जलयुक्त शिवार अभियान योजना | Quickly understand Jalyukta Shivar Abhiyan Yojana Importance in 2023

जलयुक्त शिवार अभियान योजना | Jalyukta Shivar Abhiyan Yojana Importance

पावसाची अनियमता आणि कधीही पडणारा पाऊस त्यामुळे पिकांवर होणारा दुष्परिणाम या परिस्थितीची नोंद घेऊन कृषी क्षेत्रामध्ये Jalyukta Shivar Abhiyan Yojana राबवण्यात येते.

पाऊस आजकाल कधीही पडत आहे. ज्यावेळी पावसाची शेतकऱ्यांना गरज आहे त्यावेळी पाऊस नेमका पडत नाही आणि ज्यावेळी पावसाची गरज नसते त्यावेळी पाऊस पडत असतो.

त्यामुळे शेतातील पिकांचे नियमित नुकसान होत असते आणि शेतकरी या परिस्थितीतून झुंझता झुंझता वैतागला जातो.

शेवटी शेतीचे नुकसान झाल्यामुळे त्यांचे जीवन सुरळीत चालत नाही आणि शेतकरी शेती करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. शेतीमध्ये फायदा होत नसल्याने शेतकरी शेती विकून शहराकडे नोकरी पाहण्यासाठी वाट धरतो.

Table of Contents

महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांचा होणाऱ्या दुष्परिणाम लक्षात घेऊन कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचा उत्पादनांचे वाढ आणण्यासाठी योजना सुरू करण्यात आली.

2014 15 मध्ये पाण्याच्या पातळीमध्ये दोन मीटर पेक्षा जास्त प्रमाणात घट झाली त्यामुळे 188 तालुके म्हणजेच जवळ जवळ 1900 गावांना पाण्याची टंचाई भासू लागली.

त्यामुळे ह्या गावामध्ये शेतीसाठी लागणारे पाणी आणि पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून राज्यामध्ये Jalyukta Shivar Abhiyan Yojana ह्या योजनेची संकल्पना पुढे आली.

Jalyukta Shivar Abhiyan Yojana ह्या सरकारी योजनेचे प्रामुख्याने एकच उद्दिष्ट आहे की सर्व गावे पाणी टंचाई पासून मुक्त करणे. कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देणे आणि पाण्याची उपलब्धता करून देणे ह्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून गावामध्ये पाण्याची सोय करून देण्यात येते.

जलयुक्त शिवार अभियान योजनेचा प्रामुख्याने उद्देश खालीलप्रमाणे –

भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.

भूगर्भामध्ये जो पाण्याचा साठा असतो तो सध्या कमी होत असून त्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे.

हा पाण्याचा साठा वाढवण्यासाठी, पाण्याची पातळी कशी वाढ होईल आणि जास्तीत जास्त भूगर्भामध्ये पाणी साठवून ते पाणी लोकांना कसे वापरता येईल हे देखील या Jalyukta Shivar Abhiyan Yojana मध्ये पाहिले जाते.

जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी गावातील शिवारामध्ये अडवणे.

बरेचसे पाणी पावसाळ्याच्या काळात वाहून जाते आणि त्या पाण्याचा वापर लोकांना करता येत नाही. हेच पाणी जर गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये अडवले आणि ते वर्षभर वापरण्यात आले तर पाण्याची टंचाई जाणवणार नाही आणि शेतीसाठी देखील पाणी मुबलक प्रमाणात मिळेल आणि लोकांना खर्च यासाठी देखील पाणी उपलब्ध होईल. या दृष्टीने पाण्याचा साठा करण्यासाठी विविध तलाव धरणे, बांध यांचा वापर करून पाणी साठवले जाते व गावोगावी या पाण्याचा साठा लोकांच्या पाण्याच्या गरजा पुरवण्यासाठी वापरला जातो.

राज्यातील पाण्याच्या सिंचन पद्धतीमध्ये वाढ करून त्यामध्ये शेतीच्या पाणी वापरासाठी वाढ करणे.

शेतामध्ये पाणी वापरण्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी वाया जात नाही आणि हेच पाणी मुबलक प्रमाणात साठवून इतर गोष्टींसाठी वापरता देखील येते.

बरेचसे सिंचन पद्धती आहेत ज्याद्वारे जेवढे लागेल तेवढेच पाणी शेतीला उपलब्ध करून पाण्याची बचत करता येते. शेतकऱ्यांना या सिंचन पद्धती माहित करून देणे व त्या सिंचन पद्धतीचा उपयोग करण्यास प्रवृत्त करणे हा देखील या Jalyukta Shivar Abhiyan Yojana योजनेचा एक उद्देश आहे

राज्यामध्ये सर्वांना पाण्याचा मुबलक पुरवठा करून देणे.

पाण्याचा साठा करणे, शेतीसाठी लागणारे लागणारे पाणी योग्य तऱ्हेने वापर करून उर्वरित पाणी साठ्याद्वारे लोकांना देणे, जास्तीत जास्त पाण्याची बचत करून तेच पाणी लोकांना कसे वापरता येईल या गोष्टींची जाणीव करून सर्व राज्यांमध्ये व्यवस्थितपणे पाणीपुरवठा करून देणे हा Jalyukta Shivar Abhiyan Yojana चा आणखीन एक उद्देश आहे.

गावामध्ये जे पाणीपुरवठा बंद पडले आहेत ते पुनः सुरळीत चालू करण्यासाठी प्रयत्न करणे.

बऱ्याच गावामध्ये पाणीपुरवठ्याची सोय आहे, पण काही कारणांमुळे हे पाणीपुरवठा बंद पडले आहेत. बंद पडलेले पाणीपुरी पाणीपुरवठा सुरळीतपणे पूर्ववत चालू करून देऊन लोकांना पाणीपुरवठा करून देणे हे देखील या Jalyukta Shivar Abhiyan Yojana चे उद्दिष्ट आहे.

पाणी साठवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवून जास्तीत जास्त पाण्याचा साठा करणे.

पाण्याचा साठा वाढवण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात कसे साठवता येईल यासाठी वेगवेगळे योजना म्हणजेच प्रकल्प तयार करून त्यात पाणी लोकांना वर्षभर पाणी पुरवता येईल यासाठी पाणीसाठा करून दिला जातो.

जसे की गावांमध्येच्या नद्या असतील तर त्या नद्यांमध्ये पाणी अडवले जाते. काही ठिकाणी शिवारामध्ये पाण्याचा साठा केला जातो ज्याद्वारे शेतामध्ये पाणी देण्यात येते. आणि धरणे बांधली जातात त्याद्वारे नजीकच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी बांध घातले जातात ज्याद्वारे पाण्याचा संचय वाढवण्यास मदत होते व गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होतो.

भूजल अंमलबजावणी, विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणे.

विकेंद्रीत पाण्याचा साठा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या योजना म्हणजेच प्रकल्प राबविण्यात येतात, याद्वारे पाण्याचा संचय वाढवण्यास मदत होते.

निकामी पण अस्तित्वात असलेले पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल याची योजना आखून पाण्यामध्ये आणखीन वाढ करणे.

बऱ्याच ठिकाणी पाणी अस्तित्वात आहे पण ते पाणी अशुद्ध असल्यामुळे त्याचा वापर होत नाही. अशा पाण्याला शुद्ध करून ते पूनर्जिवित करून लोकांना ते पुन्हा कसे वापरता येईल हे पहिले जाते.

वृक्ष लागवडीस लोकांना प्रवृत्त करून पाणी अडविणे आणि जिरविणे ह्याबाबत लोकांना माहिती देणे.

पाणी कमी होण्याचे मूलभूत कारण म्हणजे वृक्ष. झाडांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे प्रामुख्याने जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून पाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

वृक्षांची लागवड जास्तीत जास्त प्रमाणात झाली तर पावसाचे प्रमाण देखील वाढेल. ज्याद्वारे पाणी भरपूर प्रमाणात मिळेल. त्यामुळे सर्वांना वृक्ष लावण्यास प्रवृत्त करून देणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे या Jalyukta Shivar Abhiyan Yojana चे उद्दिष्ट आहे.

राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान योजनेसाठी निधी उपलब्ध असलेल्या योजनांच्या निधीमधून वापरण्यात येत आहे.

अशाप्रकारे सर्वांना जल म्हणजेच पाणी योग्य प्रमाणात मिळेल याची काळजी या योजनेद्वारे घेतली जाते. या योजनेअंतर्गत सर्व प्रकल्प राबवून प्रत्येक गावामध्ये पाण्याचा पुरवठा योग्य रीतीने होवू देणे या योजनेचे प्रामुख्याने लक्ष आहे.

माहिती सर्वांना शेअर करा जेणेकरून इतरांना ही ह्या माहितीचा लाभ घेण्यास मदत होईल.

अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
शासकीय माहितीक्लिक करा.

आणखी काही योजना –

अकरावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

पहिली ते दहावीच्या वर्गात साठी आर्थिक सहाय्य योजना

अटल पेन्शन योजना

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?