यूट्यूब चॅनेल बनवून घर बसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी | Earn money using YouTube channel in Marathi

यूट्यूब चॅनेल बनवून घर बसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी | Earn money using YouTube channel in Marathi

 पैसे कमावण्यासाठी यूट्यूब चॅनेल बनवून (Earn money using YouTube channel) ऑनलाईन घरच्या घरी बसून कमावण्याच्यासंधी मिळतील.

Earn money using YouTube channel
Earn money using YouTube channel

सध्या covid-१९ मुळे बऱ्याचशा लोकांचे जॉब्स धोक्यात आहेत. किंवा जॉब्स नाहीयेत. नवीन जे graduate झाले आहेत आणि ज्यांचे शिक्षण मधेच थांबले आहे. अशा परिस्थितीत काहीतरी करण्यासाठी सगळे जण धडपड करत आहेत.

नोकरी मिळवण्यासाठी काय करायचे किंवा काहीतरी नवीन income source कसा होईल. घरच्या घरी बसून आपल्याला online काही करता येईल का. असे बरेच प्रश्न मनामध्ये येत राहतात. ह्या सर्व प्रश्नांची सगळी उत्तरे तुम्हाला इथे सापडतील.

इथे तुम्हाला बऱ्याचशा ऑनलाईन मनी कमावण्यासाठी काही माहिती देत आहोत. जी तुम्हाला अतिशय  उपयुक्त होईल. आणि घरबसल्या काहीतरी कमावण्याच्यासंधी मिळतील. 

युट्युब चॅनेल बनवणे | How to make YouTube Channel

आत्ता सगळ्यात जास्त काही चालत असेल तर तुम्ही घरोघरी पाहत असाल. प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्याकडे मोबाईल आहेत आणि प्रत्येकजण काहीनाकाही युट्युबवर बघत असते. पहिला जसा घरोघरी tv बघितला जायचा तसा आत्ता सगळे जण मोबाइलचा वापर करत आहेत. मोबाईलवर tv बघणे युट्युब बघणे खूपच वाढले आहे. लहान मुलापासून ते वृद्धपर्यंत सर्रास सगळे जण युट्युब वापरतात. त्यामुळे युट्युबची पॉप्युलॅरीटी खूप वाढली आहे. ह्याचाच उपयोग करून आपण पैसे कमवू शकतो.

ह्यासाठी आपल्याला काय करावे लागेल असा प्रश्न पडला असेल. तर ह्याचे सोपे उत्तर म्हणजे आपला स्वतःचा युट्युब चॅनेल तयार करणे. पण हा युट्युब चॅनेल काढायचा कसा आणि ह्यावर आपण काय करायचे. तर तुमचे gmail  अकाउंट असेलच त्याचाच वापर करून युट्युब वर आपला चॅनेल काढायचा. पण नुसता चॅनेल काढून ठेवणे उपयोगाचे नाही. तर तो चॅनेल कशासाठी आहे आणि त्यावर तुम्ही कशाबद्दल विडिओ तयार करणार आणि विषय कुठला ठरवायचे हे सगळे आपणास सविस्तर ठरवावे लागेल.

 म्हणून प्रथम सगळे व्यवस्थित प्लॅन करून ठरवून मग आपला चॅनेल काढायचा. त्यासाठी प्रथम एक विषय निवडावा लागेल. पण हा विषय कसा निवडायचा हे पण खूप महत्वाचे आहे. विषय निवडताना प्रथम सगळे विषय ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे ते सर्व विषय नोटबूकमध्ये एकाखाली एक लिहावेत.

त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही किती पारंगत आहात हे पाहावे. आणि विषयांच्या पुढे रँक देऊन सगळ्यात जास्त पॉईंट्स कोणत्या विषयाला मिळतात ते पाहावे. अशा रीतीने तुम्ही तुम्हाला ज्याबद्दल माहिती आहे त्या विषयाचा चॅनेल ठरवावा.

युट्युब चॅनेल सुरु करण्यासाठी कीवर्ड सर्च कसा करू शकता | How to do Keyword Search for YouTube channel

 युट्युब चॅनेल ज्यावेळी स्टार्ट कराल त्यावेळी प्रथम कीवर्ड सर्च जास्त महत्वाचा मुद्दा असेल. त्यासाठी तुम्ही प्रथम कीवर्ड सर्च टूलची मदत घेऊन तुमच्या आवडीच्या आणि तुम्हाला माहित असलेल्या विषयांसाठी कीवर्ड रिसर्च कराल. आणि त्या कीवर्डच्या मदतीने तुम्हाला तुमचा चॅनेल बनवता येईल.

तर ह्याचे महत्व असे आहे कि लोक त्या विषयाबद्दल युटूबवर विडिओ कसे सर्च करतात हे तुम्हाला कळेल. आणि तुम्ही जर त्याप्रमाणे चॅनेल तयार केला तर तुमच्या चॅनेलला रँक करणे युट्युबवर सोपे जाईल. गूगल वर सर्च करून तुम्ही फ्री किवर्ड सर्च टूल वापरू शकता. keywordtool.io आणि yutubebuddy.com ह्याद्वारे तुम्हाला कीवर्ड सर्च करण्यास मदत होईल.

तुम्ही कीवर्ड सर्चसाठी यूट्यूबची मदत घेऊ शकता. त्यासाठी यूट्यूबच्या सर्चबारमध्ये तुम्हाला ज्या विषयासाठी किवर्ड सर्च करायचा आहे तो सर्च करून त्याद्वारे खाली किती किवर्ड रिफ्लेक्ट होतात ते पाहायचे आणि ते सर्व किवर्ड नोट्समध्ये लिहून काढायचे. आणि हे किवर्ड किती कॉम्पेटेटिव्ह आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही www.tubebuddy.com चे एक्स्टेंशन वापरून फाईंड करून सर्च करू शकता. नंतर तुम्ही जो किवर्ड कमी कॉम्पेटेटिव्ह आणि जास्त सर्च होत असेल त्या किवर्ड चा वापर करून विडिओ तयार करू शकता.

चॅनेलचे योग्य नाव | Right Channel Name

 चॅनेल ठरवल्यानंतर चॅनेलचे योग्य नाव द्यावे. आणि नंतर चॅनेलला सुरुवात करावी. चॅनेल create केला विषय निवडला पण त्या विषयाबद्दलची माहिती गोळा करणे आणि त्या विषयाचे मुद्दे मांडणे हे काम थोडे नीट आणि व्यवस्थित करावे लागते. कारण तुम्ही जो चॅनेल चालवत आहेत त्यासाठी त्या विषयाचा कन्टेन्ट शोधणे जास्त महत्वाचे असते. तरच आपला चॅनेल हिट होऊन आपल्याला त्यापासून पैसे कमावण्याची संधी लाभते. ह्यासाठी प्रथम आपले कन्टेन्ट व्यवस्थित रेडी ठेवून नंतरच ते युट्युब चॅनेलवर दाखवावे.     

कन्टेन्ट कसा असावा तर कंटेन्टमुळे प्रेक्षक तुमच्या चॅनेलकडे आकर्षिले जातील असा असावा. त्यासाठी तुम्ही जो विषय निवडला आहे त्या विषयावर व्यवस्थित अभ्यास करून आणि भरपूर वाचन करून त्यामधील ठरविलं मुद्दे घेऊन तुमच्या  पद्धतीने तो कसा मांडता येईल हे बघून तो नंतरच live करावा. ह्यासाठी तुम्हाला तुमच्या knowledge प्रमाणे मुद्दे लिहून काढून त्यामध्ये अजून काही टाकता येईल का हे पाहून मगच तुमचा विडिओ बनवण्यास सुरुवात करावी. जर तुमचा कन्टेन्ट स्ट्रॉंग असेल तर तुमच्या चॅनेल ला ग्रो व्हायला कुणीच अडवू शकणार नाही. 

युट्युब चॅनेलसाठी कन्टेन्ट कसा तयार करू शकता? | How to make content for YouTube channel?

कन्टेन्ट म्हणजे नेमके काय? तर कन्टेन्ट म्हणजे डेटा जो तुम्ही त्या विषयावर मांडणार आहे. आणि ज्याच्याबद्दल तुम्ही युट्युबवर दाखवणार आहे. मग तो image  च्या फॉरमॅट मध्ये असू शकतो किंवा textchya फॉरमॅटमध्ये. तो तुमचा कन्टेन्ट प्रेक्षकांना आकर्षित करणारा असला पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा कन्टेन्ट व्यवस्थित मांडला तर तुम्हाला सुद्धा चॅनेलसाठी काम करायला आवडेल आणि नक्कीच तुम्ही ह्यातून पैसे कमवू शकाल.

युट्युब चॅनेलसाठी कन्टेन्ट हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही तुमचा विषय कसा मांडता आणि त्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे. हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरते. म्हणून ह्या गोष्टींची तयारी अतिशय महत्वाची ठरते. उदा: आपण जर चित्रपट हा विषय निवडला तर तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल माहिती द्यावी लागेल. त्या चित्रपटामधील कलाकार,गायक,लेखक,दिग्दर्शक,एडिटर ह्याची माहिती घ्यावी लागेल. हा चित्रपट किती साली बनला. आणि तो किती साली प्रसिद्ध झाला हे पाहावे लागेल.

 नंतर त्या चित्रपटाची स्टोरी काय होती आणि ती आपल्याला कशी मांडता येईल ह्याचे व्यवस्थित विवंचन करून ते प्रेक्षकांना मांडून दाखवावे लागेल. आणि त्या स्टोरीचा नंतर सारांश सांगणे हे सुद्धा महत्वाचे ठरेल. प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहावा कि नाही आणि जर तो पाहावयाचा असेल तर तो कुणी पाहावा हे पण त्यामध्ये सांगावे लागेल.

अशी जर विस्तृत आणि सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या चॅनेलवर देत असाल तर तुमचा चॅनेल बघण्यास लोकांना आवडेल. आणि तुमचे subscribers वाढले आणि चॅनेल चे watchtime वाढले कि तुम्ही तुमचा चॅनेल google ऍडसेन्स साठी approve करून घेऊन तुम्ही तुमच्या चॅनेल्सवर ads च्या द्वारे पैसे मिळवणे चालू होईल. 

फक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कन्टेन्ट unique असला पाहिजे. कुणाची कॉपी करून किंवा कुणाच्या दुसऱ्या चॅनेलचा डेटा घेऊन केलेला कन्टेन्ट पात्र ठरला जात नाही. जर तसे केले तर तुम्ही चॅनेलवर बॅन होऊ शकता.

म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे चॅनेल बघा त्याच्यामध्ये नवीन काय शिकता येईल हे पाहा पण त्याच्यामधील कन्टेन्ट कॉपी करू नका. आपल्याला प्रत्येक गोष्टींमधून नावीन्य तयार करून आपले स्वतःचे इनपुट्स देऊन मग चॅनेल grow करू शकता.

 काही जण शेतीविषयी विविध माहिती चॅनेलद्वारे देतात. मग शेतात पीक कसे घ्यायचे आणि कुठले पीक त्या शेताला घ्यायचे. शेतातील मातीचे परीक्षण कसे करायचे  आणि हे सर्व टेस्ट झाल्यावर मातीचा कस कसा वाढवता येईल ह्याविषयी माहिती सांगितली जाते.

शेतात लावण्यासाठी बी-बियाणे कुठले वापरावे. शेताची मशागत कशी करावी. शेतात पाणी कसे वापरता येईल आणि त्याची सोय कशी करावी  अशा सर्व गोष्टी शेतीविषयक चॅनेलसाठी उपयुक्त ठरतात त्या सर्व गीष्टीची व्यवस्थित माहिती त्या चॅनेल्सद्वारे दिली जाते. ह्यामुळे जे शेती करतात त्यांच्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरते. आणि ह्या माहितीचा शेतकरी लाभ घेऊ शकतात.

 काही जणांचे टेकनॉलॉजिचे चॅनेल्स आहेत. ज्यांना टेकनॉलॉजि बद्दल भरपूर knowledge आहे ते हा चॅनेल तयार करतात. आणि नवीन ज्या बाजारात टेकनॉलॉजिस आल्या आहेत त्याविषयी त्या चॅनेल्सवर माहिती देतात. उदा: सध्याचे संगणक युग आहे तर तुम्ही संगणक कसा वापरायचा त्याच्यामध्ये कोणकोणते पार्टस वापरले आहेत.

सॉफ्टवेअर असतात आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? ते कशासाठी वापरले जातात. संगणक आपल्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो. शिवाय हार्डवेअर म्हणजे काय? त्याचे पार्टस काय काय असतात. त्या पार्टसचा उपयोग काय असतो. ते कसे जोडले जातात.

 त्या पार्टमधे काही बिघाड झाला तर तो कसा रिपेअर करायचा ह्याविषयी माहिती सांगितली जाते. काहीजण टीव्ही, मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन,किचन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, किचन अप्प्लायनसेंस वर माहिती दिली जाते. ज्यामुळे लोकांना त्याविषयी माहिती मिळते. आणि लोक खरेदी करण्यापूर्वी त्या सर्व वस्तूमध्ये कुठल्या ब्रँड्सच्या वस्तू चांगल्या आहेत हे पडताळणी करून पाहतात.

आणि नंतरच खरेदी करण्यासाठी जातात. म्हणजे तुम्ही जर लोकांना योग्य ते मार्गदर्शन आणि माहिती देत असाल तर लोक तुमचा चॅनेल नक्की बघतात. आणि दुसऱ्यांना पण बघण्यासाठी प्रवृत्त करतात. फक्त आपले काम असते कि योग्य ती आणि उपयुक्त अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.

आणि दुसऱ्यांना पण बघण्यासाठी प्रवृत्त करतात. फक्त आपले काम असते कि योग्य ती आणि उपयुक्त अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. जेणेकरून लोक तुमच्या कंटेन्टमुळे एंगेज राहतील.

युट्युब चॅनेलसाठी विडिओ कसा तयार करायचा? | How to create video for YouTube channel

चॅनेल क्रीएट केला कन्टेन्ट रेडी आहे. आता विडिओ कसा तयार करायचा? तर ह्याचे सिम्पल उत्तर म्हणजे आपल्याकडे आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल आहे. आणि प्रत्येक जण मोबाईलचा वापर फोटो, विडिओ काढण्यासाठी करतो.

आपण सुद्धा युट्युब चॅनेलसाठी मोबाईलद्वारे विडिओ तयार करू शकता. त्यासाठी तुमचा मोबाईल हा स्मार्टफोन असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगला विडिओ कॅमेरा असला पाहिजे ह्याद्वारे तुम्ही चांगले तुमचे विडिओ काढून ते युट्युबवर पोस्ट करू शकता. माइक आणि स्पीकर्स साठी तुम्ही तुमचे हेडफोन्स वापरू शकता.

युट्युब चॅनेलसाठी विडिओ इडिटींग | Video Editing for YouTube channel 

विडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला प्रथम विडिओ इडिटींग साठी गूगल प्लेस्टोरमधून अँडॉईड अँप मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्यावे लागेल. त्यामुळे जर जो विडिओ बनवला आहे तो जर एडिट करायचा असेल तर तो तुम्हाला विडिओ एडिटर च्या मदतीने नको असलेला विडिओ चा पार्ट रिमूव्ह करता येईल. विडिओ अपलोड करायच्या अगोदर आपण तो विडिओ नीट बघून त्यामध्ये काही त्रुटी आहेत का हे पडटाळून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही ज्यावेळी हा विडिओ बघाल त्यावेळी प्रेक्षक हा विडिओ कशा रीतीने बघेल आणि त्या व्हिडिओकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होत आहेत का ह्या गोष्टी बनवतो त्यावेळी पहिल्या व्हिडिओमध्ये काही कमतरता आहेत का ह्या पाहुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या त्रुटी परत होऊ नये ह्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.

आपण जेवढे विडिओ तयार करतो त्या प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळते. आणि ते पुढच्या विडिओ मध्ये अप्प्लाय करून तो विडिओ अत्यंत चांगला कसा होईल हयाकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते. ज्यावेळी दुसऱ्या चॅनेल्सचे व्हिडिओ आपण बघतो त्यामधून सुद्धा आपल्याला नवीन कल्पना सुचल्या जातात. आणि त्या कल्पना आपण आपल्या चॅनेल्स मध्ये इम्पलिमेन्ट करून आपलाचॅनेल्स एक उत्तम चॅनेल आहे हे सिद्ध करू शकतो.

युट्युब चॅनेलसाठी विडिओ अपलोड | Video Upload on YouTube channel

व्हिडीओ युटूबवर टाकताना एक गोष्ट लक्षात घ्यावी कि आपण कधीतरी मनाला येईल तेव्हा विडिओ टाकू नये. तर व्हिडिओमध्ये कन्सिस्टंस असला पाहिजे म्हणजे तुमच्या चॅनेल ला विडिओ बघणारा ऑडियन्स एंगेज राहील. आणि तुमच्या चॅनेल्सबद्दल त्याला विश्वास होईल कि हा चॅनेल आपल्याला उपयुक्त अशी माहिती देत आहे आणि मला ह्या चॅनेलवर रोज नवीन काहीतरी पाहण्यास मिळत आहे. सुरुवातीला आठवड्यातून २ ते ३ विडिओ टाकावेत. नंतर जशी तुमची विडिओ करण्याची प्रॅक्टिस होईल तसतसे विडिओ रोज एक युटूबवर टाकण्यास हरकत नाही. विडिओ टाकताना आपण ते विडिओचे अपलोड करायचे एक फिक्स time ठेवावे. आणि त्या फिक्स वेळेतच विडिओ अपलोड करावेत.

युट्युब चॅनेलसाठी ट्राफिक | Traffic for YouTube channel

आता आपल्याकडे आपला चॅनेल आहे आणि त्या चॅनेल्सवर तुम्ही व्हिडिओही अपलोड करत आहेत. पण तो चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल हे सुद्धा आपणास पाहावे लागेल. तर हा चॅनेल ऑर्गनिकली ग्रो करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करणे योग्य ठरेल.

त्यासाठी तुमच्याकडे व्हाट्सअँप द्वारे तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुम्ही तुमच्या चॅनेल्सची माहिती सांगू शकता आणि त्यांना तो बघण्यासाठी प्रवृत्त करू शकता. त्यासाठी तुमच्या चॅनेल्समध्ये असे विशेष काय आहे आणि त्याचा तुम्हाला कसा उपयोग हे देखील तुम्ही सांगू शकता. आणि अशा प्रकारे तुमच्या चॅनेलवर ऑडियन्स अट्रॅक्ट होईल आणि चॅनेल पाहिलं. जर तुमचा चॅनेल त्यांना आवडला तर ते तुमचा चॅनेल subscribe करतील व रोज त्या चॅनेल्सवर येणारे विडिओ बघतील. 

 तुम्ही जर फेसबुक वापरत असाल तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही तुमच्या चॅनेलसाठी एक पेज तयार करून तुमचा व्हिडिओ शेअर करू शकता. त्यासाठी तुमची फसेबूकवरची एंगेजमेंट स्ट्रॉंग असली पाहिजे आणि तुम्ही तिथे ऍक्टिव्ह असले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही नवीन विडिओ अपलोड कराल त्याची थोडीफार माहिती तुम्ही तुमच्या फेसबुकच्या पेजवर देऊ शकता.

तुमचा चॅनेल ग्रो झाला की तुम्ही तुमच्या चॅनेल्सवर advertise करून पैसे कमवू शकता. अशा रीतीने तुम्ही तुमचा चॅनेल करून घरबसल्या इनकम करू शकता.

यूट्यूब चॅनेल संबंधी अजुन माहिती 👇👇👇

Cooking यूट्यूब चॅनेल

गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा

पाळीव प्राणी YouTube चॅनेल कसे सुरू करावे?

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin