चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय l Home Remedies for Beautiful Face

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय l Home Remedies for Beautiful Face

आपला चेहरा सुंदर आणि तेजस्वी दिसण्यासाठी आपल्याला घरगुती उपाय करता येतात. आजच्या लेखांमध्ये आपण चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा उजळण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Beautiful Face) काय काय करता येतील याविषयी माहिती घेणार आहोत.

Home Remedies for Beautiful Face
Home Remedies for Beautiful Face

आपण सर्वजण नेहमी सर्वप्रथम आरशामध्ये चेहरा आपला व्यवस्थित आणि सुंदर आहे का हे पाहतो. चेहऱ्यावर थोडे जरी डाग आले किंवा पिंपल आले की आपण टेन्शनमध्ये येतो आणि यासाठी बाजारामध्ये असलेल्या विविध क्रीम आणून त्या चेहऱ्यावर वापरून ते पिंपल किंवा डाग घालवण्याचा प्रयत्न करतो.

त्याच्या उलटे अशा क्रीम वापरल्यामुळे आपला चेहरा जास्तच विद्रूप दिसायला लागतो. हे टाळण्यासाठी आपण घरगुती उपाय जरी केले तरी आपला चेहरा सुंदर आणि उठावदार दिसण्यास मदत होते. अगदी साधे साधे घरगुती उपाय जरी केले तरी आपल्याला चेहऱ्यामध्ये एक दोन आठवड्यामध्ये चांगलाच बदल घडून दिसेल.

पण आपल्याला एवढी घाई लागलेली असते की आपला चेहरा लगेच सुंदर दिसावा यासाठी आपण आपल्या चेहऱ्यावर केमिकलचा वापर करतो आणि त्याचा उलट परिणाम काही दिवसांनी चेहरा आपला नुसतेच आणि दिसतेच नुसतेच दिसू लागतो.

चेहरा काळा पडण्याची कारणे

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की चेहरा आपला काळवंडला का जातो. चेहरा काळी पडण्याची काहीतरी कारणे असतात. त्याच्यामध्ये तुमचे खाणे पिणे, तुम्ही बाहेर जाताना चेहऱ्यावर केमिकल क्रीम वापरणे अशा आणि अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.

भरपूर पाणी पिणे हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा चेहरा जर तेजस्वी दिसायचा असेल तर तुमच्या शरीरातून टॉक्सिन बाहेर पडणेआवश्यक आहे. टॉक्सिन बाहेर पडण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

नियमितपणे सात ते आठ ग्लास गाणी पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावरील तुमच्या शरीरांमधून सर्व टॉक्सिन बाहेर फेकले जातात. आतून शरीराला पोषण मिळण्यासाठी पाण्याची हवेची आणि अन्नाची गरज असते. त्यामुळे भरपूर पाणी पिले की आपल्या शरीरातील सर्व घाण निघून जाते व त्याचा परिणाम आपल्या पूर्ण त्वचेवर दिसून येतो आणि त्वचा टवटवीत होण्यास मदत होते.

जर तुम्ही कमी पाणी पीत असाल, तर तुम्ही पाणी पिण्यामध्ये बदल करून नियमित थोडे थोडे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ बाहेर जाताना एक बॉटल भरून ठेवून थोड्या थोड्या वेळाने पाणी पिऊ शकता.

कधी कधी आपण बाहेर जाताना आपला चेहरा पूर्ण झाकून घेत नाही. चेहरा बाहेर जाताना नेहमी स्कार्फने गुंडाळला पाहिजे. आजकालचे वाढते प्रदूषण, ज्याच्यामुळे आपली स्किन खराब होत आहे प्रदूषण टाळण्यासाठी नेहमी चेहऱ्यावर स्कार्फ बांधणे आवश्यक आहे.

बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन लोशन चेहऱ्यावर लावून जावे त्याच्यामुळे तुमची त्वचा उन्हाच्या किंवा इतर गोष्टींपासून सुरक्षित राहील.

बाहेरून आल्यानंतर चेहरा नेहमी स्वच्छ धुवून स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावा. तुम्ही जर चेहरा बाहेरून आल्यानंतर धुत नसाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की बाहेरून आले की सर्वप्रथम चेहरा धुवून घेणे महत्त्वाचे आहे.

कोणत्याही क्रीम चेहऱ्यावर वापरणे टाळावे. कोणतीही क्रीम आणून लगेच ती चेहऱ्यावर वापरणे योग्य नाही. तिच क्रीम तुम्हाला सूट होईल की नाही हे सांगता येत नाही त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्ही यासाठी स्किन एक्सपर्ट कडे जाऊन त्यांनी दिलेली क्रीम वापरावी किंवा तुम्ही घरगुती उपाय करावेत. इतरांच्या सल्ल्यानुसार कोणतीही क्रीम चेहऱ्यावर लावू नये.

एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल फेस पॅक

मध आणि ओट्स वापरून केलेला फेस पॅक

काळी वर्तुळाची कारणे कोणती?

चमकदार त्वचा कशी मिळवायची?

चेहरा गोरा होण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Beautiful Face)

चेहरा उजळण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीचे विविध फेस पॅक बनवता येतात. त्या फेसपॅक चा वापर करून तुम्ही चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय म्हणून दररोज वापर केला तरी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल घडून दिसेल. आम्ही इतर लेखामध्ये काही फेसपॅक दिले आहेत त्यापैकी तुम्ही फेस पॅक वापरू शकाल.

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर बर्फ लावले तरी तुमचे स्किन एकदम प्लेन होऊन चेहरा उजळलेला दिसेल. त्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी करून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून ते जरी पाणी तुम्ही चेहऱ्यावर मधून अधून लावले तरी तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसून येईल.

बेसन पीठ दही आणि हळद यांचा एकत्रितपणे फेस पॅक भरून नियमित पर्यंत चेहऱ्यावर वापरावा याने देखील चेहरा उजळण्यास चांगलीच मदत होते. हे सर्व घरगुती उपाय अत्यंत सोपे आणि सर्वांना करता येण्याजोगे आहेत. Home Remedies for Beautiful Face या लेखांमध्ये दिलेली उपाय करून पहावे आणि आपल्याबद्दल आम्हास कळवावा.

तेलकट चेहरा उपाय

वारंवार तेलकट चेहरा होत असेल, तर तुम्ही नियमितपणे टिशू पेपर वापरून चेहऱ्यावर आलेले तेल पुसून काढणे गरजेचे आहे.

तेलकट त्वचेवर पिंपल वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तेलकट त्वचेला नियमितपणे स्वच्छ धुऊन आणि पुसून चेहरा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्याजवळ टिशू पेपर ठेवू शकता.

त्याच्यानंतर बाहेरून आला की नियमितपणे चेहरा स्वच्छ धुऊन काढणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही चांगली डाळीच्या पीठाने देखील तुम्ही चेहरा धुऊन काढू शकता.

कच्चा दूधाने देखील चेहरा स्वच्छ धुऊन निघतो, चेहऱ्यावर मुलतानी मातीचा वापर करावा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळेल.

चेहरा उजळण्यासाठी काय खावे

शरीरास आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे फळे आणि भाज्यांमध्ये असतात. त्यामुळे नियमितपणे तुम्ही फळ आणि भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.

खाण्यासाठी जंक फूड टाळावे. बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाणे किंवा स्टॉलवर तेलकट खाणे वर्ज्य करावे. घरामध्ये जे बनवलेले असेल ते ताज्या अन्न खावे व नियमितपणे फळे आणि भाज्या यांचा आहार घ्यावा.

तुमचा चेहरा टवटवीत दिसण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये अनावश्यक गोष्टी बाहेर पडणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्या यांच्या खाण्यामध्ये वापर केल्यामुळे शरीरातून अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या जातात व आपले शरीर निरोघी राहते. ज्याच्यामुळे आपली त्वचा देखील स्वच्छ आणि निरोगी होते.

Home Remedies for Beautiful Face या लेखामध्ये आम्ही बऱ्यापैकी तुमच्या चेहऱ्यावरील वाटणाऱ्या काळजीचे समाधान नक्कीच केले आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही नियमितपणे व्यवस्थित ठेवल्या तर तुम्ही तुमचा चेहरा नक्कीच उजळू शकाल. [Face Mask & Face Pack for Men & Women for Glowing Skin]

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity