पापड उद्योग । Papad making business in Marathi

पापड उद्योग । Papad making business in Marathi

पापड उद्योग (Papad making business) हा व्यवसाय घरगुती व्यवसाय म्हणून महिलांना करता येण्यासारखा व्यवसाय आहे. ज्यामुळे घरिबसल्या महिला इन्कम करू शकतात.

Papad making business
Papad making business

घरोघरी गावी पापड बनवले जातात आणि ते वर्षभरासाठी खाण्यासाठी वापरले जातात. तुम्ही पण घरामध्ये पापड बनवत असालच ना.

तुमच्याकडे जर अशी पापड बनवण्याची कला असेल आणि आवड असेल तर तुम्ही वेवेगळ्या प्रकारचे पापड बनवून तुमचा एक घरी बसल्या व्यवसाय चालू करू शकता.

काही गृहिणी पापड बनवण्यामध्ये अत्यंत निपुण असतात. त्यांना हा उद्योग चांगला फायदा देऊ शकतो. तर मग तुम्ही असेच पापड बनवून भरपूर पैसे कमवू शकता. तुम्ही जर घरी बऱ्याच प्रकारचे पापड बनवत असाल तर तुम्ही ते विकून देखील चांगले पैसे कमवू शकता.

आपल्या घरामध्ये प्रत्येक जण उन्हाळा आला म्हंटले कि वर्षभरासाठी चांगले रुचकर पदार्थ बनवण्यासाठी तयारी केली जाते. अ

शा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे उन्हाळी पदार्थ आपण वर्षभर खाण्यासाठी वापरतो. त्यासाठी मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, वेगवेगळ्या प्रकारचे भाजी बनवण्यासाठी सांडगे,वेगवेगळ्या प्रकारच्या पिठापासून डाळीपासून पापड तयार केले जातात.

तुम्ही जर असेच पापड बनवून ते तुम्ही बाजारामध्ये विकले तर तुम्ही एक चांगला नफा मिळवू शकाल. तुम्ही कोणत्याही प्रकारचे पापड बनवू शकता. जर तुम्हाला अशी पापड बनवण्याची कला किंवा आवड असेल आणि तुम्ही घरी ते बनवत असाल तर तुम्हाला पापड बनवून चांगले पैसे मिळू शकतात. आणि तेही घरीबसल्या तुम्ही हे काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही.

पापड हे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. मुख्यत्वेकरून हे पापड उन्हाळ्यामध्ये तयार केले जातात.

काही पापड आपण कधीही तयार करू शकतो. उदाहरण मध्ये उडदाचे पापड तुम्ही कधीही तयार करू शकता. तसेच आजकाल असे काही नाही कि उन्हाळ्यामधेच ऊन असते. बऱ्याच वेळा ऊन असतेच त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे पापड तयार करू शकता. उडदाचे पापड उन्हामध्ये वाळवायचे नसतात त्यामुळे तुम्ही ते कधीही तयार करू शकता.

त्यासाठी तुम्ही कोणकोणते पापड बनवू शकता त्या पापडाचे सर्व साहित्य घरी आणून तुम्ही भरपूर पापड तयार करू शकता.

तुमची हि आवड तुम्हाला चांगल्या प्रकारचा उद्योग म्हणून तुम्हाला उपयोगी पडू शकता. मग जर तुम्ही खरेच इच्छूक असाल तर तुम्ही ह्याची लगेचच सुरुवात करू शकता. त्यासाठी वेळ दवडण्याची गरज नाही. लगेचच सर्व गोष्टीची तयारी करून पापड बनवून त्याचे वेगवेगळे पॅकेट्स तयार करून शेजोपाजारी सुद्धा देखील तुम्ही ते विकू शकता.   

पापड बनवण्यासाठी तुम्ही कोणता एक प्रकारचा पापड जरी विकायला सुरुवात केली तरी चालू शकते. सुरुवातीला कोणता जो तुम्हाला सोप्या आणि सहज पद्धतीने तयार करता येईल अशा पापडाचे निवड करून तुम्ही त्या पापडाचे किलोप्रमाणे पॅक करून ते बाजारात विकायला देऊ शकता.

किंवा तुम्ही स्वतः घरून ते विकू शकता. बऱ्याच प्रकारचे पापडाचे प्रकार हे तयार केले जातात. महाराष्ट्रात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड तयार केले जातात. त्यामुळे तुम्ही ह्यांच्यामध्ये भरपूर काही प्रकार किंवा मोजकेच काही प्रकारचे पापड बनवून तुमचा व्यवसाय चालू करू शकता.

साबुदाण्याचे पापड,तांदळाचे पापड, गव्हाच्या कुरवड्या, नाचणीचे पापड, उडदाचे पापड. असे अनेक प्रकारचे पापड आपण तयार करू शकतो. तुम्हाला ह्यांच्यापैकी काहीतरी पापड नक्कीच येत असतीलच ह्यात काही शंकाच नाही.

सगळ्यात सोपे पापड हे साबुदाण्याचे पापड आणि उडदाचे पापड आहेत. काही इतर पापड जरी घरी बनवत नसाल तरी तुम्ही हे दोन्ही पापड तर नक्कीच घरी बनवत असाल. मग हेच पापड विकून तुम्ही तुमचा चांगला व्यवसाय उभारू शकता.  

समजा जर तुम्ही सुरुवात साबुदाण्याच्या पापडांपासून केली तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतील ते आपण पाहू.

हे पापड तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साबुदाणा आणावा लागेल. सर्वांच्या घरी तर सहजपणे साबुदाणा उपलब्ध असतो.

मग तुम्ही उन्हाळा चालू झाला कि लगेचच साबुदाण्यापासून पापड तयार करू शकता. ह्यांच्यामध्ये पण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे पापड तयार केले जातात.

साबुदाण्याचे शिजवून केलेले पापड, उकडून केले गेलेले पापड, किंवा साबुदाण्याच्या चकल्या किंवा सांडगे असे वेगवेगळ्या प्रकारे साबुदाण्यापासून पापड तयार करून तुम्ही ह्यामध्येच चांगले पारंगत होऊ शकता. त्यासाठी तुम्ही ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपीस युट्युब, गुगल किंवा इतरांकडून शिकून घेऊन बनवू शकता.

पापड तयार करण्यासाठी तुम्ही सर्व साहित्य एकत्र करून पापड तयार करण्यासाठी काही चांगल्या युट्युब चॅनेलद्वारे तुम्ही हे पापड शिकून घेऊ शकता. तसेच सुरुवातीला थोड्या कमी प्रमाणात हे पापड तयार करून ते तुम्ही घरी खाण्यासाठी ठेवू शकता.

जसजसे तुम्ही पापड तयार करण्यात पारंगत व्हाल तसे तुम्ही नंतर प्रमाण वाढवून जास्त प्रमाणात पापड तयार करता येईल हे पाहू शकता.

नंतर हे पापड चांगल्या रीतीने व्यवस्थित पॅकिंग करून विकण्यासाठी ठेवू शकता. सुरुवातीला तुम्ही छोटे छोटे पॅक तयार करून ते विकण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. नंतर तुम्ही हळूहळू जसे तुमचे पापड विकले जातील तसे १ किलो किंवा २ किलो चे पॅकिंग करून तुम्ही ते विकू शकता.

ह्यांच्यामध्ये तुम्हाला जास्त काही वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही. आणि हे पापड लगेचच बनतात.

तुम्ही जर शिजवून पापड बनवणार असाल तर हे अत्यंत सोप्या रीतीने बनले जातात. तुम्हाला फक्त मीठ आणि गरम पाणी उकळवून त्यामध्ये रात्रभर भिजवलेला साबुदाणा टाकून तो शिजून द्यायचा. एका पातेल्यात गरम पाणी आणि साबुदाणा झाकून ठेवायचा थोड्या वेळात तुम्ही बघाल साबुदाणा पाण्यामध्ये शिजला आहे.

मग तुम्ही हे मिश्रण लगेचच उन्हामध्ये एक पातळ कागदावर एका खोलगट पळीच्या साहाय्याने गोल गोल आकारामध्ये तुम्ही हे छोटे छोटे पापड सोडू शकता.

दिवसभर चांगल्या उन्हामध्ये हे वाळवून घेऊन परत दुसऱ्या दिवशी ते उलटून तुम्ही परत सुकण्यासाठी उन्हामध्ये ठेवून द्यावेत. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जसा मसाला हवा असेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याचा वापर करून फ्लेव्हरप्रमाणे पापड तयार करू शकता.

तुम्ही साबुदाण्याचे पापड बनवायला कसे सोपे आहेत हे पहिले तसेच उडदाचे पापड बनवणे देखील अत्यंत सोपे आहे ह्यासाठी देखील तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. आजकाल तर बाजारामध्ये उडदाचे पापड तयार करण्यासाठी तयार पीठे देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही हे पापड तयार करणे तुम्हाला अगदी सोपे जाते.

तुम्ही फक्त हे पीठ विकत आणून ते मळून घेऊन त्यापासून पापड लाटू शकता. पापड लाटण्यासाठी तुम्हाला पापडाचे लाटणे आणि पोळपाट लागेल.

त्याच्यावर तुम्ही पापड लाटून ते तुम्ही घरातल्या घरात वाळवू शकता. पापड वाळवण्यासाठी मोठ्या कागदावर तुम्ही पापड ठेवून नंतर थोडे सुकल्यानंतर लगेच एकावर एक ठेवून त्यावर काहीतरी जाड वस्तू ठेवून तसेच ठेवू शकता. म्हणजे हे पापड सरळ राहतात.

त्यामुळे हे पापड तुम्ही कधीही तयार करू शकता. ह्यासाठी तुम्हाला उन्हाची किंवा उन्हाळ्याची वाट बघावी लागत नाही. कोणत्याही सीझनमध्ये हे पापड तयार करून तुम्ही विकू शकता. तुम्हाला सुरुवातीला पापडासाठी लागणारे पीठ तयार करण्याची गरज नाही. 

ते तुम्ही तयार विकत आणू शकता. नंतर मग जसा तुमचा हात बसेल आणि अंदाज येईल तसे मग नंतर तुम्ही हे पापडाचे पीठ घरच्या घरी तयार करू शकता. त्यासाठी पीठ तयार करण्यासाठी तुम्ही रेसिपी किंवा दुसऱ्या कुणाची तरी मदत घेऊन हे पीठ तयार करायला शिकू शकता.  

अशा प्रकारे तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने हे पापड बनवू शकता. ३ ते ४ दिवसामध्ये कडक उन्हामध्ये चांगले वाळल्यानंतर तुम्ही ते काढून घ्यावेत. आणि त्याचे तुम्ही तुम्हाला जसे पॅकिंग करून विकायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पॅक तयार करून विकू शकता.

काही जण ऑर्डरप्रमाणे देखील हे पापड तयार करतात आणि विकतात तुम्ही देखील तसे सुद्धा करू शकता. अगोदरच पापड टेस्टला देऊन त्याप्रमाणे कुणाला पापड हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता.

पापड तयार कारण्यासाठी जागा । Place for Papad business

पापड तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरगुती जागा पुरेशी असते. तुम्ही छोट्या प्रमाणात तुमचा उद्योग चालू करणार असाल तर तुम्ही घरच्या घरी हा व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला पापड सुकवण्यासाठी छोटेसे अंगण किंवा टेरेस पुरेसा आहे. आणि पापड तुम्ही घरातच तयार करू शकता.

कोणकोणत्या प्रकारचे पापड तयार करू शकता । Which types of Papad you can make?

तुम्ही बऱ्याच प्रकारचे पापड तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला जे पापड तयार करता येतात ते तुम्ही विकू शकता.

किंवा तुम्ही थोडेफार फ्लेव्हर तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवू शकता. पापड तसे बऱ्याच प्रकारचे असतात. आणि त्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार देखील केले जातात. तुम्हाला सहज आणि सोपे पडेल असे पापड तुम्ही बनवू शकता. पापडाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. तुम्ही ह्यापैकी कोणत्याही पापडाचा व्यवसाय करू शकता.

  • साबुदाण्याचे पापड
  • बटाट्याचे पापड
  • उडदाचे पापड
  • नाचणीचे पापड
  • तांदळाचे पापड
  • ज्वारीचे पापड

अशा अनेक प्रकारचे पापड तुम्ही तयार करून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता.

पापडासाठी लागणारे साहित्य । Material for Papad business

पापडासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे पापड बनवणार आहे त्याप्रमाणे ते साहित्य तुम्ही नजीकच्या दुकानातून विकत आणू शकता. तसेच तुम्ही तुमच्या ओळखीच्या दुकानातून सामान कमी किमतीमध्ये आणून त्याचे पापड तयार करू शकता.

ह्यासाठी तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या नजीकच्या  होलसेल  विक्रेत्याकडून पापडासाठी लागणारे सर्व साहित्य विकत घेऊ शकता.

पापडासाठी लागणारी मशीन । Machine for Papad making

पापडासाठी सुरुवातीला कोणत्याही मशीनची गरज लागत नाही तुम्ही घरच्या घरी हे पापड तयार करू शकता. तुमच्या घरी तुम्ही आणि तुमच्या मदतीला तुम्ही काही लोक ठेवून तुम्ही पापड तयार करू शकता.

जर तुम्हाला मशीन हवे असेलच तर तुम्ही indiamart.com ह्या वेबसाइट वर जाऊन कमी किमतीमध्ये तुम्हाला परवडेल त्याप्रमाणे तुम्ही मशीन घेऊ शकता. खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हि मशीन मिळून जाईल.

https://dir.indiamart.com/impcat/papad-making-machine.html

लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन । License and registration

पापड हा व्यवसाय तुम्ही घरून चालू करू शकता. तुमचा हा व्यवसाय चालू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जी.एस.टी. रेजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल जसजसे तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या रीतीने वाढेल तसे तुम्ही इतर रेजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक असते.

जसे कि तुम्ही शॉप ऍक्ट, ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन,  अशा प्रकारचे तुम्ही लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. इतर माहिती तुम्ही तुमच्या नजीकच्या सरकारी कार्यालयातून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या व्यवसायाचे रेजिस्ट्रेशन करू शकता.

पापडसाठी लागणारे पॅकेजिंग । Packaging for Papad

पापड बनवून ते चांगल्या रीतीने पॅक करण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रतीच्या प्लास्टिक बॅग्सचा वापर करू शकता. किंवा तुम्ही कागदी बॅग्समध्ये देखील पॅकिंग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही पॅकिंग घरच्या घरी करू शकता.

तुम्ही १०० ग्रॅमपासून ते २ किलो, ३ किलो असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅक तयार करू शकता. आणि त्याप्रमाणे तुम्ही किंमत आणि तुमच्या ब्रँडचे लेबल देखील बनवून पॅकेजवर लावून घेऊ शकता.

तुमच्याकडे जर मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स असतील तर तुम्ही पॅकिंग बाहेरून देखील करून घेऊ शकता. काही कंपन्या पॅकिंगच्या ऑर्डर्स घेतात आणि व्यवसायासाठी पॅकेजिंगचे काम करतात. तुम्ही तिथून सुद्धा पॅकिंग करून घेऊ शकता.

किंवा तुम्ही कोणीतरी पॅकेजिंगचे काम करण्यासाठी तयार असेल तर तुम्ही त्याला पॅकेजिंगचा खर्च देऊन त्याप्रमाणे तुमचे पापड पॅक करून घेऊ शकता. 

पापड व्यवसायासाठी लागणारे कारागीर किंवा स्टाफ । Staff for Papad business

तुम्हाला जर पापड तयार करण्यासाठी कुणाला स्टाफ ठेवायचा असेल तर तुम्ही स्टाफ ठेवू शकता. किंवा कुणी मदतीला पापड बनवण्यासाठी आणि ते सुकविण्यासाठी तुम्ही मदतनीस ठेवू शकता. तुमचा व्यवसाय जसजसा सेटअप वाढत जाईल तसतसा तुम्ही तुमचा स्टाफ वाढवू शकता.

पापड व्यवसायासाठी लागणारा खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट। Cost and investment for papad business

ह्या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या ऑर्डर्सप्रमाणे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला सुरुवातीला ज्या ऑर्डर्स येतील त्या ऑर्डर्ससाठी लागणारे साहित्य विकत घ्यावे लागेल तेवढा खर्च तुम्ही स्वतः करू शकता.

किंवा तुम्ही तुम्हाला जो कस्टमर येईल त्याच्याकडून तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन त्याप्रमाणे पापडसाठी लागणारे साहित्य खरेदी करू शकता.

जशा तुमच्या ऑर्डर्स वाढत जातील आणि तुमचा नफा वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही नंतर तुमच्या व्यवसायासाठी इन्व्हेस्टमेन्ट वाढवू शकता. तुम्हाला जो नफा मिळत जाईल त्यातील काही हिस्सा तुम्ही पापड व्यवसायासाठी वापरू शकता. आणि तुमच्या इन्व्हेस्टमेन्ट वाढवू शकता.

त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला पापड व्यवसायासाठी तुम्ही जास्त काही इन्व्हेस्ट किंवा खर्च करण्याची गरज लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही पापड विकण्याचा व्यवसाय घरी बसून कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही चालू करू शकता. ह्यासाठी तुम्हाला जास्त खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नसते.

पापड व्यवसायासाठी मार्केटिंग  । Marketing for Papad business

मार्केटिंगसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे मार्केटिंग करू शकता. तुम्हाला नजीकच्या लोकांना किंवा तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता.

त्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाईन सुद्धा ऍमेझॉन, फ्लिपकार्ट ह्यासारख्या वेबसाईटवर रजिस्टर करून घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती तुम्ही तुमच्या व्हाट्सअँप द्वारे देऊ शकता.

तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम पेजवर देखील तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकता. अशा अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करून तुम्ही तुमचा व्यवसाय द्विगुणित करून चांगला नफा कमवू शकता.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा पापडाचा व्यवसाय चांगल्या रीतीने घरीबसल्या चालू करू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा पापडाचा व्यवसाय चांगल्या रीतीने चालू करून एक चांगला घरी बसल्या तुमचा व्यवसाय चालू करू शकता.

१. सर्वप्रथम तुम्हाला कोणते पापड बनवायचे आहेत ते ठरवून घेणे आवश्यक आहे.

२. त्यानंतर ते पापड तुम्ही बनवायला येत नसतील तर ते शिकून घेणे आवश्यक आहे.

३. शिकून झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करण्यासाठी एक तुमचा स्वतःचा व्यवस्थित प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.

४. प्लॅन तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लागणारा खर्च लिहून ठेवणे.

५. तुमचा खर्च आणि इन्व्हेस्टमेंट नंतर तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करून दिवसाप्रमाणे तुम्ही किती पापड तयार कराल ह्याचे एक टार्गेट ठरवून त्याप्रमाणे तुम्ही काम चालू कराल.

६. त्यानंतर तुमच्या मालाचे जसा तो तयार होईल तसे त्याचे व्यवस्थित पॅकेजिंग करणे आवश्यक आहे.

७. नंतर तो माल ग्राहकापर्यंत तुम्ही कसा पोहोचवाल त्यासाठी मार्केटिंग प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.

८. ऑफलाईन मार्केटिंग बरोबरच तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगद्वारे जास्तीत जास्त कस्टमर कसा मिळवता येईल हे पाहणे देखील आवश्यक आहे.

९. जसा नफा वाढत जाईल तसे तुम्ही तो नफा तुम्ही तुमच्या व्यवसायात कसा योग्य रीतीने इन्वेस्ट कराल ही देखील अत्यंत आवश्यक स्टेप आहे.

अशा रीतीने तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून तुमचा पापड बनवण्याचा व्यवसाय तुम्ही चालू करून चांगला नफा मिळवू शकाल.

आणखी काही बिझनेस आयडिया –

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग

चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल?

कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Cairns-Au9 Veggie That Americans Love the Most!11 Air Fryer recipes you must try!The Best 11 Breakfast Sandwiches for Busy Mornings11 greens to simple Green Smoothies to glow your Skin