इन्स्टाग्राम पेजचा वापर करून फॉलोअर्स वाढवून पैसे कमवा | Earn money by Instagram page in Marathi

इन्स्टाग्राम पेजचा वापर करून फॉलोअर्स वाढवून पैसे कमवा  | Earn money by Instagram page in Marathi

इंस्टाग्राम (Earn money by Instagram) एक सध्या चर्चेत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर बरेच लोक सतत काही ना काही पोस्ट टाकत असतात.

Earn money by Instagram page
Earn money by Instagram page

इंस्टाग्राम वर शक्यतो इमेजेस चा वापर जास्त केला जातो. जे कोणी आपले पर्सनल वगैरे फोटो काढतात ते इंस्टाग्राम च्या पेजवर पोस्ट केले जातात.

इंस्टाग्राम खूप चर्चेत असलेले बरेचसे लोक इंस्टाग्राम चा वापर करून पैसे (Earn money by Instagram) देखील कमवतात. आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की आपण इंस्टाग्राम प्रोफाइल कसे तयार करू शकतो आणि त्याचा उपयोग करून आपण पैसे कसे कमाऊ शकतो.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊ या की तुम्ही कसे तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करू शकता आणि त्याच्यावर तुमचे स्वतःचे पेज बनवून त्या पेजवर फॉलोवर्स कसे वाढवू शकता.

इंस्टाग्राम साठी योग्य तो टॉपिक निवडून त्यावर काम करणे | Choose the right topic for Instagram and work on it

पहिल्यांदा पेज बनवण्यासाठी योग्य तो टॉपिक निवडावा लागेल. एखादा विषय जो तुम्हाला अत्यंत प्रिय असेल आणि त्यामध्ये तुम्ही निपून असाल तर तुम्ही तो विषय निवडून त्यावर तुम्ही तुमचे कन्टेन्ट पोस्ट करू शकता.

विषय निवडण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे टॉपिक लिहून त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या विषयी अनुभव आहे आणि तुम्ही कोणत्या विषयांमध्ये जास्त कन्टेन्ट बनवू शकता हे पाहून त्याप्रमाणे तुम्ही विषय निवडू शकता.

तुम्हाला विषय निवडण्यासाठी एवढा प्रॉब्लेम येणार नाही. कारण एवढे विषय आहेत की त्यापैकी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची नॉलेज असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या नॉलेज तुमच्या आवडीनुसार विषय निवडू शकता.

जसे की काही लोकांना कला क्षेत्रात खूप आवड असते तर असे लोकांनी कला क्षेत्रांमधील त्यांची जी आवड असेल त्यामध्ये कन्टेन्ट बनवून इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करू शकता.

काही लोक टेक्निकल क्षेत्रामध्ये असतात असे लोक टेक्निकल विषय निवडून देखील त्यांचा कन्टेन्ट पोस्ट करून आपले पेज फॉलोवर्स वाढवू शकता.

तुम्हाला कोणत्याही विषयाची आवड असो तुम्ही त्या विषयांमध्ये कन्टेन्ट नियमितपणे इंस्टाग्राम पेजवर टाकत गेला तर तुमचे फॉलोवर्स वाढवून तुम्ही पेजद्वारे प्रोजेक्ट देखील देऊ शकता.

ह्या सगळ्या गोष्टी मध्ये विषय निवडणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडला तर तुम्हाला यामध्ये काम करणे जास्त सोपे जाईल. आणि तुम्ही ते तुमच्या आवडीने करू शकता.

आपल्याला एका खेळाची आवड असेल तर आपल्याला ते काम काम वाटत नाही. आपण पण त्या गोष्टी हसत-खेळत करतो आणि त्यामुळे कंटाळा देखील येत नाही.

म्हणून आपल्या आवडीच्या विषयानुसार त्यामध्ये काम केले तर ते तुम्ही चांगल्या रीतीने काम करून त्यामध्ये चांगले इंस्टाग्राम फॉलोवर्स वाढवून त्याद्वारे प्रोजेक्ट घेऊ शकता.

अशा रीतीने योग्य तो विचार करून आणि कोणते विषय आहेत आणि त्यापैकी सर्वात जास्त चांगले काम कोणत्या विषयात करू शकता हे पडताळून घेऊ शकता.

ते तुम्ही टेक्निकल, कला, सायन्स, शेती, आरोग्य, सौंदर्य, इंटरटेनमेंट, क्रिकेट असे अनेक विषय आहेत. तुम्ही यापैकी कोणताही विषय निवडू शकता. अजूनही बरेचसे विषय आहेत सर्च करून पाहू शकता आणि जर तुम्हाला माझ्यापेक्षा असेल त्याप्रमाणे तो निवडून इंस्टाग्राम पेज तयार करू शकता.

आकर्षक इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करणे | Creating an attractive Instagram profile

योग्य तो विषय निवडून झाल्यानंतर त्या विषयाच्या अनुसार तुम्ही तुमचे प्रोफाइल तयार करू शकता. प्रोफाईल तयार करून त्यावर तुम्ही तुमचा बायो आणि डिस्क्रिप्शन अपडेट करू शकता.

त्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल चांगल्या रीतीने बनवून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्ट तयार करून शेअर करू शकता.

तुमच्या प्रोफाईल तुमच्या विषयानुसार असतील तर लोकांना समजू शकते की तुमचे इंस्टाग्राम पेज कशासाठी आहे आणि तुम्ही लोकांना कोणत्या विषयाबद्दल माहिती देणार आहात. त्यांना जर त्या विषयाबद्दल रुची असेल तर ते तुम्हाला फॉलो करतील.

इंस्टाग्राम वर प्रोफाइल फोटो आणि स्टोरी अपडेट करणे

इंस्टाग्राम प्रोफाइल साठी विषयानुसार तुम्ही फोटो अपडेट करु शकता. तसेच यामध्ये दररोज तुम्ही नवीन नवीन स्टोरी देखील अपडेट करू शकता.

तुम्ही तुमच्या विषयानुसार स्टोरी तयार करून नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या प्रोफाईलवर स्टोरी पाहून लोक तुम्हाला फॉलो करायला लागतील आणि तुमच्या स्टोरी मुळे तुमच्या पोस्ट आणि रील लोक पाहतील.

त्यामुळे तुमच्या पेज वर ट्रॅफिक वाढायला आणि तुम्हाला त्यापासून नंतर फायदा होईल. इन्स्टाग्राम पेज वर लोकांची एंगेजमेंट वाढण्यासाठी थोडा वेळ लागतो. तुम्ही जितके चांगले इंस्टाग्राम पेज बनवले तितके तुमचे फॉलोअर वाढले जातील. त्यासाठी तुम्हाला नियमितपणा असणे आवश्यक आहे.

इंस्टाग्राम पोस्ट आणि रील तयार करणे | Creating Instagram posts and reels

जसे आपण पाहिले की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा कन्टेन्ट इंस्टाग्राम वर तयार करून अपलोड किंवा अपडेट करावा लागतो.

इमेजेस म्हणजेच पोस्ट ह्या देखील डिझाईन करून अपलोड केल्या जातात. तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन वापरून ह्या डिझाईन तयार करून तुम्ही तुमच्या विषयानुसार कन्टेन्ट टाकू शकता.

तुम्ही नियमितपणे कन्टेन्ट अपडेट करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट वेगवेगळा कन्टेन्ट घेऊन त्यानुसार डिझाईन आणि इमेजेस टाकून पोस्ट तयार करू शकता.

अशा तीन ते चार पोस्ट नियमितपणे अपडेट करणे इंस्टाग्राम पेज वर अपलोड करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे लोकांना तुमचा कन्टेन्ट जर आवडत असेल तर लोक तुम्हाला फोन करतील आणि तुमच्या पेज ला लाईक आणि कमेंट करतील.

अशाप्रकारे तुमच्या पेज वर चांगले ट्रॅफिक आले तर त्याद्वारे प्रोजेक्ट देखील मिळू शकतात. तुमच्या विषयाच्या अनुसार जे कोणी काम करत असतील आणि त्यांना देखील इंस्ताग्रम पेज बनवून हवे असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि प्रोजेक्ट देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम पेज चांगल्या रीतीने तयार करून त्याद्वारे काम मिळवू शकता.

सध्या इंस्टाग्राम वर रील खूप चर्चमध्ये आहे. तुम्ही देखील याचा फायदा घेऊ शकता. याद्वारे तुम्हाला भरपूर लोक आणि तुमच्या पेज लाईक आणि शेअर करतील. ज्याद्वारे तुमचे फॉलोअर लवकर लवकर गेन करण्यासाठी इंस्टाग्राम वर रील जास्त उपयोगी पडते. त्यामुळे इंस्टाग्राम रील तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर तुमचे इंस्टाग्राम पेज एंगेजमेंट चांगल्या वाढू शकते.

रील तयार करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे एप्लीकेशन वापरून वरील तयार करू शकता. शिवाय तुम्ही तुमचा मोबाईल कॅमेरा वापरून देखील रील बनवू शकता.

तुम्हाला जशा प्रकारचे कन्टेन्ट लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही रील बनवून त्या पोस्ट करू शकता. त्यानंतर रील मध्ये तुम्ही म्युझिक देखील ऍड करू शकता. रील द्वारे लोकांची इंगेजमेंट जास्त वाढते आणि त्यामुळे तुमचे फॉलोअर देखील लवकर वाढू शकतात. म्हणून रील तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चांगल्या प्रकारच्या विविध रील लवकर लोकांपर्यंत शेअर केल्या जातात आणि त्यामुळे भरपूर लोक तुमच्या प्रोफाईल वर येऊन तुम्हाला फॉलो करू शकतात.

ब्लॉगिंग किंवा यूट्यूब चैनलच्या ट्रॅफिकसाठी इंस्टाग्रामचा उपयोग | Use of Instagram for blogging or YouTube channel traffic

तुम्ही जर तुमचा ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल चालवत असाल तर तुम्हाला त्यासाठी ट्रॅफिकची गरज आहे. ट्राफिक जर तुमच्या ब्लॉग किंवा यूट्यूब चैनल वर असेल तर तुम्हाला त्याद्वारे पैसे मिळू शकतात.

ट्रॅफिक वाढवण्यासाठी इंस्टाग्राम प्रोफाइल आणि पेजचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता. तुम्ही ज्या विषयावर ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल तयार केला आहे त्यावर तुम्ही इंस्टाग्राम प्रोफाइल पेज बनवून त्यावर तुमचा कंटेंट नियमितपणे अपलोड करून तुमच्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेलची लिंक तुम्ही बायो मध्ये देऊन त्याद्वारे तुम्ही ट्राफिक घेऊ शकता.

अशाप्रकारे जर तुम्ही तुमचा ब्लॉग आणि युट्युब चॅनेलसाठी काम करत असाल तर तुम्ही त्यासाठी ट्रॅफिक इंस्टाग्राम पेज वरून घेऊ शकता.

अशा रीतीने तुमचे इंस्टाग्राम पेज देखील वाढेल आणि तुम्हाला त्याचा तुमच्या ब्लॉग आणि युट्युब चॅनेल साठी फायदा देखील होईल. आणि त्यामुळे तुम्ही नंतर इंस्टाग्राम तयार करण्यासाठी प्रोजेक्ट देखील घेऊ शकाल.

इंस्टाग्राम पेज वरून तुम्ही पैसे कसे कमवू शकाल? | How To Make Money On Instagram Page?

आतापर्यंत आपण पाहिले की आपण इंस्टाग्राम पेज कशाप्रकारे वापरू शकतो. शिवाय इंस्टाग्राम पेज वर तुम्ही फॉलोवर्स गेन करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. याबद्दल देखील आपण माहिती घेतली.

जसे तुमचे इंस्टाग्राम पेज चांगल्या प्रकारे होईल त्याद्वारे तुम्ही नंतर प्रोजेक्ट देखील घेऊ शकता. तुम्ही तुमचे केलेले प्रोजेक्ट क्लायंटला दाखवून त्याद्वारे प्रोजेक्ट घेऊ शकता.

प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम चाच वापर करू शकता. इंस्टाग्राम वर जे कोणी बिझनेस मॅन किंवा कंपनी आहेत त्यांना त्यांचे इंस्ताग्रम पेज चांगल्याप्रकारे बनवून हवे असते.

बऱ्याच कंपन्या आणि बिझनेसेस त्यांचे कस्टमर इंस्टाग्रामच्या द्वारे मिळवतात. तुम्ही जर त्यांना इंस्टाग्राम पेज बनवून त्यांचे प्रॉडक्ट विकण्यासाठी कस्टमर मिळवून दिले तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही इंस्टाग्राम पेज बनवण्यासाठी पैसे घेऊ शकता.

अशा प्रकारचे कस्टमर भरपूर तुम्हाला मिळून जातील आणि त्याद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारचे काम करून घरी बसून पैसे कमवू शकता.

बरेचसे प्रॉडक्ट इंस्टाग्राम द्वारे विकले जातात तुम्ही ऑर्गानिकली जर इंस्टाग्राम वर चांगल्या प्रकारे काम करत असाल तर तुम्ही त्यासाठी प्रोजेक्ट घेऊन भरपूर काम घेऊ शकता.

तुम्हाला यासाठी घरबसल्या काम करण्याची एक चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे देखील यावर काम करू शकता आणि चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्ही फक्त दोन तास जरी दिला तरी चालू शकते आणि त्याद्वारे तुम्ही भरपूर प्रोजेक्ट मिळून नंतर तुम्ही तुमची टीम देखील वाढवू शकता.

अशा रीतीने तुम्ही इंस्टाग्राम पेज तयार करून तुम्ही तुमची ऑडियन्स तयार करून त्याआधारे पैसे कमवू शकता. यासाठी बऱ्याच गोष्टी देखील तुम्ही करू शकता.

पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पेजवर बऱ्याच गोष्टी करता येतील. आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही इंस्टाग्राम द्वारे अजून कोण कोणत्या प्रकारे पैसे कमवू शकता याविषयी अधिक माहिती घेऊ.

तुम्हाला जर अजून काही जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता. त्याद्वारे आम्ही तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टींची माहिती घेऊ.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity