पिझ्झा व्यवसाय । How to start Pizza Business in Marathi

पिझ्झा व्यवसाय । Pizza Business in Marathi

Pizza हा पदार्थ भारतामधील नसला तरी सध्या ह्याचे क्रेझ बरेच वाढले आहे. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत पिझ्झा खाणारे शौकीन आहेत.

Pizza-Business
Pizza Business

कुणालाही घरच्या रोजच्या जेवण खाण्याचा कंटाळा येतोच. आणि कंटाळा आला की मग बाहेरील काहीतरी चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यावेळी मग आपण जेवण ऐवजी पिझ्झा, बर्गर अशा गोष्टी खाणे पसंद करतो.

सर्वांना घरामध्ये पिझ्झा बनवता येत नाही. बरेच जण पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न करतात पण त्याचे मोजमाप आणि साहित्याचे योग्य ते प्रमाण नीट कळत नसल्याने आपणास पिझ्झा तेवढा चांगला बनवता येत नाही.

आपणास अशावेळी मग domino पिझ्झा, McDonald’s पिझ्झा असे आठवते. पण समजा जर असाच पिझ्झा तुमच्यापैकी घरी सुगरण असेल आणि तिला बनवता येत असेल तर…

हा बघा असेल ना असे कुणी ज्यांना पिझ्झा आवडतो म्हणून ते पिझ्झा बनवायला शिकलेत आणि अगदी restaurant सारखा पिझ्झा तयार करतात…

मग काय तुम्ही पिझ्झा बिझिनेस करू शकत नाही का? तर असे काही नाही की ह्याच लोकांनी व्यवसाय करावा त्याच लोकांनी व्यवसाय करावा.

तर का नाही तुमच्या मनात असा विचार येत की मी माझ्या घरच्यांना जसा एवढं चांगला पिझ्झा बनवून देते तर मी देखील असा पिझ्झा बिझिनेस करू शकणार?

हो…का नाही Pizza Business करू शकणार. तुम्ही जर चांगले पिझ्झा बनवणारे असाल आणि त्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच असा व्यवसाय बनवू शकाल.

जर तुम्हाला व्यवसाय करायची इच्छा आहे आणि तुम्ही पिझ्झा व्यवसायाचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही हा व्यवसाय करू शकाल.

तर चला पाहूया कशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकाल. सर्वप्रथम तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण पाहुया..

पिझ्झा बनवण्यासाठी प्रशिक्षण । Training to make pizza

कोणताही खाद्यपदार्थ बनवायचा असेल तर त्यासाठी तो बनवण्याची माहिती आणि सवय असली पाहिजे. आणि जर तुम्हाला कोणताही खाद्यपदर्थ बनवून खायची आवड असेल तर तुम्ही असा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घ्यायची गरज पडत नाही.

तुम्ही घरच्या घरी असे खाद्यपदार्थ बनवून त्याचा व्यवसाय चालू करू शकता. पिझ्झा बनवण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनेल च्या मदतीने शिकून त्यामध्ये थोडेफार नवीन तुमच्या आवडीप्रमाणे बदल करून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

प्रशिक्षण घेण्यापेक्षा तुम्ही पिझ्झा बनवण्याची घरच्या घरी सुरुवात करून आणि घराच्यांना खायला देवून तुम्ही टेस्ट बघू शकता.

तसेच professional कूक किंवा chef असतात त्यांच्याकडून तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये क्लासेस जॉईन करून तुम्ही चांगले पिझ्झा बनवायला शिकवू शकता.

काही सरकारी कोर्सेस जे की खास महिलांसाठी उपलब्ध आहेत ते तुम्ही जॉईन कॉर्न तेथून देखील पिझ्झा बनवायला शिकू शकता.

पिझ्झा व्यवसायासाठी लागणारे साहित्य आणि खर्च । Ingredients and costs for the pizza business

पिझा तयार करण्यासाठी सर्वप्रथम पिझ्झा बेस, चीझ, बटर, ब्लॅक पेपर, चिली पावडर, अशा गोष्टींची गरज पडते.

शिवाय तुम्ही पिझ्झा टॉपिंग साठी शिमला मिर्च, कॉर्न, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोबी, पनीर, बटाटा, अशा प्रकारच्या अनेक फळ-भाज्यांचा वापर देखील करू शकता.

पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला गॅस आणि त्यासाठी लागणारी भांडी ही तुम्ही घरातील वापरू शकता किंवा तुम्ही विकत देखील आणू शकता. जर तुम्ही तुमच्या किचन मधून हा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्ही ह्या सर्व वस्तू खरेदी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही.

पिझ्झा व्यवसायासाठी लागणारी जागा । Space needed for the pizza business

पिझ्झा व्यवसाय तुम्ही एखाद्या स्टॉल वर सुरू करु शकता. किंवा तुमच्या घरून देखील करू शकता. तुमच्याकडे जर थोडी जागा असेल तर तूम्ही तिथेच छोटे पिझ्झा स्टॉल उभारून हा व्यवसाय चालू करू शकता.

किंवा तुम्ही त्यासाठी मार्केटमध्ये जागा रेंट ने घेवून किंवा विकत घेवून तुमच्या गुंतवणूक प्रमाणे हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता.

पिझ्झा व्यवसायासाठी लागणारे भांडवल किंवा गुंतवणूक । The capital or investment required for the pizza business

कमीत कमी भांडवल जरी असेल तरी तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला साहित्यासाठी सुरुवातीला लागणारा खर्च, स्टॉल आणि पिझ्झा बनवायला लागणारी भांडी आणि गॅस ह्या सर्व गोष्टींचा खर्च तुम्हाला करावा लागेल.

जरी तुम्ही ह्या व्यवसायासाठी सुरुवातीला काही गोष्टी घरूनच वापरल्या तर तुम्हाला फक्त पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि पेपर डिश आणि पार्सल साठी बॅग्स एवढं खर्च येवू शकतो.

त्यामुळे ह्या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही अगदी कमी भांडवल जरी असेल तरी तुम्ही हा व्यवसाय चांगल्या रीतीने सुरू कराल.

सुरुवात तुम्ही अगदी कमी पिझ्झा तयार करण्यापासून जरी केली तरी चालू शकेल. कारण सुरुवातीला तुम्हाला अगदी कमी कस्टमर येतील. तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही पिझ्झा तयार करून देवू शकता.

शिवाय जसे तुमचे कस्टमर वाढत जातील त्यावेळी तुम्हाला जो व्यवसायामध्ये नफा मिळेल त्याचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय अजून वाढवू शकता. तुम्ही हा नफा तुमच्या व्यवसायात अजून invest करून अजून कसे तुमचे कस्टमर मिळवता येतील ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देवू शकता.

व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे रजिस्ट्रेशन । Registration required to start a business

सुरुवातीला तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करणार असेल तर तुम्ही शॉप ॲक्ट काढून घेवू शकता. तसेच तुम्हाला व्यवसायासाठी gst आणि फूड लायसेन्स लागेल ह्या सर्व गोष्टींची तुम्ही अगोदरच तयारी करून घेवू शकता.

मार्केटिंग कशा रीतीने कराल? । How do you do marketing?

पिझ्झा साठी मार्केटीग तुम्ही सर्वप्रथम तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगून चालू कराल. तुमची तुमच्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रीणीना ह्या व्यवसायाबद्दल माहिती द्याल.

तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय अजून वाढवण्यासाठी जे मोठे व्यवसाय आहेत जसे की बँक, कंपनी इथे जावून तुम्ही तुमच्या ऑर्डर्स अजून वाढवू शकाल.

शिवाय तुम्ही नियमित येणाऱ्या customer साठी किंवा जे पिझ्झा जास्त quantity मध्ये ऑर्डर्स देतात त्यांच्यासाठी तुम्ही डिस्काउंट ठेवू शकता.

लहान मुलांना देखील पिझ्झा खाण्याची खूप अवड असते. त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे पिझ्झा ठेवू शकता. जसे की छोट्या size मध्ये त्यांना पिझ्झा देवू शकता. त्यांच्या आवडीप्रमाणे जसे की मॅगी आवडते त्याप्रमाणे तुम्ही मॅगी टॉपिंग करून पिझ्झा बनवून देवू शकता. अजून अशाच नवीन नवीन आयडिया वापरून तुम्ही pizzasathi वेगवेगळे फ्लेवर बनवून देवू शकता. जेणेकरून तुमचा कस्टमर तुमच्याकडे पिझ्झा खाण्यासाठी नक्की येईल.

ऑनलाईन सोशल मीडिया चा वापर । Use of online social media

तुम्हाला जर सोशल मीडिया बद्दल माहिती असेल तर तूम्ही सोशल मीडियाचा वापर करून देखील तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवू शकता.

त्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायाचे एक बिझनेस पेज सोशल मीडियावर तयार करून तिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल पोस्ट तयार करून अपलोड करू शकता.

जसे की तुम्ही व्हिडिओ काढून तुमच्या व्यवसायाची माहिती सोशल मीडियावर देवू शकता. ज्याच्यामुळे तुम्हाला अजून ग्राहक मिळून जातील. आणि जर तुम्हाला अजुन व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही त्यासाठी तुमच्या अजून काही इतर गावामध्ये आणि शहरामध्ये ब्रांचेस ओपन करू शकता.

अशा रीतीने तुम्ही तुमचा पिझ्झा व्यवसाय सहजरीत्या चालू करून चांगली कमाई करू शकता. ह्यासाठी सुरुवातीला तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडी व्यवस्थित प्लॅनिंग केली तर तुम्हाला ह्या व्यवसायातून चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो.

तुम्ही पिझ्झा व्यवसायासाठी व्यवस्थित एक प्लॅन तयार करून त्यानंतर पिझ्झा बनवायला शिकून त्यामध्ये अजून कोणत्या रीतीने बदल करून तुम्ही इतरपेक्षा वेगळा पिझ्झा देऊ शकाल हे पाहू शकता.

नंतर तुम्ही व्यवसायासाठी साधारण किती खर्च येवू शकेल हे पाहून त्याप्रमाणे तुम्ही भांडवल तयार करू शकता. ह्या सर्व गोष्टी सुरुवातीला पाहून तुम्ही हा व्यवसाय तुमच्या बजेटमध्ये जर होत असेल तर तुम्ही ह्या व्यवसायाला आरंभ करू शकता.

ह्यामध्ये जर तुम्ही अजून काही गोष्टी करून त्यामध्ये नावीन्य करून वेगवेगळे पिझ्झा लोकांना खायला घातले आणि चांगल्या प्रकारची फूड क्वालिटी तुम्ही दिली तर तुमचा हा व्यवसाय अधिकाधिक वाढू शकतो त्यामुळे तुम्ही जर ह्या व्यवसायासाठी विचार करत असाल आणि तुम्हाला पिझ्झा बनवण्याची कला असेल किंवा आवड असेल तर तुम्ही हा व्यवसाय चांगल्या प्रकारे पुढे न्हेवु शकता.

चपाती किंवा पोळी बनवण्याचा व्यवसाय | Chapati or Roti business in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes