शेतकरी जनता अपघात विमा योजना l Secure with Farmers Insurance Scheme Benefits 2023

शेतकरी जनता अपघात विमा योजना l Farmers Insurance Scheme

शेतकरीसाठी व्यक्तिगत अपघात विमा योजना (Farmers Insurance Scheme) ही योजना 2004 मध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि 2005 पासून ही योजना अमलात आणली. त्याच्यानंतर 2014 मध्ये या योजनेसाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळाली.

राज्यामध्ये शेती करताना जे अपघात होतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला जातो किंवा शेतकऱ्यांना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळते आणि उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि कुटुंबीयास आर्थिक लाभ द्यावा यासाठी शेतकरीसाठी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. 2009 मध्ये सदर योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे ठेवण्यात आले.

राज्यामध्ये शेती करताना वीज पडणे, सर्पदंश होणे, विंचुदंश होणे, विजेचा शॉक बसणे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात आणि अन्य कोणतेही कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा जिव जातो व अपंगत्व होते. अशा शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभ देण्याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आली.

शेतकरीसाठी व्यक्तिगत अपघात विमा योजना (Farmers Insurance Scheme) योजनेची ठळक वैशिष्ट्ये

शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने या योजनेसाठी स्वतंत्र रीत्या विमा हप्ता भरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. शासनाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यात येतो.

यापूर्वी शेतकऱ्यांनी अन्य कोणता विमा भरला असेल तर त्या योजनेचा या योजनेशी कोणताही संबंध राहणार नाही. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या स्वतंत्र लागणारी सर्व कागदपत्रे वगळता इतर कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांनी द्यायची आवश्यकता नाही.

शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत (Farmers Insurance Scheme) मिळणारे लाभ

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते. अपघातामुळे दोन अवयव निकामी झाली असतील तर त्याला देखील एक लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येते आणि जर अपघातामुळे एकावेळी निकामी झाला असेल तर त्याला पन्नास हजार रुपये म्हणून नुकसान भरपाई देण्यात येते.

या योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

  • Farmers Insurance Scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा राज्यातील शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्याचे वय 10 ते 75 या वयोगटात असून महसूल नोंदणी नुसार तो खातेदार शेतकरी असावा.
  • शेतकरी म्हणून त्याच्या नावाचा सातबारा उतारा किंवा आठ नमुन्यातील उतारा असणे आवश्यक आहे.
  • नोंदणीवरून शेतकऱ्याचे सातबारा उतारा वर असलेले नाव याची संबंधित नोंद असणे आवश्यक.
  • शेतकऱ्यावर वारस म्हणून गाव कामगार तलाटीकडील झालेली वारसाची नोंद म्हणजेच मंजुरी.
  • अपघाताचा स्वरूपानुसार विहित केलेली सर्व कागदपत्रे.
  • विमा संरक्षणामध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण बाबी

सर्पदंश किंवा विंचू दंश, रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे झालेली विषबाधा. विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, जनावरांच्या चावण्यामुळे झालेला अपघात, अन्य कोणतेही अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, नक्षलवाद्यांकडून झालेला, अपघात दंगल इत्यादी सर्व बाबींचा समावेश या विमा योजने अंतर्गत करण्यात आला आहे.

(Farmers Insurance Scheme) या विमा संरक्षणामध्ये अंतर्गत समाविष्ट नसलेल्या बाबी

नैसर्गिक मृत्यू, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्ह्याच्या उद्देशाने केलेले कायद्याचे उल्लंघन, आमली पदार्थाचे सेवनामुळे झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तश्राव, युद्ध जवळच्या लाभार्थी झालेला घात, बाळंतपणातील अपघात, मोटार शर्यतीतील अपघात संन्यातील नोकरी, विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व या बाबींचा या योजनेअंतर्गत समाविष्ट होत नाही.

वारसदार

(Farmers Insurance Scheme) या योजनेअंतर्गत वारसदार म्हणून कुटुंबातील प्रमुख व्यक्ती पत्नी किंवा पती, शेतकऱ्याची आई, शेतकऱ्याची नातवंडे, शेतकऱ्याची मुलगी, शेतकऱ्यांची मुले यापैकी कोणीही वारसदार म्हणून विम्याची रक्कम दिली जाते.

याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी शेतकरी किंवा वारसदाराने तलाठ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवायची आहे. जिल्हा कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊन शासनाची विमा सल्लागार यांच्या विभागीय कार्यालयाकडे हा प्रस्ताव पुढे पाठवतात.

विमा सल्लागार या कार्यालयाकडून प्राथमिक छाननी करून विमा कंपनीकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पुढे पाठवला जातो. अशा रीतीने विमा प्रस्ताव सादर करून त्याची पूर्ण छाननी व्यवस्थित करून नंतर या विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम शेतकऱ्याच्या वारसदारास प्रदान करण्यात येते.

आणखी काही योजना

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

इंदिरा आवास योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes