गोऱ्या आणि नितळ त्वचेसाठी फेस पॅक I Face pack for fair and smooth skin in Marathi

गोऱ्या आणि नितळ त्वचेसाठी फेस पॅक I Face pack for fair and smooth skin

तुमचा चेहरा गोरी आणि नितळ त्वचेसाठी हा फेस पॅक (Face pack for fair and smooth skin) तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.

Face pack for fair and smooth skin
Face pack for fair and smooth skin

गोरे व्हायला कुणाला आवडत नाही, जे गोरे असतात त्यांना देखील अजून गोरे व्हायचे असते. प्रत्येक जण घरी गोरे होण्यासाठी भरपूर उपाय करत असतात.

काही जण टाळीचे पीठ लावते, काही जण हळद याचा वापर करतात तर काहीजण कॉस्मेटिक प्रोडक्ट विकत आणून ते चेहऱ्यावर लावतात. त्याने चेहरा तर उजळतो पण काही दिवसांमध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या आणि काळवंडला जातो. तुमचा चेहरा अगदी घरगुती उपायाने चांगला सतेज आणि टवटवीत दिसण्यासाठी हा फेसपॅक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

एकदा करून नक्की पहा हा फेस पॅक. तुम्हाला चांगला तुमच्या चेहऱ्यावर इफेक्ट देईल. काहींना असे वाटत असेल की माझा चेहरा काळा आहे तर मी हा फेस पॅक लावून गोरी होईल का? सगळ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, चेहरा आपला आहे त्यापेक्षा जास्त गोरा किंवा अगदी गोरा होऊ शकत नाही.

पण आपला चेहरा सतेज, तुकतुकीत आणि टवटवीत दिसण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. त्यामुळे तुम्ही जर हा फेसपॅक वापरला तर तुमचा चेहरा नक्कीच टवटवीत सतेज आणि चमकेल. जर चेहरा काळा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक नक्कीच जाणवेल.

अंडे आणि मध वापरून फेस पॅक

साहित्य

एक अंड्याचा पांढरा भाग

एक टीस्पून मध

एक चमचा डाळीचे पीठ

एक चमचा लिंबाचा रस

फेस पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम अंडे फोडून त्याच्यामध्ये पांढरा बलक एका बाऊलमध्ये घ्यावा. राहिलेले पिवळे बलक एका वाटीमध्ये ठेवून तुम्ही ते खाण्यासाठी वापरले तरी चालेल.

त्याच्यामध्ये मध डाळीचे पीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून चांगले एकजीव करावे.

सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले की सर्वप्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा.

बाहेरून आला असेल तर चेहरा प्रथम फेसवॉशने किंवा डाळीच्या पीठाने धुवून घ्यावा.

तयार केलेला फेस पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत सर्व भागावर पसरावावा.

फेस पॅक मुळे थोडासा अंड्याचा वास येण्याची शक्यता आहे पण तुम्ही लक्ष देऊ नका.

चेहऱ्यावरील फेसपॅक पूर्ण वाढल्यानंतर हा फेस पॅक हळूहळू पाण्याचा वापर करून चेहऱ्यावरून स्वच्छ करावा व चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

फेसपॅक जर तुम्ही रात्री वापरला तर तुम्हाला याचे चेहऱ्यावर चांगले इफेक्ट लवकर दिसून येतील.

फेसपॅक दोन झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा थोडेसे बदाम तेल लावावे त्याच्यामुळे चेहरा मऊ पडेल.

अशा रीतीने फेस पॅक तयार करून घरच्या घरी तुम्ही तुमच्या चेहरा अगदी फ्रेश आणि गोरा बनवू होण्यास मदत मिळेल. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यामध्ये दोन वेळा केला तर तुम्हाला लवकर फरक दिसून येईल.

तुम्ही जर ब्राईटनिंग आणि स्किन टायटनिंग साठी फेस पॅक शोधत असाल तर त्यासाठी हा फेसपॅक अत्यंत उपयोगी आहे. या फेसपॅक मुळे तुमचा चेहरा टाईट होण्यास मदत मिळते. जर चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर त्या कमी होतात. अंड्यामुळे चेहऱ्यावर सतेजपणा येतो. तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारते आणि तुमचा चेहरा टवटवीत आणि चकचकीत दिसतो.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images