पेपर प्लेट तयार करण्याचा व्यवसाय । Paper plate business one of the small and easy in Marathi

पेपर प्लेट तयार करण्याचा व्यवसाय । Paper plate business in Marathi

Paper plate business हा एक सध्या ट्रेण्ड मध्ये चालत असलेला एक चांगला बिझनेस आहे. पेपर प्लेट आपल्याला समारंभासाठी लागतात. ज्यावेळी घरी birthday celebration किंवा छोटे समारंभ असतात त्यावेळी paper plate ची आवश्यकता असते.

Paper plate business
Paper plate business

आपण बाहेर कधी फिरायला गेलो तर घरून टिफिन घेऊन गेलो की आपल्याला खाण्यासाठी पेपर प्लेट लागतात. बाहेर कधी नाश्त्यासाठी गेलो कि तिथे सुद्धा आपल्याला खाण्यासाठी पेपर प्लेटमध्ये खायला दिले जाते.

बऱ्याच कार्यक्रमामध्ये जर छोटी पार्टी असेल तर तिथे देखील पेपर प्लेट चा वापर करतात. अशा अनेक प्रकारचे वेवेगळे खाण्यासाठी आपण पेपर प्लेटचा उपयोग करतो. वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून स्टॉलवर जे विकले जातात त्यासाठी खायला देताना नेहमी पेपर प्लेटचा वापर केला जातो.

तुम्ही जर अशाच प्रकारच्या पेपर प्लेट बनवून एक स्वतःचा चांगला व्यवसाय करू शकता. तसेच पेपर प्लेट नंतर नष्ट करण्यासाठी सोप्या पद्धतीने त्या नष्ट करता येतात.

त्यामुळे ह्या पपेरप्लेटमुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही. त्यामुळे सध्या छोट्या उद्योजगांसाठी जे खाद्यपदार्थाचे उद्योग करत आहेत त्या ठिकाणी पेपर प्लेटची खूप मागणी आहे.    

पेपर प्लेट हा एक छोटासा व्यवसाय असला तरी छोट्या व्यवसायांना लागणाऱ्या पेपर प्लेट जर तुम्ही हा व्यवसाय करून पुरावल्या तर तुम्हाला नेहमीचे ग्राहक मिळून जातात. ह्यासाठी तुम्हाला जास्त ग्राहक शोधावे देखील लागणार नाहीत.

तुम्ही जर असे छोटे उद्योग शोधून त्यांना तुमच्या पेपर प्लेट विकल्या तर तुम्ही तुमचा ह्या व्यवसायामध्ये चांगला जम बसवू शकता. आणि तुम्ही ह्यामधून नियमित नफा कमवू शकता. त्यामुळे पेपर प्लेट हा एक अतिशय चांगला करता येण्यासारखा व्यवसाय आहे.   

पेपर प्लेट व्यवसाय करण्यासाठी लागणारी जागा | Place required for Paper plate business

हा व्यवसाय तुम्ही घरून सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर एका रूम एवढी जागा असेल तिथे तुम्ही पेपर प्लेटला लागणारी मशीन ठेवून तुमचा हा व्यवसाय चालू करू शकता. ह्यासाठी तुम्हाला कुठेही वेगळी अशी स्वतंत्र अशी जागा विकत घ्यायची गरज भासत नाही.

तुम्ही तुमच्या घरच्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय चांगल्या रीतीने करू शकता. तसेही पेपर प्लेट हा एक कच्चा माल पुरवणारा व्यवसाय आहे. त्यामुळे तुम्हाला ग्राहकाकडे जावे लागत  नाही.

तुम्हाला ह्यासाठी छोटे उद्योजकांना भेटून त्यांना तुमच्या पेपर प्लेटची माहिती देऊन त्यांना तुम्ही तुमच्या पेपर प्लेट विकत घेण्यासाठी सांगू शकता. अशा अनेक उद्योगांना तुम्ही जर चांगल्या प्रतीच्या पेपर प्लेट पुरवल्या तर तुम्हाला ह्यापासून भरपूर नफा मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय घरच्या घरी चालू करू शकता.

जर तुमच्याकडे भांडवल मुबलक आहे आणि तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर तुम्ही एखादे दुकान किंवा जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटमधे बसेल ती जागा निवडून घेऊ शकता. आणि तिथे तुमचा व्यवसाय चालू करू शकता.     

पेपर प्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Raw material for paper plate

पेपर प्लेट बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला चांगल्या पेपर ची आवश्यकता असते. हा पेपर तुम्ही जेवढा तुम्ही उत्तम गुणवत्तेचा वापराल तेवढे तुम्हाला पेपर प्लेटची  मागणी वाढेल. त्यामुळे सर्वप्रथम योग्य तो पेपर निवडणे आवश्यक आहे.

त्यानंतर तुम्ही मशीन आणि पेपर प्लेट तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य जसे कि तुम्ही जर सिल्वर पेपर वापरणार असाल तर तुम्ही सिल्वर पेपर रोल घेऊ शकता. तसेच तुम्ही पेपर कटिंगसाठी मशीन तुम्हाला विकत घ्यावी लागेल.

तुम्हाला पेपर प्लेट चे सर्व साहित्य ऑनलाईन किंवा तुमच्या नजीकच्या होलसेल दुकानातून तुम्ही खरेदी करू शकता. हे साहित्य तुम्हाला कमी किमतीमध्ये www.indiamart.com ह्या website वर देखील मिळून जाईल. इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे व्हरायटीज देखील मिळून जातील. तुम्हाला परवडेल तसे तुम्ही हे साहित्य गुणवत्ता आणि किंमत पडताळून बघून खरेदी करू शकता.

पेपर प्लेट तयार करण्याची प्रक्रिया किंवा ट्रेनिंग | How to make Paper plates or training for this business

पेपर प्लेट तयार करण्यासाठी कोणतीही ट्रेनिंग ची गरज भासत नाही. फक्त तुम्हाला जी मशीन आहे ती वापरून पेपर प्लेट तयार करता येणे आवश्यक आहे. तुम्हाला मशीन कशी वापरायची ते तुम्ही मॅनुफॅक्टरइर द्वारे तुम्हाला ह्याबाबत माहिती दिली जाते. तसेच मशीनच्या मॅन्युअल मध्ये सर्व गोष्टी उपलब्ध असतात. तुम्ही त्याप्रमाणे वाचून पेपर प्लेट स्वतः तयार करू शकता. किंवा तुम्ही युट्युब व गुगल द्वारे मशीन कसे वापरायचे त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता.

पेपर प्लेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पेपर एका ठराविक प्लेटच्या साईझ मध्ये कट करून घ्यावा लागेल. तुम्ही हा पेपर मोठ्या प्रमाणात पेपर कटिंग मशीन द्वारे तुम्ही पेपर कट करून घेऊ शकता.

त्यानंतर तुम्हाला डाय प्रेस मशीनद्वारे हा पेपर आणि त्याबरोबर जर तुम्ही सिल्वर शीट किंवा इतर डिझाईन वापरणार असाल तर तुम्ही ते डाय मशीनद्वारे प्रेस करून घेऊन तुम्ही प्लेट्स तयार करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मशीनमध्ये कटिंग प्लेट्स च्या लेअर ठेवून एका ठराविक तापमानाला गरम करून करून त्या पेपरच्या तुम्ही प्लेट्स बनवू शकता. ह्या मशीनमध्ये बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज असतात. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ह्या मशीन निवडू शकता.

प्लेट तयार झाल्यानंतर अनावश्यक राहिलेला प्लेटचा भाग ट्रिम करून घेऊन तुम्ही त्या प्लेट्स पॅकिंगसाठी तयार करू शकता. ह्या प्लेट्स सगळ्या ट्रिम करून झाल्यावर त्या एकत्र तुम्ही मोठ्या किंवा प्लॅस्टिकच्या बॅग्समध्ये पॅक करून ठेवू शकता.

पॅकिंग करण्यासाठी तुम्ही पॅकिंग मशीन विकत घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः प्लेट्स पॅक करू शकता. तुम्ही पॅकिंगसाठी प्लेट्स इतर पॅकिंग करणाऱ्या उद्योजकांकडून सुद्धा पॅकेजिंग करून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला पॅकेजिंग मशीन विकत घ्यायची गरज लागणार नाही. शिवाय तुमचा वेळ देखील वाचेल आणि तुम्हाला त्यासाठी फक्त पॅकिंगचा खर्च द्यावा लागेल.

पेपर प्लेटसाठी लागणाऱ्या मशीन आणि त्याचा खर्च | Machine and investment for paper plate business

पेपर प्लेट तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्यासाठी तुम्ही सेमिऑटोमॅटिक किंवा फुल ऑटोमॅटिक मशीनचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. तुम्ही हे मशीन निवडताना सर्वप्रथम तुम्ही ह्या युनिटमधून किती प्रोडक्शन घेणार आहे त्या प्रमाणे तुम्ही मशीन ठरवू शकता.

ह्या मशीनच्या किमती ९००० पासून ते ५०००० रुपयांपर्यंत आहेत. तुम्हाला ह्या सर्व मशीनची माहिती www.indiamart.com ह्या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता. तुम्हाला ह्यामध्ये सिंगल डाय डबल डाय अशा प्रकारच्या मशिन्स मिळू शकतील. तुम्ही स्वयंचलित मशीन घेणार असाल तर ह्या मशीन तुम्हाला थोड्या महाग मिळतील.

जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही अशी मशीन घेऊन तुमचे काम अधिक सोपे करू शकता. त्यामुळे ह्यासाठी तुम्हाला फक्त लक्ष ठेवावे लागेल. तुम्हाला कोणतेही मॅन्युअल काम करण्याची किंवा तुम्हाला त्यासाठी कामगार ठेवण्याची गरज लागणार नाही.

लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन

कोणताही व्यवसाय आपण जेव्हा चालू करतो तेव्हा आपल्याला त्याचे व्यवस्थापन चालू करताना लागणाऱ्या सरकारी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असते. तुम्ही लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन साठी तुम्ही लोकल सरकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ह्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता.

आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्व रेजिस्ट्रेशन करून घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला सर्वप्रथम जी.एस.टी.रेजिस्ट्रेशन आणि शॉप ऍक्ट लायसन्स ची आवश्यकता असते. जर तुमचा ब्रँड स्थापित करायचा असेल तर तुम्ही ट्रेडमार्क लायसन सुद्धा घेऊ शकता.

सध्या कुठलाही व्यवसाय करण्यासाठी ब्रँड असणे जास्त आवश्यक असते. तुम्ही तुमचा ब्रँड स्थापित केला तर तुमचा व्यवसाय त्या नावाने ओळखला जाईल. आणि ब्रँड व्यवसाय वाढण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.    

पेपर प्लेट व्यवसायासाठी पॅकेजिंग | Packaging for paper plate

पेपर प्लेट्स तुम्ही वेगवेगळ्या quantity मध्ये तुम्ही पॅक करू शकता. जसे कि १०० प्लेटचे पॅक किंवा ५० प्लेट चे पॅक. हे पॅक तुम्ही छोट्या पॅकिंग बॅग्समध्ये करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला पॅकेजिंग मशीनची गरज लागणार नाही.

तसेच मोठ्या पॅकसाठी तुम्ही मोठे जाड कागदी बॉक्स वापरून मोठे पॅक करू शकता. तुम्ही सुरुवातीला पॅकेजिंग साठी कोणतेही मशीन घ्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही पॅकेजिंग मशीन विकत घेऊ शकता.

तुमचा व्यवसाय जसा जास्त प्रमाणात वाढेल तसे तुम्ही पॅकेजिंगसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बाहेरून सुद्धा तुम्ही मालाचे पॅकेजिंग करून घेऊ शकता. आजकाल पॅकिंग करून देण्याचा व्यवसाय सुद्धा बरेच लोक करतात. त्यांच्याकडून तुम्ही पॅकिंग करून घेऊ शकता.    

पेपर प्लेट व्यवसायासाठी लागणारा स्टाफ | Staff for Paper plate business

पेपर प्लेट्सच्या व्यवसायासाठी तुम्ही तुम्हाला मदतीसाठी लागेल तेवढा स्टाफ तुम्ही ठेवू शकता. तुमच्या इन्वेस्टमेंटप्रमाणे तुम्ही मदतीला कामगार घेऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या घरातूनच ह्यासाठी मदत मिळणार असेल तर तुम्हाला कामगार ठेवायची गरज लागणार नाही.

जर मदतीसाठी कुणी सामानाची न्हे आन करण्यासाठी तुम्हाला जर ठेवायचे असेल तर तुम्ही कुणीतरी हाताखाली मदतीला ठेवू शकता. स्टाफ आणि कामगारांसाठी तुमच्या छोट्या उद्योगासाठी तुम्हाला कुणीही कामगार ठेवायची गरज लागत नाही.

जसजसे तुमचे मालाचे खप वाढत जातील तसतसे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कामगाराची आवश्यकता लागू शकते. त्यावेळी तुम्ही तुमच्या हाताखाली कामगार वाढवू शकता.

पेपर प्लेट व्यवसायासाठी मार्केटिंग | Marketing for paper plate business

तुम्हाला ह्यासाठी मार्केटिंग करताना विविध प्रकारच्या खाद्यव्यवसायांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. हा व्यवसाय करून तुम्ही छोट्या उद्योगांना आणि इतर छोट्या ग्राहकांना माल पुरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही ग्राहक बी२बी आणि बी२सी अशा दोन्ही प्रकारे मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला ह्यातून भरपूर फायदा मिळू शकता.

तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांना देखील तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकता. जेव्हा कोणते कार्यक्रम आयोजित केले जातात तेव्हा कंपन्या अशा पेपर प्लेट्स लागू शकतात.

त्यामुळे तुम्ही त्याठिकाणी तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकता. तसेच तुम्ही हॉटेल्सना देखील तुमच्या व्यवसायाची माहिती देऊन तुम्ही मार्केटिंग करून अजून तुमचा उद्योग वाढवू शकता.

ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही मार्केटिंग करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम द्वारे चांगल्या रीतीने अजून वाढवू शकता. त्यामुळे तुमच्या व्यवसायाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक मिळवू शकता.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा पेपर प्लेट चा व्यवसाय चांगल्या रीतीने करू शकता. तुम्हाला तुमच्या बजेटनुसार ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवून त्याप्रमाणे त्यामध्ये अजून इन्व्हेस्ट करून एक मोठी कंपनी तुम्ही स्थापित करू शकता.

आणखी काही बिझनेस आयडिया –

बेकिंग केक्स एक चांगला उद्योग

चॉकलेट तयार करण्याचा उद्योग कसा चालू कराल?

कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day