श्री महालक्ष्मीची आरती l Mahalakshmi aarti lyrics in marathi
हिंदू लोकांमध्ये महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी महालक्ष्मीची आरती (Mahalakshmi Aarti) गायली जाते. महालक्ष्मी ही भाग्याची देवता म्हणून मानली जाते.
घरामध्ये समृद्धी संपत्ती यासाठी महालक्ष्मीची प्रार्थना केली जाते. महालक्ष्मीची पूजा करून तिचे आव्हान करून आणि तिला आरती म्हणून व प्रसाद देऊन महालक्ष्मीला आव्हान केले जाते
देवीसमोर दिवा लावला जातो. अगरबत्ती आणि फुले वाहिली जातात व एक धूप हातामध्ये धरून आणि एका हातामध्ये घंटी वाजवून ही आरती म्हटली जाते.
मंदिरामध्ये ही आरती मोठ्या वाद्य आणि समूहामध्ये म्हटली जाते. महालक्ष्मीच्या आरती मध्ये लक्ष्मीचे सौंदर्य, तिने केलेली कृपा आणि उदारता यांसारख्या गुणांवर स्तुती करण्यात आली आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील संपत्ती आणि समृद्धी याचे महत्त्व देखील यामध्ये सांगितले गेले आहे. आपल्याजवळ जे काही आहे त्यासाठी कृतज्ञ म्हणून आणि देवीचे आपल्यावर सदैव आशीर्वाद राहावे म्हणून ही Mahalakshmi Aarti गायली जाते.
महालक्ष्मीची आरती ही आपण दिवाळीचा सण आला की आपल्याकडे महालक्ष्मीचे पुजन केले जाते त्यावेळी म्हंटली जाते. महालक्ष्मीचे पुजन सर्वांच्या घरी होते परंतु सर्वांना आरती पाठ नसते. इथे व्यवस्थित पुर्ण आरती दीली आहे जी तुम्हाला पाठांतर करता येईल व पुजेच्या वेळी म्हणता येईल.
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
जय देवी जय देवी…॥
Jai Devi Jai Devi Jai Mahalakshmi.
Vasasi Vyapakarupe Tu Sthoolasukshmi.
Jai Devi Jai Devi…
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी…॥
Karavirapuravasini Suravaramunimata.
Puraharavardayini Muraharapriyakanta.
Kamalakare Jathari Janmavila Dhata.
Sahastravadani Bhudhara Na Pure Gun Gaata.
Jai Devi Jai Devi…
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥
Matulinga Gada Khetaka Ravikirani.
Jhalka Hatkavati Piyusharaspani.
Manikarasana Surangavasana Mrigayanini.
Shashikaravadana Rajas Madanachi Janani.
Jai Devi Jai Devi…
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥
Tara Shakti Agamya Shivabhajakan Gauri.
Sankhya Mhanti Prakriti Nirguna Nirdhari.
Gayatri Nijabija Nigamagama Sari.
Pragate Padmavati Nijadharmachari.
Jai Devi Jai Devi…
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥
Amritabharite Sarite Aghadurite Vari.
Mari Durghata Asuran Bhavadustara Tari.
Vari Mayapatla Pranamata Parivari.
He Rupa Chidrupa Davi Nirdhari.
Jai Devi Jai Devi…
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी…॥
Chaturananene Kushchit Karmanchya Oli.
Lihilya Asatil Mate Mazhe Nijabhaali.
Pusoni Charanatali Padasumane Kshali.
Mukteshvara Nagara Kshirasagarabali.
Jai Devi Jai Devi…
अंबाची सुखसदने शशिवदने आरती l Ambachi Sukhsadne Shashivadne Aarti
एकविरा आईची आरती l Ekvira Aarti
सप्तश्रृंगी मातेची आरती l Saptashringi Mata Aarti