मॅकडोनाल्ड बिझनेस । Start your McDonald’s franchise business in Marathi

मॅकडोनाल्ड बिझनेस Start । your McDonald’s franchise business in Marathi

सर्वांना McDonald अगदी परिचित असेलच. आणि मॅकडोनाल्ड चे बर्गर तर नक्कीच खावून पाहिले असतील तुम्ही. तुमच्या लक्षात आले असेल की मॅकडोनाल्ड बर्गर किती चवीला चांगले आहे आणि का लोक मुख्य करून लहान मुले कधीही हा बर्गर खायला उत्सुक असतात.

McDonald
McDonald

शहरामध्ये जास्त करून मॅकडोनाल्ड चे रेस्टॉरंट उपलब्ध आहेत. बऱ्याच शाखा मेन चौकामध्ये आहेत. त्यामुळे कुणीही हे रेस्टॉरंट पाहिले की जायला चुकत नाही. शिवाय बर्गर ची किंमत देखील खिशाला परवडणारी असते. कुणाला जरी लंच करायचा म्हंटले तरी मॅकडोनाल्ड मध्ये जावून बर्गर खातात.

त्यामुळे मॅकडोनाल्ड बर्गर ची प्रसिध्दी तर सर्वत्रच आहे. जर तुम्ही ह्याची franchisee घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला मॅकडोनाल्ड सोबत व्यवसाय करण्याची एक चांगली संधी आहे.

मॅकडोनाल्ड व्यवसाय । McDonald’s business

McDonald रेस्टॉरंट बद्दल सर्व माहिती प्रथम आपण जाणून घेऊ. मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट हे गुणवत्ता आणि फास्ट सर्व्हिस साठी खूप फेमस आहे. तुम्ही ऑनलाईन service सुध्दा घेवू शकता. शिवाय रेस्टॉरंट मध्ये पण जावून ऑर्डर घेवू शकता.

रेस्टॉरंट मध्ये तुम्ही कधी गेला असेल तर लक्षात आले असेल की तुमच्या ऑर्डर्स अगदी कमी वेळेत डिलिव्हर केल्या जातात.

हा व्यवसाय एक franchisee बेस व्यवसाय आहे. त्यामुळे ह्याच्या बऱ्याचशा franchisee रेस्टॉरंट बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक देशामध्ये मॅकडोनाल्ड franchisee उपलब्ध आहेत. तुम्हीही अशी franchisee घेवून तुमचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता.

ह्या व्यवसायासाठी तुम्हाला franchisee घेण्यासाठी सर्वप्रथम कंपनी मालकांना contact करून franchisee साठी मागणी करू शकता. ह्यासाठी तुम्हाला भांडवल आणि योग्य अशी जागेची देखील आवश्यकता असते.

मॅकडोनाल्ड आउटलेट । McDonald’s outlet

मॅकडोनाल्ड चे भारतामध्ये प्रमुख दोन आउटलेट आहेत. आणि त्याच्या सब ब्रांचेस देशामध्ये विखुरल्या आहेत. उत्तर भारत मध्ये कॅनॉट रेस्टॉरंट आणि दक्षिण भारतात हार्डकेसल रेस्टॉरंट ही प्रामुख्याने भारतातील franchiseee आहेत. तुम्हाला franchisee साठी ह्या दोन्हीपैकी एखाद्या रेस्टॉरंट शी संपर्क करून तुम्ही franchisee साठी रिक्वेस्ट करू शकता.

McDonald’s franchise business in Marathi

McDonald हा व्यवसाय सर्वप्रथम रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड ह्या दोघां भावांनी चालू केला. प्रामुख्याने San Bernardino, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथील हे रहिवासी असून त्यांनी हा व्यवसाय अमेरिकेमध्ये सर्वप्रथम सुरू केला.

McDonald भावांनी हा व्यवसाय चालू करण्यामागचे एक मेन उद्दिष्ट होते. ते की कमीत कमी पैशांमध्ये सर्व लोकांना लंच कसे देता येईल. म्हणून एक ठराविक पॅकेजमध्ये जे बसेल ते फूड देण्यात आले. जसे की बर्गर आणि त्यासोबत potato chips ज्याला फ्रेंच फ्राईज असे म्हणतात. आणि त्यासोबत एक कोल्ड्रिंक्स. एवढे सगळे तुम्हाला अगदी कमीत कमी म्हणजे इतर रेस्टॉरंट पेक्षा जवळ जवळ अर्ध्या किमतीमध्ये तुम्ही पूर्ण लंच कराल इतपत सोय मॅकडोनाल्ड मध्ये देण्यात आली.

पिझ्झा व्यवसाय । How to start Pizza Business in Marathi

त्याच्यानंतर सर्वात speedy सर्व्हिस कशी देता येईल ह्या गोष्टीकडे देखील सर्वप्रथम लक्ष देण्यात आले . त्यामुळे तुम्ही कोणत्याही मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये गेला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांची सर्व्हिस किती फास्ट आहे.

अशा रीतीने चांगली गुणवत्ता आणि फास्ट service देवून सर्वांचे मन जिंकून हा व्यवसाय वाढू लागला.

नंतर मॅकडोनाल्ड कंपनीची franchisee Ryan Rock यांनी घेतली आणि हा व्यवसाय अजून वाढवण्यासाठी franchisee देण्यास सुरुवात केली.

त्याच्यानंतर हा व्यवसाय वाढत गेल्याने त्यांनी प्रत्येकाला ज्यांना कुणाला ह्या व्यवसायासाठी पार्टनर व्हायचे आहे त्यांना franchisee देण्यास सुरुवात केली.

1961 मध्ये मॅकडोनाल्ड ब्रदर्स ला मॅकडोनाल्ड कंपनीतून बाजूला केले आणि हा व्यवसाय व्यापक करण्यासाठी इतर देशामध्ये franchisee देण्यास सुरुवात केली.

नंतर क्रॉक च्या लक्षात आले की नुसती frqnchisee नाहीतर स्टाफ पासून ते क्लिनर पर्यंत सर्वांना ट्रेनिंग द्यायची गरज आहे. म्हणून त्यांनी सर्व स्टाफ तसेच किचन chef पासून सर्व्हिस बॉय पर्यंत सर्वासाठी एक प्रोग्राम तयार केला. आणि त्याच्यामध्ये सर्व टीम सेट करून त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देण्यात आले.

त्यामुळे एक discipline सर्व मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये मेन्टेन राहील आणि एक स्टँडर्ड मेन्टेन राहील ह्याची काळजी घेतली गेली.

जसजसा हा व्यवसाय जास्त प्रॉफिट मध्ये होवू लागला तसा ह्याच्या franchisee साठी बऱ्याच देशांमधून मागणी वाढू लागली. मॅकडोनाल्ड बिझिनेस एवढं व्यापक आहे की जवळजवळ 40000 ब्रंचेस सर्व जगभर आहेत. आणि सर्व देशामध्ये ह्या व्यवसायाला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने हा व्यवसाय अजूनच वाढत चालला आहे.

https://growthackmarathi.com/candle-business-in-marathi/

मॅकडोनाल्ड साठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी । Essentials for McDonald’s

मॅकडोनाल्ड franchisee सुरू करण्याअगोदर सर्वप्रथम मॅकडोनाल्ड क्या लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे प्रथम जाणून घेणे जास्त महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही गुगल वर mcdonald franchise साठी जी डॉक्युमेंट असेल ती डाऊनलोड करून त्यामध्ये कोणकोणते नियम आणि अटी आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

सर्वात प्रथम ज्यावेळी franchisee सुरू करायची असते त्यावेळी प्रथम आपणास त्यासाठी मालकांना काही ठराविक रक्कम द्यावी लागते. मॅकडोनाल्ड साठी साधारण 30 लाखाच्या आसपास तुम्हाला रक्कम द्यावी लागते. शिवाय रेस्टॉरंट साठी काही जागेसाठी देखील खर्च असतो. ह्याच्यानंतर तुम्हाला सामानाचा खर्च आणि सामान खरेदी करण्यासाठी मॅकडोनाल्ड च्याच विक्रेत्याकडून सामान खरेदी करावे लागते.

अशा अनेक नियम आणि अटी सर्वप्रथम व्यवस्थित वाचून घेवून जो येणारा खर्च आहे तो आपल्या खिशाला परवडणारा आहे का आणि तितकेसे तुमच्याकडे भांडवल आहे का ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

जरी तुमच्याकडे भांडवल नसेल तरी तुम्ही बँकेकडून लोन घेवून देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. जे काही डॉक्युमेंट franchisee सुरू करण्यासाठी लागतात ते तुम्ही वकीलाकडून माहिती घेवून आणि सर्व गोष्टी नीट वाचून घेवून पुढच्या गोष्टीसाठी तुम्ही तयारी करू शकता.

मॅकडोनाल्ड साठी डॉक्युमेंट आणि इंटरव्ह्यू । Document and interview for McDonald’s

मॅकडोनाल्ड साठी तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट पाहून नंतर तुम्ही franchisee साठी फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एक फोनवर इंटरव्ह्यू देवून नंतर तुम्हाला थोड्या दिवस रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला काम कसे चालते ह्या गोष्टी पाहून घ्याव्या लागतील. त्याच्यानंतर तुम्ही परत एक इंटरव्ह्यू असतो जोकी मॅकडोनाल्ड पॅनल घेते. त्याच्यामध्ये जर तुम्ही interview मध्ये जर माहिती व्यवस्थित दिली तर तुम्हाला त्याच्यानंतर मॅकडोनाल्ड ची franchisee दिली जाते. नंतर तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी आणि डॉक्युमेंट सबमिट करून तुम्ही तुमचे रेस्टॉरंट चालू करू शकता.

मॅकडोनाल्ड franchisee साठी लागणारी जागा । Space required for McDonald’s franchisee

मॅकडोनाल्ड franchisee ज्यावेळी तुम्ही सुरू कराल त्यावेळी मॅकडोनाल्ड ची टीम तुम्ही जी जागा रेस्टॉरंट साठी वापरणार आहात ती सर्वेक्षण करते. शिवाय जर तुमच्याकडे जागा नसेल तर मॅकडोनाल्ड स्वतः देखील तुम्हाला रेस्टॉरंट साठी जागा देते. तुम्हाला त्यासाठी महिन्याचे जो काही रेंट आहे तो रेंट मॅकडोनाल्ड ला द्यावा लागतो.

Restaurant साठी एक ठराविक मोजमाप आहे जेकी मॅकडोनाल्ड franchisee देण्याआधी मॅकडोनाल्ड टीम पाहते. 50000 हजार वर्गफुट जागा लागते. त्याप्रमाणे रेस्टॉरंट साठी किचनला स्पेस आणि लोकांना बसण्यासाठी थोडी जागा लागते. मॅकडोनाल्ड चे जे रेस्टॉरंट असतात ते सर्व रेस्टॉरंट एकसारखे असतात. त्यामुळे त्यांच्या ज्या जागा आहेत त्या बघूनच नंतर रेस्टॉरंट ची franchisee दिली जाते.

जी जागा निवडली आहे त्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था देखील पहिली जाते. पार्किंग आणि आसपास जर स्वच्छ परिसर असेल तर तुम्हाला franchisee लगेच मिळू शकते.

त्याबरोबरच रेस्टॉरंट ची जागा कोणत्या area मध्ये आहे हे देखील पाहिले जाते. जसे की हॉस्पिटल, कॉलेज आणि मेन रोड जवळील जागेला प्राधान्य दिले जाते. तसेच जर मेन रोड इतर रोड ना जर कनेक्ट असतील तर त्यासाठी देखील franchisee दिली जाते.

शिवाय franchisee साठी ज्या काही डॉक्युमेंट किंवा परवान्याची आवश्यकता असते तो तुम्ही सरकारी कार्यालयात जावून घेवू शकता. इतर कोणत्या डॉक्युमेंट ची आवश्यकता आहे हे देखील तुम्ही पाहून घेवू शकता.

निष्कर्ष । Conclusion

अशा रीतीने जर तुम्हाला ह्या व्यवसाची franchisee हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे लागणाऱ्या सर्व गोष्टीची तयारी करू शकता. शिवाय सर्व डॉक्युमेंट वाचून घेवून त्या अटी आणि नियम जर मान्य असतील तर तुम्ही ह्या व्यवसायाला प्रारंभ करू शकता.

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Albury-Wodonga-AuLala green smoothie to glow your skin11 Autumn Salad using Anti-Inflammatory Ingredients11 most popular mexican recipes you should tryTop 10 fast food burger chains in california
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Albury-Wodonga-AuLala green smoothie to glow your skin11 Autumn Salad using Anti-Inflammatory Ingredients11 most popular mexican recipes you should tryTop 10 fast food burger chains in california