इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना I Indira Gandhi Yojana 2023

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना I Indira Gandhi Yojana

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना (Indira Gandhi Yojana) ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून या योजना मार्फत चार इंदिरा गांधी योजना राबवण्यात येतात.

याच्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, अपंग निवृत्तीवेतन योजना आणि कुटुंब लाभ योजना या योजनांचा एकत्रित समावेश इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेमध्ये करण्यात आला आहे.

Indira Gandhi Yojana या योजने करिता ग्रामीण भागाचा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या सर्वेक्षणानुसार व शहरी भागासाठी नगर विकास विभागाने केलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या सर्वेक्षणानुसार 2002 मध्ये फक्त दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींसाठी या योजना राबवण्यात येत आहेत.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेनुसार 65 वर्षे वय व 65 वर्षावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. केंद्र शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील असलेल्या व्यक्तींसाठी दरमहा दोनशे रुपये निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून देखील चारशे रुपये दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येते. यामुळे या योजनेचा लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून एकूण सहाशे रुपये प्रतिमहा निवृत्ती वेतन मिळते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना

2010 नुसार इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये असलेल्या विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन देण्यात येते,

यासाठी त्या लाभार्थीचे वय 40 ते 65 वर्षखालील असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून 200 रुपये प्रतिमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत चारशे रुपये प्रतिमहा निवृत्ती वेतन देण्यात येते. असे एकूण निवृत्तीवेतन सहाशे रुपये प्रतिमहा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेद्वारे देण्यात येते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनेसाठी अपंग असलेल्या व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्षाखालील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे.

या वयोगटातील अपंगत्व असलेले एक किंवा एक पेक्षा जास्त अपंगत्व असलेले किंवा बहुअपंगत्व असलेले लाभार्थी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेमार्फत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र होतात.

पात्र लाभार्थ्यासाठी दोनशे रुपये प्रतिमहा केंद्र शासनाकडून व संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत चारशे रुपये राज्य शासनाकडून देण्यात येतात. असे मिळून सहाशे रुपये प्रतिमहा निवृत्ती वेतन अपंग व्यक्तींसाठी देण्यात येते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेअंतर्गत 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तींचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास एक रकमी वीस हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. वरील सर्व Indira Gandhi Yojana योजना उणे पद्धतीवर आणल्या आलेल्या आहेत.

राष्ट्रीय रेषेखालील कुटुंबासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी Indira Gandhi Yojana या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यापण निवृत्ती वेतन योजना या योजनेखालील पात्र अर्जदारांची माहिती व अर्ज छाननी तहसीलदार किंवा अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी तयार करून ती माहिती अर्ज संकल्प संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती समोर देण्यात येते. सदर समिती यावर निर्णय घेऊन Indira Gandhi Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना अर्जाची मंजुरी देऊन ठरवलेली रक्कम त्यांना देण्यात येते.

Indira Gandhi Yojana या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तहसीलदार कडे जाऊन अर्ज देऊ शकता. किंवा तलाठीकडे अर्ज दिल्यावर तलाठी तो अर्ज तहसीलदाराकडे देईल व तहसीलदार त्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून समिती अधिकाऱ्याकडे तो अर्ज देण्यात येईल.

सर्व गोष्टींची व्यवस्थित पडताळणी झाल्यावर समिती योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ठरवण्यात आलेली रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा होईल. या अर्जासाठी लाभार्थी पात्र आहे की नाही हे समितीद्वारे लाभार्थ्यांना कळविण्यात येते.

या योजनेची सविस्तर माहिती व या योजनेमध्ये किती लाभार्थीना या योजनेचा लाभ मिळाला आहे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि माहिती मिळवा. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन तसा अर्ज करू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता.

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना I Indira Gandhi Yojana

आणखी काही योजना

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

इंदिरा आवास योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee