हस्तकला एक चांगली व्यवसायची संधि | Crafting business in Marathi

Crafting business

सर्वामध्ये काहींना काही हस्तकला बनवण्याचे गुण असतात. आपल्याकडे वेगवेगळ्या सणासुदीला आपण बऱ्याच गोष्टी वापरत असतो. आणि त्या वस्तू आपण कधी कधी घरच्या घरीही बनवतो किंवा बाजारातून विकत आणतो. प्रत्येक सणामध्ये आपण बरेच काही वेगवेगळी कौशल्ये वापरून आपण काहीनाकाही नवीन हस्तकला निर्माण करतो.

Crafting business
Crafting business

प्रत्येक सणाच्या वेळी आपण आपल्या दरवाज्याभोवती रांगोळी काढतो. हि एक चांगली हस्तकला आहे. काही जण ह्याचा वापर करून रेडिमेड रांगोळी तयार करून ती विकली जाते. अशा तर्हेने जर तुम्हाला चांगली रांगोळी डिझाईन बनावता येत असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेडिमेड रांगोळी घरामध्ये तयार करून त्या तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन विकू शकता.

घरी कंटाळा आल्यावर काही महिला आपल्या घरामध्ये उशी, उशीचे कव्हर, पायपुसणी, दरवाजासाठी तोरण अशा बऱ्याच सजावटीच्या वस्तू घरच्या घरी बनवल्या जातात. ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऑनलाईन विकू शकता. 

काही मुली क्लोथ पैंटिंग, ज्वेलरी डिझाईन, मेहंदी डिझाईन, फ्लॉवर पॉट्स, मेकअप, हेअर स्टाईल ह्यामध्ये पारंगत असतात. त्यासुद्धा आपल्या ह्या कलागुणांना ऑनलाईन आणू शकतात.

तुमच्याकडे जी कला आहे ती प्रत्येक कला तुम्ही एक नवीन उद्योग म्हणून चालू करू शकतो. आणि जर तुम्ही ह्या कला वापरून ऑफलाईन नफा मिळवत असाल तर तुम्ही ह्या कलेचा वापर करून तुम्ही तुमचा नफा वाढवण्यासाठी ऑनलाईन चा मदतीने अजून कलेचा प्रचार करू शकता.

काही जण लाकडाच्या सुशोभित वस्तू बनवण्यात पारंगत असतात. काही फुलापासून विविध प्रकारचे डेकोरेशन तयार करण्यामध्ये उत्सुक असतात. काही महिलांना भरतकाम,विणकाम, ग्लास पेन्टिंग, टेबल क्लाथ, ह्यामध्ये आवड असते. काही महिला acrylic पैंटिंग्स, ग्रीटिंग कार्ड्स अशा प्रकारच्या बऱ्याच वस्तू बनवू शकतात. प्रत्येकाकडे काहींना काही कला हि अवगत असतेच.

त्यामुळे तुम्ही प्रत्येकांच्या घरात बघाल तर प्रत्येक जण काहींना काही नवीन सुशोभित वस्तू बनवण्यामध्ये पारंगत असते. अशा तुमच्या प्रत्येक घरातल्या विविध कलागुणांना तुम्ही ऑनलाईन च्या मदतीने त्याचा प्रसार करून तुमच्या कला इतरांपर्यंत तर पोहचवू शकाल पण त्या कलेचा वापर करून तुम्ही अजून तुमचा स्वतःचा एक चांगला Crafting business स्थापित करू शकाल.

2022 मध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेल्या हस्तकला पुढीलप्रमाणे आहेत.

स्टेन ग्लास पेंटिंग – स्टेन ग्लास पेंटिंग हे आता सध्या ह्याची डिमांड खूप आहे. प्रत्येक नवीन घरासाठी किंवा आपण आपल्या घराला सुशोभित करण्यासाठी काहीतरी पैंटिंग करत असतो. जर तुम्हाला स्टेन ग्लास पेंटिंग येत असेल तर तुम्ही हि कला ऑनलाईन च्या मदतीने अजून प्रसारित करू शकता.

पेपर फ्लॉवर्स – तुम्हाला जर पेपर फ्लॉवर्स बनवता येत असतील तर तुम्ही ह्यामध्ये बरेच काही करू शकता. वेगवेगळ्या सणासुदीच्या वेळी मोठमोठ्या मंडळांना मोठमोठी तोरणांची गरज असते.

गणपती आणि गौरी डेकोरेशन साठी त्यांना वेगवेगळ्या सजावटीसाठी पेपर फ्लॉवर्सचा उपयोग करता येतो. वेगवेगळ्या प्रकारची तोरणे, गणपतीसाठी मकर बनवणे, गौरीसाठी सुशोभित दागिने तयार करणे अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी पेपर फ्लॉवर्स पासून तयार केल्या जातात.

echo फ्रेंडली वस्तू – तुम्ही जर echo फ्रेंडली वस्तू तयार करत असाल तर त्या सुद्धा सणासुदीचा वेळी तुम्ही विकून तुमचा इनकम वाढवू शकता. काही जण echo फ्रेंडली राखी, echo फ्रेंडली गणपती, echo फ्रेंडली गौरी, echo फ्रेंडली डेकोरेशन असे बरेच प्रकारचे उपक्रम राबवले जातात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काही echo फ्रेंडली वस्तू तयार करून घरीबसल्या काहीतरी इनकम चालू करू शकता.

एम्ब्रॉयडरी – तुम्हाला जर हॅन्ड एम्ब्रॉयडरी किंवा मशीन एम्ब्रॉयडरी येत असेल तर तुम्ही ड्रेसेस, उशी, बेडशीट ह्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही तयार करून विकू शकता.

क्रोचेट  –  तुम्ही जर क्रोचेट वर्क करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्या सुद्धा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे विकू शकाल. तुम्ही ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करून त्या विक्री करू शकता.

वूड वर्क – तुम्ही जर लाकडाच्या विविध वस्तू बनवण्यामध्ये पारंगत असाल तर तुम्ही लाकडाच्या विविध वस्तू तयार करून त्या सुद्धा तुमच्या लोकल ठिकाणी विक्री करून नफा मिळवू शकता. नंतर हळूहळू तुम्ही ह्याचा प्रसार सोशल मीडियाद्वारे करून तुम्ही तुमचा इनकम अजून चांगला वाढवू शकता.

किचेन्स – तुम्हाला जर विविध प्रकारच्या किचेन्स बनावट येत असतील तर तुम्ही हा बुझिनेस सुद्धा चांगल्या रीतीने करू शकता. तुमच्याकडे फक्त ती कला चांगली अवगत असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही नवीन नवीन निर्माण करता आले पाहिजे. 

छोट्या छोट्या टेडी च्या किचेन्स सध्या जास्त बाजारात विकल्या जातात. त्याला सध्ध्या खप मागणी आहे. तुम्ही जर अशा प्रकारच्या किचेन बनवत असाल तर तुम्ही हा एक चांगला इनकम करू शकता.

ज्वेलरी डिझाईन – तुम्ही ज्वेलरी डिझाईन हा एक चांगला घरीबसल्या करता येणार उद्योग करता येण्यासारखा आहे. आपण गौरी गणपतीच्या  वेळी किंवा लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवासाठी विविध प्रकारचे दागिने बनवत असतो. नवीन नवीन कानातले, गळ्यातले, बँगेल्स, ब्रेसलेट्स,अंकलेट्स ह्याची खूप सध्या भापूर प्रमाणात मागणी आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या विविध दागिन्यांचा तुमच्यासाठी एक चांगला उद्योग होऊ शकतो.

हॅन्डबॅग्स  – तुम्हाला माहीतच असेल कि सध्या विविध प्रकारच्या हॅन्डबॅग्स बाजारात उपलब्ध असतात. आणि मुलींना तर नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग्स हव्या असतात. जर तुम्ही विविध प्रकारच्या हॅन्डबॅग्स बनवत असाल तर तुम्हाला ह्यामध्ये भरपूर स्कोप आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या  डिझाईनमध्ये हॅन्डबॅग्स तयार करून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे चांगल्या पद्धतीने तुमचा उद्योग वाढवू शकता.

quilling आर्ट – जर तुम्हाला विविध प्रकारच्या quilling आर्ट मध्ये आवड असेल तर तुम्ही विविध प्रकारचे पैंटिंग्स, फूल, वेगवेगळ्या प्रकारच्या कानातील रिंग्स, अंगठी, ब्रेसलेट्स, राखी वगैरे बनवून त्या विकू शकता.

कॅन्डल – तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल तयार करता येत असतील तर ह्या सुद्धा सध्या खूप विकल्या जातात. बर्थडे साठी वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर्समध्ये कॅण्डलची खूप मागणी असते. सेंटेड कॅण्डल, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन वापरून तयार केलेल्या कलरफुल कॅन्डल तयार करून तुमचा नफा तुम्ही मिळवू शकता.

फुलदाणी – जर तुम्ही घरी फुलदाणी तयार करत असाल तर ह्याचा वापर बरेचसे लोक आपल्या घरात डेकोरेशन साठी म्हणून करतात. प्रत्येक घरामध्ये हॉलमध्ये तुम्ही पहिले असेल एकतारी फुलदाणी असतेच. जर तुम्ही चांगल्या डिझाईन करून वेगवेगळ्या साईझ मध्ये फुलदाणी तयार केल्या तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रॉफिट मिळवू शकता.

गिफ्टस – आपल्याकडे सणासुदीला किंवा कुणाच्या बर्थडे पार्टीला आपण काहींना काही गिफ्ट देत असतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि नेमके गिफ्ट काय द्यायचे तुम्ही जर विविध प्रकारच्या गिफ्ट्स तयार करत असाल तर तुम्ही त्या वस्तू सेल करू शकता.

ग्रीटिंग्स कार्ड्स तयार करणे. छोटेछोटे फुलदाणी बनवणे, छोट्या मुलासाठी टेडीझ तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये चॉकलेट्स तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे बॉक्सेस तयार करणे, फोटो अल्बम तयार करणे. अशा अनेक प्रकारच्या विविध वस्तू तयार करून त्या विक्रीसाठी ठेवू शकता.

तुम्ही तुमच्या हस्तकला ऑनलाईन कशा विकू शकाल? | What is the best way to sell crafts online?

ऑनलाईनसाठी तुम्हाला बरेच ऑपशन्स available आहेत. बऱ्याचशा वेबसाइट्स ऑनलाईन सेल करण्यासाठी हस्तकलेलासुद्धा तेवढेच महत्व दिले जाते.

सर्वात अग्रेसर हस्तकलेला विकण्यासाठी वेबसाइट्स पुढीलप्रमाणे आहेत.

१. etsy – हा फ्री प्लॅटफॉर्म नाही पण हस्तकलेसाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला इथे तुमच्या प्रॉडक्ट्स लिस्टिंगसाठी फी द्यावी लागते.

२. Amazon – हा एक चांगला फ्री प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही फ्री अकाउंट ओपन करून तुमचे प्रॉडक्ट्स ऍड करू शकता. तुमचा प्रॉडक्ट विकला गेल्यावर तुम्हाला ह्यापैकी काही अमाऊंट कमिशन म्हणून amazon ला द्यावे लागते.

३. Ebay – Ebay वर हस्तनिर्मित वस्तू सर्वोत्तम विकल्या जातात. त्यामध्ये जुन्या हस्तकला, मेणबत्ती,मेटलवर्किंग ,लाकूडकाम, काचेच्या कला, ओरिगामी, बास्केट, अशा वस्तू जास्त विकल्या जातात.

विक्री करण्यासाठी मला व्यवसायाचा परवाना आवश्यक आहे का?

कुठलाही उद्योग कारण्यासतजी व्यवसाय परवाना असणे आवश्यक आहे. तुम्हाला Etsy वर विक्री करण्यासाठी एक आवश्यक असेल. Etsy किंवा Shopify सारखे प्लॅटफॉर्म हे तपासत नाहीत की त्यांच्या साइटचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यवसायाकडे असे करण्यासाठी योग्य परवाने, परवानग्या, नोंदणी इत्यादी आहेत. पण तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व licenses असणे अत्यंत गरजेचे आहे.

हस्तकला विकण्यासाठी टॅक्स आयडीची आवश्यकता आहे का?

जर तुम्ही सुरुवातीला एक छंद म्हणून काही करत असाल तर त्यासाठी नाही. पण तुम्ही जर त्याचे उद्योग म्हणून करणार असाल आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत असाल तर मग टॅक्स आयडीची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही विशिष्ट रकमेपेक्षा जास्त कमवाल त्यावेळी तुम्हाला Gst रेजिस्ट्रेशन किंवा शॉप ऍक्ट किंवा टॅक्स आयडी वगैरे लागू शकते. तुम्ही ह्याबद्दल कुणी माहितीमधील CA  च्या मदतीने करून घेऊ शकता.

तुमच्या हस्तकलेचा वापर करून तुम्ही तुमच्या उद्योगाची घरीबसल्या सुरुवात करा. आणि हळूहळू त्याचा प्रसार ऑनलाईन च्या मदतीने करून तुमचा Crafting business द्विगुणित करा. 

आणखी काही व्यवसायाबद्दल माहिती –

मॅकडोनाल्ड बिझनेस

पिझ्झा व्यवसाय

App तयार करून पेसे कमवा

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee