केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Hair growth tips

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय । Hair growth tips

केस वाढवण्यासाठी (Hair growth tips) घरगुती उपाय आहेत की जे तुम्ही कसे सहजरीत्या घरच्या घरी मिळणाऱ्या गोष्टींपासून केसांची निघा चांगली राखुन केस वाढवण्यासाठी काही हेअर पॅकचा उपयोग करून केस चांगले ठेवून केस गळती थांबवू शकता.

Hair growth tips
Hair growth tips

सर्वजणांचे केस गळण्याचे प्रमाण वाढत आहे. ही केस गळती दिवसेंदिवस वाढत आहे, कारण शहरांमध्ये होत असलेले प्रदूषण, खाण्यामध्ये अनियमितता, केसांची निघा न राखणे या सर्व गोष्टी केस गळणे वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे नियमितपणे केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आज आपण पाहणार आहोत असे इन्ग्रेडियंट जे तुम्हाला घरच्या घरी सहजरीत्या उपलब्ध होवू शकतात. आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस सुंदर आणि दाट ठेवू शकता. सर्वप्रथम आपण केस गळणे थांबवण्यासाठी केसांची काळजी (Hair growth tips) कोणकोणती घेता येईल ते पाहू.

केस नियमित स्वच्छ ठेवणे

केसांची निघा राखण्यासाठी केस नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा किंवा एक वेळा केस स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही शिकेकाईचा वापर करून देखील केस धुवू शकता. केसांना स्वच्छ धुण्यासाठी mild shampoo चा वापर करू शकता किंवा जमल्यास शिकेकाईने केस धुवून स्वच्छ केले तरी चालतील.

केसांना तेलाने मसाज करणे

केस जसे स्वच्छ करणे आवश्यक आहे, तसे केसांना तेलाने मसाज करणे देखील आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कोमट खोबरेल तेलाने केसांचा मसाज करु शकता. आवळा तेलाने किंवा बदाम तेलाने मसाज केला तरी केसांना आवश्यक असलेले पोषक्तात्वे मिळतात आणि केस गळणे थांबण्यास मदत होते.

बाहेर जाताना केस स्कार्फने बांधणे

केस प्रदूषणामुळे जास्त खराब होतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही बाहेर जात आहात त्यावेळी तुम्ही केस स्कार्फ ने बांधून बाहेर पडणे जास्त योग्य आहे. केसमध्ये धुळीतील कण चिकटल्याने केस खराब होतात. शिवाय split ends वाढतात. त्यामुळे केस वाढ खुंटते.

केसांना घरगुती हेअर मास्क वापरणे

हेअर मास्क वापरून केसांची काळजी घेणे जास्त योग्य आहे. ह्यामुळे केसांना सदैव पोषण मिळते. शिवाय केस वाढीसाठी मदत होते. केसांची नियमित काळजी घेतल्याने केस निरोगी राहतात व त्यामुळे केसांचे होणारे प्रॉब्लेम्स हळूहळू कमी व्हायला मदत मिळते.

आवळा हा केसांसाठी अत्यंत गुणकारी असा पदार्थ आहे. आवळा केसमध्ये लावून ठेवला तर तुमच्या केसांचे पोषण होते व त्यामुळे केस वाढीसाठी मदत होते. आवळा वापरून तुम्ही हेअर मास्क तयार करू शकता. आवळा पावडर तयार करून त्याची पेस्ट जरी केसांना केस धुण्याअगोदर लावून ठेवली तरी चालू शकते.

घरच्या घरी आवळा तेल देखील तुम्हाला बनवता येते. तुम्ही डबल बॉयलर पद्धतीने आवळा तेल बनवू शकता. किंवा आवळा पावडर तेलामध्ये मिक्स करून ते मिश्रण रात्री झोपतात केसांना लावून ठेवू शकता. यामुळे तुम्हाला छान झोप देखील लागेल व केस देखील चांगले होतील.

अलोवेरा जेल वापरणे

केसांना अलोवेरा जेल ने मसाज केला तरी केसांना खूप फायदा होतो. केसांचे पोषण तर होतेच शिवाय केस मऊ आणि केसांची चकाकी वाढते. केस वाढीसाठी देखील अलोवेरा जेल चा उपयोग चांगला होतो. काही जणांना केसांसाठी अलोवेरा जेल सुट होत नाही. त्यामुळे अगोदर पॅच टेस्ट करून घेवून नंतरच अलोवेरा जेल चा वापर केसांना करावा.

अशा अनेक प्रकारे तुम्ही केसांवर घरगुती उपाय करून तुमचे केस वाढण्यासाठी मदत होईल. अगदी आठवड्यातून एकदा तरी हे उपाय करून पाहिले तरी तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.

आणखी वाचा

एलोवेरा चे अनेक फायदे l Aloevera Benefits in Marathi

आहारामध्ये या 7 बिया खाण्याचे फायदे l Biya khanyache Fayde

सुटलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय l Sutlele Pot Kami Karnyasathi Gharghuti Upay

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity