मारुती स्तोत्र l Maruti Stotra

मारुती स्तोत्र l Maruti Stotra

मारुती स्तोत्र हे शक्तिशाली हनुमान साठी केलेली एक प्रार्थना आहे. आजच्या लेखांमध्ये आपण मारुती स्तोत्र विषयी जाणून घेऊया आणि माहिती स्तोत्र कशा रीतीने तुम्ही म्हणायचे हे देखील पाहूया.

हिंदू धर्मामध्ये मारुती स्तोत्र (Maruti Stotra) लाअत्यंत महत्त्व आहे. ही एक संस्कृत प्रार्थना आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी सतराव्या शतकामध्ये हनुमान चालीसा ही रचली गेली. महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा दर शनिवारी मारुती मंदिरात किंवा घरामध्ये म्हटले जाते.

ही प्रार्थना जे कोणी म्हणतात त्यांना हनुमान तर्फे चांगली शक्ती आणि ताकद मिळते. हनुमान जो श्रीराम यांचा अत्यंत प्रिय भक्त आहे. तुम्हाला जर संकटापासून दूर जायचं असेल आणि तुम्ही कुठल्या संकटामध्ये जर अडकला असेल तर तुम्ही मारुती स्तोत्र म्हणून त्या संकटापासून लांब राहू शकता.

तुमच्या आयुष्यामध्ये शांतता, यश आणि वैभव प्राप्त करण्यासाठी मारुती स्तोत्र (Maruti Stotra) म्हणावे. निगेटिव्ह एनर्जी पासून वाचण्यासाठी मारुती स्तोत्राचा जास्त उपयोग केला जातो.

ज्यांना पर्सनल आणि पर्सनल लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी मारुती स्तोत्र नियमितपणे म्हणावे. मारुती स्तोत्र म्हटल्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, आरोग्य, रिलेशनशिप किंवा इतर चॅलेंज यांना पार करण्याची शक्ती मिळते. मारुती स्तोत्र नियमितपणे म्हटल्याने विचारांमध्ये एक क्लॅरिटी येते, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी पावर वाढण्यास मदत होते.

मारुती स्तोत्र (Maruti Stotra) कशाप्रकारे म्हणावे?

मारुती स्तोत्र तुम्ही दिवसांमध्ये कधीही म्हणू शकता. शक्यतो करून मंगळवारी आणि शनिवारी मारुती स्तोत्र (Maruti Stotra) म्हटले जाते. तुम्ही मारुती स्तोत्र ग्रुप मध्ये म्हणू शकता किंवा स्वतंत्रपणे देखील म्हणू शकता.

मारुती मंदिरामध्ये जाऊन देखील मारुती स्तोत्र (Maruti Stotra) म्हटले तरी अत्यंत लाभदायक आहे. मारुती स्तोत्र 108 वेळा म्हटले असता याचे लाभ तुम्हाला जास्तीत जास्त लवकर मिळू शकतात. मारुती स्तोत्र म्हणण्यापूर्वी आंघोळ किंवा स्वच्छ हात पाय आणि तोंड धुवून नमस्कार करून देवाला दिवा लावून आणि उदबत्ती लावून शांत अशा ठिकाणी देवासमोर बसावे. मनामध्ये हनुमानची प्रतिमा आणून ही प्रार्थना किंवा स्तोत्र म्हणण्यास सुरुवात करावी.

अशाप्रकारे मारुती स्तोत्र (Maruti Stotra) हे एक अत्यंत पावरफुल असा मंत्र आहे ज्यामुळे तुम्हाला जर घरामध्ये शांती, वैभव आणि सर्व संकटांपासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही याचा 108 वेळा नियमित जप करावा. ज्याच्यामुळे हनुमान प्रसन्न होऊन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरपूर यश आणि आनंद मिळवून देण्यास मदत करेल.

Maruti Stotra

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती।

वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।1।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।

सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।।2।।

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा।

पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना ।।3।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।

पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।4।।

ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें ।

काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।5।।

ब्रह्मांड माईला नेणों, आवळें दंतपंगती।

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।6।।

पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं।

सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।7।।

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू।

चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।8।।

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।

मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।9।।

 आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती ।

मनासी टाकिलें मागें, गतीस तूळणा नसे ।।10।।

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे।

तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।11।।

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं शके।

तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।12।।

आरक्त देखिलें डोळां, गिळीलें सूर्यमंडळा ।

वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।13।।

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही ।

पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।14।।

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।

नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।15।।

दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।16।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण।

रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।17।।

।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee