युट्युब चॅनेल सुरु करताना महत्वाच्या स्टेप्स | Important steps to start your YouTube Channel in Marathi

युट्युब चॅनेल सुरु करताना महत्वाच्या स्टेप्स | Important steps to start your YouTube Channel in Marathi

आत्तापर्यंत आपण युट्युब चॅनेल तयार करून त्यापासून तुम्ही तुमचा इनकम कसा चालू करू शकता ह्याविषयी माहिती घेतली. तसेच तुम्ही विषय देखील कसे निवडू शकता ह्याविषयी पहिले. आत्ता आपण विडिओ तुम्ही कसा आणि कोणत्या प्रकारे बनवू शकतो ह्याविषयी माहिती घेऊ.

विडिओ तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर करून बनवू शकता किंवा तुम्ही कोणते विडिओ ऍप् मोबाइलवर किंवा लॅपटॉप डेस्कटॉप वर डाउनलोड करून घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही विडिओ तयार करू शकता.

तुम्ही युट्युब चॅनेल बनवला कि सर्वात महत्वाचे काम असते ते म्हणजे विडिओ तयार करणे त्यासाठी प्रथम काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.

विडिओ बनवणे सुरु करण्यासाठी तुम्हाला तुमचे एक विडिओ तयार करण्यासाठी एक वेगळा वेळ काढणे महत्वाचे आहे.

त्यासाठी तुम्ही एक स्वतःसाठी टाईम टेबल किंवा चेकलिस्ट बनवून त्याप्रमाणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे तुम्ही एक विषय निवडला तसे तुम्हाला नंतर कोणकोणते टॉपिक घेऊन विडिओ बनवायचे आहेत ते ठरवणे आवश्यक असते.

युट्युब चॅनेलवर विडिओ तयार करण्यासाठी चेकलिस्ट | Checklist for YouTube Channel

विडिओ बनवण्यासाठी तुम्ही तुमचा योग्य विषय निवडल्यानंतर तुम्ही तुमची विडिओ तयार करण्यासाठी एक स्वतःची चेकलिस्ट बनवणे आवश्यक आहे.

त्या चेकलिस्टमध्ये तुम्ही कोणकोणते विडिओ तयार करणार आहे त्याची माहिती आणि प्रत्येक दिवशी किती विडिओ अपलोड करणार आहे ह्याचे डिटेल्स तुम्ही अगोदरच तयार करून ठेवणे महत्वाचे असते. 

तुम्ही तुमची चेकलिस्ट बनवली कि तुम्ही प्रत्येक महिन्याला त्याप्रमाणे विडिओ अपलोड करत जाणे अत्यंत महत्वाचे असते.

कारण तुम्ही रेगुलर जर युट्युब चॅनेलसत्ताही विडिओ अपलोड केले तरच तुमचे विडिओ हळूहळू चालू शकतात आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत तुमचे विडिओ पोहोचू शकतात.

युट्युब चॅनेल चांगला चालण्यासाठी तुम्हाला रेगुलर आहे त्या वेळेमध्ये विडिओ तुमच्या युट्युब चॅनेलवर अपलोड करणे आवश्यक असते.

म्हणून चेकलिस्ट बनवणे जास्त योग्य ठरते त्यामुळे तुम्ही अगोदरच विडिओ बनवून ठेवून ते विडिओ तुमच्या युट्युब चॅनेलवर schedule करून ठेवू शकता. ज्यामुळे तुमचा अगोदरच विडिओ अपलोड असेल आणि जर काही कारणामुळे तुम्हाला विडिओ बनावट आला नाही तरी तुम्ही अगोदरच विडिओ बनवला असल्याने तुमचे विडिओ नेहमीप्रमाणे वेळेवर अपलोड होतात. 

चेकलिस्ट बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या एक्सेल शीटची किंवा गुगल डॉकचा  वापर करून बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही तारीख टाकून त्याप्रमाणे तुमच्या विषयानुसार वेगवेगळे टॉपिक निवडून कोणत्या टॉपिक वर कधी विडिओ बनवणार आहे ते तुम्ही टाकून ठेवू शकता.

नंतर तुम्ही विडिओ तयार करणे चालू करू शकता. विडिओ तयार करण्यापेक्षा त्याअगोदर विडिओ बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तयार असणे महत्वाचे असते. त्यामुळे तुम्हाला नंतर विडिओ बनवणे सोपे जाते.

चेकलिस्ट नंतर युट्युब चॅनेलसाठी कन्टेन्ट तयार करणे | Making checklist of videos for YouTube Channel

जसे चेकलिस्ट बनवणे महत्वाचे आहे तसेच तुम्हाला व्हिडिओसाठी कन्टेन्ट तयार करणे देखील महत्वाचे असते. कारण तुम्ही जो टॉपिक निवडला आहे त्या टॉपिकवर अगोदर प्रत्येक महत्वाचे पॉईंट्स घेऊन त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही लिहून काढून ठेवणे देखील महत्वाचे आहे.

तुम्ही प्रत्येक पॉइंटवर जी माहिती लिहिलेय ती व्यवस्थित वाचून घेऊन त्यामध्ये कोणती चूक नाही ना ते चेक करून घेऊन नंतर विडिओ बनवायला घ्यावा.

कारण जर एखादी चूक असेल आणि तुम्ही विडिओ बनवला तर तुमचा तेवढा वेळ वाया जातो आणि तुम्हाला परत त्याच्यावर काम करावे लागते. आणि तो विडिओ डिलीट करून नवा विडिओ तयार करून परत युट्युब चॅनेलवर अपलोड करावा लागेल. म्हणून अगोदरच तुम्ही जो कन्टेन्ट आहे तो चेक करून नंतर विडिओ बनवणे सर्वात उत्तम.

विडिओ कन्टेन्ट कसा तयार करायचा असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या विषयांमधील जे तयार विडिओ असतील ते विडिओ तुम्ही बघून त्यामध्ये कशी माहिती दिली आहे ते पाहून घ्यावे.

त्यानंतर त्याविषयी गुगळे आणि त्या विषय रिलेटेड बुक्स वाचून त्यामधून ठराविक पॉईंट्स निवडून तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे आणि तुमच्या माहितीप्रमाणे त्या विषयी स्वतःची एक सविस्तर माहिती किंवा आर्टिकल तयार करून ठेवावा.

तुम्हाला ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही कुणाचा कन्टेन्ट कॉपी करता कामा नये नाहीतर तुमच्या विडिओ चॅनेल रेस्ट्रिक्ट किंवा बॅन होऊ शकतो.

म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा कन्टेन्ट तयार करणे आवश्यक आहे. आणि थोडीफार त्यासाठी तुमच्या विषयाचे विडिओ पाहून कसे विडिओ कन्टेन्ट वापरले आहे तो अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या आयडिया वापरून तुमचे विडिओ कन्टेन्ट तयार करू शकता.      

युट्युब चॅनेलसाठी कन्टेन्ट तयार करण्यासाठी टायटल किंवा हेडलाईन | Title or headline of videos for YouTube Channel

तुम्ही जो टॉपिक विडिओ तयार करण्यासाठी निवडणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचे टायटल किंवा हेडलाईन ठरवावे. तुमचे टायटल किंवा हेडलाईन

तुमच्या विषयाला अनुसरून असावे. त्यामध्ये तुमचा मेन टॉपिक समजला गेला पाहिजे. लोकांना समजेल असे टायटल किंवा हेडलाईन असावी. लोकांना वाचण्यासाठी लगेच विडिओ बघण्यासाठी प्रवृत्त करेल असे तुमचे टायटल किंवा हेडलाईन असावी.

युट्युब चॅनेलसाठी कन्टेन्ट तयार करण्यासाठी डिस्क्रिपशन | Creating content description for YouTube Channel

तुम्ही जे युट्युब विडिओ तयार करण्यासाठी जे कन्टेन्ट वापरणार आहेत ते विषयाला धरून त्यामध्ये तुम्ही महत्वपूर्ण आणि योग्य ती माहिती देणारे पॉईंट घेऊन ते पॉईंट्स व्यवस्थितपणे समजून सांगावेत.

ज्यामुळे त्यापासून लोकांना योग्य ती उपयुक्त अशी माहिती मिळेल. तुमच्या दिलेल्या माहितीचा लोकांना योग्य तो उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनुभव सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्ही तुमचे कन्टेन्ट कलात्मकरीत्या समजावता येईल त्याप्रमाणे कन्टेन्ट तयार करावे.

सगळ्यात शेवटी तुम्ही सोलुशन किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये जे सांगितले आहे त्याचा सारांश सांगून तुमचे व्हिडिओसाठी तयार केलेले आर्टिकल पूर्ण करावे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे विडिओ तयार करण्यासाठी आर्टिकल तयार करून मग विडिओ तयार करण्यासाठी प्रारंभ करावा.

युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करण्याच्या पद्धती | Types of making videos for YouTube Channel

विडिओ तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल चा वापर करून विडिओ तयार करू शकता. तुमच्या मोबाइलला कॅमेराद्वारे तुम्ही विडिओ तयार करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही विडिओ तयार करण्याच्या ऍपचा वापर करून देखील तुम्ही विडिओ तयार करू शकता.

तुम्हाला चेहरा दाखवून विडिओ तयार करायचे आहेत कि चेहरा न दाखवता विडिओ तयार करायचे आहेत ते ठरवून त्याप्रमाणे तुम्ही विडिओ तयार करू शकता. तुम्ही शक्यतो स्वतःचा चेहरा दाखवून विडिओ बनवणे जास्त योग्य राहील. कारण जे विडिओ चेहरा दाखवून बनवले जातात ते सर्वात जास्त लोकप्रिय होतात. पण जर काही कारणामुळे तुम्हाला जर चेहरा दाखवून विडिओ बनवायचे नसतील तर तुम्ही चेहरा न दाखवता देखील विडिओ तयार करू शकता.

विडिओ तयार करण्यापूर्वी तुम्ही सुरुवातीला विडिओ बनवण्याची प्रॅक्टिक करून घ्यावी. म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. नंतर मग तुम्ही युट्युब चॅनेलवर विडिओ अपलोड करण्यास सुरुवात करावी. विडिओ बनवताना कोणत्या चुका होत असतील तर त्या पाहून घ्याव्या आणि त्यात सुधारणा करून पुढचा विडिओ अजून कसा आकर्षक बनवता येईल हे पाहावे.

यूट्यूब चॅनेल बनवून घर बसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी
योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे 
युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ चॅनेल
यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे
गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा
पाळीव प्राणी YouTube चॅनेल कसे सुरू करावे
Cooking यूट्यूब चॅनेल
युट्युब चॅनेलसाठी विडिओ कसे तयार करू शकता
युट्युब चॅनेल सुरु करताना विडिओ तयार करण्याअगोदर काही महत्वाच्या स्टेप्स
व्हिडिओ क्रिएशन  एक अत्यंत चांगली घरबसल्या पैसे कमावण्याची संधी

युट्युब चॅनेलसाठी चेहरा दाखवून विडिओ तयार करणे | Creating videos showing face for YouTube Channel

तुम्ही जर तुमचा स्वतःचा विडिओ तयार करणार असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा कॅमेरा वापरून विडिओ तयार करू शकता.

तुम्हाला विडिओ एडिटिंगची गरज लागू नये ह्यासाठी सुरुवातीलाच विडिओ जास्तीत जास्त चांगला कसा बनवता येईल हे पाहून त्याप्रमाणे विडिओ बनवण्यास सुरुवात करावी. तुम्ही छोट्या छोट्या क्लिप्समध्ये विडिओ देखील बनवू शकता नंतर ते एकत्र जोडून एक विडिओ तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला चांगले विडिओ बनवता येतील.

विडिओ एडिटिंग किंवा विडिओ मर्ज करण्यासाठी बरेचसे विडिओ ऍप गुगल प्ले स्टोर मध्ये आहेत त्यापैकी तुम्हाला जे योग्य ते वाटतील ते तुम्ही वापरून विडिओ एडिट करू शकता.

मोबाईलने विडिओ बनवणे जास्त सोपे आहे. सुरुवातीला कॅमेरा किंवा इतर साधने विडिओ तयार करण्यासाठी खरेदी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा मोबाइल वापरून विडिओ तयार करू शकता. नंतर तुम्ही विडिओ बनवण्यासाठी इन्व्हेस्ट केले तरी चालू शकते.   

युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करण्यासाठी विडिओ ऍप्स | Video app to create videos for YouTube Channel

गुगल प्लेस्टोरमध्ये भरपूर प्रकारचे ऍप्स आहेत त्यापैकी तुम्ही चांगले ऍप्स पाहून त्याप्रमाणे तुम्ही विडिओ तयार करण्यासाठी वापरू शकता. ह्यामध्ये kinemaster हे ऍप विडिओ तयार करण्यासाठी चांगले आहे. तसेच invideo, canva, filmora, animoto, inshot असे अनेक  ऍप्स आहेत ते वापरून देखील तुम्ही विडिओ बनवू शकता.

तुम्हाला जे योग्य आणि चांगले वाटेल ते विडिओ ऍप वापरून तुम्ही विडिओ बनवू शकता. तुम्ही विडिओ ऍप निवडतात तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्हाला विडिओ व्यवस्थित आणि जास्त वेळ लागणार नाही किंवा एडिटिंग करावे लागणार नाही असे ऍप वापरून विडिओ बनवावे.

युट्युब चॅनेलसाठी स्क्रिन रेकॉर्डिंग करून विडिओ तयार करणे | Create videos using scrin recording for YouTube Channel

स्क्रिन रेकॉर्डिंग करून सुद्धा तुम्ही विडिओ तयार करून युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरून स्क्रिन रेकॉर्ड करणारं असाल तर तुम्ही एखादे स्क्रिन रेकॉर्डर डाउनलोड करून त्याद्वारे तुम्ही तुमचा विडिओ तयार करू शकता. किंवा तुम्ही प्रेसेंटेशन रेकॉर्ड करणार असाल तर तुम्ही त्यासाठी पॉवरपॉईंट किंवा झूम मीटिंग, गुगल मीट वापरून देखील विडिओ रेकॉर्ड करू शकता.

त्यासाठी तुम्हाला वेगळे ऍप घेण्याची गरज लागणार नाही. विडिओ एडिट करण्यासाठी तुम्ही द-व्हिन्सी हे ऍप वापरू शकता. पण जर तुम्ही रेकॉर्डिंग व्यवस्थित केले तर तुम्हाला विडिओ एडिट करण्याची देखील गरज नाही.

अशा प्रकारे तुम्ही विडिओ तयार करण्यापूर्वी ह्या सर्व गोष्टी किंवा स्टेप्स महत्वाच्या आहेत. त्या सर्व तुम्ही तयार किंवा रेडी करून नंतर तुम्ही विडिओ तयार करण्याचे काम चालू करू शकता.

विडिओ तयार करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर किंवा ऍप वापरून कसे विडिओ तयार करू शकतो ह्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या आर्टिकल मध्ये पाहू ज्याच्यामुळे तुम्हाला आणखीन फायदा होईल आणि तुम्ही सहजपणे विडिओ तयार करू शकाल.

युट्युब चॅनेल सुरु करताना विडिओ तयार करण्याअगोदर चेकलिस्ट तयार करून त्याप्रमाणे कन्टेन्ट तयार करणे आणि योग्य ते विडिओ ऍप शोधून किंवा मोबाईलचा कॅमेरा वापरून विडिओ चांगले कसे तयार करता येतील ह्या सर्व गोष्टी पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. त्याप्रमाणे सर्व प्लॅनिंग करून तुम्ही तुमचा युट्युब चॅनेल चालू करून विडिओ अपलोड करू शकता.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Roanoke-Va11 Delicious Recipes to Bake It Better30-minute recipes you can try11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and Prosperity