रसगुल्ला रेसिपी । Rasagulla Recipe in Marathi

रसगुल्ला रेसिपी । Rasagulla Recipe in Marathi

बंगालमध्ये फेमस अशी मिठाई म्हणून रसगुल्ला ही मिठाई ओळखली जाते. रसगुल्ला (Rasagulla Recipe) दुधापासून बनवण्यात येतो. चवीला अतिशय गोड आणि मोठा असा गोल आकारामध्ये पेढ्याच्या गोल आकारामध्ये रसगुल्ला असतो.

Rasagulla Recipe
Rasagulla Recipe

याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाक असल्यामुळे ज्यावेळी आपण मोठा रसगुल्ला एकदम खातो त्यावेळी अतिशय तोंडामधून सर्व रस बाहेर निघतो. असेच रसगुल्ले बनवण्यासाठी खाली एक रेसिपी दिली आहे ती तुम्ही नक्की करून पहा.

रसगुल्ला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • एक लिटर गाईचे दूध
  • एक मोठा चमचा पांढरे विनेगर
  • सव्वा किलो साखर
  • दोन चमचा मैदा
  • एक चमचा गुलाब पाणी

कृती

  1. दूध उकळून घ्यावे.
  2. उकळलेले दूध बाजूला काढून त्यामध्ये पांढरे विनेगर टाकावे.
  3. दूध फाटले की लगेच एका कपड्यांमध्ये बांधून ठेवावे.
  4. जास्तीचे पाणी काढून टाकून नंतर त्याला चांगले मळावे.
  5. मैदा टाकून त्याचे लहान लहान गोळे तयार करावेत व वेगळे ठेवावेत.
  6. तीन ते चार लिटर पाण्यामध्ये साखर मिसळावी व उकडून घ्यावी.
  7. एकतारी पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये गोळे टाकून दहा मिनिटे उकळावे.
  8. दोन मोठे चमचे पाणी टाकून रसगुल्ले तरंगतील तोपर्यंत शिजवून घ्यावे. थोडेसे गुलाब जल मिक्स करावे.

तुमचे रसगुल्ले खाण्यासाठी तयार. रसगुल्ले तयार झाले की गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे. एका बाऊलमध्ये थंड थंड रसगुल्ले खाण्यासाठी द्यावे. थंड हवे असतील तर फ्रिजमध्ये रसगुल्ले ठेवले तरी चालतील. रसगुल्ल्याची रेसिपी एकदा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी शेअर करायला विसरू नका.

काजू कतली रेसिपी । Kaju Katli Recipe in Marathi

पालक पनीर रेसिपी । Palak Paneer Recipe in Marathi

कुरकुरीत समोसा रेसिपी । Kurkurit Samosa Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee