पर्स तयार करण्याचा व्यवसाय | Purse making business in Marathi

पर्स तयार करण्याचा व्यवसाय | Purse making business

तुम्हाला जर शिवणकाम येत असेल आणि तुम्हाला त्यामध्ये वेगळे काही करायचे असेल तर तुम्ही पर्स तयार करण्याचा हा व्यवसाय (Purse making business) करू शकता.

Table of Contents

मुलींना बाहेर जाण्यासाठी किंवा महिलांना पर्स वापरण्यास लागतात. प्रत्येक मुलीकडे दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स असतात. पर्स तयार करण्यासाठी तुम्हाला बेसिक शिवणकाम जर येत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पर्स बनवायला शिकू शकता.

लहान पर्स पासून ते मोठ्या पर्सपर्यंत बऱ्याच प्रकारच्या पर्स मुली वापरतात. आणि एक गोष्ट म्हणजे पर्स नवीन कुठली मार्केटमध्ये पहिली कि ती नवीन डिझाईन बघून अजून नवीन पर्स घ्यायला देखील महिला आणि मुली तयार असतात. हा व्यवसाय त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर चालू शकतो.

पर्स तयार करताना तुम्हाला लेदर किंवा कपड्याच्या पर्स अशा तुम्ही बनवू शकता. ह्या पर्स तयार करण्यासाठी तुम्ही चांगले ट्रेनिंग देखील घेऊन पर्स बनवायला शिकू शकता.

किंवा तुम्ही विविध प्रकारचे युट्युब किंवा गुगल वर सर्च करून पर्स साठी कटिंग आणि शिवणकाम कसे करायचे हे देखील शिकू शकता. तसेच तुम्ही ह्यासाठी वेगवेगळे पॅटर्न कसे तयार करता येतील आणि इतरांपेक्षा वेगळ्या डिझाईन करून पर्स कशा विकत येतील हे पाहून तुम्ही हा Purse making business चालू करू शकता.

पर्ससाठी तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न बनवायला आले आणि तुम्ही जर त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करून सर्व गोष्टी शिकून घेतल्या तर तुम्ही ह्यापासून भरपूर नफा कमवू शकता.

सर्वप्रथम एक गोष्ट म्हणजे तुम्ही व्यवसायात जास्त खर्च न करता हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आणि ह्यामध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळण्याच्या संधीदेखील भरपूर आहेत. त्यामुळे हा Purse making business तुम्ही घरबसल्या चालू करून एक चांगला नफा कमवू शकाल.     

More business –

Profitable Idli-dosa business in marathi | इडली सेंटर एक चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय 2023

कॉफी शॉप आउटलेट व्यवसाय । Coffee Shop outlet business in Marathi

ब्युटी पार्लर व्यवसाय 2023 | Beauty parlor business in Marathi

पर्स हा व्यवसाय चालू करण्यासाठी जागा किती लागू शकते? | Place required for purse business

पर्स तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची आवश्यकता नसते. तुम्ही हे काम घरूनसुद्धा सहजरित्या चालू करू शकता. ह्यासाठी तुम्हाला फक्त मशीन ठेवण्याइतपत जागा लागेल आणि तुम्ही ज्या पर्स बनवल्या आहेत त्यासाठी छोटीशी जागा लागेल.

तुम्ही एका छोट्याशा रूममध्ये देखील हा व्यवसाय चालू करू शकता. जर तुम्हाला दुकान खरेदी किंवा रेंटने घेऊन हा Purse making business चालू करायचा असेल तर तुम्ही मोक्याच्या ठिकाणी चांगली जागा बघून तिथे हा Purse making business चालू करू शकता. तसेच तुम्ही घरीदेखील हा व्यवसाय चालू करू शकता. 

पर्स किती प्रकारच्या बनवल्या जातात. | Types of Purse

पर्समध्ये तुम्ही कपड्याच्या आणि लेदरच्या पर्स देखील बनवू शकता. तुमच्याकडे जर जुने शालू किंवा डिझाईनच्या साड्या असतील तर त्यापासून देखील तुम्ही चांगल्या पर्स बनवू शकता. अशा पर्स फेस्टिवल किंवा समारंभासाठी बाहेर जाताना मुली आणि महिला वापरताना दिसतात तुम्ही अशा प्रकारच्या पर्स बनवून विकू शकता.

तसेच तुम्ही चांगल्या गुणवत्तेचे लेदर वापरून देखील पर्स बनवून विकू शकता. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये डिझाईन्स तयार करून ह्या पर्स विकू शकता. तुम्ही जेवढ्या जास्त प्रकारच्या व्हरायटी ठेवलं तेवढी तुमच्या पर्ससाठी मागणीही खूप वाढेल. त्याप्रमाणे तुम्ही जर बेसिक गोष्टी शिकून किंवा इतर पुर्सच्या डिझाईन पाहून त्यापासून थोड्याशा वेगळ्या पर्स तयार करून तुम्ही विकायला ठेवू शकता.  

पर्ससाठी लागणारे साहित्य तुम्ही कुठून खरेदी करू शकता? | Material required to make purse

पर्ससाठी जे काही लागणारे साहित्य आहे ते तुम्ही कटलरी आणि होलसेल मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. तिथे तुम्हाला पर्स तयार करण्याचे सर्व साहित्य तुम्हाला मिळू शकेल.

जसे कि लेदर कापडाचे वेगवेगळे प्रकार डिझायनसाठी लागणारे सर्व साहित्य, दोरे वगैरे तुम्ही होलसेलमध्ये विकत घेऊ शकता. तुमच्याकडे जर मशीन असेल तर बाकीचा खर्च तुम्हाला फक्त पर्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी करावा लागेल. किंवा तुम्ही तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारच्या जरीच्या काटाच्या साड्या ज्या तुम्ही वापरत नाही आणि तशाच पडून आहेत त्याचा सुरुवातीला जर वापर करून चांगल्या डिझायनमध्ये पर्स बनवून तयार केल्या तर तुम्ही ह्यापासून भरपूर फायदा मिळवू शकता.

अशा साड्या सध्या महिलांकडे भरपूर प्रमाणात असतात. आणि साड्यांचा सध्या वापर खूप कमी असल्यामुळे त्या तशाच पडून राहतात. तुम्ही जर अशा साड्या वापरून चांगल्या गुणवत्तेच्या पर्स तयार करून स्वस्तामध्ये विकल्या तर अशा पर्स बऱ्याच मुली खरेदी करतात.

पर्स तयार करण्यासाठी कोणत्या मशीनची आवश्यकता असते? | Machine required for purse making

ह्यासाठी तुम्हाला शिलाई मशीनची आवश्यकता लागू शकते. त्यासाठी तुमच्याकडे घरी जरी मशीन असेल तर त्याचा वापर करून देखील तुम्ही पर्स तयार करू शकता.

तुम्हाला फक्त लेदर आणि वेगळ्या प्रकारचे मटेरियल वापरून पर्स तयार करणार असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारचा दोरा जो तुटणार नाही आणि तो त्या कपड्यासाठी योग्य असेल तो वापरून तुम्ही पर्स तयार करू शकता. तुम्हाला जर चांगल्या प्रतीची मशीन विकत घ्यायची असेल तर तुम्ही indiamart ह्या वेबसाइट वर जाऊन मशीनच्या किमतीबद्दल आणि इतर माहिती घेऊन त्याप्रमाणे खरेदी करू शकता. 

पर्स ह्या व्यवसायासाठी कोणते लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन लागू शकते? | License and registration required for purse business

तुम्हाला कोणताही व्यवसाय चालू करण्यासाठी सरकारी लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन हे लागतेच. त्यासाठी तुम्ही जी.एस.टी आणि शॉप ऍक्ट ह्या दोन्ही लायसन्ससाठी तुम्ही रजिस्टर करू शकता. इतर काही माहिती तुम्ही अकाउंटंट किंवा सरकारी कार्यालयातून तुम्ही घेऊन त्याप्रमाणे सर्व लागणारे कागदपत्र तयार करून तुम्ही वेगवेगळे लायसन्स आणि रेजिस्ट्रेशन प्राप्त करू शकता.

पर्स ह्या व्यवसायासाठी पॅकेजिंग | Packaging for purse  

तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करणार असाल तर तुम्ही मोठ्या बॉक्स मध्ये ह्या पर्स पॅक करून दुकानांमध्ये विकायला देऊ शकता. किंवा तुम्ही छोट्या प्लास्टिक बॅग्समधून ह्या पर्स देऊ शकता. पुर्ससाठी शक्यतो पॅकिंग करण्याची आवश्यकता नसते. पण तरीही तुम्हाला ह्याची मोठ्या प्रमाणावर विक्री जर करायची असेल तर तुम्ही बॉक्सेस वापरून पॅकिंग करू शकता.

पर्स ह्या व्यवसायासाठी तुम्ही पर्सची किंमत कशी ठरवाल ? | How to decide Price for purse

पर्सची किंमत ठरवण्यासाठी तुम्हाला एका पर्ससाठी किती खर्च येतोय आणि त्यावर तुमचे किती मार्जिन तुम्हाला लावायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही पुर्सची किंमत ठरवू शकता.

तुम्हाला प्रत्येक पुर्ससाठी वेगवेगळा खर्च येऊ शकतो. तुम्ही त्यासाठी पर्सच्या साईजप्रमाणे खर्च बघून तुमचे प्रॉफिट ठरवून मग तुम्ही त्याप्रमाणे पुर्सची किंमत ठरवून त्या पर्स विकू शकता. तसेच तुम्ही मार्केटमध्ये जो काही दर लावला गेला आहे त्याप्रमाणे माहिती काढून तुम्हाला देखील त्या दरामध्ये ह्या पर्स विकणे परवडत असेल आणि तुमचा नफा होत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमची किंमत ठरवून पर्ससाठी किंमत लावू शकता.  

पर्स तयार करण्यासाठी तुम्हाला कारागीर असणे आवश्यक आहेत का किंवा किती कारागीर लागू शकतात? | Staff required for purse business

त्यासाठी तुम्ही हा Purse making business मोठ्या प्रमाणावर करणार असाल तर कारागीर लागू शकतात. पण सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर करून कमीत कमी खर्चामध्ये हा व्यवसाय नंतर वाढवून त्याप्रमाणे तुम्ही कारागीर ठेवू शकता.

तुम्हाला जोपर्यंत चांगले मार्केट मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कारागीर ठेवण्याची आवश्यकता नाही. किंवा तुम्ही मार्केटिंगसाठी सुरुवातीला एक जण ठेवू शकता. जो तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करण्यास तुम्हाला मदत करेल. आणि तुमचा Purse making business जसजसा वाढेल तसे तुम्ही तुमच्या हाताखाली लोक ठेवून हा व्यवसाय वाढवू शकता.

पर्सच व्यवसाय करण्यासाठी साधारणतः किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते? | Investment for purse business

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला महत्वाचे म्हणजे पर्स तयार करण्यासाठी एका शिलाई मशीनची आवश्यकता असेल. जर तुमच्याकडे हि मशीन असेल तर तुम्हाला नवीन मशीन घेण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्हाला ति खरेदी करावी लागेल.

तुम्ही फक्त पर्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यावर सुरुवातीला इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला जागेचा किंवा इतर अनावश्यक खर्च टाळून तुम्ही हा व्यवसाय घरीच चालू करून तुमचा नफा मिळवायला सुरुवात करू शकता. त्यामुळे तुम्ही हा Purse making business अगदी कमी खर्चात चालू करू शकता. 

पर्स तयार करण्यासाठी ट्रेनिंग घ्यायची गरज आहे का ? Training for purse making

तुम्हाला पर्स तयार करण्यासाठी ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता आहे. तुम्हाला ग्राहकांना उत्तम प्रकारच्या पर्स आणि आकर्षक अशा पर्स द्यायच्या आहेत त्यामुळे त्या बनवायला शिकण्यासाठी तुम्हाला त्यासाठी चांगले कोर्सेस पाहून ते जॉईन करून तुम्ही ह्या पर्स बनावयला शिकू शकता. काही ठिकाणी ह्यासाठी सरकारी फ्री मध्ये देखील ट्रेनिंग दिले जाते.

तुम्ही तिथून देखील ह्या पर्स बनलायला शिकू शकता. ट्रेनिंगमध्ये तुम्ही ह्या पर्स चांगल्या रीतीने तयार करायला शिकता त्यामुळे तुमची चांगली प्रॅक्टिस होतेच आणि तुम्हाला ह्यासाठी अजून काय करावे लागते डिझायन्सचे वेगळे प्रकार कसे बनवू शकता ह्याबद्दल माहिती देखील तुम्हाला मिळते त्यामुळे ह्या Purse making business साठी ट्रेनिंग हे गरजेचे आहे. नंतर तुम्ही ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता. 

पर्सची मार्केटिंग कशी कराल ? | marketing for purse

मार्केटिंगसाठी तुम्ही पोस्टर लावून किंवा तुमच्या मैत्रिणींना अजिबाजूला महिलांना तुमच्या व्यवसायाबद्दल सांगू शकता. तुम्ही कॉलेजमध्ये मुलींना तुमच्या Purse making business ची माहिती देऊ शकता.

व्हाट्सअँप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामद्वारे तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग देखील तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही अनेक प्रकारे तुम्ही मार्केटिंग करून तुम्ही तुमचा Purse making business अजून वाढवू शकता. तसेच तुम्ही इतर ठिकाणी मार्केटिंगसाठी दुकानांमध्ये पर्स विकायला देऊन तिथे जरी तुमच्या पर्स लावल्या तरी तुम्हाला तिथून कस्टमर मिळू शकतो.

तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जसे कि India Mart, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ठिकाणी तुमचा व्यवसाय रजिस्टर करून ऑनलाईन तुमचा व्यवसाय चालू करू शकता.

तुम्ही जरी मोठ्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये ह्या पर्स होलसेल रेटमध्ये विकल्या तरी तुम्हाला ह्यापासून चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही मोठ्या चांगल्या शॉप सेन्टरमध्ये जाऊन तिथे तुमच्या Purse making business ची माहिती देऊन तुम्ही त्याचा प्रचार करून तिथे तुमचा माल नेहमी जर तुम्ही दिला तर तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.   

अशा प्रकारे तुम्ही जर पर्स हा Purse making business चालू करायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय चांगल्या रीतीने व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन घरच्या घरी चालू करू शकता.     

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images