युट्युब चॅनेलसाठी विडिओ कसे तयार करू शकता | How to make videos for YouTube Channel in Marathi

युट्युब चॅनेलसाठी विडिओ कसे तयार करू शकता | How to make videos for YouTube Channel

तुम्ही युट्युब चॅनेल सुरु करणार म्हंटले कि सर्वप्रथम तुम्हाला विडिओ तयार करणे (make videos for YouTube Channel) सर्वात जास्त महत्वाचे असते. मग तुम्ही तो विडिओ कसा तयार करणार आणि त्या विडिओ साठी लागणारे कन्टेन्ट तयार करण्यासाठी काय काय करावे ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात.

म्हणून तुम्ही तुमचा विषय युट्युब चॅनेलसाठी निवडला कि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला तयार करायच्या असतात. ह्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या विडिओ तयार करायला लागणाऱ्या सर्व गोष्टी पडताळून पाहणे आवश्यक आहे. ह्या ब्लॉगमध्ये आपण विडिओ कोणत्या प्रकारे तयार करू शकता आणि विडिओ तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ह्याबद्दल माहिती घेऊ.

तुम्ही विडिओ तुमच्या मोबाईलद्वारे कॅमेराचा वापर करून तयार करू शकता किंवा तुम्ही मोबाइल ऍपचा वापर करून विडिओ तयार करू शकता. तुम्ही जर स्वतःचे विडिओ तयार करणार असाल आणि व्हिडिओसाठी कोणती एक्सट्रा इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेराचा वापर करून विडिओ तयार करू शकता.

त्यासाठी तुम्ही मोबाइलला स्टॅण्डचा वापर करून तुमचा विडिओ रेकॉर्ड करू शकता. त्यासाठी तुम्हाला जर विडिओ बनवण्याची सवय नसेल तर तुम्ही त्यासाठी स्वतःचा विडिओ तयार करण्याची प्रॅक्टिस करून मग तुमचे युट्युब चॅनेलचे विडिओ तयार करून युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता.

काहीजण समोर म्हणजे कॅमेरासमोर यायला घाबरतात किंवा काही कारणास्तव ते कॅमेरासमोर येत नाहीत. तुम्हाला जरी कॅमेरासमोर यायचे नसले आणि विडिओ तयार करायचे असले तरी तुम्ही मोबाइलला ऍप च्या मदतीने देखील विडिओ तयार करू शकता. ह्यासाठी तुम्ही कोणतेही चांगले मोबाइल ऍप गुगल प्लेस्टोरमध्ये शोधून त्यामध्ये तुम्ही विडिओ तयार करू शकता.

त्यासाठी तुम्ही विडिओ तयार करायला शिकून आणि मुसिक आणि आवाज विडिओ ला देऊन नंतर ते विडिओ डाउनलोड करून युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता. अशा अनेक प्रकारे तुम्ही विडिओ तयार करू शकता. फक्त तुम्हाला विडिओ बनवता आले पाहिजेत आणि त्याद्वारे लोकांना योग्य ती माहिती देता आली पाहिजे. तुम्ही विडिओ कोणत्याही प्रकारे बनवा फक्त त्या व्हिडिओचा जो कन्टेन्ट आहे तो लोकांना उपयुक्त आणि आवडेल असा आणि लोकांची करमणूक किंवा माहिती पुरवणारा असा असला पाहिजे.

युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करण्यासाठी लागणारा कन्टेन्ट | Content required for YouTube Channel

जसे तुम्ही विडिओ तयार करण्याचा विचार करता आणि विषय निवडता त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यासाठी लागणार कन्टेन्ट तुमच्याकडे तयार असला पाहिजे. असे व्हायला नाही पाहिजे कि एक विडिओ बनवला आणि दुसरा बनवायला घेतला तर कसा आणि कोणता विडिओ तयार करायचा हेच कळत नाही.

त्यामुळे विषय निवडतात योग्य तो विषय निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि त्या विषयावर तुम्ही वेगवेगळे टॉपिक घेऊन तो विषय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवायला जमले पाहिजे. नाहीतर तुमचा विषय जर चुकला तर तुम्ही त्या विषयावर जास्त विडिओ बनवायला जमणार नाहीत. आणि त्यामुळे तुम्हाला नंतर चॅनेलवर विडिओ बनवणे अवघड जाईल. त्यामुळे योग्य तो तुमच्या आवडीचा असा विषय निवडून तुम्ही त्यावर कोणते विडिओ बनवू शकता हे विचारपूर्वक ठरवून मगच त्या विषयावर चॅनेल बनवणे आवश्यक आहे.

तुमचा कन्टेन्ट एकदा तयार झाला कि तो विडिओ बनवायच्या अगोदर एकदा चेक करून घेणे आवश्यक आहे. नंतर मग तुम्ही त्या कन्टेन्टनुसार विडिओ बनवायला घेऊ शकता. त्यामुळे तुमचा विडिओ नंतर परत एडिट करावा तुम्हाला लागणार नाही. परत परत विडिओ बनवण्यापेक्षा जर सुरुवातीला विडिओ कन्टेन्ट अगोदरच नीट केला तर विडिओ व्यवस्थित बनवायला तुम्हाला सोपे जाते.    

युट्युब चॅनेल विडिओसाठी कन्टेन्ट तयार करण्यासाठी सर्वप्रथम चेकलिस्ट तयार करणे | Checklist for the content of  video for YouTube channel

विडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कन्टेन्टची आवश्यकता असते. तो कन्टेन्ट तुम्ही अगोदरच तयार करून ठेवला तर तुम्ही जास्तीत जास्त विडिओ युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता. नियमितप्रमाणे युट्युब चॅनेलवर विडिओ अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुमच्याकडे कन्टेन्ट आणि टॉपिक तयार असेल तर तुम्ही विडिओ नियमित अपलोड करू शकता. आणि विडिओ schedule करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला विडिओ बनवण्यासाठी गडबड होणार नाही. अगोदरच विडिओ तयार असतील तर तुम्ही ते प्रत्येक दिवशी कॅलेंडर प्रमाणे सेट करू ठेवू शकता.

चेकलिस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला एक्सेल किंवा गुगल डॉकचा वापर करून तुम्ही कोणत्या तारखेला कोणत्या टॉपिकवर विडिओ बनवणार आहे आणि तो अपलोड कोणत्या तारखेसाठी करणार आहे ह्याची माहिती तुम्ही तिथे टाकू शकता. तसेच कुठल्या टॉपिकवर कुठला कन्टेन्ट आहे ते एका वर्ड फाईलमध्ये  तुम्ही प्रत्येक टॉपिकच्या विडिओ साठी एक फाईल तयार करून त्यात तुमचा मेन कन्टेन्ट तयार करून ठेवू शकता.

यूट्यूब चॅनेल बनवून घर बसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी

योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे 

युट्युब शॉर्ट्स आणि युट्युब विडिओ चॅनेल

यूट्यूब शॉर्ट्सद्वारे पैसे कसे कमवायचे

गार्डन बनवा आणि यूट्यूब चॅनेल सुरू करा

पाळीव प्राणी YouTube चॅनेल कसे सुरू करावे

Cooking यूट्यूब चॅनेल

युट्युब चॅनेलसाठी विडिओ कसे तयार करू शकता

युट्युब चॅनेल सुरु करताना विडिओ तयार करण्याअगोदर काही महत्वाच्या स्टेप्स

व्हिडिओ क्रिएशन  एक अत्यंत चांगली घरबसल्या पैसे कमावण्याची संधी

युट्युब चॅनेल विडिओसाठी कन्टेन्ट तयार करण्यासाठी लागणारी माहिती | Information required for content of video for YouTube channel

कन्टेन्ट तयार करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम त्या कॉंटेच्या रिलेटेड वेगवेगळे विडिओ युट्युब चॅनेलवर पाहून तो विडिओ कसा तयार केला आहे. आणि त्या व्हिडिओसाठी कन्टेन्ट कसा वापरला आहे हे पाहून घेणे आवश्यक आहे.

त्यानंतर तुम्ही गुगलवर सर्च करून त्याविषयी अजून माहिती घेऊन तुम्ही तुमच्या नोट्स तयार करू शकता. तसेच तुम्ही जो विषय निवाडला आहे त्या विषयावरील बुक्स वाचून त्यामधून देखील अजून माहिती गोळा करू शकता.

तुम्ही एवढी सगळी माहिती घेऊन नंतर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करून आणि तुमच्या कल्पनेप्रमाणे लोकांना चांगला वाटेल असा स्वतःचा कन्टेन्ट तुम्ही तयार करुऊ शकता.

तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कि तुम्ही कन्टेन्ट डुप्लिकेट किंवा कुणाचा कॉपी करून घेऊ शकत नाही. तुम्हाला त्यासाठी स्वतःची मेहनत आणि त्या विषयावर अभ्यास करून तुम्ही तुमच्या नोट्स काढून आणि तुमच्या अनुभवाचा वापर करून स्वतःचे पॉईंट्स तयार करून त्याप्रमाणे तुमचा कन्टेन्ट तयार करणे आवश्यक आहे.

तुम्हाला तुमच्या विषयाबद्दल विविध माहिती सर्वत्र मिळू शकता पण त्याचा उपयोग करून तुम्ही लोकांना कशी कलात्मकरीत्या आणि इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे माहिती पुरवत आहेत हे पाहणे आवश्यक आहे.

म्हणून तुम्ही त्याविषयी नीट विचार करून लोक तुमचा विडिओ का बघतील आणि कधी बघतील ह्याचा विचार करून त्याप्रमाणे तुमचा कन्टेन्ट तयार करणे आवश्यक आहे. शेवटी तुमचा कन्टेन्ट आणि विडिओ जर चांगला आणि इतरांपेक्षा वेगळा असेल तर लोक नक्कीच तुमचा युट्युब चॅनेल पाहणे पसंद करतील.  

चेकलिस्ट हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट आहे ज्यावेळी तुम्ही एखादे स्वतःचे काम चालू करू शकता. कोणत्याही कामामध्ये सर्वप्रथम तुम्हाला नियमितपणा जास्त महत्वाचा असतो.

तुम्ही जेवढे तुमचे काम नियमितपणे आणि योग्य त्या मार्गाने कराल त्यानुसार तुमचे यश अवलंबून असते. म्हणून तुम्ही तुमच्या कामामध्ये नियमितपणा आणण्यासाठी तुम्हाला चेकलिस्ट बनवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे चेकलिस्ट नेहमी वापरून त्याप्रमाणे कामाला लागणे देखील तितकेच महत्वाचे आहे. तुम्हाला जर चेकलिस्टमध्ये नंतर काही बदल करायचे असतील तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करू शकता.

विडिओ नियमितपणे अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे अगोदर विडिओ तयार असणे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही एक महिण्यासाठी चेकलिस्ट तयार करून नंतर कन्टेन्ट आणि विडिओ तयार करून ते schedule करू शकता.

म्हणजे तुमच्याकडे अगोदरच एका महिन्यासाठी विडिओ तयार असतील आणि नंतर तुम्ही पुढच्या महिन्यासाठी विडिओ तयार करून ते पण अगोदरच बनवून ठेवू शकता. अशा रीतीने तुम्ही चेकलिस्ट तयार करून विडिओ नियमितप्रमाणे तयार करून तुम्ही तुमचा चॅनेल ग्रो करू शकता.   

युट्युब चॅनेलसाठी स्वतःचा चेहरा दाखवून विडिओ तयार करणे | Making video by showing face for YouTube channel

तुमच्याकडे कन्टेन्ट तयार असला कि तुम्हाला नंतर विडिओ कसा तयार करायचा आहे त्याप्रमाणे विडिओ तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्ही तयार करू शकता.

त्यासाठी विडिओ एडिट करण्यासाठी ऍप डाउनलोड करून ठेवू शकता. आणि स्वतःचा जर विडिओ अपलोड करणार असाल तर त्यासाठी तुमचा मोबाइल कॅमेरा चांगला असला पाहिजे. आणि नंतर तुम्ही विडिओ बनवण्याची प्रॅक्टिस करून मग विडिओ तयार करायला सुरु करू शकता.

विडिओ तयार करताना तुमचा आवाज आणि विडिओ ची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. तुम्ही तो विडिओ तयार झाला कि तो विडिओ एकदा पाहून त्यात काही चूक वगैरे झाली आहे का ते पाहून नंतर विडिओ तुम्ही युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता.

जर तुमचा विडिओ चांगला झाला नसेल तर तुम्हाला तो एडिट किंवा परत बनवून मग तो चॅनेलवर अपलोड करू शकता. परत परत विडिओ बनवायला लागू नये म्हणून अगोदरच विडिओ बनवण्याची प्रॅक्टिस करून मगच विडिओ तयार करावा आणि नंतर अपलोड करून घ्यावा.  

अशा रीतीने तुम्ही सहजपणे स्वतःचा चेहरा दाखवून युट्युब चॅनेल बनवण्यासाठी विडिओ तयार करू शकता. काही लोकांना विडिओ तयार करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो पण तुम्ही जर नियमितपणे त्याची सवय कराल तर तुम्हाला नंतर विडिओ बनवणे सोपे जाऊ शकते. 

युट्युब चॅनेलसाठी स्क्रिन रेकॉर्डिंग करून विडिओ तयार करणे | Making Screen recording videos for YouTube channel

जसे तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवून विडिओ तयार करू शकता. तसे तुम्ही तुमचे डॉक किंवा प्रेसेंटेशन दाखवूंन देखील तुम्ही विडिओ बनवू शकता. जर तुम्हाला काही शिकवायचे असेल तर तुम्ही तुमचे एक पॉवरपॉईंटमध्ये प्रेजेंटेशन तयार करून पॉवरपॉईंटमध्ये विडिओ रेकॉर्ड करून तो तुम्ही युट्युब चॅनेलवर अपलोड करू शकता.

तसेच तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप स्क्रीन रेकॉर्डिंग करून देखील तुम्ही विडिओ तयार करू शकता. ह्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये स्क्रिन रेकॉर्डिंग असते. तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपसाठी स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेऊन त्याद्वारे स्क्रीन रेकॉर्ड करून घेऊ शकता. अशा रीतीने तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून देखील चांगले विडिओ तयार करू शकता.

युट्युब चॅनेलसाठी विडिओ ऍपचा वापर करून विडिओ बनवणे | Making videos by using best video app for YouTube Channel

आपण पहिले कि तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवून तुम्ही विडिओ कसे बनवू शकता. आपण इथे विडिओ ऍपचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा न दाखवता कसा विडिओ बनवू शकता हे पाहू. ह्यासाठी तुम्हाला एक चांगले मोबाइल ऍप निवडून त्याद्वारे तुम्ही विडिओ बनवू शकता.

बरेचसे ऍप तुम्हाला गुगल प्लेस्टोरमध्ये मिळून जातील ज्याच्या मदतीने तुम्ही चांगले विडिओ बनवू शकता. जसे कि मोबाईलवर विडिओ तयार करण्यासाठी काइनमास्टर हे ऍप वापरून बरेचसे युटूबर विडिओ तयार करतात.

तुम्ही देखील ह्या ऍपचा वापर करून विडिओ बनवू शकता. इतर काही ऍप पण आहेत जे चांगले ऍनिमेशन विडिओ किंवा चांगले इफेक्ट्स वापरून तुम्ही विडिओ चांगल्या प्रकारे बनवू शकता. तुम्हाला जे योग्य आणि सोपे जाईल असे ऍप वापरून तुम्ही विडिओ तयार करू शकता. पुढील ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या विडिओ ऍपची माहिती घेऊ ज्याद्वारे तुम्हाला विडिओ बनवण्यासाठी मदत होईल.

अशा प्रकारे तुम्ही युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करण्यासाठी कोणकोणत्या महत्वाच्या स्टेप्स वापरू शकतो आणि कसे चांगले विडिओ तयार करू शकतो हे पहिले. पुढील ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या विडिओ ऍपची आपण माहिती घेऊ ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे विडिओ तयार करणे तुम्हाला सोपे जाईल.     

Categories

    

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Toowoomba-Au10 Best hellofresh meals you must tryDaily green smoothie to Glow your Skin10 Easy mid day meals you must try!10 home chef fresh and easy meals
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Toowoomba-Au10 Best hellofresh meals you must tryDaily green smoothie to Glow your Skin10 Easy mid day meals you must try!10 home chef fresh and easy meals