Profitable Idli-dosa business in marathi | इडली व्यवसाय

इडली सेंटर एक चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय | Idli-dosa business in marathi

आज आपण Idli-dosa business ह्या लेखामध्ये याविषयी माहिती घेणार ज्याद्वारे तुम्ही बिझनेस ची सुरुवात करण्यापासुन ते Income वाढवणे, Online maketing करणे सर्व जाणून घेऊ.

Idli business
Idli business

लोक बाहेरून दुसऱ्या ठिकाणावरून एखाद्या गावी कामानिमित्त ज्यावेळी येतात. तिथेच ते स्थायिक होतात तेव्हा त्यांच्या खाण्यासाठी किंवा जेवणासाठी त्यांना सतत बाहेरून विकत घ्यावे लागते.

अशा वेळी त्यांना बाहेर कुठे चांगले स्नॅक सेंटर किंवा चहा नाश्त्यापासून सर्व गोष्टी विकत घ्याव्या लागतात. अशा गोष्टी त्यांना हॉटेल्स किंवा स्नॅक सेन्टरमधून मिळून जातात.

त्यामुळे तुम्ही जर असेच स्नॅक सेंटर कोणत्याही प्रकारचे उभे केले तर त्याला सध्या खूप मागणी आहे. बरेच जण वेगवेगळे स्नॅक सेंटर उभे करतात जसे कि काही जण वडा पाव सेंटर, चहा-पोहे, समोसा, इडली-डोसा (Idli-dosa business) अशा बऱ्याच प्रकारचे स्नॅक सेंटर उभारतात आणि भरपूर नफा कमावतात.

तुम्ही जर असेच इडली आणि डोसा ह्यांचे स्नॅक सेंटर (Idli-dosa business) तुम्ही चालू केले तर तुम्हाला ह्यापासून देखील भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही फक्त इडली किंवा त्याबरोबर डोसा देखील ठेवू शकता.

आजकाल ह्या साऊथ इंडियन डिशला सर्वत्र खूप मागणी आहे. आणि बरेच लोक इडली आणि डोसा नाश्त्यासाठी खातात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा Idli-dosa business केला तर तुम्हाला नक्कीच ह्यापासून फायदा होऊ शकतो.

काही ठिकाणी तर इडली किंवा डोश्यासाठी खूप गर्दी होत असते. काही मोठे हॉटेल्सदेखील फक्त इडली आणि डोश्यासाठी खूप प्रसिद्ध असतात.

तुम्ही अशाच प्रकारचा तुमचा चांगला Idli-dosa business सेंटर उभारून खूप चांगला स्वतःचा व्यवसाय उभारू शकता.

तसेच इडली डोसा तयार करण्यासाठी तुम्ही कुणीतरी पारंगत व्यक्ती ठेवू शकता. किंवा आजकाल बऱ्याच महिलांना ह्या साऊथ इंडियन डिश चांगल्या बनवता येतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर घरच्या घरी सुद्धा काम करू शकता.

काही ठिकाणी छोटेसे स्टॉल देखील उभारून Idli-dosa business असे व्यवसाय चालू केले जातात. ज्यांच्याकडे मोठया गाडी किंवा टू-व्हिलर देखील असेल तर त्यावरसुद्धा स्वतःचा स्टाल लावून असा व्यवसाय चालू करतात.

More business –

ब्युटी पार्लर व्यवसाय | Beauty parlor business in Marathi

कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय । Coffee Shop outlet business in Marathi

शिवाय ह्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे डोसे देखील बनवून विकू शकता. जसे कि तुम्ही मसाला डोसा, प्लेन डोसा, उत्तप्पा असे अनेक प्रकार तुम्ही ह्यामध्ये करू शकता.

शिवाय इडली आणि डोसा करण्यासाठी तुम्हाला जास्त काही वेगळे साहित्य बनवावे लागत नाही. तुम्ही एकाच पिठापासून इडली आणि डोसा बनवू शकता.

तुम्हाला फक्त वेगवेगळे प्रकार करण्यासाठी इतर साहित्य जसे कि कोथिंबीर, कांदा, चीज, बटर अशा गोष्टी तुम्हाला विकत घ्याव्या लागतात ज्या तुम्ही आसपासच्या दुकानातून विकत घेऊ शकता. इडली किंवा डोसा ह्यासाठी लागणारे पीठ तुमही विकत किंवा घरीच बनवून ठेवू शकता.

अशा प्रकारे हा व्यवसाय तुम्ही तुमचे स्वतःचे घराजवळ स्टॉल लावून, एक स्नॅक सेंटर उभारून तुम्ही इडली आणि डोसा बनवण्याचा व्यवसाय (Idli-dosa business) चालू करू शकता.

व्यवसायासाठी लागणारी जागा । Place for your Idli-dosa business

तुम्ही छोटासा Idli-dosa business म्हणून चालू करणार असाल तर तुम्ही टू -व्हिलर किंवा तुमची दुसरी गाडी असेल तर तुम्ही तुमचे स्टॉल त्याच्यावर चालू करू शकता. तुम्ही जर फिरते स्टॉल चालू कराल तर तुम्हाला जेवढ्या जवळील भागामधले कस्टमर आहेत ते मिळून जातील आणि तुमचा नफा अजून वाढेल.

जर तुम्ही एका ठराविक जागेत तुमचे सेंटर किंवा स्टॉल उभारणार असाल तर तुम्ही स्वतःच्या घराजवळ स्वतःच्या जागेमध्ये तुमचे स्टॉल उभारू शकता. किंवा तुम्ही मोक्याच्या ठिकाणी तुमचे इडली-डोसा सेंटर (Idli-dosa business) चालू करू शकता.

तुम्ही दुकानासमोर देखील छोटेसे स्टॉल उभारू शकता. नाहीतर तुम्ही एखादे स्नॅक सेन्टरसाठी दुकान विकत किंवा रेन्टने घेऊन तिथे तुमचा Idli-dosa business चालू करू शकता.

ह्या व्यवसायामध्ये आणखीन नवीन काय करू शकता ? | What you can do new for this business?

तुम्ही हा Idli-dosa business चालू करणार असाल तर तुम्ही वेगवेगळ्या इडलीचे प्रकार बनवून विकू शकता. तुमच्याकडे चांगले पाककलेचे कौशल्य असेल तर ह्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आणून ते तुम्ही विकू शकता.

जर तुम्ही ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे इडली किंवा डोसा विकला तर तुम्ही नवीन काहीतरी देत आहेत म्हणून तुमच्याकडे ग्राहक लवकर आकर्षिला जाईल. पण जे काही रेसिपिज तयार कराल त्या चविष्ट आणि चांगल्या गुणवत्तेच्या असल्या पाहिजेत.

तुम्ही पुट्टी इडली, मोठी इडली असे बनवू शकता. किंवा तुम्ही चीज डोसा, चायनीज डोसा, शेजवान डोसा, मैसूर मसाला डोसा असे बरेच डोशाचे प्रकार बनवू शकता. उत्तप्प्यामध्ये तुम्ही कांदा उत्तप्पा, टोमॅटो उत्तप्पा, मसाला उत्तप्पा असे प्रकार बनवू शकता. तुम्ही तुमच्या पाककलेनुसार ह्यामध्ये बरेच प्रकार बनवू शकता.

इडली आणि डोसा ह्याबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांचे प्रकार देखील तुम्ही बनवून खायला देऊ शकता. सुरुवातीला तुम्ही ह्या टेस्टसाठी देऊन त्यांच्याकडून मत घेऊन तुम्ही अशा चटण्या सुद्धा खायला ठेवू शकता. संभारामध्ये देखील तुम्ही काही बदल करून देऊ शकता. त्याप्रमाणे प्रत्येक डिशसोबत ग्राहकांना खायला देऊ शकता.  

इडली आणि डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य । Material required for Idli and dosa business

तुम्ही इडली आणि डोसा बनवण्यासाठी तुम्ही घरगुती लागणारे जे साहित्य आहे ते तुम्ही ज्या दुकानातून घेता तिथून घेतले तरी चालू शकते. तुम्ही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य घेणार असाल तर तुम्ही त्यांच्याकडून होलसेल रेटमध्ये हे सर्व साहित्य घेऊ शकता.

ह्यासाठी मुख्यत्वेकरून तांदूळ, उडदाची डाळ, सांभार बनवण्यासाठी लागणारे साहित्य जसे कि सांभार मसाला, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, चटणीसाठी खोबरे, मिरची असे सर्व साहित्य असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला पीठ विकत घ्यायचे आहे तर तुम्ही त्यासाठी तुम्ही काही ठिकाणी तयार पीठ विकण्यासाठी ठेवले जाते तिथून तुम्ही पीठ घेऊन डोसा आणि इडली बनवून विकायला ठेवू शकता. आणि जर तुम्ही हे पीठ घरगुती तयार करू शकता तर तुम्ही हे घरातून तयार करून घेऊन त्याचा इडली आणि डोसा बनवून विकायला ठेवू शकता.   

इडली आणि डोसा बनवण्याची कृती । Procedure for Idli and Dosa

इडली आणि डोसा ह्याचे पीठ तयार करण्यासाठी तुम्हाला प्रथम तांदूळ आणि उडदाची डाळ वेगवेगळ्या पाण्यामध्ये एका भिजवून ठेवावी लागते थोड्या मेथ्या टाकून त्यामध्ये झाकण लावून हे पीठ तुम्ही सकाळी ५ तास चांगले भिजण्यासाठी ठेवू शकता.

त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून ते मिक्सरमधून काढून ते परत गरम ठिकाणी अंधारामध्ये झाकून ठेवावे म्हणजे हे चांगले फुगले जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या पिठामध्ये तुम्ही मीठ टाकून तुम्ही ह्याच्या इडली बनवू शकता.

पीठ थोडेसे पातळ करून त्यापासून तुम्ही डोसे तयार करू शकता. अशा रेसिपीज तुम्हाला सुद्धा येत असतील किंवा तुम्हाला जर येत नसतील तर तुम्ही ज्यांना कुणाला येते त्याच्याकडून शिकून घेऊ शकता.

तुम्ही ह्या रेसिपीज गुगल किंवा युट्युब वर पाहून देखील तुम्ही बनवू शकता. ह्याचे सर्व प्रमाण योग्य ते वापरून तुम्ही इडली आणि डोसे तयार करायला शिकू शकता. चटणी आणि सांभार ह्या रेसिपी देखील तुम्हाला युट्युब किंवा गुगल मध्ये मिळून जातील. ह्याचा तुम्ही सराव करून जास्त प्रमाणामध्ये कसे तयार करता येईल ह्याचे प्रमाण ठरवायला तुम्हाला मदत होईल. अशा प्रकारे तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने इडली आणि डोसा ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता.   

इडली आणि डोसा तयार करण्यासाठी मशीन । Machine required for Idli and Dosa center

तुम्ही मोठ्या प्रमाणात जर हा Idli-dosa business करणार असाल तर तुम्ही ह्यासाठी indiamart ह्या वेबसाईट वर जाऊन ह्याच्या किमती पाहू शकता. तसेच तुम्ही तुमच्या नजीकच्या होलसेल विक्रेत्याची माहिती देखील तुम्हाला इथून मिळेल. त्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता.

https://www.indiamart.com/proddetail/instant-idli-dosa-batter-machine-9807533948.html

तुम्हाला जर छोट्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कोणत्याही मशीन घ्यायची गरज नाही. तुम्ही ह्यासाठी फक्त इडली पात्र आणि  डोसा बनवण्यासाठी लागणार तवा विकत घेऊ शकता. जर असेल तर काही विकत घ्यायची गरज नाही. गॅस कनेक्शन तुम्ही एक्सट्रा घेऊ शकता. किंवा तुम्ही इलेक्ट्रिक शेगडी देखील वापरू शकता.  

इडली-डोसा सेण्टरसाठी लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन | License and Registration required for Idli and Dosa center

जी.एस.टी. रेजिस्ट्रेशन, फूड लायसन्स, शॉप ऍक्ट अशा गोष्टी तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी लागू शकतात. अजून आवश्यक माहिती तुम्ही सरकारी कार्यालयातून घेऊ शकता. किंवा तुम्ही जवळपास अकाउंटंट कडून घेऊ शकता. 

इडली-डोसा पॅकेजिंग | Idli Dosa Packaging

पॅकेजिंगसाठी तुम्ही इडली खाण्यासाठी पेपर डिश ठेवू शकता. आणि पार्सल देण्यासाठी तुम्ही पेपर बॅग्स ठेवू शकता. ह्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च करावा लागत नाही तुम्ही पेपर बॅग्स किंवा कंटेनर देखील पार्सलसाठी ठेवू शकता. चटणी आणि सांभारसाठी तुम्ही छोटे पेपर कप वापरू शकता. 

इडली-डोसा साठी किंमत कशी ठरवाल ? How to decide price for Idli-Dosa?

तुम्हाला इडली आणि डोसा तयार करण्यासाठी लागणारा खर्च काढून तुम्ही त्यामध्ये नफा ऍड करून तुम्ही किंमत ठरवू शकता. तसेच बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये सध्या काय किंमत आहे ते पाहून त्याप्रमाणे तुम्ही किंमत ठरवू शकता.

इडली-डोसा व्यवसायासाठी कारागीर/लोक  किती ठेवायचे ? | Staffs required for Idli-Dosa business

इडली-डोसा तयार करण्यासाठी एक आणि ते पॅकिंग करून देण्यासाठी किंवा खायला देण्यासाठी असे तुम्ही २ जण मदतीला ठेवू शकता. शक्य नसेल किंवा तुमच्या बजेटमध्ये नसेल तर तुम्ही सुरुवातीला तुमचे गिर्हाईक वाढेपर्यंत स्वतः देखील ह्यासाठी काम करू शकता.

इडली-डोसा व्यवसायासाठी लागणारी कॉस्ट किंवा इन्व्हेस्टमेंट | Cost and investment for Idli and Dosa business

तुम्हाला छोटा व्यवसाय करायचा असेल तर ह्यासाठी तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये देखील हा व्यवसाय चालू करू शकता. किंवा तुमचे बजेट जर जास्त असेल आणि तुम्ही मोठा व्यवसाय करण्याचा विचार करणार असाल तर तुम्ही तुमच्या इन्वेस्टमेंटप्रमाणे प्लॅन करून हा व्यवसाय चालू करू शकता.

ह्यासाठी तुम्हाला सर्व खर्च आणि साहित्य ह्याचा विचार करून तुमचा प्लॅन त्याप्रमाणे आखून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता.

इडली-डोसा व्यवसायासाठी मार्केटिंग कसे कराल? Marketing for Idli and Dosa business

मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही व्हाट्सअँप चा वापर करू शकता. किंवा बॅनर द्वारे तुम्ही जाहिरात करू शकता. तुम्ही छोटे छोटे पोस्टर लावून देखील तुमच्या व्यवसायाबद्दल लोकांना माहिती देऊ शकता.

तुम्हाला जर मोठ्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर तुम्ही कंपनी, हॉस्पिटल अशा ठिकाणी तुमच्या व्यवसायाची माहिती देऊ शकता. ऑनलाईन साठी तुम्ही तुमचा व्यवसाय गुगल वर रजिस्टर करून घेऊ शकता. किंवा युट्युब जाहिरातीद्वारे देखील तुमच्या व्यवसायाचा प्रसार तुम्ही करू शकता.

अशा प्रकारे व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही हा व्यवसाय चांगल्या रीतीने करू शकता. कुठलाही व्यवसाय असो त्याचे व्यवसाठीत प्लॅनिंग असणे महत्वाचे असते म्हणून तो नीट प्लॅन करू मग त्या व्यवसाय प्रारंभ करणे अत्यंत महत्वाचे ठरते.

तुम्हाला असेल जर आवड असा व्यवसाय करण्याची तर तुम्ही नक्कीच ह्यापासून भरपूर नफा मिळवाल. फक्त थोडीशी प्लॅनिंग, थोडीशी तुमची मेहनत, आणि लागणारी जबाबदारी जर तुम्ही व्यवस्थित पार पाडू शकाल तर तुम्ही नक्कीच कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकाल.

इडली व्यवसाय फायदेशीर आहे का?

होय इडली व्यवसाय (Idli-dosa business) फायदेशीर ठरू शकतो.

इडली डोसा मिक्सची किंमत किती आहे?

महाराष्ट्रात इडली डोसा मिक्सची किंमत ४० रुपये/किलो.

इडली डोसा पिठाचा मार्केट शेअर किती आहे?

बाजारातील हिस्सा सुमारे 10 ते 15% आहे.

ताज्या इडली पिठाची किंमत काय आहे?

ताजी इडली पीठ ४० रुपये/किलो.

कोणत्या राज्यात इडली सर्वाधिक लोकप्रिय आहे?

दक्षिण भारतात इडली सर्वाधिक लोकप्रिय आहे.

इडलीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

चेन्नई शहर इडलीसाठी प्रसिद्ध आहे.

Categories


Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin