श्री गणपति स्तोत्रम् l श्री गणपती स्तोत्र l Ganapati Stotra marathi

श्री गणपती स्तोत्र / Ganapati Stotra marathi

Let’s start on an auspicious note..

।। नारद उवाच ।।

Narad Uwach.

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।

Pranamya Shirsa Devam Gauriputram Vinayakam.

भक्तावासं स्मरेत् नित्य आयुष्कामार्थसिद्धये ।।1।।

Bhaktavasam Smaret Nitya Ayushkamarthsiddhaye.

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं व्दितीयकम् ।।

Pratham Vakratundanch Ekadantam dwitiyakam.

तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवस्त्रं चतुर्थकम् ।।2।।

Trutiya Krishnapingaksham Gajavastram Chaturthakam

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।।

Lambodaram Pancham Ch Shastham Vikatmev Ch.

सप्तमं विघ्रराजेंद्र धुम्रवर्ण तथाष्टमम् ।।3।।

Saptamam Vighrarajendra Dhumravarna Tathashtamam.

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।।

Navamam Bhalchandram Ch Dasham Tu Vinayakam.

एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननम् ।।4।।

Ekadashan Ganapatim dwadasham Tu Gajananam.

व्दादशैतानि नामानि त्रिसंध्य यः पठेन्नरः ।।

dwadashaitani namani trisandhy yah pathennar.

न च विघ्रभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।5।।

N ch vlghnabhayam tasya sarvasiddhikaram prabho

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।।

Vidyarthi labhte Vidya dhanarthi labhte dhanam.

पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।

Putrarthi labhte Putr, Putrnmoksharthi labhte gatim.

जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।।

Japed Ganapati Stotram shadabhirmase falam labhet

संवत्सरेण सिद्धि च लभते नात्र संशयः ।।7।।

Sawatsaren siddhi ch labhte natra sanahayah

अष्ठ भ्यो ब्राह्मणेभ्यश्र लिखित्वा यः समर्पयेत् ।।

Astha Bhyo Brahmanebhyashra Likhtva Ya: Samarpayet.

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ।।8।।

Tasya Vidya Bhavetsarva Ganeshasya Prasadata:

।। इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रम् संपूर्णम् ।।

Iti Srinaradapurana Sankshatananam Naam Sri Ganapati Stotram Sampurnam.

Ganapati Stotra Image

Ganapati Stotra image
Ganapati Stotra image

Ganapati Stotra मराठीत अर्थ I Ganapati Stotra meaning in Marathi

नारद जी म्हणतात, गौरीपुत्र विनायकाला नमस्कार करतो आणि भक्तांसाठी इच्छा, आयु आणि अर्थ सिद्धी प्राप्तीसाठी गणेशाचे स्मरण करून हे स्तोत्र म्हणण्यास सुरुवात करत आहे.

गणपतीचे म्हणजेच गणेशाचे पहिले नाव वक्रतुंड, दुसरे नाव एकदंत, तिसरे नाव कृष्णपिंगाक्ष आणि चौथे नाव गजवक्र आहे.

गणपतीचे पाचवे नाव लंबोदर, सहावे विकट, सातवे नाव विघ्र राजेंद्र आणि आठवे धूम्रवर्ण आहे.

नववे नाव भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपती आणि बारावे गजानन आहे. गणपतीची बारा नावे देवासमोर म्हणेल त्याला कोणत्याही विघ्नाची भीती राहणार नाही आणि सर्व प्रकारच्या त्याच्या मनोकामना पूर्ण होतील.

जो विद्यार्थी असेल त्याला विद्या प्राप्त होईल. ज्याला धन हवे असेल त्याला धन प्राप्त होईल. ज्याला पुत्र हवा असेल त्याला पुत्र मिळेल आणि ज्याला मोक्ष हवा असेल त्याला मोक्ष मिळेल.

जो व्यक्ती गणपती स्तोत्राचा जप नियमित सहा महिने करेल त्याला अपेक्षित प्राप्ती होईल आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. जी व्यक्ती हा मंत्र पूर्ण लिहून लोकांच्या स्वाधीन करेल गणेशाच्या कृपेने त्याला सर्व विद्या प्राप्त होतील.

गणपती स्तोत्र जप I Ganapati Stotra Jap

Ganapati Stotra चा जप करण्यासाठी तुम्ही मंगळवार निवडावा. मंगळवार हा गणपतीचा. गणेशाचा वार असल्यामुळे या दिवशी तुम्ही हा जप करू शकता. पूर्व दिशेला तोंड करून पद्मासन किंवा मांडी घालून बसून एका पाटावर देवाच्या समोर हा जप करावा.

जप करताना पूर्णपत्रे डोळे बंद करून सर्व लक्ष गणेश मूर्ती कडे ठेवावे. मनामध्ये कोणतेही विचार आणू नयेत आणि Ganapati Stotra व्यवस्थित स्वच्छ शब्द वापरून म्हणावे. हा जप तुम्ही निरंतर केला तर याचे तुम्हाला चांगलेच लाभ होतील. गणपती यांना प्रथम पूज्य देव मानले जाते, जो कोणी गणपतीची पूजा करतो त्यांना चांगले फळ मिळते.

तुम्ही गणेश चतुर्थी, अंगारकी संकष्टी, संकष्टी चतुर्थी या दिवशी देखील Ganapati Stotra म्हणू शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे स्तोत्र म्हणले तरी चालते. ह्या स्तोत्रांमधे गणपतीची नावे दिले आहेत. जी की गणपतीने वेगवेगळी रूपे घेतली आहेत त्याप्रमाणे ती नावे दिलेली आहेत.

तुम्ही हा जप एकवीस वेळा एकशे एक वेळा किंवा अकरा वेळा करू शकता. मोजण्यासाठी तुम्ही मोत्यांचे मनी केव्हा रुद्राक्ष माळा घेऊन जप करू शकता. जप करायचा असेल तर तुम्ही 501 वेळा देखील हा मंत्र म्हटला तरी चालू शकतो.

गणेश स्तोत्राचा जप कसा करावा?

देवासमोर पूर्वेला तोंड करून पाटावर मांडी घालून किंवा पद्मासन मध्ये बसून हा जप करावा.

गणेशाचा शक्तिशाली मंत्र कोणता आहे?

गणेश स्तोत्र हादेखील गणेशाचा शक्तिशाली मंत्र आहे. त्याच्यामध्ये गणेशाची बारा नावे दिले आहेत. तुम्ही हे स्तोत्र जरी रोज म्हटले तरी त्याचे लाभ तुम्हाला नक्की मिळतील.

संकट नाशन गणपती स्तोत्राचा अर्थ काय आहे?

संकटनाशन म्हणजे सर्व संकटापासून मुक्त करणारे गणपती स्तोत्र.

गणेश स्तोत्राचा जप किती वेळा करावा?

5, 7, 11, 21, 101 किंवा 501 वेळा गणेश स्तोत्राचा जप करावा.

गणेश स्तोत्रम कोणी लिहिले?

गणपती स्तोत्र नारद पुराणात सांगितले आहे आणि हे स्तोत्र नारद मुनींनी लिहिले आहे.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?