चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय l Home remedies to lighten face

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय l Home remedies to lighten face

घरच्या घरी चेहरा उजळण्यासाठी (Home remedies to lighten face) आपल्याकडे भरपूर उपाय आहेत तरी देखील आपण बाहेरून केमिकल क्रीम आणून त्या चेहऱ्यावर वापरतो आणि नंतर चेहरा काळवंडला की मग नंतर आपण घरगुती उपाय काय आहेत हे पाहतो. तर आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणते घरगुती उपाय आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा उजळू शकाल.

Home remedies to lighten face
Home remedies to lighten face

आपल्या किचनमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत,ज्या तुमच्या चेहरा उजळण्यासाठी उपयोगी पडतात जसे की हळद.

हळदी एक चांगली औषधी वनस्पती आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर उजळपणा तर येतोच पण त्यासोबत तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि असणारे पिंपल देखील कमी होतात. तर आपण पाहूया Home remedies to lighten face ज्यामध्ये हळदी सोबत कोणकोणते फेस पॅक तयार करून तुम्ही तुमचा चेहरा उजळू शकाल.

मुलतानी माती आणि हळदीचा फेस पॅक

एक चमचा मुलतानी माती घ्या. त्या मुलतानी मध्ये अर्धा चमचा हळद टाकून दूध थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मिक्स करून सर्व एकजीव करा.

मिश्रण अगदी चेहऱ्यावर लावण्या सारखे झाले की हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता. सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे चेहऱ्यावर कोणताही फेसपॅक लावताना तो प्रथम थंड करून लावावा. जेणेकरून चेहऱ्यावर चांगली इफेक्ट लवकरात लवकर तुम्हाला जाणून दिसतील.

थोड्यावेळाने फ्रिज मधून हा फेस पॅक काढून चेहरा स्वच्छ धुऊन पुसून घेऊन त्याच्यावर हा फेस पॅक लावावा तुम्ही जरी हा फेसपॅक बर्फाचा ट्रेमध्ये ठेवून नंतर त्याचा दिवसभर वापर केला तरी चालू शकेल.

मुलतानी मातीमुळे चेहरा तुमचा एकदम स्वच्छ आणि नितळ होऊ लागतो चेहऱ्यावरील जी साचलेली धूळ आहे ती सर्व निघून जाते आणि तुमचे डेड सेल्स रिमूव करण्यात मुलतानी माती तुमची मदत करते.

ज्यामुळे तुमचा चेहरा अगदी स्वच्छ व सुंदर दिसू लागतो. हळदीमुळे तुमच्या चेहऱ्याचे तेज वाढण्यास मदत होते. हळद ही अँटिबायोटिक आणि अँटिसेप्टिक असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील बॅड बॅक्टेरिया रिमुव्ह करण्यात मदत करते आणि तुमचा चेहरा जर काळवंडला असेल तर तो उजळण्यासाठी मदत करते. अशा रीतीने तुम्ही हा जर फेसपॅक नियमितपणे वापरला तर तुमचा चेहरा थोड्या दिवसात चांगला उजळून निघेल.

दही आणि बेसन फेस पॅक

एक चमचा दही

एक चमचा बेसन आणि त्यासोबत थोडासा लिंबाचा रस

सर्व मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. मिक्स झालेले मिश्रण व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. थोड्या वेळाने थंड झालेले मिश्रण चेहरा स्वच्छ धुऊन 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.

चेहऱ्यावर तुम्ही या फेसपॅकने जर चांगला मसाज केला तर तुम्हाला ब्लिचिंगचे गुणधर्म दिसून येतील. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक पांढरा रंग येण्यास मदत होईल. दह्यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असल्यामुळे दही हे तुमच्या चेहऱ्याला ब्लीच करते आणि चेहरा गोरा करण्यासाठी मदत करते.

बेसन हे चेहरा उजळण्यासाठी आणि चेहऱ्यांना पोषण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे दही आणि बेसन हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर उजळण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकतो. त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकल्यामुळे तुम्हाला विटामिन सी मुळे चेहऱ्यावर एक चकाकीपणा दिसून येईल.

ज्यामुळे तुमचा चेहरा चमकू लागेल. तुम्हाला जर चेहऱ्यावर शाईन हवे असेल, तर तुम्ही लिंबाचा रस जरूर वापरावा. याचा तुम्हाला चांगलाच परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. पण लक्षात ठेवावे की तुम्ही कोणताही फेसपॅक वापरत असाल तर तुम्ही बाहेर जाताना चेहरा नेहमी झाकून जावे.

चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशनचा वापर करून नियमितपणे चेहरा बाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा. त्यामुळे चेहऱ्यावर धुळीचे कण येणार नाहीत व तुमचा चेहरा काळवंडला जाणार नाही. उन्हामुळे देखील चेहरा खूप काळवंडला जातो. ज्यामुळे चेहरा थोडासा काळपट दिसायला लागतो.

कॉफी फेस पॅक

एक चमचा कॉफी

एक चमचा दही आणि एक चमचा टोमॅटो चा रस

दही टोमॅटो आणि कॉफी एकत्र मिश्रण करून घ्यावी त्याच्यानंतर ही फ्रीजरमध्ये ठेवून द्यावी किंवा फ्रिजमध्ये ठेवावी थंड झाल्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा. पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर फेसपॅक तसाच ठेवून द्यावा.

फेस पॅक लावताना चेहऱ्यावर मसाज केला तर तुम्हाला चांगला इफेक्ट दिसून येईल कॉफीमुळे तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. कॉफीमध्ये काही पोषक तत्व असल्यामुळे ते तुमच्या चेहऱ्यास टवटवीत ठेवण्यास मदत करतील व चेहरा उजळण्यास तुम्हाला लवकर मदत होईल.

दह्यामुळे आणि टोमॅटो मुळे तुमच्या चेहऱ्याला विटामिन सी आणि ब्लिचिंगच्या गुणधर्मामुळे चेहरा आणखीनच उजळण्यास मदत होईल. फेस पॅक नियमितपणे लावला तर तुम्हाला याचे चांगले उपयोग दिसून येतील.

वरील दिलेले तीन फेस पॅक तुम्ही आठवड्यामध्ये तुमच्या सोयीनुसार वापरू शकता चांगला इफेक्ट दिसण्यासाठी तुम्ही अल्टरनेट दिवसांमध्ये हे फेस पॅक वापरावे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यासाठी चांगले पोषण तर होईलच शिवाय तुम्हाला इतर कोणत्याही क्रीम लावण्याची गरज भासणार नाही.

या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल देखील कमी होतील आणि जर काही काळे डाग किंवा चेहरा काळवंडला असेल तर तो कमी होण्यास देखील मदत होईल. हे घरगुती फेसपॅक असल्यामुळे याचा इफेक्ट तुम्हाला महिन्यात दोन महिन्यांमध्ये दिसून येईल. फक्त हे फेसपॅक तुम्हाला नियमित वापरण्याची गरज आहे तरच तुम्हाला याचा फायदा होईल.

फेसपॅक जोसे वापरतात तसे हे देखील महत्त्वाचे आहे की चेहरा तुम्ही नियमितपणे धुवून घेतला पाहिजे नियमितपणे चार वेळा तरी कमीत कमी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन काढावा बाहेरून आल्यानंतर सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून तो टॉवेलने पुसून घ्यावा.

बाहेर जाताना नियमितपणे संस्क्रीन लोशनचा वापर करावा आणि त्यासोबत चेहऱ्यावर स्कार्फ लावावा जेणेकरून बाहेरची धूळ चेहऱ्यावर येणार नाही.

चेहरा स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी व उजळण्यासाठी तुम्हाला चेहऱ्याची नियमितपणे काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही फेस पॅक देखील वापरू शकता शिवाय आणि त्यासोबत घरगुती उपाय जसे की चेहरा स्वच्छ धुणे मसाज करणे या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

तुमची त्वचा आणि चेहरा यांना पोषक घटक मिळण्यासाठी तुमचा आहार व्यवस्थित असणे आवश्यक आहे नियमितपणे आहारामध्ये फळे आणि भाज्या यांचा समावेश करणे तसेच डाळी कडधान्य याचा देखील वापर करावा खाण्यामध्ये बाहेरच्या गोष्टी टाळाव्या जंक फूड शक्यतो खाऊ नये.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियमितपणे तुम्ही जर तुमची काळजी घेतली तर तुमचा चेहरा या उपायाने नक्की उजळेल. [Home remedies to lighten face].

खोबरेल तेलाचा वापर आणि फायदे l Uses and Benefits of Coconut Oil

ग्रीन ज्यूस – वजन कमी करण्याचे रहस्य आणि चेहरा सुंदर l Green Juice – The Secret to Weight Loss and a Healthy Glow in Marathi

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय | Thick hair with 7 quick home remedies

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee