गिरणी व्यवसाय । Flour mill business in Marathi

गिरणी व्यवसाय । Flour mill business in Marathi

आपल्याला जगण्यासाठी तीन मूलभूत घटकांची आवश्यकता असते. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा माणसाच्या जीवनासाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये अन्न ही सर्वात मोठी गरज आहे. कारण अन्न पोटात गेल्याशिवाय आपण जगू शकत नाही.

Flour-mill-business
Flour mill business

असे अन्न तयार करण्यासाठीं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे वापरून अन्न शिजवून खाण्यासाठी योग्य बनवले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने धान्याचा वापर करून आपण वेगवेगळी पिठे तयार भाकरी किंवा चपाती बनवली जाते. भाजी खाण्यासाठी ती भाजी चपाती किंवा भाकरी याबरोबर खाल्ली जाते.

तसेच अनेक विविध पदार्थ बनवण्यासाठी पिठाचा वापर तयार केला जातो. जेवण रुचकर आणि खाण्या योग्य बनवण्यासाठी आपण पिठे तयार करतो आणि त्यापासून पराठे, थालीपिठ, वडे, भाकरी, दशमी, चपाती, डोसे, इडली असे अनेक पदार्थ बनवतो.

अशी पिठे तयार करण्यासाठी आपल्याला चक्की जवळपास असेल तिथे जावून धान्ये बारीक करून घेतली जातात. अशीच गिरण तुम्ही देखील चालू करून पैसे कमवू शकता.

तर आज बोलणार आहोत की गिरणी व्यवसाय कशा रीतीने सुरू कराल. पिठे तयार करून विकणे किंवा पीठ तयार करून देणे अशा दोन्ही प्रकारे तुम्ही व्यवसाय करु शकता.

पूर्वी पीठ तयार करण्यासाठी दगडांची चक्की वापरली जायची. जसे की आपण पाहिले असेल घरामध्ये जाते असते. त्याचा वापर करून पूर्वी पीठ तयार केले जायचे. त्यानंतर जसे वीज निर्माण केली जावू लागली तसे इलेक्ट्रिक उपकरण तयार होवू लागले आणि गिरणी मधे देखील इलेक्ट्रिक मशीनचा वापर करून पीठ तयार करून देवू लागले. जात्याचा वापर करून पीठ तर बारीक व्हायचे पण त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागायचे.

अगदी थोडे जरी पीठ असेल तर त्यासाठी भरुपुर वेळ जायचा. आत्ता बाजारामध्ये घरगुती पीठ तयार करण्यासाठी मशीन आलेत पण त्याचा देखील तितकासा खास उपयोग होत नाही.

कारण खूप कमी प्रमाणात पीठ तयार होते आणि जेवढे बारीक आपल्याला हवे असते तेवढे बारीक देखील होत नाही. त्यामुळे शक्यतो बरेच लोक पीठ तयार करण्यासाठी नजीकच्या गिरणीमध्ये जावून घेवून येतात.

Flour mill business व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही अगदी सुरुवातीला मशीनवर चालणारी मोठी गिरणी विकत घेवून गिरणी व्यवसाय सुरू करू शकता.

Flour mill business सुरू करण्यासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता असते. त्या जागेमध्ये तुम्ही पट्ट्याची गिरणी लाऊन त्यावर पीठ तयार करून देवू शकता. शिवाय तुम्ही पीठ तयार करून ते पॅक करून देखील विकू शकता. शहरामध्ये शक्यतो बरेचजण चक्की मधून पीठ तयार करून आणण्याऐवजी ते पीठ पॅक घेणे पसंद करतात. गावामध्ये पिठे लागतील त्याप्रमाणे चक्की मधून तयार करून घेवून येतात.

गिरणी व्यवसाय कसा सुरू कराल । How you will start flour-mill-business

Flour mill business सुरू करण्यासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता आहे. त्यानंतर तुम्ही त्याजागेमध्ये मशीन लावू शकाल. एखादी तुम्हाला पिठाची मशीन घेवून त्या जागेमध्ये लावावी. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता ह्या व्यवसायामध्ये लागत नाही. त्यामुळे हा अगदी कमी खर्चामध्ये करता येणारा व्यवसाय आहे. तुमच्याकडे जागा जर असेल तर तिथेच तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

गिरणी व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा । Place required for flour-mill-business

Flour mill business साठी सर्वप्रथम जागा निवडणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमची स्वतःची जागा असेल तर उत्तम. नाहीतर तुम्ही रेंटने देखील जागा घेवू शकता. जागेची निवड तुम्ही करून त्याप्रमाणे तिथे Flour mill business सुरू करू शकता. जिथे लोकवस्ती आहे अशाच ठिकाणी जरी गिरणी व्यवसाय सुरू केला तरी उत्तमरीत्या चालू शकतो.

पिठाची आवश्यकता तर सर्वांनाच असते. त्यामुळे तुम्ही घरासमोर देखील Flour mill business व्यवसाय सुरू केला तरी चालू शकतो.

Flour mill business सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल । Investment required for flour mill business

flour-mill-business साठी देखील तुम्हाला थोडेफार भांडवल असणे आवश्यक आहे. Flour mill business मध्ये जरी इतर गोष्टी लागणार नसतील तरी बाकीचा खर्च जसे की मेंटेनन्स, वीजबिल ह्या गोष्टी देखील पहाव्या लागतात.

तुम्ही त्याप्रमाणें प्लॅनिंग करून तुमचे भांडवल जमा करू शकता. सर्वात जास्त मशीन विकत घेण्यासाठी आणि त्याच्या मेंटेनन्स साठी येतो. नवीन मशीन असेल तर तुम्हाला साधारण ५०००० रुपये आसपास खर्च येवू शकतो. पण जर तुम्ही जुनी मशीन घेणार असेल तर तुम्हाला थोडा कमी खर्च होईल. सुरुवातीला नवीन मशीनसाठी मेंटेनन्स कमी येवू शकतो.

Flour-mill-business प्लॅनिंग । planning required for flour mill business

कोणत्याही व्यवसायासाठी सुरू करण्याअगोदर त्याची व्यवस्थितरीत्या प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही प्रथम लागणाऱ्या सर्व गोष्टी पाहून आणि त्यासाठी किती खर्च येवू शकतो ते पहावे. शिवाय तुम्ही Flour mill business सुरू करण्यासाठी किती भांडवल वापरू शकता हेदेखील पडताळून पाहणे आवश्यक आहे. अशा रीतीने तुम्ही सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही योग्य रीतीने प्लॅन करून व्यवसाय सहजपणे सुरू करू शकता. शक्यतो करून जितंकी बचत करता येतो तितकी बचत करून व्यवसाय सुरू करू शकला तर तुम्ही व्यवसाय यशस्वीरीत्या करू शकता.

Flour-mill-business पॅकेजिंग । Packaging required for flour mill business

flour mill business तुम्ही सुरू केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पिठासाठी पॅकेजिंग देखील आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही टेट्रापॅक वापरून मटेरियल पॅक करू शकता. ह्यामध्ये तुम्ही अर्धा किलो, एक किलो, पाच किलो असे पॅक बनवू शकता. त्या पॅकिंग करून त्यावर तुम्ही तुमच्या ब्रँडचे नाव आणि लोगो देखील वापरू शकता. आणि असे पॅक तुम्ही दुकानामध्ये स्टॉलवर किंवा मॉलमध्ये देखील विकायला देवू शकता.

Flour-mill-business साठी लागणारे लायसेन्स आणि रजिस्ट्रेशन । license and registration required for flour-mill-business

कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हंटले की लायसेन्स आणि रजिस्ट्रेशन तर करावे लागणारच. Flour mill business साठी तुम्ही प्रथम GST रजिस्ट्रेशन करून घेवू शकता. छोटा व्यवसाय सुरू करणार असेल तर तुम्ही शॉप ॲक्ट घेवू शकता. शिवाय फूड लायसेन्स देखील आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही FSSAI हे लायसेन्स देखील आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय वाढवणार असेल तर तुम्ही तुमचा ब्रँड रजिस्टर करून घेवू शकता. शिवाय तुम्ही त्यासोबत तुमचे बँक करंट अकाऊंट देखील बनवून घेवू शकता. अशा रीतीने सर्व लायसेन्स आणि लागणारे रजिस्ट्रेशन पाहून घेऊन व्यवसायाची सुरुवात करू शकता.

Flour-mill-business साठी मार्केटिंग । Flour mill business marketing

flour-mill-business साठी मार्केटिंग तुम्ही छोटे बॅनर करून पब्लिसिटी करू शकता. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअँप फेसबुक ह्याचा वापर करून तुमच्या प्रॉडक्ट्स चे पॅकिंग चे चांगल्या रीतीने फोटो काढून ते पोस्ट करू शकता.

शिवाय तुम्ही ह्यासाठी तुमचा माल जर तुम्हाला शहरामध्ये विकायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन advertisement करून देखील सेल वाढवू शकता. वेगवेगळ्या मॉल, दुकाने, स्टॉल ज्याठिकाणी जावून तुम्ही प्रोडक्ट ची मार्केटीग करू शकता. ह्यासाठी तुम्ही एखादा सेल्समन ठेवून त्याच्याकडून सर्व काम करून घेवू शकता.

Flour mill business साठी लागणारे कर्मचारी । Flour mill business

तसे म्हंटले तर flour mill business साठी तुम्हाला कर्मचारी ठेवण्याची गरज नाही. पण जसे तुमचे कस्टमर वाढत जातील आणि तुम्हाला जर हा व्यवसाय अजून चांगल्या रीतीने मोठा करायचा असेल तर तुम्ही हुळूहळू कर्मचारी वाढवू शकता.

कर्मचारी प्रथम गिरणी चालवण्यासाठी त्यानंतर पॅकिंग साठी आणि त्यानंतर तुम्ही एखादा मार्केटिंग करण्यासाठीं एखादा सेल्समन देखील ठेवू शकता. अशा रीतीने योग्य ते प्लॅनिंग करून flour mill business तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून चांगल्या रीतीने पुढे जावू शकता.

जसे की आपण flour-mill-business विषयी सविस्तर माहिती घेतली. त्याप्रमाणे व्यवस्थित नियोजन करून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आणि तुम्ही त्या व्यवसायामध्ये नक्कीच यशस्वी करू शकता जर तुम्ही Flour mill business योग्य प्लॅनिंग करून केला असेल तर. त्यामुळे सर्व प्लॅन करा आणि आपल्या बजेतप्रमाने व्यवसाय सुरू करा.

मिठाई व्यवसाय । Sweet shop business in Marathi

लोणचे बिझनेस । Pickle business in Marathi

किराणा दुकान व्यवसाय । How to start a Grocery business in Marathi

द्राक्षे बाग किंवा मनुका व्यवसाय । Kishmish business in Marathi

Categories

1 thought on “गिरणी व्यवसाय । Flour mill business in Marathi”

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin