कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय । start your own Kurkure business from home in Marathi

कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय । Kurkure business from home in Marathi

Kurkure business हा इंडिया मध्ये किती लोकप्रिय आहे हे सर्वांनाच माहित आहे. ह्याची सुरुवात प्रथम पेप्सिको इंडिया ने चालू केली. त्यावेळी ह्याला crunchy किंवा crispy अशा नावाने ओळखले जायचे. नंतर हळूहळू ह्याचा प्रसार संपूर्ण इंडियामध्ये झाला.

Kurkure business
Kurkure business

त्यावेळी लहर कुरकुरे या नावाने कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय चालू झाला. आणि तो जगभर खूप प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे कुरकुरे सध्या सुद्धा तेवढेच प्रसिद्ध आहेत. जेवढे ते पहिले सुरुवातीला प्रसिद्ध होते. त्यामुळे आपण असा हा खाण्याचा पदार्थ जो जगभर खूप प्रसिद्ध आहे तो जर तुम्ही Kurkure business म्हणून सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये यशस्वी होऊ शकाल.

ह्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसे कि टोमॅटो कुरकुरे. मसाला कुरकुरे, झिगझॅग अशा बऱ्याच प्रकारच्या नावाने हे कुरकुरे ओळखले जातात. तुम्ही ह्यामध्ये भरपूर प्रकारचे कुरकुरे बनवून ते मार्केटमध्ये देऊ शकता.

कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत. त्या आणून तुम्ही घरच्या घरी हा व्यवसाय करू शकता. ह्याची भरपूर सर्वत्र मार्केटमध्ये मागणी असल्याकारणाने हा Kurkure business व्यवसाय तुम्ही चांगल्या रीतीने करू शकाल. आणि ह्यापासून तुम्ही भरघोस नफा देखील मिळवू शकाल.

जर तुम्हाला Kurkure business व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ह्याची सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याप्रमाणे तुमचा व्यवसाय तुम्ही चालू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीचे व्यवस्थितरीत्या प्लांनिंग करायला तुम्हाला मदत मिळेल. आणि त्याची मदत घेऊन तुम्ही एक तुमचा स्वयंमचालित व्यवसाय उभारू शकाल.

कुरकुरे हे सर्वात जास्त लहान मुलांना खूप आवडतात. आपण लहान मुलांना बाजारात घेऊन गेलो कि हि मुले जेव्हा दुकांसमोर काही कुर्कुर्याची पाकिटे बघतात तेव्हा ते बघून मुले हट्ट करतात. त्यांना ते कुरकुरे खाण्यासाठी घरच्यांना सारखे ते विनवणी करतात. शिवाय जी मुले कॉलेज किंवा शाळेमध्ये असतात. ते सुद्धा बाहेर ब्रेकमध्ये भूक लागली तर कुरकुरे विकत घेऊन खातात.

ऑफिसमध्ये कामे करणारे कर्मचारी, कामगार, स्टाफ देखील कधीकधी भूक लागली कि पर्याय म्हणून चहाबरोबर ब्रेकफास्टसाठी कुरकुरे विकत घेऊन खातात. ह्यावरून आपल्याला लक्षात येते कि कुरकुरे साठी लोकांची किती मागणी आहे. कुणी  कधी बाहेर फिरायला गार्डनमध्ये गेले तरी ते खाण्यासाठी कुरकुरे घेतात. अशा प्रकारे प्रत्येक वर्गातील लोकांना कुरकुरे खाण्यासाठी खूप आवडतात.

त्यामुळे हा जर व्यवसाय कुणी केला तर त्याचे कुरकुरे संपायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय जर सुरु करणार असाल तर तुमच्या लक्षात आले असेल कि ह्यासाठी सध्या किती मागणी आहे. तुम्ही अशा हा Kurkure business सहजसोप्या चालू करून भरपूर चांगला नफा घरच्या घरी मिळवू शकाल.  

कुरकुरे व्यवसाय चालू कारण्यासाठी तुम्हाला लागणारी जागा | Place to start your Kurkure business

Kurkure business तुम्ही घरच्याघरी सहजरित्या चालू करू शकता. ह्यासाठी तुम्हाला जे काही मटेरियल आणि वस्तू लागतील त्या तुम्ही होलसेल मध्ये बाजारामधून मागवून घेऊन कुरकुरे बनवू शकता. ह्यासाठी तुम्हाला कुठेही वेगळी जागा बघण्याची गरज नाही.

एखादी छोटीशी लहानशी खोली जरी असेल तरी तुम्ही तिथून हा Kurkure business करू शकता. कधीकधी बरेच जण असा विचार देखील करतात कि त्यांच्याजवळ काही फारशी जागा नाही तर ते कसा काय आम्ही कुठला व्यवसाय चालू करू शकू. पण असे काही तेवढे महत्वाचे नसते कि तुमच्याकडे जर जागा असेल तरच तुम्ही एक चांगला व्यवसाय करू शकाल.

तुम्हाला ह्यासाठी जागेपेक्षा तुम्ही तो तुमच्या स्वयंपाकघरातच कसा चालू करता येईल ह्याचा विचार आणि नियोजन कराल. कुठलाही व्यवसाय करण्यासाठी प्रथम आपल्याला जे जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्या त्या प्रॉब्लेम चे आपल्याला सोलुशन किंवा उत्तर मिळवणे आवश्यक असते.

त्यामुळे कुठलाही व्यवसाय यशस्वी कारण्यासाठी जो काही प्रॉब्लेम आणि आपल्याला प्रश्न असतील ते तुम्ही प्रथम त्याचे उत्तर मिळवणे महत्वाचे आहे. अशा कोणत्याही ज्या काही अडचणी असतील त्यावर मात करून पुढे सरकणे  महत्वाचे असते. त्यामुळे जागेसाठी तुम्ही असेच बरेचसे योग्य ते पर्याय शोधून तुम्ही कमी जागेतसुद्धा तुमचा कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय चालू करू शकता.

नवीन फ्लेवरचे कुरकुरे तयार करून अधिकाधिक नफा कसा मिळवाल । How to get more profit by making many types of flavoured Kurkure

तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आले असेलच कि कुरकुरे ह्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर किंवा आकारामध्ये वेगवेगळ्या रीतीने बदल करून तुम्ही तुमचे कुरकुरे अधिकाधिक खपवू शकता.

बाजारामध्ये ह्याची खूपच चांगली मागणी आहे. तुम्हाला सध्या हल्दीराम, बालाजी हे ब्रँड किती प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. कंपन्या नेहमी त्यांचे जे फूड प्रॉडक्ट्स असतात. त्यामध्ये काहीतरी नवीन आणून त्याचे नाव बदलून ते मार्केटमध्ये विकत असतात. लोकांना सुद्धा वेगवेगळ्या चवीसाठी असे पदार्थ खाण्यासाठी खूप आवडतात.

तुम्ही सुद्धा असेच तुम्ही पदार्थामध्ये थोडे फ्लेवर मध्ये बदल करून नवनवीन चटकदार मसाले वापरून किंवा इतर काही तुम्ही बदल करून तुमचे कुरकुरे जास्तीत जास्त तुम्ही मार्केटमध्ये खपवू शकता. तुमच्या नवनवीन कल्पना किंवा पाककलेच्या कौशाल्याद्वारे कुरकुरे अजून वेगळ्या प्रकारे लोकांना कसे देता येतील त्याप्रमाणे विचार करून तुम्ही तुमचा नफा अधिकाधिक मिळवू शकता.  

कुरकुरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्यासाठी खर्च. | Material and investment for Kurkure making

कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवरचे पीठ, छोले पीठ, मसाले पावडर, सुखे मसाले, तेल, इत्यादी वस्तू तुम्हाला आणाव्या लागतील. तुम्ही ह्या सर्व वस्तू होलसेल मार्केटमधून तुम्हाला किती कुरकुरे बनवायचे आहेत त्याप्रमाणात विकत घेऊ शकता. 

ह्यासाठी लागणारा खर्च हा तुमच्या गरजेप्रमाणे किंवा तुम्ही सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट करू शकाल त्याप्रमाणे तो ठरवणे जास्त महत्वाचे ठरते. जसे तुम्ही सर्व प्रथम १ किलोसाठी तुम्हाला किती खर्च येईल आणि त्यामध्ये तुम्ही किती कुरकुरे पॅक बनवू शकाल. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा खर्च ठरवू शकाल.

सगळ्या वस्तूंचा येणारा खर्च एकत्र लिहून ठेवावा म्हणजे नंतर ज्यावेळी तुम्हाला तुमच्या कुरकुरे साठी नफा मिळवून जी किंमत ठरवावी लागेल ती ठरवायला तुम्हाला सोपे जाईल. अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला व्यवस्थितपणे व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टीचे नियोजन करावे लागेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे तुमचा व्यवसाय चालू करता येईल.  

कुरकुरे बनवण्यासाठी लागणारी मशीन आणि त्यासाठी खर्च. | required machine and investment for Kurkure business

कुरकुरे बनवण्यासाठी तुम्ही जर मशीन विकत घेणार असाल तर बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या मशिन्स उपलब्ध आहेत. त्या तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकता. जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल आणि तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर तुम्ही मशीन विकत घेऊन कुरकुरे बनवू शकता.

मशीनद्वारे तुम्ही मोठ्या प्रमाणात कुरकुरे प्रोडक्शन करू शकता. मशीन लावण्यासाठी तुम्हाला जवळजवळ पूर्ण प्लान्ट तयार करण्यासाठी ६ लाखाच्या जवळपास खर्च येऊ शकतो. हे मशीन तुम्हाला किती कुरकुरे एका तासामध्ये हवे आहेत त्या प्रमाणात ह्या मशीन बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

जसा तुम्हाला जास्त माल कमी वेळेत हवा असेल तशी त्या मशीनची किंमत वाढली जाते. त्याबरोबर ह्यामध्ये GST सुद्धा नंतर ऍड करून त्या मशीनची किंमत ठरते. जर तुम्ही मशीन घेऊ शकत नसाल तर तुम्ही घरच्या घरी हॅन्ड मशीनद्वारे कुरकुरे बनवून छोट्या विकू शकता. 

मशिनशिवाय तुम्ही कच्चे कुरकुरे सुद्धा होलसेल मध्ये विकत घेऊन त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर्स टाकून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे पॅक करून विकू शकता. तुम्ही ह्यासाठी पॅकेजिंग मशीन घ्यायची सुद्धा गरज नाही.

तुम्ही त्याऐवजी साधे कागदी बॅग्समध्ये किंवा चांगल्या ग्रेडच्या बॅग्समध्ये कुरकुरे पॅक करून विकू शकता. किंवा जर तुमचे बजेट पॅकेजिंग मशीन घेण्याइतके आहे तर तुम्ही त्यासाठी इन्व्हेस्ट करून तुमच्या स्वतःच्या ब्रॅण्डच्या नावाने कुरकुरे पॅक करून चांगल्या रीतीने नफा मिळवू शकता. त्यामुळे मशीन घेण्यासाठी तुम्हाला कोणताही ज्यास्तीचा खर्च न करता सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता.

कुरकुरेसाठी लागणारे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन । License And registration for Kurkure business

तुम्हाला ह्यासाठी सर्वप्रथम GST आणि फूड लायसन्स (FSSAI) ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. त्यानंतर तुम्ही स्वतःचा ब्रँड स्थापित करणार असाल तर तुम्ही टट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन ची गरज आहे. ह्याव्यतिरिक्त तुम्ही प्रदूषण नियंत्रण अजून FIRE रजिस्ट्रेशन पण करणे आवश्यक आहे. इतर माहिती तुम्ही जवळपास सरकारी कार्यालयातून घेऊ शकता.  

कुरकुरेसाठी ट्रेनिंग । Kurkure Training

कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग ची गरज नाही. तुम्ही युट्युब किंवा गूगल वर रेसिपी शोधून ते बनवायला शिकू शकता. किंवा तुम्ही कच्चे कुरकुरे आणून त्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकून वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स तयार करू शकता. त्यामुळे ह्यासाठी तुम्हाला वेगळा ट्रेनिंग घेण्यासाठी खर्च करावा लागणार नाही.  

कुरकुरेसाठी लागणारा स्टाफ आणि पॅकेजिंग । Staff and Packaging required for Kurkure

कुरकुरे व्यवसायात तुम्हाला साधारण ९ ते १० लोक लागू शकतात जर तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमचा व्यवसाय उभारणार असाल. पण जर तुम्ही कच्चा तयार माल होलसेलमध्ये विकत आणून तुमचा व्यवसाय चालू करणार असाल तर ह्यासाठी तुम्हाला जास्त लोकांची गरज लागणार नाही.

तुम्ही फक्त पॅकेजिंगसाठी कुणीतरी हाताखाली एकजण ठेवू शकता. किंवा घरच्याघरीच तुम्ही कुणाची तरी मदत घेऊन तुम्ही काम चालू करू शकता.

पॅकेजिंग करण्यासाठी तुम्ही रेडिमेड मॅकेजिंग मटेरियल घेऊ शकता. तुम्हाला जर स्वतःचा ब्रँड हवा असेल तर तुम्ही तुमचे पॅकेजिंग दुसऱ्या कोणत्या पॅकेजिंग कंपनीकडे सुद्धा देऊ शकता. किंवा तुम्ही पॅकेजिंग मशीन विकत घेऊन कुरकुरे पॅक करू शकता. 

कुरकुरे व्यवसायासाठी मार्केटिंग । Marketing for Kurkure business

मार्केटिंगसाठी तुम्ही दुकानांमध्ये कुरकुरे पॅक sample म्हणून देऊ शकता. जसजसे दुकानदाराला कुरकुरेसाठी गिर्हाईक मिळत जाईल तसतशा तुमच्या ऑर्डर्स वाढत जातील. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला सर्व दुकानांमध्ये मार्केटिंग करणे योग्य ठरते. तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरसुद्धा तुमचा Kurkure business रजिस्टर करू शकता. किंवा तुम्ही सोशल मीडियाद्वारे फेसबुक,इंस्टाग्राम, व्हाट्सअँप द्वारे तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.

अशा रीतीने तुम्ही तुमचा कुरकुरे बनवण्याचा Kurkure business चांगल्या पद्धतीने करू शकता. सुरुवातीला तुम्ही घरच्या घरी कच्चा माल आणून हा व्यवसाय चालू करू शकाल. जसा तो जास्तीत जास्त तुम्हाला नफा मिळवून देईल त्या प्रमाणात मग तुम्ही तुमचा व्यवसायात अजून इन्व्हेस्टमेंट करून चांगला वाढवू शकता. 

रसगुल्ला रेसिपी । Rasagulla Recipe in Marathi

काजू कतली रेसिपी । Kaju Katli Recipe in Marathi

पालक पनीर रेसिपी । Palak Paneer Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?