सांबर रेसिपी I Sambar Recipe

सांबर रेसिपी | Sambar Recipe

सांबर ही रेसिपी (Sambar Recipe) प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या डाळी आणि मसाले टाकून त्यापासून सांबर बनवला जातो. हा सांबर इडली,डोसा,उडीदवडा, उपमा यासोबत खायला दिला जातो. शिवाय महाराष्ट्रामध्ये हा सांबर पोह्यांबरोबर देखील खायला दिला जातो.

Sambar Recipe
Sambar Recipe

साहित्य

  • 1 टीस्पून तुरीची डाळ
  • 1 टीस्पून मटकीची डाळ
  • 1/2 टीस्पून मुग डाळ
  • 1 शेवग्याची शेंग
  • 1/2 कप बारीक चिरलेले टोमॅटो
  • 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1/4 टीस्पून लाल तिखट
  • 1/4 टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेस्पून तेल
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 1/2 टीस्पून जिरे
  • 1/4 टीस्पून हिंग
  • 1/4 टीस्पून कढीपत्ता
  • 1/4 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

  1. सर्वप्रथम तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मटकीची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी. शेवग्याच्या शेंगा कट करून घ्याव्यात.
  2. एका कुकरच्या भांड्यामध्ये सर्व डाळी आणि शेवग्याची शेंग व अर्धा टोमॅटो टाकून कुकरला डाळ शिजण्यास ठेवावी.
  3. तीन शिट्ट्या झाल्या की कुकरची डाळ शिजते. शिजलेली डाळ कुकरमधून बाहेर काढून एका कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकून फोडणी द्यावी.
  4. नंतर हळद, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मसाला एकसारखा परतून घ्यावा.
  5. गरम मसाला वरून टाकून सर्व मिश्रण एकत्रित हलवल्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेली डाळ पळीच्या साह्याने बारीक करून कढईमध्ये मिक्स करावी.
  6. थोडेसे पाणी टाकावे जेणेकरून सांबार पातळ तयार होईल.
  7. वरून सांबर मसाला देखील घालावा व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  8. चांगली डाळ उकळी आल्यानंतर पाच मिनिटे बारीक गॅसवर बंद करून ठेवावी.
  9. तुमची पाच मिनिटानंतर सांबार ची रेसिपी तयार होईल.
  10. हा सांबर तुम्ही इडली डोसा उडीद वडा किंवा पोहे याबरोबर खायला द्यावा.

काही महत्वाच्या टिप

सांबर बनवताना डाळीचे मिश्रण जास्त घट्ट होऊ नये.
सांबर बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता.
उदाहरणार्थ, तुम्ही सांबरमध्ये धनेपूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालू शकता.
सांबरंबरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डोसा, इडली, उडीद वडा , उपमा किंवा पोहे इत्यादी पदार्थ सर्व्ह करू शकता.

रेसिपी एकदा नक्की करून पहा. अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे. झटपट बनवता येण्यासारखी आहे.
सर्व डाळीचे मिश्रण असल्यामुळे ही एक प्रोटीन युक्त रेसिपी आहे.

जर तुम्ही इडली, डोसा चा प्लॅन बनवत असाल तर नक्कीच सांभार बनवा आणि ही रेसिपी वापरून सांबार बनवा. सांबर रेसिपी इतरांना देखील शेअर करा. आवडल्यास आपल्या कमेंट आम्हाला जरूर कळवा आणि दक्षिण भारतातील रेसिपींचा आनंद घ्या.

झटपट बटाटा वेफर्स । Batata Vafers recipe in Marathi

महाराष्ट्रातील लोकप्रिय घावन रेसिपी l Ghawan recipe from Maharashtra

झटपट पुलाव रेसिपी | Quick Pulao Recipe

मोगलाई चिकन बिर्याणी । Moglayi Chikan Biryani recipe in Marathi

शिरखुर्मा रेसिपी । Shirkhurma Recipe in Marathi


Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day