कुरकुरीत समोसा रेसिपी । Kurkurit Samosa Recipe in Marathi

कुरकुरीत समोसा रेसिपी । Kurkurit Samosa Recipe in Marathi

समोसा (Kurkurit Samosa Recipe) घरी करायला गेले की कुरकुरीत होत नाही. जेवढा आपण बाहेर स्टॉलवर चविष्ट समोसा खातो त्याप्रमाणे जर घरच्या घरी तुम्हाला समोसा बनवायला आला तर किती मस्त. तर ही एक रेसिपी देत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुरकुरीत असा घरच्या घरी समोसा बनवता येईल तर चला पाहूया समस्या तयार करण्याची रेसिपी.

Kurkurit Samosa
Kurkurit Samosa

कुरकुरीत समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • दोनशे ग्रॅम मैदा
  • एक चमचा ओवा
  • चाळीस ग्रॅम तूप
  • चवीनुसार मीठ
  • दोनशे ग्रॅम बटाट्याचे तुकडे
  • शंभर ग्राम हिरवे मटार
  • हिरवी मिरची, आले
  • एक चमचा लाल मिरची पावडर

कृती

  1. समोसाचे वरच्या आवरण तयार करण्यासाठी मैदा बारीक केलेला ओवा तूप आणि चवीनुसार मीठ एकत्र करून पीठ मळावे.
  2. तयार झालेले पीठ आल्या फडक्याने झाकून ठेवावे.
  3. तेल गरम करून जिरे टाकावेत.
  4. प्रथम बटाटे उकडून घ्यावेत.
  5. जिऱ्याचा कलर बदलल्यानंतर कापलेले थोडे आले हिरवी मिरची टाकावी.
  6. नंतर हिरवे मटार, बटाट्याचे तुकडे, लाल मिरची पावडर, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकावा.
  7. कडे मध्ये बटाट्याची भाजी थोडीशी वापरून द्यावी त्याच्यामध्ये हवी असल्यास कोथिंबीर टाकावी.
  8. मळून ठेवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून लाटावे.
  9. मध्यातून गोळे कापून राहिलेल्या भागाला कोणा सारखा आकार द्यावा.
  10. कोन पाणी लावून जोडावा व केलेली बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये भरून घ्यावी. भाजी भरल्यानंतर कोन पूर्ण बंद करून घ्यावा.
  11. कढई मध्ये तेल गरम करून केलेले समोसे कुरकुरीत होईपर्यंत तळावे.

समोसे अतिशय कुरकुरीत होतात आणि चविष्ट देखील लागतात. तुम्हाला जर थोडासा आंबटपणा हवा असेल तर त्यासाठी तुम्ही आमचूर पावडर किंवा थोडासा लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकला तर समोस्याची चव आणखीन चांगली येईल. हा समोसा नक्की एकदा घरी करून पहा आवडल्यास शेअर करा आणि कमेंट करा.

उत्तपम रेसिपी । Uttappam Recipe in Marathi

आवळा चुंदा रेसिपी । Awala Chunda Recipe in Marathi

गाजराचे पुडिंग । Gajarache Puding Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee