गिफ्ट गैलरी व्यवसाय । Gift shop business in Marathi

गिफ्ट गैलरी व्यवसाय । Gift shop business in Marathi

सणासुदीला आपल्याकडे एकमेकांना गिफ्ट देण्याची पद्धत आहे. शिवाय कुणाचा बर्थडे असेल त्यावेळी देखील सर्वांना आपण गिफ्ट देतो. अशा प्रकारे आपल्याकडे वर्षभर काही ना काही सण वाढदिवस लग्न आणि इतर काही कार्यक्रम असतात ज्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला काही ना काही एकमेकांना गिफ्ट द्यायचे असते.

Gift shop business
Gift shop business

अशाच गिफ्ट वस्तूंचे आपण जर दुकान टाकले तर अशा रीतीने हे दुकान चांगल्या प्रकारे चालू शकते. म्हणून आपण कोणताही व्यवसाय जर करण्याचे इच्छुक असता तर तुमच्यासाठी गिफ्ट शॉप किंवा गिफ्ट गॅलरी काढून चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता.

लग्नसराई सुरू झाली की लग्नसराईमध्ये सर्वांना गिफ्ट देण्यासाठी काहीना काही खरेदी करावे लागते. असे गिफ्ट शोधण्यासाठी गिफ्ट शॉप मध्ये लोक जाऊन काहीतरी खरेदी करतात आणि लग्नासाठी नवरदेवाला वा नवरीला गिफ्ट देतात.

गिफ्टमध्ये काही असू शकते पण सर्वांना युनिक असे गिफ्ट हवे असते. जे लोकांना पसंत पडेल आणि लोक ते स्वीकारतील अशा प्रकारचे जर तुम्ही गिफ्ट दिले तर गिफ्ट स्वीकारले जाते. तर चला पाहूया की तुम्ही गिफ्ट शॉप हा बिजनेस कशा रीतीने सुरू करू शकाल. सर्वप्रथम मार्केटमध्ये आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी गिफ्ट घ्यावे लागते हे पहिले पाहून घ्यावे लागेल.

लग्नामध्ये शक्यतो करून बऱ्याच प्रकारच्या गिफ्ट लागतात. यामध्ये गिफ्ट देताना जे लग्न करणारे मंडळी आहेत ते देखील देतात आणि ज्यांना लग्नासाठी बोलवले आहे ते देखील गिफ्ट देतात. त्यामुळे अशा ठिकाणी भरपूर गिफ्टची गरज असते तुम्ही जर Gift shop business सुरु केला तर. अशा प्रकारचे गिफ्ट ठेवल्यानंतर तुमचा लग्न सराईच्या काळामध्ये भरपूर बिझनेस होऊ शकतो.

शिवाय नेहमी येणारे बर्थडे सेलिब्रेशन साठी देखील गिफ्टची गरज असते. कुणाचा ना कुणाचा प्रत्येक महिन्याला बर्थडे असतोच त्यामुळे बर्थडे साठी कोणी जाणार असेल तर त्याला गिफ्ट घेऊन जावे लागते.

अगदी लहानपणापासून ते मोठ्या वडीलधाऱ्या माणसांपर्यंत आजकाल आपल्याकडे बर्थडे सेलिब्रेशन केले जाते. अशावेळी ज्याचा कुणाचा बर्थडे असेल त्याच्या वयानुसार त्याला योग्य ते गिफ्ट बर्थडे दिवशी दिले जाते.

समजा आपल्या घरात पाच माणसे असतील तर त्या पाच माणसांमध्ये प्रत्येकाचा कधी ना कधी बर्थडे असतो. असे जर तुम्ही शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहत असाल तर तुमच्या गावाच्या किंवा शहराच्या आसपास जेवढे लोक असतील त्या लोकांचा बर्थडे कधी ना कधी असतोच आणि हे बर्थडे सेलिब्रेशन केले जाते त्यावेळी प्रत्येक जण चांगले गिफ्ट विकत घेते.

आपल्याकडे लग्नसराई आणि बर्थडे सेलिब्रेशन होत असते. तसेच आपल्याकडे बरेच सण साजरे केले जातात. अशा सणा दिवशी देखील गिफ्ट देण्याची आपल्याकडे पद्धत आहे.

त्यामुळे वर्षभर आपल्याकडे काही ना काही एकमेकांना गिफ्ट दिले जाते. त्यामुळे हा Gift shop business तुमच्यासाठी एक चांगला व्यवसाय ठरू शकतो आणि तुम्हाला चांगल्या रीतीने इनकम देऊ शकतो.

गिफ्ट शॉप बिझनेस सुरू करण्याआधी काही महत्वपूर्ण स्टेप्स । What are the important steps to start a gift shop business?

गिफ्ट शॉप सुरू करण्याआधी सर्वप्रथम तुम्ही Gift shop business सुरू करण्यासाठी किती बजेट ठेवले आहे ते बजेट पाहावे त्याप्रमाणे पुढचे प्लॅनिंग करावे.

बजेट झाल्यानंतर तुम्हाला प्लॅनिंग मध्ये गिफ्ट शॉप सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे सर्व एका ठिकाणी लिहून घेऊन त्याप्रमाणे सर्व गोष्टीचा रिसर्च करणे आवश्यक आहे.

याच्यानंतर तुम्हाला त्या बजेटमध्ये गिफ्ट ओपन करता येईल का आणि किती साईज मध्ये गिफ्ट ओपन करू शकता आणि कुठे सुरू करू शकता हे पाहणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला चांगल्या जागेची निवड करावी लागेल.

तुम्ही जागेची निवड केली आहे किंवा ज्या जागेमध्ये शॉप उभा करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कस्टमर मिळणार आहे का आणि तुमचा बिजनेस होणार आहे का हे देखील पडताळणे आवश्यक आहे.

याच्यानंतर तुम्हाला जे सामान खरेदी करायचे आहे त्यासाठी तुम्हाला होलसेल विक्रेता शोधणे आवश्यक आहे जो होलसेल विक्रेता तुम्हाला नियमितपणे चांगल्या आणि योग्य दरामध्ये गिफ्ट होलसेल मध्ये देईल असा होलसेलर शोधून कायम तुम्ही त्याच्याकडून मटेरियल घेऊ शकाल आणि बजेटमध्ये मिळेल हे पाहणे गरजेचे आहे.

या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर तुम्हाला जे गिफ्ट तुम्ही विकायला ठेवणार आहात त्यासाठी दुकान डेकोरेट करणे गरजेचे आह दुकानांमध्ये वस्तू लोकांना दिसतील आणि लोक त्याचवेळी ते खरेदी करतील. त्यामुळे तुम्ही जे गिफ्ट ठेवणार आहात ते सगळे तुम्ही लोकांना दिसतील असे ठेवावे. जेणेकरून लोक बघितल्यानंतर लगेचच गिफ्ट खरेदी करण्यास तयार होतील आणि अशाप्रकारे तुमचा व्यवसाय सुरू होईल.

गिफ्ट शॉप सुरू करण्यासाठी जागेची निवड । Choosing a place to start a gift shop

तुमची जर स्वतःची जागा असेल तर तुम्ही त्या जागेत देखील ओपन करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला त्या जागेमध्ये लोकांची रहदारी आहे का आणि ग्राहक तुमच्या दुकानांमध्ये येतील का हे पाहणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे ग्राहकच नसतील तर तुमचा व्यवसाय कसा होईल त्यामुळे तुम्ही जी जागा निवडणार आहात त्या जागेवर लोकांची रहदारी असणे गरजेचे आहे.

तुम्ही Gift shop business सुरु करण्यासाठी रेंट ने देखील जागा घेऊ शकता किंवा विकत देखील घेऊ शकता. तुम्ही तुमच्या बजेटनुसार जागेची निवड करून आणि योग्य त्या ठिकाणी गिफ्ट शॉप साठी जागा घेऊन तुम्ही गिफ्ट बिझनेस सुरू करू शकाल.

गिफ्ट आयटेम ची योग्य ती निवड । Right selection of gift items

गिफ्ट आयटेम योग्य ते दुकानात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही जे गिफ्ट ठेवणार आहेत ते गिफ्ट लोक खरेदी करतील का हे देखील पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी गिफ्ट अशा प्रकारचे ठेवावे जे की सणासुदीला बर्थडेला आणि इतर फंक्शन साठी लोक लगेचच खरेदी करतील.

गिफ्ट दुकानात घेताना गिफ्ट आकर्षक असावे. जे लोकांना आकर्षित करेल आणि लोक बघता क्षणी गिफ्ट घेतील. अशा प्रकारचे गिफ्ट तुम्ही होलसेल मार्केट मधून खरेदी करावे आणि तुमच्या दुकानांमध्ये ठेवावे.

दुकानांमध्ये गिफ्टची मांडणी योग्य तऱ्हेने करावी. जे गिफ्ट एक सारखे आहे ते एकत्र ठेवावे आणि प्रत्येक ब्लॉक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट ठेवावे.

गिफ्टची मांडणी करताना सणासुदीला जे गिफ्ट लागतात ते गिफ्ट एकत्र ठेवावेत आणि जे गिफ्ट बर्थडे ला लागतात ते गिफ्ट एकत्र ठेवावेत.

फंक्शन साठी असणारे गिफ्ट वेगळ्या ठिकाणी ठेवावेत आणि लग्न सरायीसाठी लागणारे गिफ्ट एका ठिकाणी ठेवावे. त्यामुळे बघताक्षणी लोकांना नक्की कोणत्या प्रकारचे गिफ्ट हवे आहे ते विचारून त्याप्रमाणे त्यांना गिफ्ट लगेचच बघता येईल आणि त्यापैकी कोणते गिफ्ट खरेदी करता करायचे आहे ते त्यांना लगेच समजू शकते.

गिफ्ट शॉपसाठी लागणारे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन । License and registration required for gift shop

सर्वप्रथम शॉप ॲक्ट काढून घ्यावे. त्याच्यानंतर जीएसटी नंबर रजिस्टर करून घ्यावा आणि Gift shop business शॉपसाठी तुम्ही जर ब्रॅण्डेड नाव देणार असाल तर रजिस्टर करून घ्यावे. इतर कोणकोणत्या लायसन्स आणि रजिस्ट्रेशन ची आवश्यकता पडू शकते हे तुम्ही नजीकच्या सरकारी कार्यालय मध्ये जाऊन चौकशी करून त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार करून तुमचा बिजनेस सुरू करू शकता.

गिफ्ट शॉप बिझनेस साठी मार्केटिंग । Marketing for Gift Shop Business

Gift shop business सुरू केल्यानंतर तुम्ही त्यासाठी मार्केटिंग करून तुमचा बिजनेस अधिक अधिक वाढवू शकता मार्केटिंग तुम्ही व्हाट्सअप द्वारे ग्रुप तयार करून लोकांना वेगवेगळ्या गिफ्ट आयटमचे फोटो पाठवून आणि त्याचा प्राईस पाठवून देखील तुम्ही तुमचे गिफ्ट विकू शकता शिवाय तुम्ही फेसबुकला तुमचे स्वतःचे एक पेज तयार करून फेसबुक द्वारे देखील तुमच्या गिफ्ट आयटमची मार्केटिंग करू शकता.

ऑफलाइन मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर तयार करून तुमच्या नजीकच्या ठिकाणी दुकानासमोर लावून तुमचा Gift shop business चा प्रचार करू शकता.

ज्यावेळी कोणाला गिफ्ट खरेदी करायचे असतील त्यावेळी लोक हे बॅनर पाहून तुमच्याकडे खरेदी करण्यासाठी येतील. शिवाय तुम्ही नजीकच्या ओळखीच्या दुकानदारांना देखील तुमच्या गिफ्ट शॉप बिझनेस बद्दल आणि दुकानाबद्दल सांगून त्यांच्याद्वारे देखील तुम्ही कस्टमर वाढवू शकता.

तुमच्या मित्रांना नातेवाईकांना देखील त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देण्यासाठी प्रवृत्त करू शकता आणि त्याच्या द्वारे देखील तुमच्या Gift shop business चा प्रसार अधिक अधिक होऊ शकतो.

अशा प्रकारे तुम्ही Gift shop business जर करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुमच्यासाठी हा व्यवसाय एक चांगला इन्कम करून देणारा व्यवसाय आहे आणि तुम्ही तो शहरामध्ये असाल किंवा गावामध्ये असाल तुम्ही तो कुठेही करू शकता. शिवाय तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही गिफ्टस् ठेवून त्याप्रमाणे हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमच्याकडे कोणी गिफ्टस्त यार करत असेल तर तुमच्यासाठी Gift shop business हा एक उत्तम बिझनेस होऊ शकतो.

अन्य वाचा –

आईसक्रीम बनवण्याचा व्यवसाय | Ice-cream making business in Marathi

पर्स तयार करण्याचा व्यवसाय | Purse making business in Marathi

कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय । Coffee Shop outlet business in Marathi

ब्युटी पार्लर व्यवसाय | Beauty parlor business in Marathi

इडली सेंटर एक चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय | Idli-dosa business in marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee