योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे युट्युब चॅनेलसाठी महत्वाचे | Importance of choosing right subject or niche for YouTube Channel in Marathi

योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे युट्युब चॅनेलसाठी महत्वाचे | Importance of choosing right subject or niche for YouTube Channel in Marathi

योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे युट्युब चॅनेलसाठी महत्वाचे आहे त्यासाठी आपण आजच्या लेखामध्ये Importance of choosing right subject or niche for YouTube Channel किती आणि कसे महत्वाचे आहे त्याची विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला ह्या लेखामध्ये देत आहोत.

choosing right subject or niche for YouTube Channel
choosing right subject or niche for YouTube Channel

जसे आपण मागील लेखामध्ये पहिले कि तुम्ही युट्युब चॅनेल वर विडिओ अपलोड करून पैसे कमवू शकता. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत हे देखील आपण पहिले. ह्या लेखामध्ये आपण युट्युब चॅनेलसाठी विषय निवडणे किती महत्वाचे आहे हे पाहू. ज्या विषयाचे तुम्ही विडिओ बनवाल त्या विषयाबद्दल आपल्याला योग्य ती माहिती आणि अनुभव असेलच तरच आपण लोकांना चांगल्या प्रतीचे विडिओ देऊ शकू.

जर तुमच्याकडे योग्य तो विषय तुम्ही निवडू शकला नाही तर तुमचा युट्युब चॅनेल कितपत लोकांना आवडेल व तो लोक किती पाहतील हे सांगता येत नाही. असे युट्युब चॅनेल शक्यतो जास्त काळ चालत नाहीत. त्यामुळे योग्य तो तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ज्या विषयामध्ये पारंगत असाल असा विषय निवडणे जास्त महत्वाचे आहे.

विषय निवडण्यासाठी तुम्ही खूप विचारपूर्वक निर्णय घेऊनच मग तुमचा विडिओ चॅनेल चालू करावा. जर तुम्ही कोणत्याही विषयाबद्दल माहित नाही पण तुम्हाला त्यामध्ये शिकण्याची आणि काहीतरी करण्याची आवड असेल तर तुम्ही त्याचे विषयाबद्दल योग्य ती माहिती आणि प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा युट्युब चॅनेल चालू करू शकता.

युट्युब विषय निवडण्यासाठी आवड, अनुभव आणि शिक्षण ह्याचे महत्व | Your Likeness, Experience and Education for YouTube Subject

ह्या तीन गोष्टी तुमच्या युट्युब चॅनेलच्या विषयासाठी महत्वाच्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे आणि ज्या गोष्टीचे तुम्ही प्रशिक्षण घेतले आहे त्या विषयाबद्दल तुम्ही तुमच्या अनुभवानुसार लोकांना चांगली माहिती देऊ शकता.

जसजसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिक्षणाची निवड करून शिक्षण घेता आणि त्या विषयाबद्दलचे अनुभव घेऊन तुम्ही त्या विषयांमध्ये पारंगत होता तो विषय तुम्हाला मांडायला आणि लोकांपर्यंत पोहोचवायला तुम्हाला सोपे जाते.

आणि तुम्हाला त्याविषयाबद्दल वेगवेगळी माहिती आणि अनुभव असल्याकारणाने तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या प्रश्नावर बोलू शकता. किंवा त्यावर तुम्ही चांगले सोलुशन देऊ शकता. म्हणून नुसती आवड आहे म्हणून एखादा विषय निवडला आणि चॅनेल बनवला असे होत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याचे योग्य ते ज्ञान आणि  अनुभव असणे आवश्यक आहे.

ह्या तिन्ही गोष्टी पडताळून घेऊन मग तुम्ही युट्युब चॅनेलसाठी योग्य तो विषय निवडू शकता. त्यासाठी तुम्ही जर काही अगोदरच कुठल्या क्षेत्रामध्ये काही काम करत असाल आणि तुम्हाला त्याची आवड आणि ज्ञान असेल तर तुम्ही तोच तुमचा विषय म्हणून निवडून तुमचा युट्युब चॅनेल तयार करू शकता. त्यामुळे त्यासाठी तुमच्याकडं भरपूर माहिती आणि तुमचे वेगवेगळे अनुभव मांडून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवू शकता.

पण काहीवेळा असे असते कि काही विद्यार्थी किंवा लोक कि ज्यांना नक्की कोणत्या विषयावर विडिओ बनवायचे तेच कळत नाही. अशा लोकांनी आपला जो काही छंद किंवा आवड असेल त्याप्रमाणे विडिओ बनवले तरी चालू शकतात. फक्त तुम्ही त्या विषयावर योग्य ती माहिती लोकांना पुरवणे आवश्यक आहे.   

युट्युब चॅनेलसाठी तुम्ही निवडलेला विषय  लोकप्रिय आहे का? | Finding Popular subject for YouTube Channel

जसे कि आपली आवड ज्ञान आणि आपला अनुभव आहे तो विषय युट्युब चॅनेलसाठी निवडणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला तो विषय किती लोकप्रिय आहे हे देखील पाहावे लागेल. कारण तुमचे विडिओ लोक तेव्हाच बघतील जेव्हा लोकांच्या तो विषय आवडीचा आहे.

आणि जो विषय लोकांना जास्त आवडतो आणि ज्या विषयाचे विडिओ लोक जास्त बघतात तो युट्युब चॅनेल चांगला चालू शकतो. त्यासाठी तुम्ही तुमचा जो विषय आहे तो पडताळून पाहण्यासाठी त्या विषयाचे विडिओ युट्युबवर चेक करून पाहू शकता. ज्या विडिओला जास्त views आहेत ते विडिओ लोक सतत बघतात.

म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो कि कोणत्या प्रकारचे विडिओ चांगले चालतात. जसा तुम्ही विषय निवडून घ्याल तसे तुम्ही त्या विषयाचे वेगवेगळे युट्युब चॅनेल शोधून त्याच्यावर कोणत्या प्रकारचे विडिओ बनवले आहेत आणि ते विडिओ कसे बनवले आहेत हे तुम्ही पाहू शकता. तसेच त्या चॅनेलसाठी views आणि कंमेंट्स आहेत का ह्याच्यावरून तुम्हाला साधारण अंदाज येईल कि तो विषय जो तुम्ही निवडला आहे तो लोकप्रिय विषय आहे. आणि तुम्ही मग तुमचा विषय घेऊन तुम्ही तुमचा कन्टेन्ट तयार करून विडिओ बनवायचा विचार करू शकता.  

युट्युब चॅनेलसाठी वेगवेगळे विषय | Different subjects for YouTube Channel

वेगवेगळ्या श्रेणी किंवा क्षेत्राप्रमाणे तुम्ही युट्युब चॅनेलसाठी विषय निवडू शकता. आपल्याला विषय निवडण्यासाठी भरपूर वाव आहे. त्यामुळे कुणीही विषय नाही असे म्हणू शकत नाही. तुम्ही अगदी छोट्या छोट्या श्रेणीमध्ये देखील युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करू शकता. काहीजण कला क्षेत्राचे विडिओ बनवतात.

काही जण जे मेडिकल एक्स्पर्ट किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये पारंगत असतात ते त्या विषयाचे विडिओ बनवतात. काही लोक टेकनिकल क्षेत्राचे विडिओ तयार करतात. काही फिटनेस बद्दल विडिओ बनवतात. काही फेस्टिवल विषयी विडिओ बनवतात. अशी अनेक क्षेत्र आहेत कि तुम्ही ज्यामध्ये विडिओ बनवू शकता. तुम्ही युट्युब चॅनेलवर जाऊन सुद्धा वेगवेगळे विषयाचे विडिओ बघू शकता. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल कि लोक किती वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या क्षेत्राचे विडिओ पाहतात.

हेलथ आणि फिटनेस ह्या विषयावर युट्युब चॅनेल | Health and Fitness YouTube Channel

तुम्ही जर कुणी हेलथ किंवा फिटनेस एक्स्पर्ट असाल आणि तुम्हाला त्या क्षेत्रातील एक चांगला अनुभव असेल तर तुम्ही ह्या विषयावर देखील विडिओ बनवू शकता. हेलथ आणि फिटनेस मध्ये देखील वेगवेगळ्या श्रेणी किंवा विषय आहेत त्यातील एखादा विषया देखील तुम्ही निवडून तुमचा युट्युब चॅनेल चालू करू शकता. फिटनेसमध्ये तुम्ही जिम, योगा, ऐरोबिकस, डाएट, वेट लॉस, ह्यावर तुम्ही युट्युब चॅनेल तयार करू शकता. हेलथ मध्ये तुम्ही जर एक्स्पर्ट असाल तर तुम्ही सौंदर्य, नाक, कान, घसा, नुट्रीशन, मेडिटेशन, हेल्थ रुटीन,योग्य आहार आणि आरोग्य ह्यावर तुम्ही युट्युब चॅनेल बनवू शकता.    

आर्टस् आणि क्राफ्ट्स ह्या विषयावर युट्युब चॅनेल | Arts and Crafts YouTube Channel

काही लोक आर्ट्समध्ये किंवा क्राफ्ट्स बनवण्यामध्ये पारंगत असतात असे लोक आर्टस् आणि क्राफ्ट्स मधील एखादा विषय निवडून त्यावर विडिओ बनवू शकतात. आर्ट्समध्ये तुम्ही रांगोळी, पेंटिंग, हस्तकला, डेकोरेशन, कॉमेडी, फिल्म अशा प्रकारच्या क्षेत्रातील युट्युब चॅनेल बनवू शकता. क्राफ्ट्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग्स, शोभेच्या वस्तू, फ्लॉवर पॉट्स, फ्लॉवर्स, तोरण, क्रोशाच्या तयार केलेल्या सुशोभित वस्तू असे अनेक प्रकारचे युट्युब चॅनेल तुम्ही चालू करू शकता.

कूकिंग आणि रेसिपीस विषयावर युट्युब चॅनेल |Cooking and Recipes YouTube Channel

भरपूर लोकांना कूकिंग किंवा वेगवेगळ्या रेसिपीस बनवण्याची आवड असते अशा लोकांना तर विडिओ बनवणे खूप सोपे आहे. आणि असे विडिओ भरपूर लोक बघतात. कारण पूर्ण भारतात किंवा बाहेर देखील महाराष्ट्रीयन, साऊथ आणि नॉर्थ इंडियन रेसिपीस लोकांना खूप आवडतात. तुम्ही देखील जरी कूकिंग मध्ये एक्स्पर्ट जरी असला तरी कोणती नवी रेसिपी जरी युट्युब चॅनेलवर पाहायला देखील आवडते आणि बनवायला देखील आवडते. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यात शौकीन किंवा पारंगत असाल तर तुम्ही असा कूकिंग आणि रेसिपीसचा तुमचा युट्युब चॅनेल चालू करू शकता. मुख्य गोष्ट म्हणजे असे चॅनेल लोक बघण्यासाठी कंटाळत नाहीत. जास्त करून असे युट्युब चॅनेल महिला भरपूर प्रमाणात बघतात.

आणि त्यासाठी तुम्हाला काही शेफ वगैरे बनण्याची गरज देखील नाही तुम्ही घरगुती जेवण किंवा घरात चांगल्या दिवाळीच्या किंवा मिठाई जरी तुम्ही बनवत असाल तरी तुम्ही तुमचा चॅनेल चालू करू शकता. काही महिला किंवा पुरुषदेखील बेकिंगमध्ये खूप एक्स्पर्ट असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे केकच्या डिझाईन्स किंवा बेकरीचे वेगवेगळे पदार्थ बनवण्यामध्ये आवड असते तुम्ही असा युट्युब चॅनेल देखील चालू करू शकता.      

कूकिंगमध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्विंग प्लेटसाठी डेकोरेशन चांगले करत असाल तर तुम्ही असा युट्युब चॅनेल जरी काढला तरी तो खूप चालू शकेल. जसे कि वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रुटस आणि सॅलडच्या वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करणे किंवा प्लेट्समध्ये वेगवेगळे खाण्याच्या गोष्टी वापरून डिझाईन बनवणे असा युट्युब चॅनेल देखील खूप चांगला चालू शकतो.

ट्रॅव्हलिंग किंवा प्रवास विषयावर युट्युब चॅनेल | Travelling YouTube Channel

तुम्हाला जर ट्रॅव्हल करायची आवड असेल आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सारखे फिरण्यासाठी जात असाल तर तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड युट्युब चॅनेल बनवू शकता. वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती वेगवेगळ्या हॉटेल्स आणि ट्रॅव्हल्स आणि त्याचा खर्च ह्याविषयी माहिती, वेगवेगळ्या चांगल्या बघण्यासाठी स्पॉट्स आणि येण्याजाण्यासाठी लागणारा खर्च अशा अनेक प्रकारची माहिती तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या युट्युब चॅनेलवर देऊ शकता.

तसेच प्रवास कुठून आणि कसा स्वस्त आणि कमी खर्चामध्ये तुम्ही करू शकाल ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या युट्युब चॅनेलवर देऊ शकता. त्यासाठी तुम्ही सारखे ट्रॅव्हल करत असला पाहिजे किंवा तुम्ही भरपूर प्रवास जरी केला असेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या पर्यटन स्थळांविषयी माहिती असेल तरी तुम्ही तुमचा युट्युब चॅनेल चालू करू शकता. भरपूर लोक पर्यटन करण्यासाठी दरवर्षी फिरण्यासाठी जातात. आणि सर्व लोकांना फिरण्याची आवड असतेच आणि वेगवेगळे चांगले स्पॉट्स बघण्याची आवड असते असे लोक ट्रॅव्हलिंग चे युट्युब चॅनेल खूप बघतात आणि तिथून काही माहिती मिळवून फिरायला जातात.

रेस्टॉरंट आणि फूड विषयावर युट्युब चॅनेल | Restaurant and Food YouTube Channel

तुम्हाला जर भरपूर खाण्याची आवड आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फूड खाण्यासाठी भ्रमंती करण्याची आवड आहे तर तुम्ही असाच तुमचे युट्युब चॅनेल चालू करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊन तेथील खाण्याविषयी आणि वेगवेगळ्या डिशेशची माहिती घेऊन तुम्ही त्यावर विडिओ बनवून तुमच्या युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता. ज्यांना खाण्याची भरपूर आवड आहे ते असा युट्युब चॅनेल चांगल्या प्रकारे बनवू शकतात. सर्व प्रकारचे रेस्टॉरंट आणि हॉटेल्स ह्याविषयी माहिती आणि तेथील कोणकोणत्या डिशेश जास्त फेमस आहेत आणि त्या कशा प्रकारे बनवल्या जातात हि सर्व माहिती तुम्ही तुमच्या युट्युब चॅनेलवर देऊ शकता. 

गार्डनिंग आणि फार्मिंग विषयावर युट्युब चॅनेल | Gardening and Farming YouTube Channel

तुम्ही जर शेती किंवा तुम्हाला प्लॅंटींग करण्याची आवड आहे तर तुम्ही त्या क्षेत्रामधील माहिती देऊन देखील तुमचे विडिओ बनवू शकता. शेती ह्या विषयावर तुम्ही जर कोणत्या प्रकारची शेती करता आणि त्यासाठी कोणकोणत्या खतांचा वापर करता. शेतामध्ये पीक कसे घेतले जाते.

कोणते पीक कोणत्या जमिनीत चांगले येते. त्यासाठी तुम्हाला किती खर्च लागतो. आणि त्यापासून तुम्हाला किती नफा होतो ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या युट्युब चॅनेलवर दाखवू शकता. तसेच तुम्ही सोबत कोणते जोडउद्योग करता जसे कि कुकुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन, मधमाशीपालन ह्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या चॅनेलवर माहिती देऊ शकता.

जर तुमचे स्वतःचे गार्डन आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्याची आवड आहे तर तुम्ही त्याविषयी देखील माहिती देऊन तुमचा युट्युब चॅनेल चालू करू शकता. जसे कि गार्डनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडे लावतो त्याविषयी माहिती देणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा फळे आपण गार्डनमध्ये कशा प्रकारे लावू शकतो ह्याविषयी देखील आपण युट्युब चॅनेलवर माहिती देऊ शकतो. तसेच काही जणांना बोन्साय किंवा कलमे तयार करायला देखील आवडतात तर तुम्ही तशा प्रकारचे विडिओ देखील चालू करू शकता.  

काही जणांना वेगवेगळ्या प्रकारची इनडोअर आणि आऊटडोअर प्लॅंट्स आवडतात त्यावर देखील तुम्ही तुमचे विडिओ तुमच्या युट्युब चॅनेलवर  अपलोड करू शकता.

पेट्स, पक्षी आणि प्राणी विषयावर युट्युब चॅनेल | Pets, birds and Animals YouTube Channel

तुम्हाला जर प्राणी आणि पक्षी आवडत असतील आणि तुम्ही घरी पाळीव प्राणी देखील सांभाळत असाल तर तुम्ही अशा प्रकारचा युट्युब विडिओ चॅनेल देखील चालू करू शकता. तुमच्या घरी असलेल्या पेट्सबद्दल तुम्ही चॅनेलवर माहिती देऊ शकता. त्याचे अन्न, त्याची काळजी कशी घेता ह्याविषयी माहिती देऊ शकता.

अशा अनेक प्रकारचे विषय आहेत जे कि तुम्हाला एक युट्युब विडिओ चॅनेल चालू करण्यासाठी चांगले आहेत तुम्ही तुमची आवड बघून असाच एखादा विषय निवडून तुमचा युट्युब विडिओ चॅनेल चालू करू शकता.

यूट्यूब चॅनल कसा बनवायचा ह्याविषयी आणखीन माहिती घेवू –

गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा । How to make YouTube channel of Garden in Marathi

पाळीव प्राणी YouTube चॅनेल कसे सुरू करावे? Pet youtube channel in Marathi

यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे | Earn money by youtube shorts

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin