त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेस पॅक l Face pack to improve skin texture

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेस पॅक l Face pack to improve skin texture

तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी काकडीचा हा फेस पॅक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तुमच्या त्वचेला योग्य असे पोषण मिळणे आवश्यक असते. तुमच्या त्वचेची निघा राखणे आणि तुमच्या त्वचेला आवश्यक असणारी पोषक तत्वे जर व्यवस्थितपणे मिळाली तर तुमची त्वचा सुंदर दिसते व त्वचेचा पोत सुधारण्यास देखील मदत होते.

Face pack to improve skin texture
Face pack to improve skin texture

तुम्ही जर घरगुती फेसपॅक नियमितपणे वापरले तर तुमचा चेहरा उजळण्यास नक्कीच मदत मिळते. घरगुती फेस पॅक हे घरातील ज्या गोष्टी आपण खाण्यासाठी वापरतो त्यांचा वापर करून केलेले असतात.

त्यामुळे जशी शरीराची पोषक तत्वे फळे आणि भाज्या खाल्ल्याने आणि डाळी यांच्यामुळे मिळतात. तसेच त्वचेसाठी देखील फळे, भाज्या आणि डाळी यांचा वापर करून जर तुम्ही फेस पॅक तयार केले तर ते फेस पॅक तुमच्या त्वचेचे पोषण करून तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते.

तर चला पाहूया काकडी पासून तयार केलेला फेस पॅक जो तुमच्या त्वचेला तजेलदार बनवेल आणि तुमचा चेहरा स्वच्छ सतेज आणि नितळ दिसेल.

काकडीचा फेस पॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

  • एक चमचा काकडीचा रस
  • एक चमचा बदाम तेल
  • मसूरच्या डाळीचे एक चमचा पीठ
  • थोडीशी चिमूटभर हळद

एका बाऊलमध्ये काकडीचा रस आणि त्याच्यामध्ये बदाम तेल डाळीचे पीठ आणि चिमूटभर हळद एकत्र करावी सर्व मिस्टर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते चेहरा दोन चेहऱ्यावर लावावे.

चेहऱ्यावर हलक्या हाताने मानेपासून ते कपाळापर्यंत गोल गोल मसाज करत राहावे दहा मिनिटे तरी मसाज करावा त्याच्या नंतर फेस पॅक तसाच चेहऱ्यावर पंधरा मिनिटे ठेवून द्यावा.

फेस पॅक पूर्णपणे वळल्यानंतर हळुवारपणे पाणी शिंपडून फेस पॅक स्वच्छ करावा चेहरा स्वच्छ झाल्यानंतर चेहऱ्यावर थोडेसे बदाम तेल लावून चेहऱ्यावर मसाज करावा.

हा फेस पॅक तुम्ही रोज जरी वापरला तरी चालू शकेल. या फेसपॅकमुळे तुमचा चेहरा अगदी स्वच्छ होईल व चेहऱ्यावरील डाग तसेच सुरकुत्या आणि चेहरा जर काळवंडला असेल तर चेहरा सुंदर होण्यास मदत मिळेल. हा नियमित वापरल्याने तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळेल. हा फेस पॅक तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी बाहेरून आल्यानंतर वापरला तरी चालेल.

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day