । How you will decide brand name for your coffee?

Coffee Shop outlet business साठी तुम्हाला ब्रँड नेम ह्याची गरज लागेल त्यामुळे तुम्ही प्रथम त्यासाठी तुम्ही एक चांगले नाव ठरवून घेऊ शकता. नाव इतरांपेक्षा वेगळे आणि लोकांना आवडेल असे असावे.

तसेच ज्यामुळे तुमच्या कॉफी शॉपकडे लोक यायला आकर्षिले जातील असे नाव ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही एक चांगले नाव ठरवून तुम्ही तुमच्या कॉफी किंवा कॅफे आउटलेटला ठेवू शकता. 

कॉफीसाठी लागणारे साहित्य । Material required for Coffee shop

तुम्ही ज्या प्रकारची कॉफी बनवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व साहित्य तुम्ही मसाल्याच्या होलसेल विक्रेत्याकडून तुम्ही सर्व लागणारे साहित्य कमी खर्चामध्ये खरेदी करू शकता. तुम्ही जर जास्त प्रमाणात साहित्य घेतले तर तुम्ही ते होलसेल मध्ये कमी किमतीमध्ये घेऊ शकता.

कॉफी पावडर, साखर, अशा गोष्टी तसेच तुम्ही बाकीच्या कॉफी तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्ही घरच्या जर एक्सट्रा असतील तर त्या वापरू शकता.

सुरुवातीला तुम्ही ह्यासाठी कमी खर्चामध्ये तुम्ही कसा कॅफे ओपन करून तुमचा व्यवसाय चालू कराल हे पाहून मग तुम्ही तुमचा व्यवसाय नंतर अजून वाढवू शकता. 

कॉफी व्यवसाय करण्यासाठी ट्रेनिंग । Training for Coffee Shop outlet business

Coffee Shop outlet business हा कुणीही करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे त्यामुळे ह्यासाठी तुम्हाला ह्यासाठी कोणत्याही ट्रेनिंगची गरज लागत नाही. तुम्ही हा व्यवसाय कधीही चालू करू शकता. तुम्ही जर कुठे कॉफी किंवा कूकिंगमध्ये एक्स्पर्ट असेल तर त्याच्याकडून शिकून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता किंवा तुम्ही स्वतः गुगल किंवा युट्युब च्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी बनवणे शिकून हा व्यवसाय चालू करू शकता. 

कॉफी तयार करण्यासाठी लागणारी मशीन । Machine required for coffee making

कॉफी तयार करण्यासाठी तुम्ही मशीनच्या ऐवजी तुम्ही स्वतः किंवा एखादा चांगला कॉफी बनवणारा शेफ ठेवून कॉफी तयार करू शकता.

सुरुवातीला तुमच्याकडे ग्राहक कमी असल्यामुळे तुम्ही मशीन घ्यायची गरज नाही. जसे तुमचे ग्राहक किंवा कस्टमर वाढतील तसे तुम्ही मग नंतर तुमच्याकडे तुम्ही मशीन वापरून कॉफी  तयार करू शकता.

पण मशीनपेक्षा हाताने बनवलेली कॉफी जास्त चांगली लागते त्यामुळे तुम्ही स्टाफ जरी ठेवून कॉफी बनवून घेतली तरी चालू शकते. कॉफी जास्त विकण्यापेक्षा त्याची गुणवत्ता कशी टिकून ठेवता येईल आणि लोकांना ती कशी आवडेल ह्याकडे तुम्ही लक्ष देणे महत्वाचे आहे.

त्यामुळे तुमचे गिर्हाईक वाढण्यास तुम्हाला मदत होईल. जर तुम्ही मशीन ठेवली तर कदाचित ग्राहक तुमच्याकडे येणार नाहीत. कारण बऱ्याच ठिकाणी ऑफिस किंवा मोठ्या मॉलमध्ये अशा कॉफी मशिन्स उपलब्ध असतात पण तिथे कॉफी पिणे लोक सहसा टाळतात. म्हणून तुम्ही जर कुणी चांगल्या प्रकारची कॉफी बनवणारा ठेवला तर तुम्ही चांगला कस्टमर मिळवू शकता.

तसेच तुमच्याकडे खूपच कस्टमर असेल आणि तुम्ही मोठा कॅफे ओपन करणार असाल तर तुम्ही चांगल्या गुणवत्तेच्या मशिन्स कॉफी तयार करण्यासाठी ठेवू शकता. तुम्ही ह्या मशिन्सच्या किंमती www.indiamart.com ह्या वेबसाईट वर जाऊन खरेदी करू शकता. तुम्हाला कोल्ड स्टोरेज, फ्रिज, कॉफी ग्राइंडर अशा अनेक वस्तू देखील ह्या वेबसाईट वर मिळून जातील.

कॉफी किंवा कॅफे ह्या व्यवसायासाठी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन । license and registration to Coffee Shop outlet business

कोणत्याही खाद्यपदार्थाचा व्यवसाय तुम्ही करणार असाल तर तुम्हाला FSSAI रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. ह्याद्वारे तुमच्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता पहिली जाते आणि त्यारामने तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते.

नंतर तुम्ही तुमचा Coffee Shop outlet business चालू करू शकता. तुम्ही ह्यासोबत जी. एस. टी., शॉप ऍक्ट आणि ट्रेडमार्क लायसन्स देखील हवे असते. ते देखील तुम्ही घेऊ शकता.

अशा अनेक प्रकारचे लायसन्स आणि अजून कोणतेही रेजिस्ट्रेशन्स तुम्हाला करावे लागत असतील तर त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लागणारे रेजिस्ट्रेशन करून तुमचा Coffee Shop outlet business चालू करू शकता.

कॉफी किंवा कॅफे ह्यासाठी स्टाफ । Staff for Coffee shop

तुम्हाला ह्या Coffee Shop outlet business साठी स्टाफची गरज लागू शकते. त्यासाठी कॅशियर, कॉफी तयार करण्यासाठी कामगार किंवा सर्व्हिस देण्यासाठी काही स्टाफची तुम्हाला आवश्यकता असते. तुम्ही छोटेसे आउटलेट किंवा स्टॉल उभारणार असाल तर तुम्हाला मदतीसाठी एक व्यक्ती देखील ठेवून तुमची तुमचे शॉप चांगले चालवू शकता. सुरुवातीला जास्ती ग्राहक नसल्याने कामाचा तेवढासा ताण येत नाही पण जसे तुमचे कस्टमर वाढत जातील तसे तुम्ही तुमचा स्टाफ ठेवू शकता. 

कॉफी ह्या व्यवसायासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट । Investment for Coffee business

तुम्ही छोटेसे कॉफी शॉप उभारणार असाल तर तुम्ही कमी बजेटमध्ये देखील हा व्यवसाय चांगल्या रीतीने चालू करू शकता. पण जर तुम्ही ह्यासाठी तुम्हाला मशीन वगैरे आणि मोठे शॉप खरेदी करून मोठे कॅफे उभा करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्ही तुमच्या मशीनसाठी आणि बाकीचे लागणारे खर्च बघून त्याप्रमाणे तुम्ही तुमचे बजेट ठरवून इन्व्हेस्टमेंट करू शकता. 

कॉफी ह्या व्यवसायासाठी मार्केटिंग । How to do Marketing for coffee shop

Coffee Shop outlet business हा चालू केल्यानंतर त्यासाठी मार्केटिंग करणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही मोठे बॅनर किंवा छोटेसे पोस्टर गल्लीमध्ये आणि चौकामध्ये लावून तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती इतर लोकांना देऊ शकता. तसेच तुम्ही व्हाट्सअँप, मोबाईल फोनद्वारे तुम्ही इतरांना देखील तुमच्या व्यवसायाबद्दल कळवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय अधिकाधिक वाढवू शकता.

तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर तुम्ही तुमच्या खाद्याबद्दल माहिती देऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल सर्वांना माहिती देऊ शकता. कोणताही व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला चिकाटीची आवश्यकता असते.

कोणताही व्यवसाय करताना प्लॅनिंगपूर्वक जर तुम्ही काम केले तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. तसेच तुम्ही व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शिकून घेऊन त्या तुमच्या कामगारांना देखील सांगून त्यांना त्याप्रमाणे ट्रेन करून तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता.

कुणीही सांगितले आणि ऐकले म्हणून व्यवसाय केला तर तो व्यवसाय होत नाही त्यासाठी तुमची आवड आणि लागणारी मेहनत आवश्यक आहे. त्यामुळेच कोणताही व्यवसाय यशस्वी होतो.

अशा रीतीने तुम्ही योग्य ती आवश्यक माहिती घेऊन आणि त्याबाबत ट्रेनिंग घेऊन तुम्ही तुमचा Coffee Shop outlet business हा चांगल्या चिकाटीने आणि मेहनतीने केला तर तुम्ही नक्कीच ह्यात यशस्वी होवू शकता. तुम्हाला व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी जरी वेळ लागत असेल तरी जर तुम्ही चांगली मेहनत आणि मार्केटिंग करून तुमचा व्यवसाय चांगला मोठा करू शकता. फक्त ह्यासाठी चिकाटी, मेहनत, विश्वास गोष्टी आवश्यक असतात.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes