शेती उद्योग | Farming business in Marathi

शेती उद्योग | Farming business in Marathi

Farming business हा एक अतिशय चांगला आणि फायदेशीर उद्योग आहे. ह्यामध्ये बऱ्याच प्रकारचे पीक घेऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे शेती करता येते. शेतीमधील तंत्रज्ञान आणि विविध सुविधा आज उपलब्ध असल्यामुळे विविध प्रकारची शेती करणे सोपे झाले आहे.

Farming

विविध पिके घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारची शेती करू शकतो. शेतीबरोबर तुम्ही अजून जोडउद्योग करून सुद्धा आपण चांगला उद्योग करू शकतो. शेतीबरोबर अजून जोडउद्योग करण्यासाठी सुद्धा बऱ्याच प्रकारचा गोष्टी करता येण्यासारख्या आहेत.

सर्वात फायदेशीर शेती | Farming is most profitable

बरीच प्रकारची पिके घेऊन आपण चांगल्या प्रकारची शेती करू शकता. त्यासाठी तुम्हाला जसे कि धान्ये ज्यामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, मका, बाजरी, नाचणी, डाळी ह्यासारखी पिके तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला तुम्ही तुमच्या जमिनीचे परीक्षण करून घेऊन त्या जमिनीत कोणते पीक येईल ते पीक घेऊन तुमची शेती करू शकता.

तुम्हाला जर दुसरे कुठले चांगले पीक घ्यायचे असेल तर तुम्ही त्या मातीच्या परीक्षणाद्वारे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या पिकासाठी कोणकोणत्या खतांची आणि विविध गोष्टींची गरज लागेल हे पाहून तुम्ही त्याप्रमाणे पीक निवडू शकता. तुम्हाला जर फळांची शेती करायची असेल तर तुम्ही शेतामध्ये फळे सुद्धा पिकवू शकता.

त्याबरोबरच आजकाल बाजारात सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी काही वनस्पतीचा वापर केला जातो त्यांना सुद्धा बाजारात खूप मागणी आहे तुम्ही त्याप्रमाणेसुद्धा वनस्पती नवडून त्याची शेती करू शकता. 

Farming business बरोबर तुम्ही जर अजून कोणता जोडउद्योग करणार असाल तर तुम्ही प्रथम त्याची माहिती घेऊन त्यापासून सुरुवात करू शकता. जोडउद्योगामध्ये जसे कि मत्स्यपालन, कुकुटपालन, शेळी, मेंढी, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय खत तयार करणे,

मधमाशीपालन अशा अनेक प्रकारचे जोडउद्योग तुम्ही करू शकता. ह्या उद्योगामुळे तुम्हाला तुमच्या शेतीसाठी चांगले खत मिळते त्यामुळे तुमची जमीन चांगली कसदार राहते. आणि त्यामध्ये घेतलेले पीक चांगले येण्यास तुम्हाला मदत मिळते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिकांची आणि जोडउद्योगाची निवड करू शकता.

वेगाने वाढणारे जोडउद्योग | Side business with farming business to increase profit

कोंबडीपालन हा एक उत्तम आणि चांगल्या प्रकारे कमी जगात जर तुमची शेतीची जागा कमी असेल तर त्यामध्ये हा करता येऊ शकतो. आजकाल बाजारामध्ये चिकन आणि अंडी ह्यांना खूप मागणी आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वात फायदेशीर असा जोडउद्योग कोंबडीपालन हा होऊ शकतो. तुम्ही ह्याद्वारे भरपूर फायदा वाढवू शकता.

मत्स्यपालन – माशांची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मत्स्यपालन व्यवसायाद्वारे सुद्धा तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता. मत्स्यपालन हा तुम्ही छोटे तळे किंवा विहिरीमध्ये करू शकता. जर तुमच्या शेतीमध्ये छोटे तळे किंवा विहीर आहे त्यामध्ये तुम्ही मासे पाळू शकता.

मधमाशी पालन  – मधमाशी पालन करून तुम्ही मधाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता. आजकाल सर्व लोक आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक औषधे वापरू लागले आहेत.

मध हा एक अतिशय चांगला उपयोगी सगळ्या औषधाबरोबर किंवा आपण नुसता सुद्धा घेऊ शकतो त्याचे शरीरासाठी बरेच गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे जर तुम्ही मधमाशी पालन करून चांगल्या उत्तम दर्जेचा मध बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवला तर नक्कीच त्यापासून तुम्ही एक चांगला नफा मिळवू शकता.

सेंद्रिय खत – तुम्ही शेतीबरोबरच सेंद्रिय खत तयार करून त्याची विक्रीसुद्धा करू शकता. सेंद्रिय खताचा शेतीमध्ये वापर केल्यामुळे जमिणीचा कस टिकून ठेवण्यास मदत तर होतेच पण त्याबरोबर तुम्ही पीकचे उत्पन्नसुद्धा चांगले घेऊ शकता.

सेंद्रिय खताचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये खतासाठी ह्या खताचाच वापर करून चांगले पीक घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला सेंद्रिय खत विकत घेण्याची गरज भासत नाही.आणि चांगल्या उत्तम दर्जाचे खात विकून सुद्धा तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. 

अशा रीतीने जर योग्य त्या प्रकारे व्यवस्थित नियोजन करून Farming business हा व्यवसाय केला तर त्यामधून भरपूर नफा मिळवू शकतो.

सर्वात फायदेशीर शेती व्यवसाय | How to make farming business profitable

मशरूम शेती – मशरूम शेती हा एक अतिशय फायदेशीर पीक आहे. तुम्ही ह्याची शेती करून चांगला नफा कमवू शकता. मोठमोठ्या मॉलमध्ये आणि हॉटेल्समध्ये ह्याची खूप मागणी आहे. तुम्ही जर अशा प्रकारे मशरूमची शेती करून तो माल जर तुम्ही हॉटेल्स किंवा मॉल मध्ये देऊन त्यापासून चांगल्या प्रकारे नफा घेऊ शकता.

मायक्रोग्रीन्स – मायक्रोग्रीन्स हा एक अतिशय चांगला उत्पन्न आणि नफा मिळवून देणारे पीक आहे. तुम्ही मायक्रोग्रीन्स तयार करून सुद्धा चांगल्या प्रकारे ताज्या ताज्या मायक्रोग्रीन्सची विक्री करू शकता.

ड्रॅगन फ्रुट – सध्या बाजारामध्ये ड्रॅगन फ्रुट ला सुद्धा खूप मागणी आहे. हे पीक अतिशय सोप्या पद्धतीने करता येते. ह्यासाठी आपल्याला पिकांची जास्त काळजी सुद्धा घ्यावी लागत नाही. आणि हे पीक कमी पाण्यातसुद्धा चांगले येते. ह्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही बाजारात फळविक्री करून एक चांगला भरघोस नफा मिळवू शकता.

किवी फ्रुट – किवी हे फ्रुटची मागणी सुद्धा बाजारामध्ये खूप जास्त आहे. तुम्ही किवीची सुद्धा चांगल्या प्रकारे शेती करून भरघोस नफा मिळवू शकता.

फुलांची शेती – फुलांचे पीक सुद्धा तुम्ही शेतात घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता. सुगंधी ताज्या फुलांची तर मागणी असतेच पण त्याबरोबर त्याचा उपयोग काही सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी देखील केला जातो. तुम्ही त्यामुळे दोन्ही प्रकारे तुमचा व्यवसाय करू शकता आणि नफा कमवू शकता.

शेतीसाठी भाजीपाला अधिक फायदेशीर Vegetables are more profitable for farming business

Farming business साठी भाजीपाला ह्याचे पीकसुद्धा चांगल्या प्रकारे नफा मिळवून देणारे आहे. जसे कि शिमला मिर्च, ब्रोकोली, पालक, टोमॅटो, काकडी, बिट अशा प्रकारच्या भाज्या देखील तुम्ही शेतीसाठी निवडू शकता. भाज्यांना रोज बाजारामध्ये भरपूर मागणी असते आणि ह्याची गरज रोज प्रत्येक माणसाला असतेच त्यामुळे ह्यामधून सुद्धा भरपूर नफा तुम्ही कमवू शकता.

शेतीसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? | Requirements for Farming business

1. चांगली शेतजमीन जी तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही छोटीशी दुसऱ्याची जमीन शेतीसाठी घेऊ शकता.

2. शेतातील जमिनीचे चांगल्या तज्ज्ञांद्वारे परीक्षण करून घेणे.

3. जमिनीचा कस जर कमी झाला असेल तर त्यासाठी लागणाऱ्या खतांचे व्यवस्थितरित्या नियोजन करणे.

4. जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची पिके घेऊ शकाल ह्याविषयी माहिती घेणे.

५. शेतीसाठी बियांचा आणि खतांचा खर्चाचे व्यवस्थित नियोजन करणे.

६. शेतीसाठी लागणार खर्च आणि त्यातून अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल ह्याविषयी व्यवस्थित माहिती घेणे.

७. शेतीमध्ये दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः लक्ष देणे.

८. शेतीबरोबर जोडउद्योग करून खतासाठी आणि बियांसाठी लागणारा खर्च कमी करणे.

९. वेळच्या वेळी पाणी आणि शेतीची मशागत करणे.

अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या शेतीचे नियोजन केले तर तुम्हाला ह्यापासून चांगले उत्पन्न आणि नफा मिळू शकतो. तुम्हाला ह्यासाठी जातीने स्वतः लक्ष घालणे अतिशय महत्वाचे आहे.

शेतीमध्ये लोकांना फायदा का मिळत नाही. | Whya people fail in Farming business

काही लोकांना Farming business मध्ये काही करण्यामुळे नफा मिळत नाही. जसे कि अवकाळी कधीही पडणारा पाऊस. कधी पाऊस पडतो तर कधी कधी पाऊस पडतच नाही. किंवा कधी कधी अजून वेगळी करणे देखील असतात. जसे कि उद्योग म्हणून शेतीकडे बघितले जात नाही किंवा शेतीकडे लक्ष दिले जात नाही.

पैशाच्या अभावी जमीसाठी लागणाऱ्या गोष्टींच्या कमतरतेमुळे पिकांचे नुकसान होते. खूप प्रयत्न करून सुद्धा जमिनीमध्ये पीक चांगले येत नाही. पण असे जरी असले तरी प्रत्येक गोष्टींमध्ये यश आणि अपयश ह्या दोन्ही बाजू असतातच. आपण प्रथम त्याची योग्य ती करणे जाणून घेतली पाहिजेत आणि त्याप्रमाणे पाऊले उचलली पाहिजेत.

तुम्ही शेतीबरोबर जोडउद्योग जर केला तर तुम्हाला त्यापासून तसे म्हंटले तर बराच फायदा होऊ शकेल. जरी शेतीमधून पीक निघाले नाही तर तुमचा जोडधंदा तुम्हाला ह्यामध्ये मदत करू शकतो. तसेच तुम्ही आजकाल सरकारची देखील मदत घेऊ शकता. शेती करणाऱ्यासाठी आजकाल वेगवेगलय सवलती आणि सोयीसुद्धा उपलब्ध आहेत. कधी कधी जरी तुम्हाला फायदा मिळत नसेल तरी तुम्ही जोडउद्योगाद्वारे तुमचा नफा वाढवू शकता.

वेगवेगळ्या प्रकारची शेती | Diifferent types of Farming business

1. शहरी शेती, म्हणजे शहरी भागात आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात शेतीचा सराव करणे.

2. फळे किंवा भाजीपाला शेती.

३. फुलांची शेती

४. औषधी वनस्पतीची शेती

५. सेंद्रिय खत निर्मिती.

६. नर्सरी.

७. शेत पीक शेती.

८. खतांचे वितरण.

अशा प्रकारे व्यवस्थित नियोजन करून तुम्ही छोटा Farming business सुद्धा करू शकता. आणि त्याबरोबर तुम्ही जोडउद्योगसुद्धा नवडून त्याद्वारे सुद्धा चांगले उत्पादन घेऊन चांगला नफा कमवू शकता.

छोटा स्नॅक सेंटरचा उद्योग | Snack Center business in Marathi

शिवणकाम उद्योग । Sewing business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin